Differences between India-Maldives tourism and Lakshadweep Tourism in Marathi -मालदीव आणि लक्षद्वीप
मालदीव आणि लक्षद्वीप निसर्गरम्य बेटांसाठी म्हणूनच पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली दोन ठिकाणे आहेत ! एक भारता जवळ आणि दुसरे भारतात असलेले.
एक प्रजासत्ताक आणि दुरे केंद्रशासित !
दोन्ही देशात इस्लाम धर्म प्रामुख्याने अनुसरला जातो.
अलिप्त राष्ट्र गट चळवळ , इस्लामिक सहकारी संघटना, सार्क राष्ट्रकुल परिषद, संयुक्त राष्ट्रे इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा मालदीव सदस्य आहे .
सध्याच्या राजकीय सामाजिक आणि पर्यावरणीय बदलांच्या पार्श्व भूमीवर अजूनही काही नोंदी महत्वाच्या ठरतात .
मालदीव मधील बदललेले सरकार , चीन च्या प्रभावाखाली कार्य करताना आढळते.
दोन्ही देशात इस्लाम धर्म प्रामुख्याने अनुसरला जातो.
अलिप्त राष्ट्र गट चळवळ , इस्लामिक सहकारी संघटना, सार्क राष्ट्रकुल परिषद, संयुक्त राष्ट्रे इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा मालदीव सदस्य आहे .
सध्याच्या राजकीय सामाजिक आणि पर्यावरणीय बदलांच्या पार्श्व भूमीवर अजूनही काही नोंदी महत्वाच्या ठरतात .
मालदीव मधील बदललेले सरकार , चीन च्या प्रभावाखाली कार्य करताना आढळते.

चीन देशाचे जागतिक स्वप्न सर्वमान्य असले तरी चीनचे स्वप्नपूर्ती चे मार्ग अनेकदा अनेक देशांसाठी अडचणीचे ठरले आहेत. तो एक वेगळाच विषय आहे. परंतु चीनचे धोरण आणि मालदीव देशाचे सध्याचे राजकारण दोन्हीही भारताला मानवणारे नाहीत .
भारतात देखील सत्ता बदल झाल्यापासून त्याचे पडसाद आणि परिणाम सातत्याने या न त्या मुद्द्यावरून झालेल्या सध्याच्या सरकारच्या निर्णयातून स्पष्ट दिसतात.
बहुतांश जनतेला ते अपेक्षित आहे आणि भावणारे देखील आहे.
अतीव सहिष्णुता, कातडी बचाव धोरण आणि ठकास महाठक या साऱ्यांचा सुयोग्य मेळ सांभाळत भारत सरकार ठाम पावले उचलत आहे.
मालदीव येथून भारतीय सैनिकांची हकालपट्टी झाली आणि त्याला प्रत्युत्तर देत भारत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करत काही पावले उचलली .
या पार्श्वभूमीवर लक्षद्वीप येथील भारताचे सध्याचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची भेट सध्या सर्वत्र चर्चेत आहे.
मालदीव आणि लक्षद्वीप यातील काही स्थनिक आणि काही व्यावहारिक तुलनात्मक बदल पुढील गोष्टी कशा ठरतील किंवा ठराव्यात याबद्दल स्पष्टता आणण्यात सहाय्यभूत ठरतील.
भारताच्या दक्षिणेला असलेले मालदीव हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राष्ट्र आहे. साधारण ३०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेलं हे राष्ट्र ८२० किलोमीटर दक्षिणोत्तर तर १३० किलोमीटर पूर्व पश्चिम असे विस्तारले आहे.
1960 च्या दशकात संयुक्त राष्ट्राच्या मिशनने मालदीव द्वीपसमूह पर्यटनासाठी योग्य नाही असे जाहीर केले होते.
त्यानंतर म्हणजे 1972 मध्ये मालदीवमध्ये पाहिले रिसॉर्ट कुरुंबा आयलंड रिसॉर्ट सुरू करण्यात आले आणि फेब्रुवारी 1972 मध्ये पहिल्या पर्यटकांच्या गटाचे आगमन झाले , तेव्हापासून मालदीवमध्ये पर्यटन व्यवसाय वाढला असे म्हणतात.
या देशातील इतर बाबींबाबत थोडक्यात माहिती घेऊ.
