Best Tourist places in Lakshadweep:भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप वरील समुद्रकिनाऱ्यावर फिरत असतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर लक्षद्वीप हे नाव पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलं. काहीच क्षणानंतर लक्षद्वीप हे नाव गुगल सर्च मध्ये ट्रेंड करू लागल आणि Google चा गेल्या वीस वर्षांचा रेकॉर्ड मोडीत निघाला.चला तर अतुलनीय भारतामधील एका अशाच अतुलनीय जागेची सफर करूया.आपल्या सगळ्यांचा प्रिय देश भारत आणि या भारत देशाला खूप मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे. या समुद्रकिनाऱ्यामधीलच एक सगळ्यात सुंदर समुद्राच्या ठिकाणचं डेस्टिनेशन म्हणजेच छोटसं लक्षद्वीप. संस्कृत आणि मल्याळम मध्ये लक्ष म्हणजे एक लाख आणि द्वीप म्हणजेच बेटे . एक लाख द्वीप म्हणजेच एक लाख बेटांचा समूह. केरळमधील कोची शहरापासून जवळ जवळ 400 किलोमीटर दूर पश्चिम घाटावर स्थित हे एक आयर्लंड आहे. नेहमीच्या गर्दी पासून दूर , स्वर्ग अनुभव देणारे समुद्रकिनारे, नेत्रदीपक तलाव, नीलमणी निळे पाणी आणि रंगबिरंगी सागरी समुद्री जीवांचा आशीर्वाद लाभलेले ठिकाण म्हणजेच लक्षद्वीप.
लक्षद्वीपचा प्रवास
म्हणजे एका वेगळ्या युगात , एका वेगळ्या जगात पाऊल ठेवण्यासारखे आहे.लक्षद्वीप हा भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. ज्यामध्ये एकूण 36 बेटे आहेत आणि त्यांचे एकूण क्षेत्रफळ केवळ 32 चौरस किलोमीटर आहे.लक्षद्वीपच्या या 36 बेटांपैकी फक्त 11 बेटांवर लोकं राहतात.
बहुतेक पर्यटक एकतर उत्तर आयर्लंड मधील आगाती, बंगारम, थिन्नाकारा आणि कल्पती यासारख्या बेटांना भेटी देणे पसंत करतात किंवा दक्षिणेकडील मिनी कॉय , कावरत्ती आणि कल्पेणी यांसारख्या बेटावर जाणे पसंत करतात. लक्षद्वीप त्याच्या नैसर्गिक सौंदर्या व्यतिरिक्त समृद्ध संस्कृती आणि परंपरेसाठी ओळखले जाते. तुम्हाला येथे आयर्लंडच्या लोकांच्या जीवनशैलीची खूप चांगली झलक पाहायला मिळेल. नारळापासून विविध उत्पादने तयार करणे आणि मासेमारी हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. येथील लोक अतिशय स्वागताऱ्ह आणि मनमिळावू आहेत.
अस्पर्शीत लक्षद्वीप Best Tourist places in Lakshadweep
जरी तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आजपर्यंत लक्षद्वीप ला भेट दिली नसली आणि भारताच्या नकाशावर लक्षद्वीप बेटे हे काही तुरळक बिंदूनी दर्शवलेली असली म्हणून त्याचे महत्त्व कमी होत नाही. लक्षद्वीप हा एक चमकदार हिरेजडित रत्न आहे जो आपल्या प्रिय भारताचे सौंदर्य आणखी वाढवतो.
शुभ्र समुद्रकिनारे, लक्षद्वीप मधील सुंदर सरोवरे आणि येथील जीवनाच्या संथ गतीमुळे हे ठिकाण कोणत्याही प्रवाशासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक मानले जाऊ शकते. दैनंदिन जीवनातील घाईगडबडीपासून दूर राहून आपल्या थकलेल्या शरीर आणि मनाला आराम देण्यासाठी लोकांना या ठिकाणी यायला आवडते. तथापि हे ठिकाण केवळ विश्रांतीसाठी नाही तर snorkeling, स्कुबा डायविंग , कायाकिंग ,मासेमारी , नौकाविहार आणि समुद्रकिनाऱ्यावर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करण्यासाठी प्रसिद्ध आहे.लक्षद्वीपची बेटे प्रतिबंधित क्षेत्र आहेत आणि या बेटांना भेटी देण्यासाठी प्रशासनाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे .
