What is Concentration? एकाग्रता म्हणजे काय l concentration tips in Marathi

WhatsApp Group Join Now

Concentration म्हणजेच एकाग्रता. मन अस्वस्थ आहे, एकाग्रतेसाठी या टिप्स फॉलो करा:-

concentration tips in Marathi:एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची जी क्षमता किंवा प्रयत्न म्हणजे एकाग्रता. आपल्याला एखादी गोष्ट करायची असते पण ती आपण करू शकतोच असे नाही कारण आपल्याला जे काही करायचे असते त्या ध्येयावर आपले लक्ष केंद्रीत करणारी (concentration) एकाग्रता आपल्याकडे नसते. ही एकाग्रता कशी साधायची?

रेमेझ सॅसन असे म्हणतात की एकाग्रता म्हणजे एखाद्याच्या इच्छेनुसार लक्ष वेधण्याची जी क्षमता असते ती एकाग्रता. एकाग्रता म्हणजे लक्षावर नियंत्रण. एका विषयावर, वस्तूवर किंवा विचारावर मन केंद्रित करण्याची आणि त्याच वेळी मनातून इतर सर्व असंबंधित विचार, कल्पना, भावना आणि संवेदना वगळण्याची जी क्षमता आहे, ती म्हणजे एकाग्रता.

आपल्यापैकी बहुतेकांसाठी आपल्या कल्पना, भावना आणि संवेदना हा भाग वगळणे ही अवघड गोष्ट आहे. लक्ष केंद्रीत करणे किंवा आपल्या ध्येयावर अढळ राहणे, पण आपल्या ध्येयामध्ये आपण अढळ राहू शकत नाही कारण आपल्यापैकी बरेच जण मोबाईल, लॅपटॉप किंवा कम्प्युटर, whatsapp, टेलिग्राम किंवा इतर डजनभर apps आपल्यासाठी महत्त्वाचे असतात. आपण बर्‍याचवेळा मल्टीटास्किंग करण्यात मग्न असतो, असे करणे हे अर्थात आपल्या नोकरी धंद्याच्या दृष्टीने पुढे जाण्यासाठी सोयीस्कर असते. मल्टीटास्किंग म्हणजे एका वेळी अनेक कामे करणे. परंतु याचा आपल्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो. आपल्या वैयक्तिक जीवनावर आणि व्यावसायिक प्रतिमेवर परिणाम करणाऱ्या गोष्टी आपण विसरतो किंवा ती माहिती आपल्याला लगेच आठवू शकत नाही.

सध्याच्या काळात आपला सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. सतत ऑनलाइन, सतत काहीतरी नवीन गोष्टी पाहण्याची आणि ऐकण्याची सवय झालेली असल्याने आपण जास्त वेळ एका गोष्टीकडे मन एकाग्र करू शकत नाही.

 Concentration एकाग्रता किंवा मानसिक अस्वस्थता दूर करण्यासाठी काही टिप्स:-

खर तर मन एकाग्र करणे, यात कठीण असे काही नाही आहे. यासाठी तुम्हाला काही संशोधनावर आधारित पद्धती समजून घेण्याची गरज आहे. आणि त्या पध्दतींचा अवलंब करण्याची देखील गरज आहे.

१.      मेंदूला उत्तेजित करा:- Stimulate the brain 

आता तुमहाला वाटेल मेंदूला उतेजीत करणे म्हणजे काय? तर आपल्या मेंदूला काहीतरी करण्यासाठी प्रवृत्त करा. त्याला काहीतरी खादय पुरवा म्हणजे तो उत्तेजित होईल. त्यासाठी आपल्या मेंदूला काहीतरी काम करायल लावा. म्हणजे एखादे शब्दकोडे, सुडोकू, अशा सारखे काम मेंदूला दिले तर तो काहीतरी करण्यासाठी उत्तेजित होईल. आणि त्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. आणि तुम्हाला ताजेतवाने वाटेल, एकाग्रता वाढून तुम्ही सकारात्मक व्हाल.

हे खेळ फक्त प्रौढांसाठीच नाही तर आपण लहान मुलांना देऊनही त्यांच्या मेंदूला चालना देण्याचे काम करू शकतो. एखादे चित्र काढणे किंवा एखाद्या चित्रामध्ये रंग भरणे. हे सुद्धा मेंदूला चालना देण्यासारखेच आहे.

२.      मेडिटेशन करा (Meditation):-

मेडिटेशन म्हणजे दररोज ध्यान करणे. डोळे बंद करून तुमच्या श्वासावर लक्ष केन्द्रित करण्याचा प्रयत्न करा. मेडिटेशन हे तुम्ही सकाळी लवकर उठून आपल्या दिवसाची सुरुवात करू शकता, ते कुठेही करू शकता त्यासाठी तुम्ही तुमच्या घरात, किंवा एखाद्या शांत ठिकाणी तुमच्या घरातील अंगणात, किंवा एखाद्या गार्डन मध्ये सुद्धा करू शकता. तुमच्या रोजच्या कामातून छोटासा ब्रेक घेऊन जर दररोज दहा मिनिटे तुम्ही मेडिटेशन केल्यास तुम्ही तुमचे concentration म्हणजे तुमची एकाग्रता तुम्ही वाढवू शकता.

