Essential Spices in Indian kitchen: भारतामध्ये मसाले असल्याशिवाय स्वयंपाक अजिबात होत नाही. भारतीय स्वयंपाकाची चव मसाल्यांमध्ये सामावलेली असते. या लेखामध्ये आपण कुठले कुठले मसाले वापरले जातात. त्यापैकी दहा मसाल्यांचे उपयोग व महत्त्व पाहणार आहोत. मसाले हे अन्नाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहेत. मसाले हे अनेक नैसर्गिक पदार्थांचे मिसळून तयार होतात. कुठलाही मसाला म्हणजे एखाद्या झाडाचे पान, फळ, फुल, खोड हा कुठलाही भाग असू शकतो. ते अन्नात मिसळले की पदार्थाला विशेष चव येते. तसेच या मसाल्यांचे आरोग्य विषयक सुद्धा खूप फायदे आहेत. भारतीय स्वयंपाक घरात अनेक प्रकारचे मसाले सापडतात. भारतामध्ये हे मसाले केरळ राज्यात प्रामुख्याने उगवले जातात. प्रत्येकाचे वेगवेगळे गुणधर्म आहेत आणि ते गुणधर्म अतिशय उपयोगी आहेत.
भारत हा देश उष्ण प्रदेशात येत असल्यामुळे, तिथे अन्न लवकर खराब होते. मसाल्यांच्या वापरामुळे अन्न खराब होण्याची शक्यता कमी होते. बऱ्याच मसाल्यांमध्ये रोगप्रतिकारक गुण असतात. त्यामध्ये विटामिन बी, सी, लोह, कॅल्शियम आणि इतर अँटीऑक्सिडेंट यांचा उत्तम स्त्रोत असतो.

अनेक मसाले हे औषध, सौंदर्य प्रसाधन, सुगंध उत्पादने तसेच धार्मिक कार्यामध्ये उपयोगी असलेल्या गोष्टी यामध्ये वापरले जातात.
आता आपण खालील मसाल्यांचे उपयोग आणि त्यांचे गुणधर्म (Essential Spices in Indian kitchen)बघूया.
१)वेलदोडा–भारतीय स्वयंपाकात दोन प्रकारचे वेलदोडे वापरले जातात. हिरवा आणि काळा. हिरवा वेलदोडा गोड पदार्थात वापरतात तर काळा वेलदोडा मसालेदार पदार्थात वापरतात. दोन्हीही वेलदोड्यांना चव आणि सुगंध आहे. वेलदोड्यांमध्ये विटामिन सी आणि लोह असते.
वेलदोड्याचे उपयोग–
*चहा मध्ये वेलदोडा टाकून प्यायल्यास सर्दी आणि खोकल्यापासून पासून मुक्तता मिळते.
*वेलदोडा खाल्ल्यामुळे लाल पेशी वाढण्यास मदत होते.
*पित्त झाले असल्यास किंवा मळमळ होत असल्यास वेलदोडा जर तोंडात ठेवला तर त्रास कमी होण्यास मदत होते.
*वेलदोडा खाल्ला तर ऍसिडिटी कमी होते.
*वेलदोडा तोंडात ठेवल्यास मुखदुर्गंधी कमी होते.
*वेलदोडा खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते.
*वेलदोडा चहात टाकून प्यायल्यामुळे पोटावरची चरबी कमी होते. आणि गॅस कमी व्हायला मदत होते.
२) दालचिनी—दालचिनीचे झाड सदाहरित झुडपा सारखे असते. हे झाड मुख्यतः श्रीलंका आणि भारतामध्ये केरळ या ठिकाणी उगवते. समुद्रसपाटीपासून हजार मीटर उंचीवर हे झाड वाढते. दालचिनी म्हणजे झाडाच्या खोडाच्या आत मधील भागात असलेली पुंगळी असते. दालचिनीला कलमी पण म्हटले जाते. हा एक अत्यंत स्वादिष्ट मसाला आहे. दालचिनीचे दोन प्रकार आहेत. कॅसिया आणि सिलोन.
दालचिनीचे उपयोग—
*पाण्यामध्ये दालचिनीची पूड उकळून त्यामध्ये मध आणि मिरेपूड टाकून घेतल्यास सर्दी आणि दुखत असलेला घसा बरा होतो.
*दालचिनी, सुंठ,व जिरे समप्रमाणात एकत्र करून जेवणानंतर घेतल्यास पोट फुगत नाही व अपचनही होत नाही.
*मळमळ ,जुलाब व उलटी याकरता दालचिनी उपयुक्त आहे.
* गर्भाशयाच्या विकारांवर दालचिनी खूप उपयुक्त आहे.
*दालचिनीची पाने किंवा साल हे मिठाई आणि इतर पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतात.