SPORTS लक्षद्वीप ची पर्यटनाची नोडल एजन्सी म्हणून स् ओळखली जाते. स्पोर्ट्स चे संक्षिप्त रूप आहे सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ नेचर टुरिझम अँड स्पोर्ट्स. Sports for Promotion of Nature Tourism and Sports ह्या एजन्सीचा लक्षद्वीप मधील पर्यटनाशी निगडित सर्व प्रकारच्या ऍक्टिव्हिटी वर कंट्रोल आहे.
लक्षद्वीप बेटावर कसे जायचे?
जर तुम्हाला लक्षद्वीपला भेट द्यायची असेल तर स्पोर्टच्या माध्यमातून पॅकेज घ्यावे लागेल किंवा कोणत्याही नोंदणी कृत ट्रॅव्हल एजंट द्वारे लक्षद्वीपचे पॅकेज घेऊ शकता. त्याबद्दलची अधिक माहिती तुम्हाला लक्षद्वीपच्या पर्यटन वेबसाईटवर पाहायला मिळेल. तुम्हाला भारतातील कोणत्याही प्रदेशातून लक्षद्वीप ला जायचे असेल तर त्यासाठी प्रथम केरळ राज्यातील कोची शहर गाठावे लागेल कोचीहून तुम्ही विमानाने किंवा जहाजाने लक्षद्वीप ला पोहोचू शकता.जर तुम्हाला विमानाने लक्षद्वीप ला यायचे असेल तर कोची विमानतळावरून थेट विमानसेवा मिळेल. हे विमान कोची विमानतळावरून लक्षद्वीपच्या आगाती नावाच्या एकमेव विमानतळावर दररोज सकाळी नऊ वाजता उड्डाण घेते. हा प्रवास सुमारे एक तासाचा अतिशय सुंदर प्रवास आहे .
अलाईन्स एअरलाईनचे दैनंदिन फ्लाईट जे कोची विमानतळावरून चालते तुम्हाला सकाळी साडेदहाच्या सुमारास लक्षदीप मधील आगाती विमानतळावर पोहोचवेल. कोची ते आगाती या प्रवासासाठी सुमारे साडेपाच ते साडेसहा हजार रुपयांमध्ये विमानाचे तिकीट मिळेल आणि ही किंमत वर्षभर जवळपास सारखीच असते. कोची ते आगाती हा विमान प्रवास अतिशय नयनरम्य प्रवास आहे. आगाती विमानतळ हे संपूर्ण भारतातील सर्वात सुंदर विमानतळापैकी एक आहे.
लक्षद्वीपला पोहोचल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तुमची औपचारिक प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.अगदी विमानतळावरच ही सुविधा पाहायला मिळेल.हवाई प्रवासा व्यतिरिक्त कोचीहून लक्षद्वीप ला जाण्यासाठी समुद्रमार्गे देखील प्रवास करू शकतो. त्यासाठी सात प्रवासी जहाजांचा पर्याय उपलब्ध आहे ज्यांची नावे MV Kavaratti, MV Arabian Sea, MV Lakshadweep Sea, MV Lagoon, MV Corals, MV Amindivi and MV Minicoy आहेत.ही सर्व क्रूज जहाजे कोची ते लक्षद्वीप पर्यंत धावतात आणि त्यासाठी सुमारे 14 ते 18 तास लागतात. ही प्रवासी जहाजे सर्व सुविधांनी परिपूर्ण दिसतील. तुमच्या बजेटनुसार तुम्ही येथे bunk bed, द्वितीय श्रेणी किंवा प्रथम श्रेणी खोलीची सुविधा घेऊ शकता. तसेच येथे अल्पोपहार आणि जेवणाची ही योग्य सोय आहे. लक्षद्वीप ला भेट देण्याचा तिसरा पर्याय म्हणजे लक्झरी क्रूझने येणे. गेल्या काही वर्षापासून मुंबई आणि गोव्यापासून लक्षद्वीप पर्यंत कौडालिया क्रूज सुरू आहे .त्यामुळे तुम्ही लक्झरी क्रूजनेही लक्षद्वीप ला येऊ शकता.
