Let’s understand the Chat GPT that is influencing the technology world: तंत्रज्ञान विश्वावर प्रभाव पाडणाऱ्या चॅट जीपीटीला समजून घेऊ!
पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणजे मानव. मानवाच्या बौद्धिक क्षमतांची झालेली उत्क्रांती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु आता मानवाने तयार केलेले तंत्रज्ञानच त्याच्या या बौद्धिक क्षमतांसोबत स्पर्धा करीत आहे. संपुर्ण पृथ्वीतलावर माणसाच्या बुद्धिला तोड देईल असे कोणाही नाही असे म्हटले जायचे परंतु आता माणसाने स्वतःच स्वतःच्या बौद्धिक क्षमतांना पर्याय उपलब्ध करु दिला आहे. यापुर्वी आपण INTELIGANC म्हणजेच बुद्धिमत्ता हा शब्द फक्त मानवी वर्णनापुरताच वापरत होतो पण आता बुद्धिमत्ता ही संकल्पना मानवापुरती मर्यादित न राहता त्याचे कृत्रिम पर्याय उपलब्ध झाले आहेत. याला आपण Artificial intelligence म्हणजेच कृत्रिम बिद्धिमत्ता असे म्हणू शकतो. या कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच AIचा प्रवास सुरु करणाऱ्या Chat GPT ची संपुर्ण माहिती आपण आजच्या या लेखाच्या माध्यमातून मिळवणार आहोत. Chat GPT Complete information in Marathi
चॅट जीपीटीची सुरुवात कशी झाली? What is Chat GPT
ChatGPT चे पूर्ण नाव Chat Generative Pre-Trained Transformer म्हणजेच चॅट जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर असे आहे. चॅट GPT हे OpenAI या कंपनीने विकसीत केले असून ती Artificial Intelligence च्या जगात एक प्रसिद्ध Company आहे. चॅट जीपीटीच्या संस्थापकांबद्दल सांगायचे झाल्यास सॅम ऑल्टमन आणि एलन मस्क यांनी 2015 मध्ये याची सुरुवात केली. मस्कने सुरुवातीच्या काळातच यातून माघार घेतली. त्यानंतर मायक्रोसॉफ्टने यात गुंतवणूक केली आणि 30 नोव्हेंबर 2022 रोजी प्रोटोटाइप म्हणून लाँच केले गेले. प्रोटोटाईप (Prototype) म्हणजे Product Launch करण्यापूर्वी Product Testing साठी ते Sample बाजारात आणले जाते. अवघ्या 5 दिवसात तब्बल चॅट जीपीटीने 10 लाख वापरकर्ते मिळवत आतापर्यंतचे इंटरनेटवरील सर्वात लोकप्रिय टूल म्हणून मान्यता मिळवली होती. आज चॅट जीपीचे 15 अब्जाच्या घरात वापरकर्ते आहेत.
Copywriting म्हणजे काय ? ते करियर म्हणून करता येईल का, इथे वाचा.
चॅट-जीपीटीचा रोजचा खर्च 5.80 कोटी रुपये
एका अहवालानुसार चॅट-जीपीटीचे व्यवस्थापन करण्यासाठी OpenAI या निर्मात्या कंपनीला 7 लाख डॉलर म्हणजे रोजचे 5.80 कोटी रुपयांचा खर्च येतो. यानुसार आपण अंदाज लावू शकतो की किती मोठ्या प्रमाणावर या तंत्रज्ञानामध्ये माहितीचा साठा केलेला आहे आणि अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. आता चॅट जीपीटीचे 4 थे स्वरुप म्हणजेच chat GPT4 बाजारात आले आहे. याच्या निर्मात्यांनी या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरकर्त्यांसाठी मात्री काही शुल्क लावला आहे.
चॅट जीपीटीचा उपयोग कोणकोणत्या प्रकारे केला जाऊ शकतो?
माहिती विश्वात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चॅट जीपीटीचा वापर होऊ शकतो. आपण या माहिती तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रांची माहिती घेऊ आणि त्यामध्ये चॅट जीपीटीचा कोणत्या पद्धतीने वापर करुन घेता येईल यादेखील गोष्टी समजून घेऊ.
