दहावी नंतरचे करियर ऑप्शन
नुकताच दहावी बारावीचा निकाल लागला. या निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांना जितकी असते तितकीच पालकांनाही असते.कारण दहावी आणि बारावीनंतर वेगवेगळे करिअरचे पर्याय मुलांसाठी उपलब्ध होतात. जर हा पर्याय योग्य निवडला गेला तर मुलांचे करियर चांगले घडते आणि या टर्निंग पॉईंट ला जर मुलांच्या हातून करिअर निवडताना चूक झाली ही चूक कधीही भरून न निघणारी असते. त्यामुळेच आजचा हा लेख सध्या दहावी पास झालेल्या मुलांसाठी असणार आहे.यातून त्यांना दहावी नंतर नेमके करिअर काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.चला तर मग आजच्या आपल्या लेखाला सुरुवात करूया,
दहावी पास झालेल्या मुलांना दहावीनंतर जर अकरावी आणि बारावी करायची नसेल तर त्यांच्यासाठी सध्या विविध कोर्सेस आणि इतर वेगळेही पर्याय उपलब्ध आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण आता खाली पाहू.
1) इंजीनियरिंग डिप्लोमा-
दहावी नंतर हा एक बेस्ट ऑप्शन आहे इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करणे.हा डिप्लोमा तीन वर्षाचा असून या डिप्लोमा नंतर आपल्याला इंजिनिअरिंगची डिग्री ही करता येते या डिप्लोमा मध्ये विविध शाखा देखील उपलब्ध आहेत. मुलांना त्यांच्या आवडीच्या शाखेनुसार प्रवेश घेता येतो आणि त्याच्यामध्ये पुढे डिग्री ही करता येते, या कोर्सचा कालावधी तीन वर्षाचा असुन तसेच नंतर तीन वर्षाचा कोर्स करून इंजिनिअरिंगची डिग्री ही मिळवता येते.
डिप्लोमा इन इंजिनिअरिंगच्या विविध शाखा-
1. डिप्लोमा इन सिव्हील इंजीनियरिंग
2. डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
3. डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग
4. डिप्लोमा इन मर्चंट नेव्ही इंजीनियरिंग
5. डिप्लोमा इन & टी सी(इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन)-
2)आर्ट टीचर डिप्लोमा-
कला किंवा कलेकडे इंटरेस्ट असलेल्या मुलांसाठी आर्ट टीचरचा डिप्लोमा हा एक वेगळा असा पर्याय उपलब्ध आहे.यानंतर टीचर बनू शकता आणि त्यानंतर यात आपल्याला डिग्री सुद्धा करता येते सध्या आर्ट टीचर ची मागणी ही विविध शाळेमध्ये केली जाते.त्यामुळे हा डिप्लोमा करून लवकर जॉब मिळू शकतो. तसेच तुम्ही ऑनलाईन क्लासेस ही घेऊ शकता किंवा स्वतःचे असे क्लासेस ही सुरू करू शकता. या कोर्सचा कालावधी हा दोन वर्ष किंवा तीन वर्ष असा असू शकतो.
3) आयटीआय-
आयटीआय सुद्धा एक चांगला पर्याय दहावी पास झालेल्या मुलांसाठी अवेलेबल आहे .यामध्ये तुम्ही फिटर,वेल्डर, मेकॅनिक,डिझेल मेकॅनिक इत्यादी विविध शाखा मध्ये तुम्ही आयटीआय करून स्वतःचे चांगले करिअर घडवू शकता. तसेच या कोर्सचा कालावधीही अगदी कमी आहे.दोन वर्षांमध्ये तुम्ही हा कोर्स पूर्ण करू शकतो.
4) रेल्वे तिकीट कलेक्टर-(TC)
रेल्वे डिपार्टमेंटमधील एक्झाम देऊन तुम्ही दहावीनंतर तिकीट कलेक्टर म्हणजे टीसी सुद्धा होऊ शकतात. यासाठी रेल्वे डिपार्टमेंट कडून घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये पास असणे गरजेचे असते.
5) बँक क्लर्क एक्झाम-
दहावीनंतर बँकेतील क्लर्क च्या एक्झाम देऊन ही जॉब मिळू शकतो.त्यासाठी थोडेसे बँकेतील कामकाजाचे ज्ञान असणे गरजेचे असते. तसेच विविध बँकेमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये उमेदवाराला पास होणे गरजेचे असते. काही ठिकाणी मुलाखती द्वारे देखील बँक मध्ये जॉब मिळू शकतो. दहावीनंतर या परीक्षेची तयारी करू शकता.