३.      पुरेशी झोप घ्या :-

अगदी बरोबर. आपल्या शरीराला झोपेची, नव्हे पुरेश्या झोपेची आवश्यकता असते. ती जर नाही मिळाली तर आपली दिवसभर चिडचिड होऊ शकते. म्हणून पुरेशी झोप घ्या. अशी झोप भारतात आपण रात्रीच घेऊ शकतो. काहीजण रात्रभर मोबाईल वापरुन सकाळी आळशी माणसासारखे झोपून राहतात, ते कधीच योग्य नाही. तुमचा जॉब जर रात्रीचा असेल तर ते ठीक आहे. मुंबई पुण्यासारख्या शहरात आपल्याला माहितीच आहे की ऑफिसला जाण्यासाठीच्या प्रवासात आपल्याला किती वेळ द्यावा लागतो. त्यावेळी त्या प्रवासात आपण ट्रेन, बसमध्ये सुद्धा छोटीशी नॅप घेऊ शकता आणि ती छोटीशी नॅप सुद्धा आपल्याला खूप मोठी ऊर्जा मिळवून देते. त्यामुळे तुमची अस्वस्थता निघून जाऊन आपला मेंदू कार्यक्षम होण्यासाठी तयार होतो.

४.      अवांतर वचन करणे :-

तुमचे मन अस्वस्थ असेल तर अशा वेळी आपण वाचन करू शकतो. आता तुम्ही म्हणाल आम्ही रोजचं वाचन करतो. आपल्याला ऑफीस कामासाठी, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वाचन करावेच लागते. पण अवांतर वाचन म्हणजे आपल्या रोजच्या देंनंदिन कामव्यतिरिक्त काही वाचन केले, जसे की गोष्टीची पुस्तक वाचणे, मराठी साहीत्य वाचणे,एखादे मासिक किंवा एखादे जोक्सचे पुस्तक वाचणे. असे अवांतर वाचन केले तर आपली अस्वस्थता निश्चित कमी होऊ शकते.

५.      मित्रमंडळीसाठी वेळ काढा :-

हल्लीच्या काळात आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे आपण सोशल मीडियाने एकमेकांशी कनेक्ट होतो. त्यापेक्षा आपण आपल्या रोजच्या कामाच्या गडबडीतून एखादा दिवस आपले शालेय मित्र किंवा ऑफिसचे सहकारी यांच्या सोबत थोडावेळ कुठेतरी ट्रीपसाठी प्लान करू शकता. पण ओफिसच्या सहकार्‍या व्यतिरिक्त जर आपल्या शाळा कॉलेज मधील सवंगड्यांसोबत जर एखादा दिवस बाहेर गेलात तर तुम्ही उजाडणारा नवीन  दिवस हा एका वेगळ्या प्रेरणेने अनुभवाल.

६.      योगासने, चालणे, असे व्यायाम करा:-  

आपण नेहमीच वाचतो व्यायाम, योगासने आणि चालण्याचे फायदे. पण त्याचा आपण आपल्या वैयक्तिक जीवनात किती फायदा करून घेतो? तर यांचं उत्तर ९९ % नाही असेच येईल. आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याकडे या गोष्टींसाठी वेळच नसतो. म्हणजे आपण तसा वेळ काढतही नाही किंवा त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण आपल्या शरीराला रोजच्या व्यायामाची गरज असतेच. त्यामुळे आपल्या शरीरा बरोबरच आपल्या मानलाही ताजेतवाने वाटेल.

दररोज व्यायामाला वेळ देणे शक्य नसेल तर निदान ३० मिनिटे चालण्याचा सराव करा. चालण्याने सुद्धा आपल्या शरीरातून पॉजिटिव लहरी निर्माण होतात. त्याच आनंद घ्या. जे हार्ट पेशंट, डायबेटीज पेशंट आहेत त्यांना चालण्याने खूप फायदा होतो असे शास्त्रीय निष्कर्षात दिसून आले आहे. 

७.      पौष्टिक आहार घ्या :-

आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी आपला आहारही तितकाच महत्वाचा आहे. जसे तेलकट तुपकट खाल्ल्याने आपले वजन नियंत्रणात राहत नाही तसेच आपल्या शरीर स्वास्थ्याबरोबरच आपले मानसिक स्वास्थ्य ही जपणे महत्वाचे  आहे. जर आपण पारंपरिक आणि पौष्टिक अन्न खाल्ले तरच आपले मन शांत, स्वस्थ राहणार आहे. त्यामुळे मनस्वास्थ्य टिकविण्यासाठी पौष्टिक आहारचेच सेवन करा.

आपण कधी आपले दैनंदिन वेळापत्रक निश्चित केले आहे का? म्हणजे आपण दिवसभर काय करतो? एकदा या गोष्टींवर लक्ष देऊन बघा concentration tips in Marathi:

·        आपण दिवस कसा घालवतो?

·        दिवसभर आपण काय वाचन करतो?

·        टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल वर आपण किती वेळ घालवतो?

·        सोशल मीडियावरील कोणत्या गोष्टी आपण बघतो आणि त्यावर आपण काय विचार करतो?

·        दिवसभर आपण कोणत्या प्रकारच्या मित्रमंडळींबरोबर वेळ घालवतो व त्यांच्याशी कोणत्या प्रकारच्या विचारांचे आदान प्रदान करतो?

अशा प्रकारे आपले दैनंदिन वेळापत्रक बनवा आणि ते फॉलो करा.

या वरील सर्व प्रकारच्या गोष्टींचा आपल्या मनावर सुप्तपणे परिणाम होत असतो. म्हणून आपल्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या मनाची एकाग्रता खूप महत्वाची असते. कधीतरी एकदा निसर्ग निर्मित स्थळांना भेट द्या, आपला आहार सुधारा, सोशल मीडियापासून दूर व्हा, योगासने- व्यायाम यावर लक्ष केन्द्रित करा. 

तुम्हाला “Concentration म्हणजेच एकाग्रता” ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. concentration tips in Marathi तुम्ही तुमच्या एकाग्रतेसाठी काय उपयोजना करता? तेही आम्हाला कळवायला विसरू नका. हा लेख कसा वाटला? तेही कमेन्ट बॉक्स मध्ये कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top