Attacks of Leopard and Wildlife Protection Act : सध्या महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागांमध्ये आपल्याला बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे. बिबट्याचा मानवी वस्तीतील वाढता वावर आणि त्यातून मानवी वस्त्यांमध्ये होणारे वन्यप्राण्यांच्या हल्ले हा सध्या खूप बिकट बनत चाललेला प्रश्न आहे. यामागे कारणे ही तशीच आपल्याला दिसून, आजच्या या लेखात वन्यजीवांचा मानवी वस्ती मधील वाढता वावर व वन्यजीव संरक्षण कायदा इत्यादी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
1)नागरी वस्तीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार
2)वन्यजीवांचे मानवावर होणारे हल्ले-
3)बिबट्यांच्या(वन्यजीव)संरक्षणार्थ उपाययोजना-
4)वन्यजीव संरक्षण कायदा-
5)बिबट्या दिसल्यावर काय कराल?
नागरी वस्तीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार-
नागरी वस्ती मध्ये भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्याचा मुक्त संचार या अलीकडच्या काळात सर्वांच्या चिंतेचा विषय आहे. ऊस हे त्याच्या अधिवासाचे आवडते ठिकाण. नागरी वसाहतीत भक्ष्याच्या शोधार्थ येणारा आणि भटकणारा बिबट्या अनेकदा दिसूनयेतो. वाढते शहरीकरण आणि औद्योगीकरण यामुळे मोठ्या प्रमाणात केलेली वृक्षतोड आणि त्यामुळे वन्यजीवांच्या अधिवासामध्ये सातत्याने होत असलेला मानवी हस्तक्षेप हे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे वन्य जीव हे मानवी वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश करत असून वन्यजीव हे चिडून मानवा वरती हल्ले करताना दिसत आहेत. बिबट्यांचा मानवी हस्तक्षेपामुळे नष्ट झालेल्या नैसर्गिक अधिवास आणि त्यातून त्यांचा सुरू झालेला संघर्ष यामुळे बिबटे हे मानवी वस्तीकडे आकर्षित होताना आपल्याला दिसून येतात. बिबट्यांचा हक्काचा नैसर्गिक अधिवास सध्या त्यांना कमी पडत आहे तसेच शिकारीच्या शोधात भटकणारे बिबटे अनेकदा मानवी वस्तीमध्ये शिरकाव करताना आपल्याला आढळून येतात.
वन्यजीवांचे मानवावर होणारे हल्ले-
एप्रिल 2014 ते 2017 या तीन वर्षात केवळ वाघ आणि हत्ती यांनी केलेल्या सरासरी रोज 1 नागरिकाप्रमाणे 1144 नागरिक मारले गेले आहेत.जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार डास सर्वात जास्त मानवाच्या मृत्यूला कारणीभूत घटक आहे. दरवर्षी 7 लाख 25 हजार लोकांचा त्याच्यापासून प्रादुर्भावा मूळे मृत्यू होतो. हे दुर्लक्षित पण वास्तव आहे.