6) डिप्लोमा इन फॉर्म मॅनेजमेंट-
शेतीची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. ज्यांना शेती आवडते किंवा पुढे चालू कृषी क्षेत्रातील विविध परीक्षा द्यायच्या आहेत त्यांनी दहावीनंतर डिप्लोमा इन फॉर्म मॅनेजमेंट केले. तर त्याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो. तसेच या डिप्लोमा नंतर या यामध्ये डिग्री देखील करता येते. या कोर्सचा कालावधी हा दोन वर्ष असू शकतो.
7) डिप्लोमा इन म्युझिक-
संगीत क्षेत्राची आवड असणाऱ्या तसेच संगीतामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा पर्याय अगदी योग्य आहे. अगदीच दहावीनंतर अकरावी बारावी न करता जरा हटके करिअर ऑप्शन ज्यांना हवे आहे त्यांनी नक्कीच हा ऑप्शन ट्राय करायला हरकत नाही.
8) डिप्लोमा इन इंटरियर डिझाईन-
दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा इन इंटरियर डिझाईनिंग हा एक चांगला पर्याय आहे. सध्या इंटरियर डिझाईन हे खूप मोठ्या प्रमाणावर केले जाते.विविध बिल्डिंग,घरे,रोहाऊसेस तसेच प्रायव्हेट ऑफिसस सजविण्यासाठी इंटरियर डिझाईन हे केले जाते. इंटेरियर डिझाईन हे नेहमी कोर्स झालेल्या तज्ञ व्यक्तीकडून करून घेण्यात येते.सध्या या करिअरला खूप मोठ्या प्रमाणावर स्कोप आपल्याला पाहायला मिळतो.ज्यांना पटकन दहावीनंतर अर्निंग हवे आहे त्यांनी इंटरियर डिझाईन हा पर्याय निवडायला काहीच हरकत नाही.
9) मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन सर्टिफिकेट कोर्स(एम एल टी)-
मेडिकल फीडची रिलेटेड असणारा हा सर्टिफिकेट कोर्स. हा कोर्स दहावी नंतर केला जातो.या कोर्स नंतर तुम्ही मेडिकल लॅबोरेटरी काढू शकता.
10) डिप्लोमा इन ब्युटी कल्चर
11) डिप्लोमा इन हेअर ड्रेसिंग-
12) गारमेंट टेक्नॉलॉजी-
वरील तीन दिलेले विविध डिप्लोमा आहे. जे तुम्ही दहावी झाल्यानंतर एक चांगले करिअर देणारे ऑप्शन आहे ज्यांना कॉस्मेटिक किंवा ड्रेस डिझाईन आवडते अशा विद्यार्थ्यांसाठी हे एक चांगले करिअर ऑप्शन ठरू शकतात.
13) दहावीनंतर अकरावी-
दहावीनंतर अकरावी हा एक पारंपारिक ऑप्शन दहावी पास झालेल्या मुलांसाठी आहे. पण अकरावी करताना तुम्हाला करिअर ऑप्शन आधी निवड केलेला असणे गरजेचे आहे. जसे की तुम्ही अकरावी ही आर्ट्स,सायन्स आणि कॉमर्स या तीन शाखांमध्ये करू शकता. जसे की तुम्ही सायन्स मध्ये अकरावी केली तर तुम्हाला इंजीनियरिंग किंवा मेडिकल हे ऑप्शन असतात. तसेच इतरही वेगवेगळे डिग्री आणि डिप्लोमा आपल्याला या शाखेतून करतात, बँकिंग क्षेत्राची आवड असणाऱ्या किंवा भविष्यात सीए होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॉमर्स शाखा उत्कृष्ट पर्याय ठरते, आर्ट्स शाखेतूनही वेगवेगळ्या डिग्री आणि डिप्लोमा ही करता येतात.
नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकाला अनुषंगाने लिहिण्यात आलेला. हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आमच्या हा लेख वाचून तुम्हाला आपले करिअर निवडण्यात मदत झाली का? ते देखील सांगा तसेच अशाच विविध माहितीसाठी आमच्या लेखक मित्र वेबसाईटला भेट देत रहा
Adv.विनिता झाडे मोहळकर.