चला तर आता या लेखाच्या निमित्ताने लक्षद्वीपला पोहोचल्यानंतर या सुंदर आयर्लंडची आभासी सहल करूया.
Agatti Island आगात्ती आयर्लंड
जर तुम्हाला आगाती आयर्लंड एक्सप्लोर करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला आगाती पोलीस स्टेशनमध्ये तुमच्या नावाची नोंद करावी लागेल. तिथे प्रवेश केल्यानंतर तुम्हाला तूम्ही परत जाण्याची तारीख देखील टाकावी लागेल आणि हाच नियम सर्व आयर्लंड ला लागू होतो. आगाती आयर्लंड वर लक्षद्वीप मधील एकमेव विमानतळ आहे. त्यामुळे जर तुम्ही लक्षद्वीप ला विमानाने जात असाल तर आधी आगाती आयर्लंडला भेट दिली पाहिजे.
या आयर्लंडमध्ये तुम्हाला सुंदर पांढरे वाळूचे किनारे आणि संपूर्ण लक्षद्वीप मधील सर्वात सुंदर तलाव आढळतील. कोची पासून आगाती आयर्लंड चे अंतर सुमारे 460 किलोमीटर आहे.हे छोटे आयर्लंड सुमारे सात किलोमीटर लांब आहे आणि त्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 3.86 चौरस किलोमीटर आहे. अगदी आयर्लंड मध्ये तुम्हाला पूर्व, पश्चिम आणि उत्तरेकडे सुंदर समुद्रकिनारी पाहायला मिळतात.हे समुद्रकिनारे खूपच विलोभनीय आहेत.हे आयर्लंड एक्सप्लोर करण्यासाठी तुम्ही एक तर टॅक्सी किंवा स्थानिक ऑटो भाड्याने घेऊ शकता .
दुसरा चांगला पर्याय म्हणजे स्थानिक बाईक भाड्याने घेणे. येथे तुम्हाला २०० ते ३०० रुपयांच्या नाममात्र भाड्यात बाईक सहज मिळतील. अगत्ती आयर्लंडच्या पूर्व आणि पश्चिमेकडील जेट्टी वरून तुम्हाला बेटाच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी वेगवान जहाजे किंवा खाजगी बोटीचा पर्याय मिळतो. जर तुम्हाला बंगाराम ला जायचे असेल तर येथून खाजगी बोट भाड्याने घेऊन तुम्ही बंगाराम आयर्लंडलाही जाऊ शकता. यासाठी तुम्हाला खाजगी बोटीसाठी सुमारे सात ते आठ हजार रुपये भाडे द्यावे लागेल.
Best time to visit lakshdweep ऑक्टोबर ते एप्रिल हा काळ लक्षद्वीप ला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. यावेळी येथील तापमान 30° च्या आसपास राहते आणि सकाळ व संध्याकाळचे वातावरण अतिशय अल्हाददायक असते.
लक्षद्वीप बेटे मोठ्या प्रमाणात अपग्रेडसाठी भारत सज्ज
नुकतच पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी भारताने लक्षद्वीप बेटांसाठी 3600 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांच्या सुधारणांची घोषणा केली आहे. या योजनेमध्ये Androth,Kalpeni आणि कदमत बेटांवर बंदर सुविधा तसेच kadamat बेट, आगात्ती बेट आणि कावरत्ती बेटावरील रस्त्यांच्या बांधकामाचा समावेश आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यापूर्वी त्यांच्या मुलाखतीतील बजेट 2024 च्या भाषणात देशांतर्गत पर्यटन आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी लक्षद्वीपसह port कनेक्टिव्हिटी ,टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चर आणि आयर्लंड वरील सुविधा विकसित करण्यावर भर देण्याची घोषणा केली आहे.
तुम्हाला ही Best Tourist places in Lakshadweep वाटली,ते नक्की कळवा. आपल्य मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप ही जॉईन करा.
लेखकाचे नाव – प्रिती यादव, पुणे