राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे I
‘`राम’ ही केवळ दोन `अक्षरे नाहीत तर राष्ट्रमंत्र आहे, जय श्रीराम हा केवळ एक जयघोष नाही तर समस्त भारतीयांची प्रेरणा आणि अस्मिता आहे. भारतीयांचे अवघे जीवन श्रीरामांनी व्यापलेले आहे, अयोध्येत श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे. ५०० हून अधिक वर्षानंतर श्रीरामांचे अयोध्येत राम मंदिर बनत आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात या सोहळ्याचा उत्साह, आनंदाचे वातावरण झालं आहे, त्या निमित्ताने राम मंदिराविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात (Ayodhya Ram Mandir Full Information in Marathi) जाणून घेणार आहोत.
वाल्मिकी ऋषींनी रचलेले रामायण एक महाकाव्य, हिंदू धर्मातील एक पवित्र ग्रंथ. रामायण महाकाव्यातील श्रीराम हे नायक. अयोध्या, श्रीरामाच्या पूर्वजांची राजधानी, या नगरीचे रघुवंशी महाराज दशरथ व ज्येष्ठ राणी कौशल्या यांचे पुत्र श्रीराम. श्रीरामांचे वास्तव्य त्रेता युगात होते असे म्हटले जाते.

राजकीय आणि कायदेशीर लढाई नंतर श्री रामांचे अयोध्येत राम मंदिर बनत आहे. राम मंदिर मुक्तीसाठी एकूण ७६ लढाया झाल्या चला तर मग पाहूया या राम मंदिराचा इतिहास.
राम मंदिर इतिहास
वाल्मीकींच्या रामायणानुसार श्रीरामांनी जलसमाधी घेतल्याचे म्हटले जाते. बराच काळानंतर उज्जैनचा राजा विक्रमादित्य अयोध्येत आला त्याने या ठिकाणी खोदकाम सुरू केलं, श्रीरामाचे अस्तित्व असल्याचे दिसून आले व राजा विक्रमादित्याने रामाच मंदिर बांधलं. अनेक वर्ष मंदिरात रामाची पूजा केली जात होती.
चौदाव्या शतकात मुघलांची सत्ता आली. बाबरचा १५२६ मध्ये मेवाडचा राणा संग्राम सिंह यांनी लढाईत पराभव केला. पराभवानंतर बाबरची नजर अयोध्येतील राम मंदिरावर पडली त्याने आपला सेनापती मीर बाकी वर राम जन्मभूमीवरील राम मंदिर उद्ध्वस्त करून तेथे मस्जिद बांधण्याची जबाबदारी सोपवली.
अयोध्या रक्षणासाठी अक्षरशहा हजारो हिंदूंनी आपले र*क्त सांडले. मुसलमानांची सेना व तोफखानाने सज्ज होती, यात एकूण १ लक्ष ७१ हजार हिंदू वीरांनी बलिदान दिले. पण अखेर २३ मार्च १५२८ ला मीरबाकीने अयोध्येतील राम मंदिर उ*द्ध्वस्त केले. पुढे मस्जिद ला ‘बाबरी मस्जिद’ असे नाव देण्यात आले.
परंतु हिंदू शांत बसले नाहीत.हिंदूंनी परत एकदा राम भक्त पंडित देवीदिन पांडे यांच्या नेतृत्वाखाली एक लढा उभा केला पांडेजींनी ७० हजाराची फौज उभी केली. बाबरनी च लिहून ठेवले आहे की केवळ देवीदिन ने ७०० मुस्लिम यु*ध्या*त ठा*र मारले. सुमारे पाच दिवस तुंबळ यु*द्ध झालं ,अखेरीस देवीदीन पांडेला बंदु*की*ची गो*ळी घालून ठा*र मारले गेले.
त्यानंतर हंसवर रियासत ची राणी राजकुमारी ने 3000 विरांगणाची एक पलटण उभी करून दहा मोठ्या चढाया केल्या. अखेरच्या हल्ल्यात राणी रणांगणात म*रण पावली. यानंतर औरंगजेबाने सय्यद हसन अलीच्या नेतृत्वाखाली बा*बरी मशिदीच्या रक्षणासाठी पन्नास हजारांची फौज पाठवली तेव्हा बाबा वैष्णव दास यांनी पंजाब मधील रणझुंजार गुरु गोविंद सिंह यांनी मिळून सैन्य परतावले.
