लाडका भाऊ योजना २०२४ l मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना – CM Youth Work Training Scheme

WhatsApp Group Join Now

लाडका भाऊ योजना २०२४

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना – CM Youth Work Training Scheme”

महाराष्ट्र शासनाने “लाडकी बहीण” योजनेंनंतर आता महाराष्ट्रातील तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना आणली आहे. याच योजनेला लाडका भाऊ योजना असे म्हटले आहे. या योजनेचा (GR) जीआर २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेत प्रशिक्षणार्थीना विद्यावेतन दिले जाणार आहे. काय आहे ही योजना? या योजनेतून तरुणांना काय फायदा होणार आहे. या योजनेसाठी काय पात्रता आणि निकष आहेत. या योजनेविषयी तरुणांच्या मनात शंका आहेतच पण नक्की शासनाचा जीआर काय आहे? ते आज आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना CM Youth Work Training Scheme (लाडका भाऊ योजना २०२४):-

महाराष्ट्रात खूप मोठ्या संख्येने तरुण मुले ही शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. परंतु त्या प्रमाणात तरुणांना नोकर्‍या मिळत नाहीत तसेच त्यांना जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी योग्य मार्गदर्शनही मिळताना दिसत नाही. या सर्वांचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील वाढती बेरोजगारी. या बेरोजगारांमध्ये बारावी उत्तीर्ण, पदवीधर, पदविका, पदव्युत्तर तसेच आयटीआय अशी चांगल्या दर्जाचे शिक्षण घेतलेलेही युवक बघायला मिळतात. कधी तर रोजगारची संधी असूनही अशा युवकांकडे पुरेसा अनुभव नसल्याने त्यांना ती संधी हुकवावी लागते.

३ डिसेंबर १९७४ पासून महाराष्ट्र राज्यात “रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजना” ही योजना  महाराष्ट्र शासनामार्फत चालविली जाते. या योजनेचा लाभ तळागळातील तरुण बेरोजगारांना होण्यासाठी त्यात सुधारणा करणे आवश्यक होते. म्हणून बेरोजगार तरुणांना पुरेसा अनुभव व रोजगार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” अमलात आणण्याचे योजिले आहे.

काय आहे शासन निर्णय :-

महाराष्ट्रातील तरुणांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन, तरुणांची नोकरी मिळविण्याची क्षमता वाढविण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” ही २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून राबविण्यात येत आहे.

लाडका भाऊ या योजनेतून काय फायदा होणार आहे? 

  महाराष्ट्रातील पात्र उमेदवाराला खालील प्रमाणे लाभ होणार आहे.

  • बारावी उत्तीर्ण : दरमहा 6000//₹
  • डिप्लोमा धारक : दरमहा 8000/ ₹
  • पदवीधर तरुण:  दरमहा 10000/₹

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप CM Youth Work Training Scheme:-

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविली जाण्याचे प्रयोजन आहे. या योजनेसाठी जे संकेत स्थळ दिलेले आहे त्यावर ज्याला या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे तो उमेदवार तसेच रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील. तसेच ज्या उमेदवारांना प्रशिक्षण घ्यावयाचे आहे त्यांना प्रशिक्षण देऊ इच्छिणारे प्रशिक्षक सुद्धा याच नोंदणी पोर्टल म्हणजेच https://rojgar.mahaswayam.gov.in  या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

नोंदणी कुठे करता येईल? 

·       योजनेचे कामकाज म्हणजेच ज्या उमेदवारांन नोंदणी करवयाची आहे, आस्थापनांची नोंदणी, कार्य प्रशिक्षण व्यवसाय नोंदणी, त्यांची उपस्थिती नोंदवणे, विद्यावेतन अदा करणे, प्रशिक्षण अहवाल, अनुभव प्रमाणपत्र या सर्व गोष्टी ऑनलाइन होतील .म्हणजे या सर्व गोष्टी पारदर्शकपणे हाताळल्या जातील.  यासाठी आवश्यक असलेली सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी ही  आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांची राहील.