शेती व उद्योगधंदे विस्तारासाठी तसेच नद्याच्या प्रकल्पासाठी जमिनीची मागणी सारखी वाढत असल्या कारणामुळे जंगलांचा मोठ्या प्रमाणावर नाश होत आहे. तसेच गावागावात दिसत असलेली ही वनराई पूर्वजांनी सातत्याने केलेल्या वृक्षसंवर्धनाची जाणीव करून देतात. परंतु आता वनाचा ऱ्हास होत आहे आणि वृक्षसंवर्धनाची जागा आता अतिक्रमणे, निर्बंध तोडणे, वनवे आणि अनियंत्रित चराई यांनी घेतली आहे.अद्यापही आपल्या देशात इंधन म्हणून जळाऊ लाकडांचा प्रामुख्याने उपयोग केला जातो आणि त्यातून होते ते बेसुमार वृक्षतोड.वन्यप्राणी हल्ले करतात आणि खूप प्रमाणात शेती नुकसान करतानाही दिसत आहेत.पूर्वी मोर दिसला की शुभ शकून मानायचे.पण आता तोच मोर मानवी रस्त्यांच्या अगदी जवळ आला आहे आणि मोठ्या प्रमाणात भाजी पिकांवर ताव मारताना दिसत आहे. त्यामुळे त्याचे मयूर नृत्य आता नेत्रसुखद वाटत नाही आणि त्याचे दिसणे ही नाविन्यपूर्ण वाटत नाही. बऱ्याच ठिकाणी रानडुकरे शेतातील सर्व प्रकारच्या पिकांचे नुकसान करताना दिसत आहे. माकडानाही मानवी वस्त्यांमध्ये आपले वेगळे ठाण मांडले आहे. बऱ्याच वेळा माकडेही मानवावर हल्ला करताना दिसतात कोल्हे,काळवीट, रानडुकरे,गेंडा, गवा, अस्वल, बिबट्या, हत्ती यासारखे प्राणी मानवी वस्त्यांमध्ये प्रवेश करत आहेत.
वन्यजीव संरक्षणार्थ उपाययोजना-
सरकारने वन्यजीव सप्ताह हा नवीन उपक्रम फक्त वन संवर्धनासाठी एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर या कालावधीत नव्याने सुरू केला आहे,या सप्ताहाचे उद्दिष्ट हे आहे की यातून वन संवर्धन होऊन वन्यजीवांसाठी त्यांच्या हक्काचा एक नैसर्गिक अधिवास त्यांना मिळावा. वन्यजीव सप्ताह यातून वृक्षतोड कमी केली पाहिजे हे देखील प्रामुख्याने सांगितले जाते वन संवर्धनासाठी कोणकोणते उपाय आपण अमंलात आणू शकतो यावरही विचार केला जातो.भारतात सध्या 50 अतिसुरक्षित व्याघ्र प्रकल्प असतील अस्तित्वात आहेत या सर्व प्रकल्पाचे उद्दिष्ट हेच आहे की हिंस्र प्राण्यांना त्यांच्या हक्काच्या अधिवासात राहता यावे. वन्यजीवांचे मानवावरती होणारे हल्ले आणि यावरती उपाय म्हणून मानवाने केलेले काही कृत्य हे बऱ्याचदा वन्यजीवाच्या जीवावर बेतल्याचे आढळून आलेले आहे. शेतातील पीक रक्षणासाठी सोडण्यात येणारे विद्युत प्रवाह, तसेच वन्यप्राणी शेतात येऊ नये म्हणून शेताच्या बाजूला तयार केलेले काटेरी कुंपण सोबतच रानडुकरांपासून शेताचे रक्षण व्हावे म्हणून वाजविण्यात येणारे फटाके हे वन्यजीवांना जखमी करू शकतात प्रसंगी वन्यजीवांना या गोष्टीचा इतका फटका बसतो की त्यांना जागेवर आपला जीव गमवावा लागतो. सध्या सुरू असलेला सुष्टीतील दोन जीवांचा संघर्ष हा विजयासाठीचा नसून जगण्यासाठीचा आहे.यातून मानवाने बोध घेणे गरजेचे आहे यावर जनजागृती करून प्रभावी उपाय करणे गरजेचे आहे. फॅब्रिक वॉल्टर चॅम्पियन हे भारतातील पहिले व्यक्ती एक होते ज्यांनी बिबट्याच्या संवर्धनासाठी कार्य केले.