१८५३ – आयोध्यात धार्मिक हिंसाचाराची सुरुवात झाली. राम मंदिर जागेवरून पहिल्यांदा दोन समुदायात वाद निर्माण झाला. राम जन्मभूमी च्या जागेवर मंदिर पा*डून त्या ठिकाणी बाबरी मशीद उभारल्याचा दावा हिंदू संघटनांकडून करण्यात आला मंदिर मशिद वादातून पहिल्यांदा जागेवर दं*ग*ल पेटली.
१८५९ – ब्रिटिश प्रशासनाने क्षेत्राभोवती कुंपण उभारले. मुसलमानांना आत प्रार्थना (नमाज) करण्याची आणि हिंदूंना अंगणात पूजा करण्याची परवानगी दिली.
१८८५- चौथरावर मंदिर उभारण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी महंत रघुवीर दास यांनी फैजाबाद न्यायालयासमोर केली परंतु न्यायालयाने ती नाकारली.
१९४९- रामचरित मानसचे पठण आयोजन करण्यात आले व हिंदू कार्यकर्त्यांनी मस्जिदत प्रवेश केला व राम आणि सीतेच्या मूर्ती ठेवल्या.त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने तातडीने मूर्ती हलवण्याचे आदेश दिले परंतु जिल्हा दंडाधिकारी के.नायर यांनी धार्मिक भावना दुखावण्याचा आणि हिंसाचार भडकण्याच्या भीतीने त्यांनी आदेशाची अंमलबजावणी करण्यास असहमती व्यक्त केली.
१९५०- वादग्रस्त जमिनीसाठी न्यायालयात एका लढायची सुरुवात झाली. फैजाबाद दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली मुर्त्या हटवण्यात येऊ नयेत परंतु त्या टाळेबंदीत राहतील आणि केवळ पुजाऱ्या कडून पूजा सुरू राहील जनता बाहेरून दर्शन घेईल असे आदेश दिले.
१९६१- उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाने वादग्रस्त जमीन ताब्यात घेण्याची आणि मूर्ती ह*टवण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली.
१९८४- विश्व हिंदू परिषदेने आयोजित मंदिर निर्मितीसाठी एका समितीची स्थापना केली.
१९८६- १ फेब्रुवारी १९८६ रोजी फैजाबादचे जिल्हा न्यायाधीश उमेशचंद्र पांडे यांच्या याचिकेवर आधारित के एम पांडे यांनी हिंदूंना पूजा करण्याची परवानगी दिली आणि त्या वास्तूवरील कुलूप काढून टाकण्याचे आदेश दिले. राजीव गांधी यांचे सरकार ही या निर्णयाला अनुकूल होते. कोर्टाच्या या निर्णयाविरुद्ध बाबरी मस्जिद कमिटी तयार करण्याचा निर्णय झाला.
१९८९- विश्व हिंदू परिषदेचे नेते देवकीनंदन अग्रवाल यांनी मंदिराचा दावा करत आणखीन एक खटला दाखल केला व नोव्हेंबर 1990 केंद्र सरकारच्या परवानगीने म*स्जिदी पासून थोड्या अंतरावर राम मंदिर भूमिपूजन करण्यात आलं.
१९९०- हिंदू समाजात राम जन्मभूमीची माहिती पोहोचवण्यासाठी गंगामाता, भारत माता यात्रा, श्रीराम जोत यात्रा, श्रीराम शिलापूजन असे अनेक कार्यक्रम देशभरात घेण्यात आले त्यानंतर प्रत्यक्ष राम जन्मभूमीवर जाऊन कार सेवा करायचं ठरलं कार सेवक आयोध्या पर्यंत पोहोचू नयेत म्हणून त्यावेळेसचे मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांनी सर्व वाहतुकीचे मार्ग बंद केले होते वीस हजार सश*स्त्र जवान तयार करण्यात आले होते दिनांक 30 ऑक्टोबर १९९० हा दिवस कार सेवेचा निश्चित झाला. जन्मभूमीचा परिसर कार सेवकांनी अक्षरशा भरून गेला कित्येक कार सेवक वानरा सारखे घुमटावर जाऊन चढले जय श्रीरामांच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. ‘रामलल्ला हम आये है मंदिरही बनायेंगे’ च्या ललकाऱ्या उमटत होत्या.
१९९२- सहा डिसेंबर १९९२ रोजी एक ऐतिहासिक घटना घडली. विश्व हिंदू परिषद व शिवसेनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी वादग्रस्त वास्तू पाडली ही वास्तू पाडल्यानंतर देशभरात जातीय दंगली उसळल्या आणि हजारो लोकांचे प्राण गेले.