माहिती तंत्रज्ञान – information technology
माहिती तंत्रज्ञानाच्या विश्वात तुम्हाला एखादे सॉफ्टवेअर तयार करायचे असल्यास तुम्ही चॅट जीपीटी या टूलला कमांड देऊ शकता आणि काही सेकंदातच तुमच्या समोर तुम्हाला बनवायच्या असलेल्या सॉफ्टवेअरची ब्लू प्रिंट तयार होते, ते सॉफ्टवेअर कसे बनवायचे यापासून ते कोणकोणत्या सोयी पुरवेल इथपर्यंत सर्व गोष्टी माहिती स्वरुपात तुम्हाला मिळू शकतील.
मजकूर तयार करणे – content making
आज आपण कोणतेही ब्राउजर ओपन केले असता आपल्याला त्यावर माहिती देणारा खूप विविध प्रकारचा मजकूर दिसतो, तो माणसांनी स्वतःच्या बौद्धितक क्षमतांनुसार तयार केलेला आहे. परंतु तुम्हाला एखाद्या वेबसाईट साठी काही कंटेण्ट हवा असेल, एखाद्या विषय मांडणारा लेख तयार करायचा असेल किंवा रिसर्च पेपर जरी तयार करायचा असेल तरी चॅट जीपीटीला कमांड देऊन तुम्ही हे काम अगदी काही सेकंदात करु शकता.
सोशल मिडियासाठी वरदान – big help for social media
तुम्ही युट्यूब व्हिडिओसाठी एखादी स्क्रिप्ट लिहू इच्छिता त्यात तुम्हाला विषय मिळालेला आहे परंतु तो कसा मांडायचा हे तुम्हाला कळत नसेल तर चॅट जीपीट अगदी काही सेकंदात तुमचे हे काम करुन देऊ शकेल. एखाद्या कंपनीच्या ब्रँडसाठी मार्केटिंग स्ट्रॅटेजी तयार करायची असल्यास त्याबद्दल माहिती संकलन करायचे असल्यास हे काम देखील चॅट जीपीट अगदी काही सेकंदात करुन देऊ शकेल.
तुम्हाला एखाद्या विषयावर ब्लॉग लिहायचा असल्यास देखील चॅट जीपीटीला कमांड दिल्यास तुम्हाला विषयानुरूप संपूर्ण ब्लॉग लिहून मिळू शकेल.
वैद्यकीय क्षेत्रातील मदत – Medical field help
चॅट जीपीटीच्या निर्मात्यांचे ठाम मत आहे की, वैद्यकीय क्षेत्रात चॅट जीपीटीचा वापर केला जाऊ शकतो. अनेकांचा याला विरोध आहे. परंतु चॅट जीपीटी लोकांची लक्षणे पाहून निदान करू शकतो इतकेच नाही तर Advisory Medication Recommend सुद्धा करू शकतो. Medical Data Availability आणि Patterns नुसार, हे मानवी रोगांचे निदान करण्याची क्षमता त्यामध्ये आहे.
प्रश्नांची उत्तरे शोधा – Real time answer
तुम्हाला तंत्रज्ञानविषयक कोणत्याही प्रश्नाच उत्तर देण्यासाठी हे टूल तयार करण्यात आलेले आहे. Website चे Organic Traffic कसे वाढवायचे, घरी बसून पैसे कसे कमवायचे, Personalized Emails कसे लिहायचे यापासून ते एखादे पुस्तक कसे लिहायचे इथपर्यंत चॅट जीपीट तुम्हाला उत्तरांच्या माध्यमातून मदत करु शकेल.
Digital Market वर ChatGPT चा होणारा प्रभाव –
आजची सर्वाच मोठी इंडस्ट्री म्हणजे Digital Market. Chat GPT चा Digital विश्वावर मोठा प्रभाव पडत असल्याचे दिसून येत आहे. डिजिटल मार्केटमध्ये विविध कामांसाठी चॅट जीपीटीचा उपयोग करता येऊ शकतो. अनेकांची कामे हे चॅट जीपीटी अगदी काही सेकंदात करणार असल्याचे दिसून येत आहे. Chat GPT that is influencing the technology world:
· Chatbot च्या माध्यमातून Customer Support तयार करुन देऊ शकेल. तसेच ग्राहकांच्या शंकांचे निवारण करण्यासाठी देखील हे टूल पूर्णपणे सक्षम आहे.
