निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी फेस सिरमचे फायदे :-
अजूनपर्यंत आपण मॉईश्चराइजर, सन्सक्रीन, फेशवॉश, फेसक्रीम बद्द्ल माहिती घेतली असेल पण आता बाजारात फेस सिरम आलेले आहे. वयाच्या पंचविशी नंतर आपण आपल्या स्कीन टोन नुसार ते वापरू शकतो. मग ती स्कीन ड्राय, ऑईली किंवा सर्वसामान्य असेल तरी प्रत्येक स्कीनसाठी आपण हे सिरम वापरू शकतो.
फेस सिरम हे अगदी हलके आणि मॉईश्चराइजर सारखे असते पण मॉईश्चराइजरपेक्षा चांगल्याप्रकारे ते आपल्या त्वचेवर काम करते. सिरम हे मॉईश्चराइजर सारखेच पातळ द्रव्य असते. हे लावल्याने आपला कोणत्याही प्रकारचा स्कीन टोन असेल तरी आपला चेहरा आणखी ग्लो होण्यास मदतच होते.
बदलत्या हवामानाचा, आपल्या आहारातील काही सवयी, आपली धावपळ, तरुण मुली म्हटलं तरी त्यांची नोकरी व्ययसायातील दगदग याचा सगळ्याचा परिणाम आपल्या त्वचेवर नकळतपणे होत असतो. तसेच सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यामुळे आपली स्कीन टॅन आणि वृद्ध देखील होते. ऑफिसमधील धावपळ, घरातील समस्या, मुले संसार या सगळ्याचा परिणाम आपल्या झोपेवर होतो आणि अकाली वृद्धत्वाला सामोरे जावे लागते. पिंपल्स, चेहर्यावरील सुरकुत्या, डोळ्याखालील काळी वर्तुळे यामुळे आपल्या सौदर्यात बाधा निर्माण होते. यासाठीच आपण फेस सिरमचा वापर करून आपले सौदर्य वृद्धिंगत करू शकतो.

उत्तम रिझल्टसाठी आपण कुठले सिरम? आणि ते कशा प्रकारे निवडता येईल? हे जाणून घेणे महत्वाचे आहे. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
आपण आता आपल्या त्वचेनुसार कोणते सिरम वापरू शकतो हे पाहणार आहोत.
सिरम कधी वापरायचे असते?
वय वर्षे २५ च्या पुढे आपण सिरम लावू शकतो, पण काही सिरम ही अगदी वयाच्या विशीत सुद्धा लावू शकता, तर काही सिरम तर टीन एजर्स सुद्धा लावू शकतात. सिरम हे सकाळी किंवा रात्री लावू शकता पण ते कुठल्या प्रकारचे सिरम आहे त्यावर अवलंबून असते. पण त्यासाधी आपल्या त्वचेचा प्रकार आपल्या डॉक्टरकडून एकदा समजून घ्या. आपण आता स्किनकेअरच्या पद्धतीमध्ये सिरम कधी लावायचे असते? ते आधी जाणून घेऊ.
आधी चेहरा स्वच्छ धुवून घेतल्यावर सिरम लावायचे, त्यावर मॉईश्चराइजर लावायचे आणि घरातून बाहेर पडायचे असल्यास त्यावर सनस्क्रीन लोशन लावणे गरजेचे आहे. या आणि अशाच पद्धतीने सिरम लावणे आवश्यक आहे. यातली एकही स्टेप स्किप करू नका.
सिरम प्रकार
आता आपण सिरमचे काय काय प्रकार आहेत ते ही पाहू, म्हणजे तुम्हाला ठरविता येईल की तुमच्या स्कीन टोनला कुठले सिरम उपयुक्त आहे.
•हायलुरोनिक अॅसिड: – हायलुरोनिक अॅसिड नावाचे जे सिरम आहे ते अगदी मॉईश्चराइजरसारखे काम करते. म्हणजे आपल्या चेहर्याला लावल्यानंतर ते आपल्या चेहर्यावर पाणी शोषून ठेवते. त्यामुळे त्वचा सतत टवटवीत, तुकतुकीत राहते. हे सिरम कोणत्याही स्कीन टोनसाठी तुम्ही लावू शकता. सिरम हे शक्यतो सकाळी लावायचे असते. हायलुरोनिक अॅसिड हे काही प्रॉडक्ट मध्ये मोईश्चराइजर कम हायलुरोनिक अॅसिड अशा स्वरुपात मिळते. अशा प्रकारचे जर सिरम वापरले तर आपली त्वचा दिवसभर टवटवीत राहील.