*डोकेदुखी साठी दालचिनीच्या पावडरचा लेप वापरतात
*मुरुमांसाठी दालचिनी ची पावडर लिंबामध्ये मिसळून त्यावर लावली की मुरमे बरी व्हायला मदत होते.
३) लवंग —-लवंग ही औषधी वनस्पती आहे. लवंगाचे झाड नेहमीच हिरवेगार असते. उंची बारा ते तेरा मीटर असते. झाडाची साल पिवळट असते. झाडाला सगळ्या बाजूंनी कोवळ्या आणि खाली वाकणाऱ्या फांद्या असतात. पानांचा आकार अंडाकार असतो. लवंगाचे फुल निळसर तांबडे असते. तेच वाळवून लवंग म्हणून बाजारात विकायला येते. या झाडाला साधारण नऊ वर्षांनी फुल येते.
लवंगी चे उपयोग—-
*लवंगी चा उपयोग मुख्यतः औषध उत्पादनांमध्ये केला जातो.
*लवंगी चा उपयोग अन्नपदार्थाला चव आणि सुगंध देण्याकरता केला जातो.
*लवंगी चा उपयोग दात दुखी साठी केला जातो. टूथपेस्टमध्ये लवंग हा एक मुख्य घटक असतो. दात दुखत असल्यास लवंगीचे तेल लावल्यामुळे दात दुखण्यापासून मुक्तता होते.
*मळमळ व उ*लटी करता लवंगी ची पूड हे एक अतिशय गुणकारी औषध आहे.
*लवंगी मध्ये मुख्यतः पाणी, प्रथिने, तंतू, मेद, कर्बोदके, खनिजे आणि ब समूह जीवनसत्वे असतात. त्यामुळे त्याचा स्वयंपाक घरातील वापर अतिशय उपयोगी आहे.
*लवंगी चा वापर दंतघावने, गुळण्याकरण्या करता, साबण, सौंदर्यप्रसाधने, गरम पेय, तेल आणि अत्तर यामध्ये होतो.
४) हळद—हळदीला भारतातील वातावरण अनुकूल असल्यामुळे संपूर्ण भारतामध्ये हळदीची लागवड होऊ शकते. भारतामध्ये मुख्यतः चार प्रकारच्या हळदीची लागवड करण्यात येते. एका जातीची हळकुंड dark पिवळ्या रंगाची असतात. त्यांचा उपयोग रंग तयार करण्यासाठी करतात.
तिला लोखंडी हळद असेही म्हणतात. दुसऱ्या प्रकारची हळद ही फिकट पिवळ्या रंगाची असते. तिचा उपयोग स्वयंपाकात होतो.
तिसऱ्या प्रकारची हळद म्हणजे रान हळद. चौथ्या प्रकारची हळद म्हणजे आंबेहळद. तिचा उपयोग शरीरावर सूज आल्यास व मार लागल्यास त्यावर लेप लावण्याकरता होतो. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या हळदीच्या जातीचे उत्पादन होते.
हळदीचे उपयोग—-
* हळद खाल्ल्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते.
*हळदी मधील कर्क्युमिन हे हृदयविकाराचा धोका कमी करते.
*घशाला जंतू संसर्ग झाल्यास दूध हळद प्यायल्यामुळे आराम होतो.
*हळदीमुळे जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध होतो. जखमेवर हळदीचा लेप लावल्यास तो अँटीसेप्टिक म्हणून काम करतो.
*रोज हळद खाल्ल्याने अन्न पचनास मदत होते.
*रोज जेवणात हळदीचा वापर केल्याने रक्त शर्करा पातळी नियमित राहते.
*हळदीमध्ये असलेल्या एका अँटिऑक्सिडेंट घटकाचा वापर कर्करोगाला बरे करण्यास होतो.
*हळद व डाळीचे पीठ एकत्र करून स्नानाच्या वेळी संपूर्ण शरीराला लावल्यास त्वचारोग जाऊन अंगकांती सतेज होते.
५)जिरे—जिऱ्याचे झाड लहान तीस सेंटीमीटर असते. खोड बारीक असते. पाने पातळ, लांब आणि हिरव्या रंगाची असतात. फुले पांढऱ्या रंगाची असतात. जिऱ्याचे बी हे मसाला म्हणून वापरतात. भारतात पंजाब राजस्थान, गुजरात आणि उत्तर प्रदेशात जिऱ्याची लागवड होते.
जिऱ्याला विशिष्ट सुवास असतो व चव कडवट असते. जिऱ्यामध्ये पाणी, तंतू खनिजे प्रथिने, लोह,कॅल्शियम व कॅरोटीन असते.
जिऱ्याचे उपयोग—
*भारतीय स्वयंपाक घरात मुख्यतः जिऱ्याचा उपयोग फोडणी देण्यासाठी होतो.