२००२- कार सेवा करण्यासाठी जाणार्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना लक्ष करत गुजरात स्थानकात एका ट्रेनला आग लावण्यात आली. घटनेमुळे गुजरात मध्ये दंगल उसळला आणि 2000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
बुद्धिमेत्तेचे प्रकार कोणते , बुद्धिमत्ता कशी ओळखावी ? माहिती वाचा
२००३ -न्यायालयाने राम जन्मभूमीवर उत्खनन करण्यास सांगितले त्यात मंदिराच्या अनेक अवशेष सापडल्याचे भारतीय पुरातत्व विभागाने अयोध्येतील उत्खनन अहवालात नमूद केले.
२०१०- अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त जमीन सुन्नी वक्फ बोर्ड, राम मंदिर विराजमान आणि निर्मोही आखाडा यांच्यातील समान भागांमध्ये विभागली.
२०११- आयोध्या वादावर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.
२०१७- सर्वोच्च न्यायालयाने न्यायालाया बाहेर तोडगा काढण्याचे संबंधित पक्षकारांना निर्देश दिले त्याशिवाय अनेक भाजप नेत्यांवर गु*न्हेगारी कट रचलाचा आरोप निश्चित करण्यात आले.
२०१९- सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय दिला त्यात राम जन्मभूमीवर मंदिर बांधण्यास अनुमती दिली यासाठी भारत सरकारला एक ट्रस्ट तयार करून त्यांच्या ताब्यात रामजन्मभूमीची जमीन सोपवण्यास सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने आठ आठवड्यांच्या आत कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले. ९ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने रामजन्मभूमीच्या बाजूने निकाल दिला. विवादित 2.77 एकरची संपूर्ण जमीन हिंदू बाजूस दिली आणि अतिरिक्त पाच एकर स्वतंत्रपणे मशिदीसाठी देण्याचे निर्देश दिले.
२०२०- २५ मार्च 2020 रोजी २८ वर्षानंतर श्रीरामांच्या मूर्ती मंडपातून फायबर मंदिरात हरवण्यात आल्या आणि ५ ऑगस्ट रोजी मंदिराच्या बांधकामाचा भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला. राम जन्मभूमीवर भव्य मंदिराचे उभारणी करण्यासाठी संपूर्ण देशभर २०२१ मध्ये मकर संक्रांतीपासून पुढे 44 दिवस निधी समर्पण अभियान घेण्यात आले या अभियानात हिंदू समाजातील सर्व स्तरातील लोकांनी सहभाग घेतला या अभिनव अभियानात २००० कोटी रुपयांचा निधी जमा झाला.
२०२३- अयोध्येत रामाचे भव्य मंदिर तयार झाले. 22 जानेवारी 2024 रोजी श्रीरामांचे भव्य मंदिराचे लोकार्पण होईल ज्यामुळे अनेक दशकांपासून सुरू असलेला वाद संपुष्टात येईल आणि रामाची पूजा विधिपूर्वक केली जाईल.
श्रीराम मंदिर रचना (Ayodhya Ram Mandir Full Information in Marathi)
· देशातील इतर मंदिरांचा अभ्यास करून श्री राम मंदिराची रचना करण्यात आली आहे . श्रीराम मंदिर हे मंदिर पारंपारिक नांगर लीत बांधले आहे. पुढील ८०० ते १००० वर्ष टिकणारे आहे.
· श्री राम मंदिर कोणार्क मंदिरासारखी रचना आहे.
· श्रीराम मंदिराची पूर्व पश्चिम लांबी-३८० फूट आणि रुंदी-२५० फूट तसेच उंची १६१ फूट आहे.
· मंदिर तीन मजली आहे. प्रत्येक मजला वीस फूट उंच आहे मंदिराला 392 खांब आणि 44 दरवाजे आहे.
· भुतल गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या बालमूर्ती स्थित आहेत आणि प्रथम गृहात श्रीराम दरबार आहे.
· नृत्य मंडप, रंग मंडप, घोडमंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे पाच मंडप आहेत.
· खांबावर तसेच भिंतीवर विविध देवी देवतांच्या तसेच देवांगनांच्या मूर्ती आहे.
· मंदिरात 32 पायऱ्या सोडून पूर्व दिशेच्या सिंहदारातून प्रवेश होईल.
· दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टचे व्यवस्था करण्यात आली आहे.
· मंदिराच्या चहू बाजूला आयताकृती प्राकार आहे त्याची लांबी ती 732 मीटर आणि रुंदी 4.25 मीटर आहे.
· प्रकाराच्या चारही कोपऱ्यांमध्ये चार मंदिरे आहेत भगवान सूर्य, भगवान शंकर, श्री गणेश, देवी भगवती तसेच दक्षिण बाजूस श्री हनुमान आणि उत्तर बाजूस अन्नपूर्णा देवीचे मंदिर आहे.
· मंदिराजवळ पौराणिक काळातील सीता कूप आहे.
· श्रीराम मंदिर परिसरात महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्ष स्वागत राजगुरू, माता शबरी आणि देवी अहिल्या यांचेही मंदिरे प्रस्थापित आहेत.
· नैऋत्य भागातील नवरत्न कुबेर तिला येथील शिवमंदिरांच्या जीवन उद्धार तसेच रामभक्त जटायचे स्थापना करण्यात आली आहे.
श्रीराम मंदिर बांधकामातील वैशिष्ट्य :
श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी राजस्थानमधील लाल आणि पांढरा दगडाची निवड करण्यात आली आहे. याचे विशेष कारण म्हणजे हा दगड हजारो वर्ष टिकतो. संपूर्ण राम मंदिर निर्माणासाठी एकूण खर्च १८०० कोटी रुपये होणार आहे व मंदिर परिसराच्या विकासासाठी अजून खर्च होणार आहे. श्रीराम मंदिरातील श्रीराम आणि माता सीता यांची मूर्ती शाळीग्राम या पवित्र दगडापासून बनवण्यात आली आहे कारण शालिग्राम दगडात श्री विष्णू विराजमान असतात त्यामुळेच हा दगड नेपाळमधून मागवण्यात आला आहे.
श्रीराम मंदिर कोणत्या कंपनीने बांधले ?
टाटा समूह आणि बांधकाम कंपनी एल अँड टी द्वारे श्रीराम मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे.
अयोध्येतील राम मंदिर कसे जायचे ?
अयोध्येला जाण्यासाठी संपूर्ण जगातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध आहेत. तसेच रेल्वे मार्गसुद्धा उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातून अयोध्येसाठी थेट रेल्वे सेवा उपलब्ध आहे .
श्रीराम मंदिर साठी कित्येक पिढ्या लढल्या त्यांच्यामुळेच राम मंदिर प्रत्याक्ष्यात आले, राम रामजन्मभूमीवरील मंदिरात पुन्हा विराजमान होताना आपण पाहणार आहोत. राम मंदिर आपल्या हयातीत निर्माण झाले याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. या अपूर्व सोहळ्याचे आपण हि साक्षीदार होणार आहोत.
तर हि आहे श्रीराम मंदिराची माहिती ,तुम्हाला हि माहिती नक्की आवडली असेल. तर शेयर नक्की करा. आणि अश्याच update साठी website ला भेट द्या. (Ayodhya Ram Mandir Full Information in Marathi)
जय श्रीराम ! जय श्रीराम ! जय श्रीराम !
डॉ. सुप्रिया सांगवीकर , औरंगाबाद
खूप सुंदर माहिती.
खूप छान माहिती लिहिली आहे.
Nice and objective information….!!
माहितीपूर्ण लेख 👍🙏
छान माहीती
अतिशय माहिती पूर्ण लेख आहे. राम मंदिरा बद्दल आभिमन जागृत होतो. आपल्या मुलांनाही हा लेख वाचायला सांगावा
जय श्रीराम अतिशय सुंदर लिखाण केले आहे
जय श्रीराम अतिशय सुंदर लिखाण केले आहे
खूप सुंदर माहिती.. जय श्री राम 🙏
Khup Important information..
Thankyou
माहितीपूर्ण लेखन , अशा लेखनामुळे ज्ञानात खूप भर पडते.
जय श्रीराम अतिशय सुंदर लिखाण केले आहे
जय श्रीराम अतिशय सुंदर लिखाण केले आहे👍
Jai shriram khup Chan v mahitipurvak likhan
महात्वपूर्ण महिती आहे..जय श्री राम
फारच छान माहिती व मंदिराचा इतिहास कळला.
जय जय श्रीराम
अतिशय सुंदर माहिती संकलन केले आहे.भुतो न भविष्य असे मंदिर उभारणी अतिशय आनंददायी…