सीए म्हणजे काय ? सीए व्हायला पात्रता काय ? CA Complete Information in Marathi

WhatsApp Group Join Now

CA Complete Information in Marathi

सीए म्हणजे चार्टर्ड अकाऊंटंट हा अगदी सरळ शब्दशः अर्थ. पण मराठी भाषेत सांगायचे तर सीए म्हणजे सनदी लेखापाल. ही एक  पदवी आहे. आपण CA करणार्या अनेक विद्यार्थ्यांना तासन्तास अभ्यास करताना पाहिले असेल, हा अभ्यास क्रम कोणी कुठे शोधून काढला ? तसेच हा अवघड अभ्यास करून पुढे कुठ्ल्या प्रकारचे काम करायला लागते, याची काही पात्रता आहे काय ? या सगळ्याची माहिती आपण आजच्या लेखात घेणार आहोत.

आपणाला माहीत आहे का ,“चार्टर्ड अकाऊंटंट” या नावाचे सर्वात पहीले अकाऊंटंट होते. ज्यांनी एक व्यावसायिक अकाऊंटिंग पद्धत बनविली. ज्याची स्थापना १९५४ मध्ये स्कॉटलंड येथे झाली. या पद्धतीच्या स्थापनेपासून एक शाही सनद मंजूर केली गेली.  सनदी लेखापाल हे एक आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त व्यावसायिक पद आहे.

कुणाला माहीतही नसेल कदाचित, १९२० साली, मेरी हॅरिस स्मिथ या इंग्लंड आणि वेल्समधील जगातील पहिल्या महिला चार्टर्ड अकाउंटंट बनल्या होत्या. त्यावेळी स्त्रिया हे अशा प्रकारचे शिक्षण घेऊ शकत नव्हत्या.कायदा १९१९, या कायद्या अंतर्गत शिक्षण घेऊन स्त्रिया अशा प्रकारचे शिक्षण घेऊ शकत होत्या. तो एक वेगळा विषय आहे. पण या संदर्भातील विषय आहे म्हणून ही माहिती वाचण्यात आली.

चार्टर्ड अकाउंटंट हे ऑडिटिंग, टॅक्सेशन, आर्थिक आणि सामान्य व्यवस्थापनासह व्यवसाय आणि वित्त या सर्व क्षेत्रात काम करतात. काही सार्वजनिक सराव कामात तर काही खाजगी क्षेत्रात काम करीत करतात आणि काही सरकारी संस्थांमध्ये काम करतात.

जगभरात चार्टर्ड अकाउंटंट्समध्ये १९०  देशांमधील १.८ दशलक्ष चार्टर्ड अकाउंटंट आणि विद्यार्थी असलेल्या १५ संस्थांचा समावेश केला गेला आहे. त्यातील देशांची यादी पुढीलप्रमाणे औस्ट्रेलिया, बांग्लादेश, बरमुदा, कॅनडा, झेकप्रजासत्ताक, यूरोपियन युंनियन, भारत, आयर्लंड, नेपाळ, न्यूझीलंड, पाकिस्तान, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि युनायटेड किंगडम.

भारतात, चार्टर्ड अकाउंटंट्सचे नियमन हे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया याद्वारे केले जाते जे चार्टर्ड अकाउंटंट्स कायदा, १९४९ साली स्थापन केले गेले आहे. ICAI च्या सहयोगी सदस्यांना त्यांच्या नावांमध्ये CA हा पद जोडण्याचा अधिकार आहे. जे सदस्य पूर्णवेळ सरावात आहेत, आणि पाच वर्षांचा सराव पूर्ण केला आहे, ते फेलो चार्टर्ड अकाउंटंट (FCA) वापरू शकतात.

भारतातील सर्व सीए किंवा सनदी लेखापाल हे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटचे  मेंबर असतात. सनदी लेखापाल हे अकाउंटिंग संबंधित सर्व समस्यांची उत्तरे शोधतात तसेच इन्कम आणि इन्कम टॅक्स च्या संबंधित सर्व कार्य करतात. Chartered account ला अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे  विद्यार्थी CA या करिअरकडे वळताना दिसत आहेत.