या देशातील फार कमी जमीन शेती योग्य असून या देशामध्ये भोपळा, रताळी तसेच अननस, ऊस, बदाम आणि उष्णकटिबंधीय प्रदेशात येणाऱ्या काही भाजीपाल्यांचे व फळांचे उत्पादन घेतले जाते.
नारळाच्या झाडांपासून खोबरे व काथ्या तयार करण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.
मुख्य अन्न भात व मासे हे असले तरी तांदळाची आयात मात्र त्यांना करावी लागते.
मालदीव ची उंची समुद्र सपाटीपासून केवळ 1.5 मीटर आहे. जगात सर्वात सपाट ठिकाणांपैकी मालदीव एक आहे.
मालदीव ची राजधानी माले हे एकमेव पर्यटन स्थळ असून देशाच्या सर्वसाधारण मध्यभागी हे शहर वसलेले आहे. येथे अनेक पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. पर्यावरणाची काळजी घेत , तेथील सौंदर्य अबाधित राहावे म्हणून म्हणून अनेक कायदे येथे आहेत.
आता आकर्षणाची प्रमुख करणे पाहू .
मालदीवच्या समुद्रामध्ये अनेक प्रकारच्या दुर्मिळ कासवे आणि त्यांच्या प्रजाती आढळून येतात.
तसेच येथील समुद्रात व्हेल आणि शार्क माशांची संख्या खूप मोठी आहे. या माशांना आपण सहज समुद्रामध्ये सहज पाहू शकतो.
मालदीवच्या समुद्र किनाऱ्यांवर बारीक चमकदार पांढरी शुभ्र वाळू दिसते .
अशा सर्व वैविध्य पूर्ण वैशिठ्यांमुळे मालदीवच्या बीचला जगाचा स्वर्गही म्हटले जाते.
हे सर्व असेल तरी
मालदीवमध्ये सतत हवामान बदल घडत असतात कारण . बहुतांश बेटे
समुद्रसपाटीपासून सहा फूट उंचीवर आहेत.
मालदीव देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा वाटा सर्वाधिक आहे हे लक्षात घेतले पाहिजे. जीडीपीचा एक चतुर्थांश भाग येथून येतो.
दरवर्षी पर्यटक मालदीवला भेट देतात, यामध्ये भारतीयांचं प्रमाणही जास्त आहे. एकूण ६० टक्क्यांहून अधिक प्रमाण हे भारतीय पर्यटकांचे आहे.
याची काही प्रमुख कारणे पाहू.
१)भारतीयांसाठी मालदीव व्हिसा फ्री आहे.
२)भारत ते मालदीवपर्यंत फ्लाइट कनेक्टिव्हिटी चांगली आहे.
३) भारतातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांमधून मालदीवला थेट विमानाने पोहोचता येते.
४) मालदीवमध्ये सन आयलंड, ग्लोइंग बीच, , माले सिटी, माफुशी, आर्टिफिशियल बीच, मामिगिली, फिहलहोही आयलंड ही प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत.
गेल्या वर्षी दोन लाखांहून अधिक भारतीयांनी मालदीवला भेट दिली आहे.
पंतप्रधान मोदी यांची लक्षद्वीप भेट या तुलनात्मक घटनेला कलाटणी देणारी ठरली. शिवाय मालदीवच्या काही मंत्र्यांकडून पंतप्रधान मोदीं यांचे बाबतआक्षेपार्ह वक्तव्य केलं गेलं.
आता नेटकरी लक्षद्वीप आणि मालदीवची तुलना करताना दिसत आहे.
लक्षद्वीप विषयी काही ठळक आणि तुलनात्मक गोष्टी पाहू.
लक्षद्वीप हा भारतातील आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी एक आहे.
मालदीव प्रजासत्ताक देश आहे.
मालदीव हा लक्षद्वीप पेक्षा दहा पटींनी मोठा देश आहे.
लक्षद्वीप चे एकूण क्षेत्रफळ जेमतेम बत्तीस किलोमीटर आहे.
कोची शहरापासून त्याचे अंतर साधारण साडेचारशे किलोमीटर आहे.
मालदीव आणि लक्षद्वीपचे या मधील अंतर सातशे किलोमीटर आहे.
मालदीव हा 1200 बेटांचा समूह आहे तर लक्षद्वीप ३६ बेटांचा आहे.
36 पैकी फक्त 10 बेटांवर लोक राहतात, इतर बेटांवर कोणीही राहत नाही.
मालदीवची लोकसंख्या सुमारे 5 लाख आहे. तर लक्षद्वीप ची लोकसंख्या जेमतेम साठ हजार आहे.