•सलिसिलिक अॅसिड: – ज्यांच्या चेहर्यावर पिंपल्स येत असतील तर सलिसिलिक अॅसिड हे त्यांच्यासाठी बेस्ट फ्रेंड आहे. सलिसिलिक अॅसिड हे बिटा हायड्रोक्सिड अॅसिड आहे त्यामुळे आपल्या स्कीन वरील तैलग्रंथीच्या प्रमाणाला रोखण्याचे काम करते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कोणत्या वेळी लावावे? तर हे सिरम रात्री झोपताना लावायचे. ज्यांची स्कीन तेलकट आहे, ज्यांच्या चेहर्यावर पिंपल्स येतात, ज्यांना ब्लॅक हेड्सची समस्या भेडसावते. अशा समस्यांनी त्रस्त असणार्यांनी आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावायचे. याचे रिझल्ट्स चांगले मिळतात. पण चांगले रिझल्ट्स मिळाले म्हणून कधीही रोज लावणे टाळावे तसेच दिवसा लावणे टाळावे. हे सिरम रात्री झोपताना लावणे कधीही इष्ट. ज्याठिकणी पिंपल्स येतात त्याठिकाणी लावून ठेवावे त्यानंतर त्यावर मोईश्चराइजर आणि सनस्क्रीनने त्वचेला प्रोटेक्ट करणे आवश्यक आहे.
•ग्लायकोलिक अॅसिड सिरम: – जर तुमच्या त्वचेवर पिंपल्स येऊन गेल्यावर काही डाग राहत असतील तर त्यांच्यासाठी ग्लायकोलिक अॅसिड सिरम लावणे हा एक उत्तम उपाय आहे. आणि ते सकाळच्या रुटीनमध्ये तुम्ही लावू शकता. ते कस लावाल तर आधी चेहरा फेसवॉशने स्वच्छ करून घ्यायचा त्यानंतर टोनर वापरल्यासारखे तुम्ही हे चेहर्यावर वापरू शकता. चेहर्याला कापसाच्या सहाय्याने पुर्णपणे लावून घ्यायचं. ते पूर्ण पुसून घ्यायचं अर्थात कापसाच्या सहाय्याने. हे लावून झाल्यानंतर मोईश्चराइजर लावायला विसरू नका आणि घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावायला विसरायचे नाही. ज्यांची स्कीन तेलकट आहे ते ह्याचा उत्तमप्रकरे वापरू शकतात. अगदी आठवड्यातून तीन ते चार वेळा लावल्याने तुमची त्वचा उजळ दिसू लागते. डाग विरहित नितळ त्वचा पाहायला आणि अनुभवला मिळते. पण एक लक्षात घ्या ज्यांची स्कीन सेंसिटीव्ह आणि ड्राय आहे त्यांनी याचा वापर टाळावा. जर वापरायचे असेल तर एकदा स्कीन टेस्टर म्हणून वापरून पहावे नंतर जर सूट झाले तर आठवड्यातून एकदाच वापरावे.
•ट्रेटीनोल: – ट्रेटीनोल म्हणजे विटामीन ई आहे. हे त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे. ट्रेटीनोल हे रात्री झोपताना लावणे. ट्रेटीनोल चे प्रमुख कार्य म्हणजे आपली मृत त्वचा काढून टाकून नवीन नितळ त्वचा येण्यास मदत करते. पण ट्रेटीनोल लावल्यावर मोईश्चराइजर लावायला विसरू नका कारण रेटिंनोलमुळे आपली स्कीन ही ड्राय होऊ शकते. नुसती शकतेच नाही तर यामुळे त्वचा ड्राय होतेच. त्यामुळे त्यानंतर मोईश्चराइजर लावणे अत्यावश्यक आहे. हे लावल्यावर सकाळी उठल्यानंतर ग्लायकोलिक अॅसिड लावायचे त्यानंतर मोईश्चराइजर लावायचे आणि न विसरता सनस्क्रीन लावायचे. कारण आपण रात्री जर रेटीनोळ लावलेले असते त्यामुळे आपली मृत त्वचा जाऊन नवीन स्कीन येण्याची प्रकिया सुरू झालेली असते. त्यामुळे जर मोईश्चराइजर आणि सनस्क्रीन लावून आपली त्वचा आपण प्रोटेक्ट केली नाही आणि जर तुम्ही उन्हाच्या संपर्कात आलात तर तुमची स्कीन काळी पडण्याची दाट शक्यता असते.
