Best Apps for Translation :आपल्याला माहिती आहेच की इंटरनेट म्हणजेच गूगलवर आपल्याला महितीचा खजिना सापडतो. एखादी गोष्ट आपल्याला माहीत नसल्यास आपण इंटरनेट वरून सहज शोधू शकतो आणि ते ही एका किल्क मध्ये. पण ही सगळी माहिती असते ती इंग्रजी भाषेमध्ये. जर आपल्याला इंग्रजी येत नसेल तर आपल्याला ते समजणे कठीण जाते. किंवा आपल्याला एखादा इंग्रजी शब्द समजायला अवघड जातो, त्यामुळे आपल्याला त्या शब्दाचा तसेच त्या वाक्याचा अर्थ समजला नाही तर सागलच कठीण होऊन बसते, म्हणून आम्ही ही माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत .
आपण आपल्या मातृभाषे मध्ये ही माहिती मिळवू शकतो तर ती कशी? तर आपल्याला खालील अॅप्स हे आपल्या भाषेमध्ये अनुवाद करून देतात ते ही विनाशुल्क, म्हणजे तुम्हाला ट्रान्सलेटरकडे जाण्याची आवश्यकता नाही. काही अॅप्स अशी आहेत जी तुम्हाला अचूक ट्रान्सलेशन करून देऊ शकत नाहीत पण तुम्हाला त्या विषयाचे आकलन निश्चितच होते. तर आज आम्ही तुम्हाला अशा अॅप्स विषयी माहिती देणार आहोत जिथे तुम्हाला इंग्रजी भाषेतील कंटेंट हा तुमच्या मराठी किंवा इतर भाषेमध्ये अनुवाद करून देईल.
इंग्रजीतून मराठी अनुवाद किंवा ट्रान्सलेट करून देणारे अॅप्स l Best Apps for Translation
• Google Translate गुगल ट्रान्सलेट
• Microsoft Translator मायक्रोसॉफ्ट ट्रांसलेटर
• Hi Translate
• Marathi to English Translator
• Translate All
• Speech to Speech translation
• English Marathi /Dictionary
• Text to Voice Translator
१. गूगल ट्रान्सलेट (Google Translate):-
गूगलचे गुगल ट्रान्सलेट हे एक असे अॅप आहे जे आपल्याला इंग्रजीभाषेतील कंटेंट आपल्या भाषेमध्ये भाषांतर करून देते. हे अॅप गूगलने एप्रिल २००६ पासून सुरू केले. ज्यावेळी हे अॅप सुरू झाले त्यावेळी अमेरिका तसेच यूरोपियन पार्लमेंट मधील कागदपत्रे ही या अॅपच्या मदतीने भाषांचा डेटा तयार करण्यासाठी वारण्यात आला. पण आता जेवढा भाषांतरचा पर्याय वापरला जातो तसा त्यावेळी कुणी वापरत नव्हते.
आता मात्र संपूर्ण जगच गुगल ट्रान्सलेटचा वापर करते. २०१६ मध्ये मात्र याचा विस्तार केला गेला. पूर्वी कुठल्याही भाषेचा इंग्रजी अनुवाद होत होता, हळू हळू एका भाषेचा दुसर्या भाषेत अनुवाद होऊ लागला. आजच्या काळात मात्र शंभरपेक्षा अधिक भाषांचा अनुवाद वेगवेगळ्या भाषांमध्ये केला जातो. याआधी फक्त एखाद्या शब्दाचा अर्थ भाषांतरित केला जात होता. आता मात्र आख्खं पान संपूर्णपणे भाषांतरित करायची सोय उपलब्ध केली आहे. गूगल ट्रान्सलेट हा एक असा पर्याय आहे जो तुम्ही इंग्रजी भाषेचा दुसर्या भाषेत अनुवाद करू शकता. Best Apps for Translation
पण या पुढचा पर्यायही गुगल ट्रान्सलेटने शोधला आहे, तो म्हणजे तुम्ही एखाद्या मजकुराचा फोटो काढला तरी त्याचे अवघ्या काही सेकंदात 40 भाषांमध्ये अनुवाद होऊ शकतो. याचे आणखी वैशिष्ठ्य म्हणजे आपले इंटरनेट सुरू नसतानाही तुम्ही याचा वापर करू शकता.
२. मायक्रोसॉफ्ट ट्रांसलेटर (Microsoft Translator):-
मायक्रोसॉफ्टचे हे अॅप सुद्धा भारतातील २२ अधिकृत भाषांमधील अनुवाद करू शकते. गुगल ट्रान्सलेटमध्ये मराठी अनुवाद होऊ लागल्यावर मायक्रोसॉफ्ट मध्येही मराठीसाठी ही सेवा उपलब्ध व्हावी अशी मागणी सुरू होती. आता अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मराठी अनुवादसाठी हा पर्याय मिळत आहे.
कोरोनापासून अनेक जण घरून काम करीत आहेत. अशावेळी जगभरात संपर्क साधण्यासाठी मायक्रोसॉफ्ट ट्रांसलेटर ही सुविधा आपल्याला पुरवीत आहे. मायक्रोसॉफ्ट आता AI, मशीन लर्निंग, न्यूरल्स यांची मदत घेत प्रत्येक भाषेतील अनुवाद हा शक्य तितक्या अचूक करण्याचा प्रयत्न करीत आहे. हा पर्याय आपण आपल्या अनुकलनीय भाषेमध्ये भाषांतर करण्यासाठी वापरू शकतो.