*जिऱ्यामध्ये खूप पोषक घटक असल्यामुळे त्याचा उपयोग डाळ, रायता, सूप, सॅलड, भाज्या यामध्ये केला जातो.
*जिऱ्याचे पाणी प्यायल्याने वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी नियमित राहते.
*जिरे हे रक्तातील हानिकारक ट्राय ग्लिसराईड्स कमी करते.
*जिऱ्याचे पाणी पचनाला चालना देऊन वजन कमी करण्यास मदत करते.
*जिऱ्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात
*जिरे खाल्ल्याने पोटातील जळजळ कमी होते. Essential Spices in Indian kitchen
६)मेथी दाणे —- स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होणारा हा मसाला आहे. मेथी ही पाने आणि बिया या दोन्ही स्वरूपात वापरली जाते. मेथीची पाने भाजी म्हणून वापरले जातात तर मेथी दाणा हा मसाला म्हणून वापरला जातो. मेथी ला कडवट चव असते.
मेथीचे उपयोग—
* रक्ताची कमतरता असणाऱ्या रूग्णांसाठी मेथी हे वरदानच आहे त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते.
*मेथीदाण्यांमध्ये बहुमूल्य औषधी गुण आहेत कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीस यासाठी मेथी दाणा हा वापरला जातो.
*एक चमचा मेथी दाणा पाण्याबरोबर घेतल्यास अपचनाची समस्या दूर होते.
*मेथीचे दाणे अर्थराइटिस आणि सायटिका याकरता रामबाण उपाय आहेत.
*मेथीच्या दाण्याची पेस्ट केसांच्या मुळांना लावल्यास कोंड्याचा त्रास नाहीसा होतो.
*मेथी दाणे रात्रभर नारळाच्या तेलात भिजवून ठेवून ते तेल डोक्याला लावल्यास केस गळणे कमी होते.
*मेथी पावडर चे रोज सेवन केल्यास पोटातील गॅस आणि छातीतील कफ कमी होतो.
*मेथीदाण्यांमुळे प्रतिकार शक्तीत वाढ होते.
७)धणे—धणे म्हणजे कोथिंबीरच्या रोपाला आलेले आणि वाळवलेले फळ. हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. पदार्थाची चव वाढवण्याकरता धन्याची पावडर अनेक पदार्थात टाकली जाते..त्याबरोबर त्याचे अनेक उपयोग आहेत.
धण्याचे उपयोग—
*औषधीय गुणवत्ता असलेले धणे हे थायरॉईडची समस्या कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी वापरले जातात.
*धण्याचे पाणी सेवन केल्यास प्रतिकारशक्ती वाढते. यामध्ये अँटिऑक्सिडंट असल्यामुळे ते फ्री रॅडिकल्स कमी करतात.
*धण्यामध्ये ए आणि सी हे पोषक तत्त्व असतात.
*सकाळी उठून धण्याचे पाणी प्यायल्याने पोटाच्या अनेक समस्या दूर होतात. जसे जळजळ, अपचन यासारख्या समस्या दूर होतात.
*धण्याचे पाणी प्यायल्याने त्वचेचे अनेक रोग दूर होतात. कोथिंबीर मध्ये लोह असते. त्यामध्ये अँटी फंगल आणि अँटिबॅक्टरियल गुणधर्म असतात जे त्वचेच्या विकाराला दूर करायला उपयुक्त असतात.
*धण्याचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. त्यामुळे धण्याचे पाणी प्यायल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो.
८)जायफळ—जायफळाचे झाड हे दहा ते वीस मीटर उंच वाढणारे सदापर्णी झाड आहे. यामध्ये नर व मादी असे दोन वेगवेगळे झाडांचे प्रकार आहेत. जायफळ हे झाडाचे बी आहे.
जायफळाची फळे गुळगुळीत आणि चिकूच्या आकाराची असतात. . जायफळ हे उष्णकटिबंधातील पीक आहे.
जायफळाचे उपयोग—-
*जायफळ हे निद्रानाशासाठी अतिशय गुणकारी आहे. जायफळ उगाळून झोपेच्या आधी घेतल्यास उत्तम झोप लागते.
*पचनक्रिया मंदावली असेल तर जायफळाचे सेवन केल्यास ती सुधारू शकते तसेच आम्लपित्त, जळजळ यावर सुद्धा ते गुणकारी आहे.
*जायफळामध्ये असलेल्या अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मामुळे ते वेदनानाशक म्हणून वापरले जाते. स्नायूंचे दुखणे तसेच सांधेदुखी साठी त्याचा उपयोग केला जातो. यासाठी जायफळाचे तेल दुखलेल्या भागावर लावतात.
