तुम्हाला लिहायची आवड असेल आणि त्यातून पैसे कमवायचे असतील तर कंटेंट रायटिंग हे एक अतिशय चांगले स्किल आहे. विशेष म्हणजे यामध्ये तुमचे वय काय आहे याचा काहीही संबंध येत नाही. तुमचा छंद तुम्हाला कमाईत बदलायचा असेल तर यासारखा चांगला पर्याय नाही.
कंटेंट रायटिंग हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे, पहिला कंटेंट म्हणजे एखाद्या विषयाची संपूर्ण माहिती आणि दुसरा शब्द रायटिंग म्हणजे लेखन.कंटेंट रायटिंग ही लेखनाची कला आणि शब्दांचा खेळ आहे. ज्यामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट सोप्या, मनोरंजक आणि आकर्षक शब्दात व्यक्त करायची असते. लेखन करून पैसे कमवण्यासाठी कोणत्याही विषयावर उत्तम लेख लिहिण्याची कला आहे.
आजच्या काळात, कंटेंट रायटिंग जॉब प्रोफाईलची मागणी विविध कंपन्यांकडून खूप वेगाने वाढत आहे. सध्याचे युग हे डिजिटल युग असल्याने भविष्यात अनेक requirement असणार आहेत. कंटेंट रायटिंग कोणत्याही एका भाषेची आवश्यकता नसते. तुम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा तुमच्या प्रादेशिक भाषेतही लेखन करू शकता.प्रत्येक भाषेत वेगळी मागणी आहे.
जर तुम्हाला चांगले कंटेंट लेखन करता येत असेल आणि तुम्ही कोणत्याही विषयावर फार कमी वेळात उत्तम लेख लिहू शकता! त्यामुळे तुम्ही कंपन्या आणि ब्लॉग वेबसाइटसाठी कंटेंट लिहून लाखो कमवू शकता.
कंटेंट रायटिंग शिकल्यानंतर कंटेंट रायटरला नोकरी किंवा कंटेंट रायटिंग जॉब शोधण्याची गरज नाही. कारण कंटेंट रायटर स्वत:ची ब्लॉग, वेबसाइट किंवा affiliate वेबसाइट तयार करून स्वत:साठी लिहून पैसे कमवू शकतो. तसेच अश्या अनेक website असतात ज्यांना कंटेंट रायटरची गरज असते.
कंटेंट रायटर कसे व्हावे – How to Become a Content writer?
आजच्या काळात कंटेंट रायटर हा एक उत्तम side income किंवा part time पर्याय आहे. तसेच फ्रीलान्सिंग करून तुम्हाला कंटेंट रायटिंग जॉब करायचा असेल तर तुम्ही कंटेंट रायटिंग जॉब शोधू शकता! काही वर्ष अनुभव घेतल्यानंतर चांगल्या लेखन कौशल्यासह फ्रीलान्सर बनून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता!
कंटेंट रायटिंग हा सध्या करिअरचा चांगला पर्याय बनला आहे. त्यामुळे नोकरी व्यतिरिक्त पार्ट टाइम कंटेंट रायटिंग करून तुम्ही घरबसल्या भरपूर पैसे कमवू शकता! कंटेंट रायटर होण्यासाठी काही टिप्स खालील प्रमाणे आहेत.
1. भरपूर वाचन करा
कंटेंट रायटिंगसाठी तुमचे वाचन खूप महत्वाचे ठरते. वर्तमानपत्रे, पुस्तके , मासिक ,ऑनलाइन ब्लॉग, तुमच्यासाठी अधिकाधिक वाचन करणे खूप महत्त्वाचे आहे! इतरांचे ब्लॉग आणि लेख शक्य तितके वाचा. त्यांची लिहिण्याची पद्धत याचा अभ्यास करा.
2. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय रहा.
ऑनलाइनच्या या युगात, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि लिंक्डइन इत्यादीसारख्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सक्रिय असणे आवश्यक आहे.ऑनलाइन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय राहून, तुम्ही अधिकाधिक काम मिळवू शकता! तसेच तुम्ही अनुभवी कंटेंट रायटर आणि त्यांच्या पद्धतींचे अनुसरण करू शकता! “Content writing in Marathi”
3. भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे!