·       या योजनेअंतर्गत बारावी झालेले विद्यार्थी तसेच आयटीआय, पदवी, पदविका, पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असलेले विद्यार्थी ऑनलाइन नोंदणी करू शकतील,

·       लघु, मोठे उद्योग, शासकीय निम शासकीय आस्थापना/महामंडळ, सामाजिक संस्था (कंपनी कायदा २०१३ मधील सेक्शन ८ अन्वये) विविध आस्थापना यांना आवश्यकता असलेल्या कामगारांची मागणी ते या संकेत स्थळावर करू शकतात. यापैकी २० आस्थापना या कार्यप्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात.

·       या आस्थापना/उद्योगमध्ये सध्याच्या मनुष्य बळावर आधारीत सुमारे १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात उपलब्ध केल्या जातील.

·       शासकीय/ निमशासकीय आस्थापना/उद्योग/महामंडळाची कार्यालये या योजने अंतर्गत कामगारांची मागणी करू शकतील.

·       यातून उद्योगासाठी लागणारे कुशल कामगार व त्यासाठी लागणार्‍या कामगारांची पात्रता या संकेत स्थळावर उपलब्ध असेल.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत अर्जदाराची आवश्यक पात्रता (CM Youth Work Training Scheme):-

·       या योजनेसाठी अर्ज करणार्‍या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही तो उमेदवार १२ वी पास, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर झालेला असावा. ज्यांचे शिक्षण सुरू आहे ते या योजनेसाठी पात्र उमेदवार नाहीत.

·       अर्जदाराचे वय हे किमान १८ ते ३५ वर्षे असावे.

·       अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा.

·       अर्जदाराचे आधार कार्ड हे बँकेशी लिंक केलेले असावे.

·       अर्जदाराने आपली नोंदणी ही संकेत स्थळावर करून त्याचा नोंदणी क्रमांक घेतलेला असावा.

·       मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत (CM Youth Work Training Scheme) आस्थापना/उद्योगासाठीची आवश्यक पात्रता:-

·       सदर उद्योग/आस्थापना ही महाराष्ट्र राज्यात स्थित असावी.

·       सदर उद्योग/आस्थापना ही कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पोर्टलवर नोंदणीकृत असावे.

·       सदर उद्योग/आस्थापनेची स्थापना ही 3 वर्षापूर्वीची असावी.

·       सदर उद्योग/आस्थापना ही EPF, ESIC, GST, Certificate of incorporation, DPIT व उद्योग आधार ची नोंदणी केलेली असावी.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत (CM Youth Work Training Scheme)प्रशिक्षणार्थीना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे शासनामार्फत खालील प्रमाणे विद्यावेतन दिले जाईल.

·       या योजने अंतर्गत प्रशिक्षण घेण्याचा कालावधी हा सहा महिन्याचा असेल. सदरच्या प्रशिक्षण कालावधीसाठी त्या प्रशिक्षण घेणार्‍या उमेदवारला शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल.

·       या योजने अंतर्गत प्रशिक्षण घेणार्‍या उमेदवाराला किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाहनिधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू असणार नाही.

·       या योजने अंतर्गत १२ वी पास असलेल्या प्रशिक्षणार्थीला शासनामार्फत महिना ६०००/- इतके विद्यावेतन दिले जाणार आहे.

·       या योजने अंतर्गत आयटीआय/ पदविका धारक प्रशिक्षणार्थीला शासनामार्फत महिना ८०००/- इतके विद्यावेतन दिले जाणार आहे.

·       या योजने अंतर्गत पदवीधर/ पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थीला शासनामार्फत महिना १००००/- इतके विद्यावेतन दिले जाणार आहे.

या लेखाचे व्यवस्थित वाचन केल्यास नक्की योजना काय आहे हे आपल्या लक्षात येईल. उगाच घाई गडबड करून कुणीही उठसुठ अर्ज करण्याची तसदी घेऊ नये. जी घाई लाडकी बहीण योजनेसाठी केलेली आहे. नक्की योजना समजून घ्या आणि अर्ज करा.

मैत्रिणींनो तुम्हाला या अशा सरकारी योजनांची माहिती हवी असल्यास कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करा. आणि माझा लाडका भाऊ ही माहिती कशी वाटलीतुम्हाला ही माहिती आवडली कातर हा लेख वाचून तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. तेही कमेंट बॉक्स मध्ये कळवाआपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र‘ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.

1 thought on “लाडका भाऊ योजना २०२४ l मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना – CM Youth Work Training Scheme”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top