सिरम कोणत्या वयात हे वापरायचे असते?
· तर तुमचे वय जर 20 ते 25 असेल तर आठवड्यातून दोन वेळा
· जर तिशीत असाल तर आठवड्यातून तीन वेळा
· जर चाळीस आणि त्यापेक्षा जास्त असेल तर आठवड्यातून चार ते पाच वेळा लावणे आवश्यक आहे. त्याबरोबरच मोईश्चराइजर लावणे सुद्धा गरजेचे आहे. कारण आपल्या वयाच्या 30 ते 40 नंतर आपल्या स्कीनसाठी ओलावा असणे गरजेचे असते. तो नसेल तर आपली स्कीन ड्राय, वृद्धात्वाकडे झुकलेली आणि सुरकुत्या असलेली भासु शकते.
•नियासिनमाईड सिरम:
नियासिनमाईड सिरम हे भरपूर सिरम बरोबर एकत्र लावता येते. ते आपण रोजही लावू शकतो. नियासिनमाईड सिरम हे त्वचेतील ऑइल कंट्रोल करते त्यामुळे ड्राय आणि सेंसिटीव्ह स्कीनसाठी हे तितकेसे उपयुक्त नाही. हे सिरम दिवसा वापरायचे असते. हे लावताना याचा क्रम मात्र असा ठेवावा आधी क्लीनझर, टोनर, नायसिनेमायडी सिरम, मोईश्चराइजर आणि न विसरता सनस्क्रीन वापरायचे आहे. अशा योग्य पद्धतीने जर तुम्ही सिरमचा वापर केला तर तुम्ही चिरतरुण राहू शकता.
•विटामीन सी सिरम: – विटामीन सी हे एक अॅण्टी एजिंग चे काम करते . आपले जस जसे वय वाढत जाते तस तसे आपली स्कीन ड्राय होत जाते. म्हणजेच आपणा वृद्धात्वाकडे झुकू लागतो पण विटामीन सी सिरम हे यासाठी एक वरदानच आहे. आपल्या त्वचेला ग्लो सुद्धा विटामीन सी मुळे येऊ शकतो. आपल्याला आपल्या डिलिव्हरीच्या वेळेला स्किनमध्ये विटामीन सी ची भरपूर आवश्यकता असते. आणि डिलिव्हरी नंतर आपली स्किन थोडी डल होऊ लागते. तर विटामीन सी सिरम हे त्यावेळी उपयुक्त तर असतेच तर आपल्या रोजच्या वापरतही विटामीन सी हे असलेच पाहिजे.
फेस सिरम खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा: –
•फेस सिरम खरेदी करण्यापूर्वी तुमच्या स्किन टोन साठी कोणते सिरम उपयुक्त आहे याविषयी डॉक्टर कडून खात्री करून घ्या.
•सिरम लावल्यानंतर त्यावर मोईश्चराइजर आणि सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे.
•सिरम लावताना ते काही थेंब एवढेच लावणे अपेक्षित असते कारण याचा जास्तीचा वापर त्वचेसाठी हानिकारक आहे.
•सिरम लावल्यानंतर मसाज करणे टाळावे.
मैत्रिणींनो तुम्हाला “फेस सिरम याविषयीची” ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. तुम्हाला ही माहिती आवडली का? हा लेख कसा वाटला? तेही कमेन्ट बॉक्स मध्ये कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhsApp ग्रुप हि जॉईन करा.
लेखिका : सपना कद्रेकर, मुंबई
Good,, Nice information 👍🏻
Very informative