कंटेंट रायटिंग तुम्ही कोणत्याही भाषेत करू शकता. मराठीत करायचे असेल तर चांगले व्याकरण, आकर्षक पद्धतीने लिहिणे. तसेच मराठी भाषेचे योग्य ज्ञान असणे आवश्यक आहे. हिंदी , इंग्रजी भाषा हि तुम्हाला काम शोधायाचे अनेक पर्याय देईल. चांगली कमाई करायची असल्यास इंग्रजीला पर्याय नाही कारण तुम्ही परदेशी clients सोबत काम करून डॉलर्स मध्ये पैसे कमवू शकता.
4. रोज सराव करा
लेखनाचा रोज सराव केल्यास तुमचे लेखन कौशल्य सुधारत जाते. रोजच्या रोज किमान ३०० शब्द लिहावेत. त्यासाठी विविध विषय निवडावेत.
५ . एखादा चांगला कोर्स करा
आजकाल अनेक चांगले ओंनलाइन कोर्स किंवा वर्कशॉप घेतले जातात. त्यातला एक करू शकता त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. फक्त कोर्से करताना त्या शिक्षकाची माहिती किंवा ती व्यक्ती डिजिटली कुठे आहे हे तपासून पहा. कारण आजकाल फसवणारे सुद्धा भरपूर आहेत.
कंटेंट रायटिंगचे प्रकार कोणते आहेत? Types of Content Writing
जसे कंटेंट रायटर्सचे वेगवेगळे प्रकार असतात, त्याचप्रमाणे कंटेंट रायटिंग देखील वेगळे असते. (Content writing in Marathi)
- SEO Content Writing
- Technical Writing
- Education Writing
- B2B Writing
- Script Writing
- Ghost Writing
- Press Release Writing
- Blog posts.
- Website copywriting.
- Social media posts.
- Advertising/sales copywriting
- Ebooks & white papers.
या प्रकाराव्यतिरिक्त सुद्धा अनेक प्रकारचे लेखन केले जाते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेखन करू शकता. तुमच्या आवडीच्या विषयावर म्हणजे nische निवडू शकता. समजा तुम्हाला health related लिहायला आवडत असेल तर तो विषय घेऊन लिखाण करू शकता.
कंटेंट रायटर जॉब्स किती प्रकारचे आहेत? (Content writing jobs )
Freelancer / Remote – घरात बसून blogging करून किंवा विविध digital marketing agency साठी काम करू शकता. अनेक website साठी ही per article लिहून कमाई करू शकता. पण त्यासाठी मेहनत करावी लागेल. एक कंटेंट रायटर दरमहा 30 ते 50 हजार कमवू शकतो पण त्यासाठी तुम्हाला तेवढे स्कील्स develope करावे लागतील. यासाठी वयाची अट नाही.
Part time – नोकरी सांभाळून तुम्ही रोज २,३ तास लिहून १०-१५ हजार कमवू शकता.
FULL time – जर तुमच्याकडे mass communication , BA/ MA इंग्लिश डिग्री असेल तर तुम्ही फ्रेशर म्हणून जॉब साठी apply करू शकता. १५-२० हजार पासून पगार सुरु होतात.
कंटेंट रायटिंग नोकर्या कशा शोधायच्या? (Content writing in Marathi)
तुमचे चांगले network असेल तर सर्वात उत्तम, त्यामुळे ओळखीने तुम्हाला काम मिळण्यास सोपे जाईल. समजा नसेल तर तुम्ही इंटरनेटवर अशा फ्रीलान्सिंग वेबसाइट्स (freelance,upwork,fiverr) आहेत, तिथे तुम्ही काम शोधू शकता. जिथून तुम्हाला कंटेंट रायटरच्या नोकर्या मिळू शकतात! Facebook मधील ब्लॉगिंग ग्रुपमध्ये सामील होऊन तुम्ही काम देखील शोधू शकता! Linked in , naukri ,indeed वर देखील अनेक जॉब्स असतात. फक्त वेळेत apply करणे. चांगला पोर्टफोलिओ आणि samples बनवून मेल करणे महत्वाचे असते. तसेच Writer sheetal या youtube channel वर तुम्हाला यासंबंधी भरपूर माहिती मिळेल .
उत्तम माहीती. सध्या काही कारणांमुळे बाहेर जाऊन जॉब करणे शक्य नसते म्हणून ज्यांच्याकडे लिखाणाचे कौशल्य आहे त्यांच्यासाठी हा योग्य पर्याय आहे. मी ही माहीती फेसबुक वर वाचली होती आणि तुमचा पहिला content writing चा workshop attend केला होता.
आता मी तुमच्या मार्गदर्शनाखाली लिहीत आहे.
Need job
Good informetion