ज्यांचा वाचन हा छंद आहे, वाचनामुळे स्वतःचे जीवन समृद्ध होते, वाचन हेच स्वतःचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते अशी ज्यांची ठाम समजूत असते. त्यांच्यासाठी ई-पुस्तक म्हणजे एक पर्वणीच आहे.
ई-पुस्तक याचा साधा सरळ अर्थ म्हणजे इलेक्ट्रॉनिक पुस्तके. या प्रकारच्या पुस्तकात मजकूर, चित्रे किंवा दोन्ही गोष्टी समाविष्ट केल्या जाऊ शकतात. यालाच पुस्तकाचे “डिजीटल रूपांतर” म्हटले तरी काही पुस्तके ही फक्त ई-पुस्तके म्हणूनच प्रकाशित केली जातात. ई-पुस्तके ही ई-बुक रीडर या वाचण्यासाठी तयार केलेल्या उपकरणावर वर नाहीतर आपण आपल्या मोबाईलवर, संगणकावर, लॅपटॉप किंवा आयपॅडवर वाचू शकतो. प्रवासामध्ये, ट्रेनमध्ये, बसमध्ये एकट्याने प्रवास करायचा असेल तेव्हा हीच ई पुस्तके आपली सोबत करतात. ऑफिस मध्ये काम करणार्यांना, विद्यार्थ्यांना पुस्तकांचे ओझे सावरत नेण्यापेक्षा आपल्या मोबाईलवर ती डाऊनलोड करून ठेवली की आपल्या फावल्या वेळेत ती वाचता येतात. काही ई पुस्तक ही आपल्याला वाचायचा कंटाळा आला किंवा वाचण्यासाठी वेळ नसेल तर आपण ऐकूही शकतो. डिजिटल तंत्रज्ञान हे खूप पुढारलेले आहे.
ई-पुस्तक म्हणजे काय? ई पुस्तकाचे फायदे आणि ई पुस्तकाची विक्रीकरुन पैसे कमवता येतात का?
ई-पुस्तक म्हणजे एखाद्या लिखित पुस्तकाची सॉफ्ट कॉपी. जिथे पुस्तक प्रकाशित केली जातात, पण इलेक्ट्रॉनिक स्वरूपात. सॉफ्ट कॉपी म्हणजे डिजिटल दस्तऐवज. आपण एखाद्या महत्वाच्या दस्त ऐवजाचे पीडीएफ स्वरुपात जतन करून ठेवतो. त्याच पद्धतीने आपल्याला एखाद्या आवडलेल्या पुस्तकाचे सुद्धा पीडीएफ स्वरुपात आपण ई-पुस्तक जतन करून ठेवू शकतो. या व्यतिरिक्त आपण आपल्या मोबाइलमध्ये सुद्धा ई-पुस्तक वाचण्यासाठी काही आप्स डाऊनलोड करू शकतो. ज्यामुळे आपल्याला आपले वाचन समृद्ध करता येते.
पूर्वी ठिकठिकाणी ग्रंथालये उपलब्ध होती तिथे आपण सभासदत्व घेतले की आपल्याला हवी ती पुस्तके घेऊन वाचायला मिळत असत. काही दिवसांनी ती पुस्तके परत करून दुसरी पुस्तके आपण घेऊन येऊ शकत होतो. पण आताच्या ह्या धकाधकीच्या जीवनात, डिजिटल युगात लोकांना ग्रंथालयात जाऊन पुस्तके घेणे देणे हा एक खर्चिक आणि वेळ काढू उपाय वाटतो त्यापेक्षा ते ई-पुस्तक हा पर्याय निवडतात. आता अशा प्रकारची ग्रंथालये राहिली नाहीत.
सन 2000 पासून इंटरनेटवर लिखित साहित्य आणि ई-पुस्तक विक्री केली जात होती. जिथे वाचक इ कॉमर्स प्रणाली द्वारे वेबसाइट वरुन पारंपरिक लिखित आणि ई-पुस्तके खरेदी करीत असत. ई-पुस्तक विकत घेण्याचे मुख्य कारण म्हणजे वाजवी दर आणि वेळची बचत. म्हणजेच आपल्या हवी ती पुस्तके आणि आपल्या हव्या त्या वेळेत उपलब्ध करून घेता येतात.