३. Hi Translate :-
इंग्रजीतून मराठी किंवा इतर भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी Hi Translate हा एक चांगला पर्याय आहे. हे अॅप अण्ड्रोइड आणि आयओएस या दोन्ही ठिकाणी वापरता येऊ शकत. हा अॅप आपण आपल्या मोबाइल मध्ये डाउनलोड केल्यास आपला फायदाच होईल. म्हणजे बघा आपल्याला एखादा इंग्रजी मेसेज आपल्या मोबाइल वर आला आणि आपल्याला तो समजला नाही तर आपले मोबाइल मध्ये Hi Translate हा अॅप अॅक्टिवेट करून तिथेच आपण कर्सर नेला तर तिथेच आपल्याला त्याचा अर्थ समजतो. त्यासाठी आपल्याला तो मेसेज कॉपी पेस्ट करून दुसरीकडे न्यावा लागत नाही. इतक सोप तंत्रज्ञान आपल्याकडे आलेले आहे. फक्त आपल्याला त्याची महिती नसते. Hi Translate
४. Marathi to English Translator: –
आपल्याला एका भाषेतून दुसर्या भाषेत अनुवाद करायचा असेल तर खूप वेगवेगळे अॅप्स आपण आता पर्यन्त बघितले आहेत. पण मराठीतून आपल्याला इंग्रजी अनुवाद करायचा असेल आणि इंग्रजीमधून मराठी मध्ये अनुवाद करायचा असेल तर मराठी इंग्लिश ट्रान्सलेशन अॅप हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. आणि तो गुगल वर सहज उपलब्ध होतो तो ही विनाशुल्क वापरला जातो. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
५. Translate All: –
अजून पर्यंत आपण एका भाषेतून दुसर्या भाषेत अनुवाद करू शकतो हे पर्याय पहिले पण Translate All या अॅपच्या मदतीने फोटो मधील टेक्स्ट देखील आपण भाषांतरीत करू शकतो. या अॅप मध्ये मराठी व्यतिरिक्त अनेक भाषांचा समावेश आहे.
६. स्पीच-टू-स्पीच भाषांतर:-
आपण सध्या एखाद्या भाषेतून दुसर्या भाषेत भाषांतर करण्यासाठी वेगवेगळ्या अॅप वापर करतो. पण आता आय आय टी मुंबई ने एक नवे तंत्रज्ञान आणले आहे ते म्हणजे स्पीच तो स्पीच भाषांतर.
आयआयटी बॉम्बे मधील कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंग विभागातील प्राध्यापक पुष्पक भट्टाचार्य यांनी बहुभाषिकाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यासाठी आयआयटी बॉम्बे मराठी आणि हिंदी या सारख्या भारतातील भाषांसाठी काम करत आहे. यामध्ये अधिक भाषांचा सहभागही होत आहे. हे तंत्रज्ञान अनेक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याचा विचार यांनी नोंदवला आहे. इंग्रजी-ते-मराठी स्पीच-टू-स्पीच भाषांतर तयार करीत असताना, मराठी-ते-इंग्रजी स्पीच-टू-स्पीच भाषांतर या सहज करता यावे यासाठी काम करत असल्याचे प्राध्यापक भट्टाचार्य म्हणाले.
७. English Marathi /Dictionary: –
ही डिक्शनरी मराठी भाषिकांना वापरली तर इंग्रजीतील अवघड शब्द सहज सापडून भाषांतर करणे सोपे जाईल. तसेच ज्यांना इंग्रजी भाषा शिकायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा एक चांगला पर्याय असेल. या डिक्शनरी मध्ये इंग्रजी भाषा शिकण्यासाठी काही टास्क दिलेले आहेत त्यामुळे आपल्याला एक पर्यायी भाषा म्हणून इंग्रजी ही शिकता येईल. इंग्रजीतील कंटेंट आपल्याला मराठी भाषेत भाषांतरित करून समजण्यासाठी सुद्धा उपयोगात येईल.
८. Text to Voice Translator:-
आपण जर बाहेर किंवा बाहेरच्या देशात फिरायला गेलो आणि आपल्याला त्यांची भाषा येत नसेल तर आपण या अॅपचा वापर करून आपण त्यांची भाषा आपण भाषांतरीत करू शकतो. किंवा आपण वॉइस ट्रांसलेटर वापरुन आपली भाषा वॉइस ट्रांसलेटरवर भाषांतरीत करून आपण त्यांना ऐकवू शकतो. नाहीतर त्यांची भाषा भाषांतरीत करून आपण ऐकू शकतो.
अशाच प्रकारे आपण एका भाषेतून दुसर्या भाषेत भाषांतर करून घेऊ शकतो. तर आपण फक्त ही माहिती घेऊन आपण इंग्रजी नाहीतर इतर भाषेतील पेपर वाचू शकतो. तसेच आपण यातून ट्रान्सलेटर म्हणून कमाई सुद्धा करू शकतो. सध्या हा ट्रेंड चालू आहे. इंग्रजी किंवा इतर तत्सम भाषांतील साहीत्य आपल्या मातृभाषेत रूपांतर करून आपण कमाई सुद्धा करू शकतो. Best Apps for Translation
मैत्रिणींनो तुम्हाला “इंग्रजीतून मराठी मध्ये अनुवाद करणारे बेस्ट अॅप्स” ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. तुम्हाला ही माहिती आवडली का? हा लेख कसा वाटला? तेही कमेन्ट बॉक्स मध्ये कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.”
लेखिका : सपना कद्रेकर मुंबई
छान उपयुक्त माहिती
Khup chan lekh tai