मुंबईची शान – अटल सेतू आहे तरी काय ? इथे क्लीक करून वाचा

सनदी लेखापाल (CA) करण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे?

जे विद्यार्थी मान्यताप्राप्त बोर्डाच्या कोणत्याही शाखेतून 12 वी परीक्षा पास झाल्यानंतर फाउंडेशन कोर्स सुरू करू शकतात. ते विद्यार्थी सीए साठी प्रवेश घेऊ शकतात.

१९७० मध्ये केवळ वाणिज्य शाखेची पदवी असलेले विद्यार्थी सीए या परीक्षेसाठी पात्र ठरत असत परंतु आता यात बदल करण्यात आल्यामुळे आणि भारतामध्ये औद्योगिकीकरणाची वाढ मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे सीए या क्षेत्राची मागणी वाढलेली आहे. म्हणून कोणतीही पदवी करून सीए करता येते.

फाउंडेशन कोर्स हा कोर्स म्हणजे सीए बनण्यासाठीचा महत्वाचा पाया आहे. विद्यार्थ्याने  फाऊंडेशन कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर सीएचा पुढील अभ्यासक्रम सुरू होतो. जे विद्यार्थी फाउंडेशन कोर्स पास करतात ते इंटरमिजिएट कोर्ससाठी पात्र असतात.  सीए होण्यापूर्वी तुम्ही घेतलेला इंटरमिजिएट हा शेवटचा कोर्स आहे. तुम्हाला या प्रत्येक कोर्ससाठी नियमित असलेल्या सर्व पात्रता व आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे. ज्यांना फाउंडेशन कोर्स वगळून डायरेक्ट एंट्री स्कीमने प्रवेश घ्यायचा आहे ते तशा प्रकारे प्रवेश घेऊ शकतात.   

या अभ्यासक्रमाच्या परीक्षा दरवर्षी मे आणि नोव्हेंबरमध्ये होतात. एकदा नोंदणी झाल्यानंतर सदर नोंदणी ही तीन वर्षांसाठी वैध राहते. यात जर तो विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्या विद्यार्थ्याला पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता असते.

नोंदणीनंतर परीक्षेला बसण्यासाठी फक्त आठ महिन्यांचे अंतर असावे लागते.  या इंटरमिजिएट कोर्सचा अभ्यासक्रमा अंतर्गत 8 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

तर ग्रॅज्युएशननंतर थेट प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट कोर्स परीक्षेला बसण्यापूर्वी 9 महिन्यांचे प्रारंभिक व्यावहारिक प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. प्रात्यक्षिक प्रशिक्षण जे एकूण 3 वर्षांचे आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मेच्या परीक्षेला बसण्यासाठी 1 ऑगस्टपूर्वी आणि नोव्हेंबरच्या परीक्षेला बसण्यासाठी 1 फेब्रुवारीपूर्वी नोंदणी करून हे प्रशिक्षण सुरू करावे लागते.

सीए फायनल कोर्स हा सीए होण्यासाठीचा शेवटचा टप्पा आहे. इंटरमिजिएटप्रमाणे यातही एकूण आठ विषय आहेत. जे दोन गटात विभागले गेले असून यात अभ्यासक्रमाचे दोन्ही गट उत्तीर्ण करावे लागतात. यासोबतच प्रात्यक्षिक प्रशिक्षणही पूर्ण करावे लागते. या प्रशिक्षणात अडीच वर्षांचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर अंतिम अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी अर्ज करता येतो.

सीए अभ्यासक्रमातील या तीन टप्प्यांव्यतिरिक्त 3 वर्षांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि चार ते चार आठवड्यांचे इतर दोन प्रशिक्षण या सीए अभ्यासक्रमांतर्गत करावे लागतात.

सनदी लेखापाल (सीए) काय काम करतात ?

सीए (सनदी लेखापाल) हा असा एक व्यावसायिक व्यक्ती आहे, जो व्यवसाय आणि संस्थांना लेखा, लेखापरीक्षण, कर आकारणी, आर्थिक सल्लागार आणि सल्ला सेवा प्रदान करतो. त्यांच्या प्राथमिक जबाबदाऱ्यांमध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत  –

*  सनदी लेखापाल हे आर्थिक विवरण करून नियमांचे पालन सुनिश्चित करण्यास मदत करतात.