ई-पुस्तकाचे फायदे :-
१. आताच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. अशावेळी आपली वाचनाची आवड ही मागे पडू शकते. पण आपण ई-पुस्तक वाचून कमी वेळात आपली आवड जोपासू शकतो.
२. ई-पुस्तक सेवा पुरविणारी आमझोन किंडल ही नवीन लेखकांसाठी लिखाण करण्याची एक उत्तम सोय आणि संधी आहे. काहींना लेखन करण्याची आवड असते पण त्याचे लेखन करून ती पुस्तके प्रकाशित करणे म्हणजे त्यात वेळ आणि पैसाही खर्च होतो. त्यापेक्षा त्यांना ई-पुस्तक प्रकाशित करून ते इतरांना वाचनासाठी देणे सोयिस्कर पडते. म्हणजेच ज्यांना वाचनाची आवड आहे ते वाचू शकतात आणि ज्यांना लिखाणाची आवड आहे त्यांना ही चांगली संधी आहे. या प्लॅटफॉर्मवर स्वतः लिहिलेले पुस्तक आपण विनामूल्य प्रकाशित करू शकतो.
३. ई-पुस्तकामुळे आपल्याला नवीन पुस्तकांची माहिती आणि उपलब्धता कळू शकते. आपली एखाद्या आवडत्या लेखकाची कुठली पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत याची माहिती मिळू शकते. आणि ती सुद्धा एका क्लिक वर. आपल्या आवडी बरोबरच गणित, विज्ञान, इतिहास, राजकारण, भौगोलिक ज्ञान या माहिती बरोबरच यातील पुस्तकेही आपल्या वाचनात येऊ शकतात.
४. आपल्याला याची माहिती आहे का? मोठमोठ्या विश्व विद्यालयांमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या पुस्तकांची ई लायब्ररी सुरू केली आहे.
५. आताचे विद्यार्थी अर्थार्जनासाठी विविध अभ्यासक्रम निवडून त्यामध्ये विद्या विभूषित करतात. त्यासाठी त्यांना काही संदर्भीय साहीत्य आणि त्यांच्या अभ्यासक्रमविषयी काही पुस्तकांची आवश्यकता असते. पूर्वी या अशा विद्यार्थांना विविध ग्रंथलये पालथी घालावी लागत होती पण आता या ई-पुस्तक आणि ई लायब्ररी मुळे हे त्यांना सहज उपलब्ध होऊ शकते.
ई-पुस्तक विक्री करून पैसे कमवता येतात का?
ई पुस्तकाची विक्री करून आपल्याला पैसे कामविता येतात, यामध्ये ॲमेझॉन किंडल या ॲप द्वारे तुम्ही तुमच्या लिहिलेल्या ई-बुकची विक्री करुन पैसे कमवू शकता. जर तुमच्या ई बुक ची विक्री झाली तर यामधील काही रक्कम ही या कंपनीकडे कडे ठेवली जाते व उरलेली रक्कम ही लेखकाला दिली जाते.
ई पुस्तकांचे वितरण कसे केले जाते:-
ई-पुस्तके ही इंटरनेटवर डाउनलोड करण्यायोग्य दस्त ऐवज म्हणून वितरित केली जातात. जी आपण ऑफलाइन म्हणजेच इंटरनेट शिवाय वाचू शकतो. ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन वेगवेगळे वेब ब्राउझर असतात.
आपल्या वाचकांना किंवा ग्राहकांना वेबसाइटवर ई-पुस्तके शोधून वाचता येण्यासारखी सुविधा उपलब्ध असते. आपले वाचक ती पुस्तके विकतही घेऊ शकतात. परंतु ज्या वाचकाला एखादे पुस्तक विकत घ्यायचे असेल तर ते थेट प्रकाशकाच्या किंवा वितरकांच्या पूर्व परवानगीने ती विकत अथवा डाउनलोड करून घेऊ शकतात. ई पुस्तके आपण एका वेळी एका ठिकाणी संग्रहीत करून ठेवू शकतो.