मालदीव प्रमाणेच लक्षद्वीप येथे मोठ्या प्रमाणावर लोक इस्लाम धर्माचे पालन करतात.
पर्यटनाला बंधनकारक असणारी लिमिटेशनस्
१) लक्षद्वीपला हवाई मार्गाने जाण्यासाठी एकच हवाईपट्टी आहे. त्याची कनेक्टिव्हिटी कोचीशी आहे.
२) लक्षद्वीपच्या बाकीच्या बेटांवर जाण्यासाठी बोटीची मदत घ्यावी लागते.
३) लक्षद्वीपला जाणे भारतीयांसाठी थोडे कठीण आहे. सर्व प्रथम लोकांना कोचीला जावे लागेल. त्यानंतरच लक्षद्वीपला जाता येईल.
४) लक्षद्वीपला जाण्यासाठी लोकांना प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागते. येथे अनेक बेटे आहेत जिथे लोकांना जाण्यास मनाई आहे.
लक्षद्वीपमध्ये भेट देण्यासारखी ठिकाणे
अगट्टी, कदम, कावरत्ती बेट, बांगराम, लाइट हाऊस, जेट्टी साइट, मशीद, जेट्टी साईट, थिनाकारा या ठिकाणांना भेट देणे लोक पसंत करतात.
बहुतेक वेळा येथील तापमान २० ते ४० अंशाच्या दरम्यान असते. अर्थात भेटीचा पसंतीचा हंगाम फारतर डिसेंबर ते फेब्रुवारी महिना एवढाच असतो.
अशा रीतीने मालदीव आणि लक्षद्वीप हे दोन्हीही आपापल्या जागी वेगवेगळे स्थान वैशिष्ट्ये घेऊन स्वतंत्रपणे जगणारे विभाग मालदीवच्या एका घटनेमुळे तुलनात्मक झाले .
वैचारिक स्तरावर ही आत्मसन्मानाची बाब झाली असून भविष्यात भारत सरकार कोणते निर्णय घेते, कोणते नियम शिथिल किंवा कडक करते याकडे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे.
यात विकास आराखडा, त्यासाठी लागणारे अर्थ सहाय्य, मनुष्यबळ , होणारे फायदे किंवा संभाव्य तोटे याचा ही साधक बाधक विचार करावा लागेल.
प्रश्न केवळ देशाच्या अस्मितेचा नसून जागतिक घडामोडींवर परिणाम करणाऱ्या आणि युद्ध सदृश परिस्थिती निर्माण होते की काय या संभाव्य विचारधारेचा देखील आहे.
पर्यटन हा फक्त ट्रिगर पॉइंट आहे हे लक्षात घे य ला हवे.
इतर देशांतून वर्षातून साधारण किती लोक मालदीव ला भेट देतात यावर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतील.
सध्याची आकडेवारी अशी :
भारत: 2 लाख 5 हज़ार
रूस: 2 लाख 3 हज़ार
चीन: 1 लाख 85 हज़ार
यूके: 1 लाख 52 हज़ार
जर्मनी: 1 लाख 32 हज़ार
इटली: 1 लाख 11 हज़ार
अमेरिका: 73 हज़ार
वरील आकडेवारीतून हे स्पष्ट होत आहे की भारतावर मालदीवचे मुख्य आर्थिक बलस्थान असलेले पर्यटन मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे.
आपण अशी आशा नक्कीच करू शकतो की , उद्भवलेल्या परिस्थितीचा लाभ घेऊन भविष्यात लक्षद्वीप पर्यटन क्षेत्रात आघाडीवर राहून आपला सर्वांगीण विकास साधेल .
गेल्या काही वर्षात लडाखने जसा पर्यटन क्षेत्रात आमूलाग्र बदल करून जगात नाव कमावले, तसेच, किंबहुना त्याहून जास्त ऐतिहासिक आणि अस्मिता जपणाऱ्या या घटनेचा साक्षीदार लक्षद्वीप बनेल.
जगभरात या गोष्टीची दखल घेतली जाईल. भारताला , भारतीयाला याचा कायम अभिमान राहील.
लेखिका – ज्योती आनंद एकबोटे, पुणे
खूपच छान व विस्तृत माहिती दिली आहे
खूप उपयुक्त माहिती
ज्ञानात भर पडली .
अशी चांगली माहिती मिळत राहो
धन्यवाद ज्योती
Thanks. Good information
Thought provoking information.
Great!