वन्यजीव संरक्षण कायदा Wildlife Protection Act 1972
वन्यजीव संरक्षण कायदा 1972 हा कायदा वन्यजीवांची अवैध शिकार आणि तस्करी रोखण्यासाठी भारत सरकारने प्रारित केलेला एक कायदा आहे. या कायद्यानुसार वन्य प्राण्यांचे शिकारीपासून संरक्षण होते. वन्य पक्षी आणि प्राण्यांची झपाट्याने घट होणारी संख्या याचा विचार करून हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. वन्य प्राण्यांच्या विविध जातीचे संरक्षण व्हावे तसेच त्यांचे नैसर्गिक अधिवासाचे व्यवस्थापन व्हावे व वन्य प्राण्यांच्या विविध शरीराच्या भागातून होणाऱ्या व्यापाराची नियमन आणि नियंत्रण व्हावे यासाठी हा कायदा तयार करण्यात आला आहे. या कायद्यानुसार प्राणी म्हणजे उभयचर प्राणी पक्षी, प्राणी आणि सरपटणारे प्राणी त्यांची पिल्ले तसेच पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या बाबतीत त्यांची अंडी इत्यादी सर्व यांचे संरक्षक होते.
या कायद्यानुसार वन्य प्राण्यांना पकडणे, ठार मारणे, विषबाधा करणे,सापळा करणे,वन्य प्राण्यांना पकडून त्यांना ठाणे ठार मारण्याचा प्रयत्न करणे हे सर्व गुन्हे आहेत.वन्य प्राण्यांच्या शरीराच्या कोणत्याही भागाला दुखापत करणे नष्ट करणे किंवा कापून घेणे पक्षांच्या अंड्यांचे नुकसान करणे किंवा पक्ष्यांच्या घरट्याला नष्ट करणे. वाढत्या शहरीकरणाचा फटका हा वन्यजीवांना सहन करावा लागत आहे.
बिबट्या दिसल्यावर काय कराल?-
निवासी वस्तीमध्ये भरकटलेले अनेक बिबटे भक्षाच्या शोधार्थ येताना दिसून येतात. जर तुम्हाला तुमच्या आसपास एकादा बिबट्या आढळून आला तर तुम्ही काय करावे,याविषयी आता आपण जाणून घेणार आहोत.
:बिबट्या आपल्या समोर आल्यावर प्रथम आपण जागचे न हालता आहे तिथेच उभे राहावे आपण हालचाल केल्यास बिबट्या आपल्यावरती हल्ला करू शकतो.
:बिबट्या आपल्या आपल्याला दिसला तर त्याला दगड मारून किंवा कोणतीही अंकुचीदार वस्तू वापरून हाकलून देण्याचा प्रयत्न करू नका.
:आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तो अधिकच हिंस्र बनून प्रतिहल्ला करू शकतो.
:तुमच्या परिसरात एखादा बिबट्या आढळून आल्यास तात्काळ वन विभागाला कॉल करून याबाबतची माहिती सांगावी.
:वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी आल्यानंतर त्यांच्या कार्यामध्ये कुठलाही अडथळा आणू नये त्यांना लागेल ते सहकार्य करावे.
बिबट्यांचा वाढता मानवी वस्ती कडील शिरकाव आणि यामागील कारणे तसेच बिबट्यांचे मानवावरती होणारे हल्ले यातून सध्याची परिस्थिती ही एक वेगळेच वळण घेताना आपल्याला दिसून येते. वृक्षतोडीमुळे बिबट्यांना त्यांचे हक्काचे अधिवास सोडून इतरत्र भटकावे लागत आहे. शिकार करण्यासाठी आणि शिकारी लोकांपासून वाचण्यासाठी अनेक वन्यजीव आपल्याला मानवी वस्त्यांचा आश्रय घेताना सध्या आढळून येतात प्रसंगी हे वन्यजीव जखमी होतात आणि काही वेळेस त्यांना आपला जीव देखील गमावा लागतो.
बिबट्यांचा मानवी वस्ती मधील वाढणारा वावर तसेच वन्यजीवांचे मानवावरती होणारे हल्ले व वन्यजीव संरक्षण कायदा आणि सरकारने वन्यजीवांच्या संरक्षणासाठी केलेले विविध उपाय याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा तसेच अशाच विविध माहितीपूर्ण गोष्टीसाठी आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला नक्की भेट द्या. तुमच्या सूचनांचे स्वागतच राहील.
Adv.विनिता झाडे मोहळकर.