मे 2007 मध्ये ऍपलचे सीईओ स्टीव्ह जॉब्स यांनी आयपॉड नॅनो हे सादर केले. या आयपॉडमध्ये एक हजार गाणी आहेत आणि ह्याचे वजन दोन पेन्सिल पेक्षाही कमी आहे.
सध्याची ई पुस्तकांची स्थिती:-
वर म्हटल्याप्रमाणे डिजिटल तंत्रज्ञान एका एका टप्प्याने पुढे जात आहे. ई पुस्तकांबरोबरच ई ई-ऑडिओ आणि व्हिडिओ पुस्तके, ऑडिओ बुक एफएम चॅनेल असे एक एक टप्पे येत आहेत. हाच खरा ई-पुस्तकांचा विकसनाचा काळ आहे. मराठी वाचक फक्त भारतातच नव्हे तर इंग्लंड, अमेरिका, व समुद्रातल्या बोटींवरही मराठी वाचक आहेत. महाराष्ट्रात मराठी वाचक आहेत पण अनेक लोक पुस्तकांच्या किमती पाहून ती विकत घेणे टाळतात. या अशा गोष्टींमुळे विक्री कमी होते त्यामुळे प्रकाशकांना पुस्तकांच्या किमती जास्त ठेवणे भाग पडते
लेखकांना प्रकाशक मिळताना काय अडचणी येतात याचा उल्लेख “मृत्युंजय” चे लेखक शिवाजी सावंत यांनी त्यांच्या एका मुलाखतीत संगितले आहे. मग एक लक्षात घ्या ग्रामीण आणि परदेशातील लेखकांची काय अवस्था असेल. नवीन काळातील सर्व प्रसिद्ध लेखक इंटरनेटवरून आले आहेत. ‘प्रतिलिपी’, ‘ई पुस्तकालय’, ‘मातृभारती’ असे अनेक ई-पुस्तक प्रकाशित करणारे प्रकाशक वाढत आहेत. महिन्याला सुमारे २०० नवीन ई पुस्तके एकट्या मराठीत प्रकाशित होत आहेत.
ई-पुस्तके विरुद्ध लिखित पुस्तके अशी तुलना करणे चुकीची आहे. इंटरनेट वरील ई पुस्तके आणि कागदावरील लिखित पुस्तके ही वाचकांपर्यंत पोहोचण्याची माध्यमे आहेत. प्रत्येक माध्यमाची स्वतःची अशी काही स्थान आहेत आणि त्यानुसार ती माध्यमे आपापले काम करत असतात. टीव्ही व रेडिओवर बातम्या सुरू झाल्यावर वर्तमानपत्रांचा खप कमी न होता उलट वाढला. वृत्तवाहिन्या वाढल्या, तशी वर्तमानपत्रे कमी न होता त्यांची संख्या दिवसागणिक वाढत गेली. त्यातील काही वृत्तपत्रांनी आपल्या स्वतःच्या वाहिन्या सुरू केल्या. इंटरनेट वरून जेव्हा न्यूज येऊ लागल्या तेव्हा सर्व वृत्तपत्रांनी आपल्या ई आवृत्त्या सुरू केल्या. इंटरनेट आले म्हणून लोकांनी वृत्तपत्रे वाचणे टाकले नाही तसेच टीव्ही आल्यावर चित्रपट बंद झाला नाही. चित्रपट आल्यावर नाटके बंद पडली नाहीत. आता तर हे सर्व इंटरनेटवर आहेत आणि ओटीटी, यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत.
आता जशी वाचक आणि लेखकांना संधि मिळत आहे तशीच ई पुस्तक ऑडिओमुळे आवाजाला ही यात प्राधान्य दिले जात आहे. वॉइस ओवर आर्टिट्स या क्षेत्रात उतरले आहे. उत्तरोत्तर यात अशीच प्रगती होत आहे.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
लेखिका – सपना कद्रेकर मुंबई
खूप छान आणि सविस्तर माहिती. धन्यवाद.
खूप छान आणि उपयोगी अशी माहिती मिळाली ताई …असेच सुंदर लेख लिहीत जा
अतिशय उपयुक्त माहिती
उपयुक्त माहिती
अनेक नवलेखकांना या संधीच लाभ घेता येईल