· चॅट जीपीटी ग्राहकांची भाषा समजू शकजून घेऊन त्यांच्यात भाषेत प्रतिसाद देऊ शकत असल्याने याच्या मदतीने अगदी 24 तास उपलब्ध असलेले कॉल सेंटर निर्माण करता येते.
· एखाद्या कंपनीच्या बॉससाठी Personal Assistantचे काम देखील Chat GPT करु शकेल. म्हणजेच क्लाईंटसोबत मिटिंग फिक्स करणे, कामाचे शेड्यूल बनवणे, कर्मचाऱ्यांच्या कामाचा डाटा तयाकर करणे, क्लाईंटसोबतच्या कामाचा डाटा तयार करणे असे एक ना अनेक कामे चॅट जीपीटीच्या मदतीने करता येणे शक्य आहे.
चॅट जीपीटीचे फायदे आणि तोटे (Chat GPT Complete information in Marathi)
कोणत्याही नव तंत्रज्ञानाचे जसे फायदे असतात तसेच तोटे देखील असतात. म्हणूनच या दोन्ही गोष्टींची सारासार मांडणी येथे देण्यात येत आहे. सर्वप्रथम फायदे आणि नंतर तोट्यांता आपण विचार करु.
चॅट जीपीटी वापराचे फायदे – benefits of Chat GPT
· चॅट जीपीटीच्या माध्यमातून तुम्ही 24 तास काम करुन घेऊ शकता. मानवी क्षमतांच्या हे पलीकडे असल्याने विविध कंपन्यांची पसंती चॅट जीपीटीला मिळत आहे.
· ज्या कामासाठी 10 ते 15 व्यक्ती कंपनीमध्ये नेमाव्या लागतात त्यांचे काम एक मशीन करत असल्याने कंपन्यांच्या पैशांची बचत होणार आहे.
· विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात चॅट जीपीटीचा वापर करुन एक उत्तम डाटा तयार करता येणार आहे.
· वापरकर्त्यांसाठी अत्यंत सोपे आणि समजण्यास सरळ असलेले असे हे टूल आहे.
· चॅट जीपीटी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ शकते.
चॅट जीपीटी वापराचे तोटे – Disadvantages of Chat GPT
· चॅट जीपीटी निर्मात्यांनी सतत अद्ययावत करावे लागत असल्याने नव्या माहितीचे संकलन होत नाही तोपर्यंत वापरकर्त्यांना ती माहिती मिळू शकत नाही.
· चॅट जीपीटी मानवी भावनांपलिकडे जाऊन विचार करु शकत नाही कारण ती मशीन आहे. कितीही प्रकारे मानवी विचारांना, संकल्पनांना पर्याय म्हणून त्याची निर्मिती करण्यात आली असली तरी मानवाप्रमाणे भावनिक विचार क्षमता त्यामध्ये नाही.
· अनेक अभ्यासकांचे मत आहे की, चॅट जीपीटीकडून मिळविण्यात आलेली बरीच माहिती ही वापरकर्त्यांनी इतर प्लॅटफॉर्मच्या मदतीने तपासून पहावी. UPSC च्या 100 प्रश्नांपैकी केवळ 55 प्रश्नांचीच बरोबर उत्तरे देणे चॅट जीपीटीला शक्य झाले आहे असेही सांगण्यात येते. याचाच अर्थ चॅट जीपीटी या तंत्रज्ञानाला Common Sense आणि Real World Knowledge अत्यंत कमी असल्याचे दिसून येते.
· चॅट जीपीटी हे अल्गोरिदम आणि विविध पॅटर्नच्या मदतीने बनविण्यात आलेले असल्याने बरेचदा ते वापरकर्त्यांना चुकीची माहिती देत असल्याचे देखील निदर्शनास आले आहे.
माहिती तंत्रज्ञानाशी संबंधीत अशाच काही पोस्टसाठी जोडले जा आमच्या लेखकमित्र या वेबसाईट सोबत. तुमच्या प्रतिक्रया आम्हाला जरुर कळवा आणि अजून कोणकोणत्या विषयासंदर्भात तुम्हाला लेख वाचायला आवडतील ते देखील कमेंट करुन नक्की सांगा.
लेखिका – विशालाक्षी चव्हाण, मुंबई
Nice and best information….
फार छान चांगली आणि महत्वाची माहिती देणारा लेख आहे