*  सनदी लेखापाल हे व्यक्ति, व्यवसाय व संस्थेच्या आर्थिक स्थितीचे आणि कामगिरीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून  वित्तीय विवरणांचे स्वतंत्र ऑडिट करतात.

* आर्थिक माहितीची अचूकता आणि निष्पक्षता तपासून पाहतात आणि कायदेशीर आणि नियामक आवश्यकतांचे पालन करतात.

*  व्यक्ती आणि व्यवसायांना कर नियोजन आणि सल्ला देण्याचे काम करतात. ते आपल्या अशीलाला त्यांच्या कर दायित्वांना अनुकूल करण्यास मदत करतात.

*   तसेच कर कायद्यांचे पालन करून, कर रिटर्न फाइल करतात आणि कर ऑडिट किंवा विवाद दरम्यान आपल्या अशीलाचे  प्रतिनिधित्व करतात.

*   सनदी लेखापाल हे अर्थसंकल्प, अंदाज, रोख प्रवाह व्यवस्थापन आणि आर्थिक विश्लेषणासह आर्थिक व्यवस्थापन सेवा देतात. ते धोरणात्मक आर्थिक निर्णय घेण्यास आणि ग्राहकांना त्यांची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यास  मदत करतात.

*  जोखीम व्यवस्थापन, अंतर्गत नियंत्रणे आणि आर्थिक प्रणाली अंमलबजावणीशी संबंधित सल्ला व सेवा प्रदान करतात.

*   आपल्या अशीलाच्या व्यवसायाच्या कार्यक्षमता सुधारण्यासाठी, खर्च कमी करण्यासाठी आणि एकूण व्यवसाय कार्यप्रदर्शन सुधारण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करतात.

*   विलीनीकरण आणि अधिग्रहण, व्यवसाय मूल्यांकन, आर्थिक परीक्षण आणि व्यवसायांसाठी भांडवल उभारण्यासाठी सल्ला देतात. ते गुंतवणुकीचे निर्णय, भांडवल रचना आणि आर्थिक जोखीम व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करतात.

* आर्थिक अनियमितता तपासण्यास, फसवणूक नियंत्रित करण्यास  आणि कायदेशीर कार्यवाहीमध्ये तज्ञांची मते प्रदान करण्याचे काम करतात. ते आर्थिक नियोजनाचे विश्लेषणासह व्यवहार कसा करावा यासाठी मदत करतात आणि आर्थिक नुकसान किंवा नुकसानीचे प्रमाण निर्धारित करतात.

*  कर्ज पुनर्रचना, दिवाळखोरी कार्यवाही आणि लिक्विडेशन प्रक्रियांवर मार्गदर्शन प्रदान करून आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या व्यवसायिकांना योग्य मार्गदर्शन  करतात.

*  संस्थांच्या आर्थिक व्यवहार्यतेचे मूल्यांकन करण्यात आणि त्यांच्या पुनर्प्राप्तीसाठी किंवा ऐच्छिक परिसमापन करण्यासाठी धोरणे विकसित करून अशा व्यवसायिकांना योग्य ती मदत करतात.

CA चांगली कमाई करू शकतात. नोकरी आणि नंतर व्यवसाय देखील करू शकतात. अनेक CA फर्म intern घ्यायला उत्सुक असतात त्यासाठी चागंला पगार हि देतात.

तुम्हाला हा लेख कसा वाटला ,काही प्रश्न असतील तर जरूर कॉमेंट करून सांगा आणि आपल्या मित्र मंडळीना शेयर करायला अजिबात विसरू नका.

6 thoughts on “सीए म्हणजे काय ? सीए व्हायला पात्रता काय ? CA Complete Information in Marathi”

  1. पूर्ण माहिती सविस्तर दिली आहे.
    इतर graduates ना पण हा कोर्स करता येतो हे नव्याने समजले.
    इतकी गरज वाढली आहे ही चांगली गोष्ट आहे.
    धन्यवाद !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top