*अभ्यासानुसार अँटी मायक्रोबियल या गुणधर्मामुळे जायफळ हे पोटाच्या कर्करोगा करता औषध म्हणून वापरले जाते.
*आजकाल मधुमेह हा बहुतेक सगळ्यांनाच होत असतो. जायफळाचे सेवन केल्याने मधुमेह नियंत्रित करता येतो.
*जायफळामध्ये असलेल्या ॲंटी बॅक्टेरियल या गुणधर्मामुळे ते दात किडणे, दातांमध्ये फटी निर्माण होणे या प्रकारच्या समस्यांमध्ये उपयोगी आहे.
*जायफळाचे सेवन डोळ्याच्या आरोग्या करता फायदेशीर होऊ शकते. जायफळाच्या सेवनाने प्रोस्टाग्लॅंडिन या हार्मोनला संतुलित करून डोळ्यांच्या समस्या नियंत्रित करता येतात.
*जायफळामध्ये anticonvulsant गुणधर्म असतात. जे तणाव दूर करण्याकरता आवश्यक आहेत.
*जायफळामध्ये विटामिन ए आणि सी असते. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
९) मोहरी—मोहरी ही भारतीय स्वयंपाक घरात फोडणी देण्यासाठी वापरला जाणारा एक महत्त्वाचा मसाला आहे.
भारतात राजस्थान गुजरात उत्तर प्रदेश महाराष्ट्र या ठिकाणी हे पीक घेतले जाते. मोहरी का*ळ्या पिवळ्या आणि हलक्या तपकिरी रंगात येतात. मोहरी मध्ये अनेक पोषक तत्व असतात. कॅल्शियम, तांबे, मॅंगनीज, विटामिन ए, विटामिन सी, फायबर ,सेलेनियम इ.
मोहरीचे उपयोग—
*मोहरीच्या सेवनाने पचन सुधारते.
*मोहरीचा उपयोग कर्करोगांच्या उपचाराकरता करतात.
*मोहरीच्या सेवनाने चयापचय सुधारते व पोटाचे विकार दूर होतात.
*मोहरीच्या नित्य सेवनाने हृदयाचे आरोग्य सुधारते
*मोहरीच्या सेवनाने केसांची वाढ होते.
*मोहरीमुळे मुखाची दुर्गंधी दूर होते. Use of spices in Indian kitchen.
१०)हिंग— स्वयंपाक घरातील मसाल्यात अतिशय चांगले गुणधर्म म्हणून त्याचा उपयोग केला जातो. हिंगा ला एक विशिष्ट चव आणि सुगंध असतो. यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. ही एक बार माही औषधी वनस्पती आहे.
हिंगाचे उपयोग—
*कुठलाही पदार्थ तयार करत असताना फोडणीमध्ये हिंग टाकले की त्याचा सुगंध आणि खमंग वास येतो. हा हिंगाचा गुणधर्म पाचक म्हणून उपयोगी आहे. पोटाच्या वातविकारांकरता हिंग अतिशय उपयोगी आहे.
* हिंगाच्या नियमित सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
*हिंगा मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात जे फ्री रॅडिकल ला नियंत्रित करतात. हिंग खाल्याने कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध होतो.
*हिंगाचा उपयोग वजन नियंत्रित करण्यासाठी सुद्धा केला जातो.
*हिंगाचा अर्क घेतल्यास लघवीचे प्रमाण वाढून मूत्रपिंडाचे कार्य सुधारते. हिंगामध्ये असलेले फिनोलिक संयुगे आणि फ्लेव्होनाॅइड्स अतिरिक्त क्रिएटिनिन आणि युरिया बाहेर काढतात. त्यामुळे मूत्रपिंडांचे कार्य नियंत्रित राहते.
*फुफ्फुस यकृत आणि मुत्रपिंड यांच्या कर्करोगावर हिंगाचा औषध म्हणून उपयोग करतात.
भारतीय स्वयंपाक घरात मसाल्यांचे महत्त्व व उपयोग, Essential Spices in Indian kitchen हा लेख आपल्याला कसा वाटला? ते नक्की कळवा व प्रतिक्रिया द्या. असे नवनवीन लेख व कथा वाचण्याकरता आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला नक्की भेट द्या. आपल्या मित्र परिवारामध्ये जरूर शेअर करा आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप पण जॉईन करा.
धन्यवाद!
लेखिका —वैशाली देव(पुणे)
Nice informative article 👍
Useful , especially for the younger generation who are at distance from usage of such food items
खूप उपयुक्त माहिती
Very informative!
Got some great information from this article!
Very Informative 🙏🏻
Informative article ..
घरगुती औषधे आपल्या मसाल्यातच आहेत. छान माहिती.
धन्यवाद 🙏
फार छान माहिती. स्वास्थ्यची सामग्री घरीच असते.