महाराष्ट्रातील थंड हवेची सर्वोत्तम पाच ठिकाणे l Five Hill Station in Maharashtra

WhatsApp Group Join Now

उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी जायचा प्लॅन करताय? चला तर मग बघुया महाराष्ट्रातील पाच सर्वोत्तम ठिकाणे?

उन्हाची चाहूल लागताच आठवण येते ती म्हणजे कुठेतरी थंड ठिकाणी उन्हाळ्याची सुट्टी घालवण्याची. आजोळची मजा तर असतेच पण असं वाटतं मोठ्यांना कुठे न्यायचं तेही कूल व्हायला त्यामुळे विचार येतात ते म्हणजे हिल स्टेशनचे? कुठे जायचं फिरायला या उन्हाळ्यात या उन्हापासून स्वतःला वाचवायला चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्रातली अशी सर्वोत्तम पाच ठिकाणे जिथे लागेलआपल्याला थंड हवेची चाहूल, गार वातावरण आणि जायलाही पडेल सोपे. तर या लेखा समवेत थांबवूया तुमची ही भटकंती आणि जाणून घेऊया कोणती आहे ती पाच ठिकाणे…..

1. चिखलदरा: (MOST BEAUTIFULFIVE HILL STATION IN MAHARASHTRA)

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असून पर्यटकांना नेहमी विदर्भाचे नंदनवन म्हणून नजरेस भरते. चिखलदरा हे विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. विदर्भात सर्वाधिक उन्हाळा असतो त्यामुळे शीतलता अनुभवण्यासाठी पर्यटक येथे भेट देतात. सातपुड्याच्या पर्वतरांगात चिखलदरा हे ठिकाण येते. आपण जवळच मेळघाट परिसर व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केला गेला आहे. या मेळघाटात वाघांचा प्रकोप जास्त असून, मोर ,रानकोंबड्या, अस्वले, हरीण यांचा संचार सुरू असतो. चिखलदरा हे ठिकाण डोंगरांच्या दृश्यांचा आनंद घेण्यासाठी सर्वोत्तम आहे असेच बरेच पॉइंट आहेत जे तुम्ही बघू शकता.

1. मोझरी पॉईंट:

काही वेळा एन्जॉय करण्यासाठी हे छान ठिकाण असून चिखलदरा चे सर्वोत्तम दृश्य इथून पाहायला मिळते छोटा धबधब्याचा आनंद घेऊ शकतो आणि काही भेटीच्या वेळी येथे अधोरेखित करू शकतो तसेच बोटिंग, घोडसवारी सुद्धा पहावयास मिळते.

2.ग्वालीगढ:

ग्वालीगढ येथे भेट नक्की द्यावी ही वास्तू 1425 ते 26 मध्ये अहमद शहा ने बांधलेली असून बघण्यासाठी एक दिवसही लागू शकतो हे एक छान ठिकाण आहे मात्र इथे खाद्यपदार्थ विक्रेते कधी नसतात त्यामुळे आपल्या पूर्ण सोयी ने जाणे येथे उत्तम ठरेल.

3. भिमकुंड:

भीमकुंड दरीच्या वरच्या भागात एक कुंड आहे त्या कुंडाचे नाव भिमकुंड असे असून याची आख्यायिका म्हणजे भीमाने कीचक नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्या वधानंतर या कुंडात त्यांनी हात धुतले त्यामुळे या कुंडाचे नाव भिमकुंड असे पडले गेले. या कुंडातील पाणी लाल रंगाचे दिसून येते. चिखलदऱ्यात कॉफीचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते कारण वातावरण कॉफीसाठी पोषक आहे तसेच दक्षिणेला तीन किलोमीटर बहामनी किल्ला असून तो पाहण्यासाठी पूर्ण दिवस लागू शकतो त्यात जुन्या इमारतीं चे अवशेष, तोफा ,तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत आहे.

4. वैराट:

हा चिखलदऱ्यातील रेंजर प्रशिक्षण कॉलेज कडील प्रमुख पॉईंट असून तो चिखलदरा पासून आठ किलोमीटर अंतरावर दोन्ही बाजूंनी सातपुड्याच्या पर्वतरांगात हा सर्वात उंच पॉइंट आहे. वैराट ही आधी महाभारताच्या काळात वैराट राजाची नगरी होती. या ठिकाणावरून निसर्गाचं सूर्यास्ताचे आगळं वेगळं चित्र दर्शन घडते.

5: पंचबोल पॉईंट:

या पॉइंट वरून आपल्याला पाच पर्वतांची मालिका बघायला मिळते तसेच या पॉईंटवर प्रतिध्वनी खूप सुंदर स्वरात ऐकायला मिळतो एकच प्रतिध्वनी पाच ते सहा वेळा ऐकू शकतो मात्र या पॉईंटवर जाण्याचा रस्ता हा थोडा खराब असल्यामुळे वाहने काळजीपूर्वक चालवावीत.

कसे जायचे?

चिखलदरा हे हील स्टेशन बडनेरा रेल्वे स्टेशन यापासून जवळ आहे. त्यामुळे रेल्वे मुंबई हावडा या मुख्य रेल्वे मार्गावर बडनेरा रेल्वे स्टेशन आहे. किंवा आजूबाजूच्या परिसरातील पर्यटकांसाठी चिखलदरा जवळच अमरावती असून येथे एसटी किंवा खाजगी वाहन सहज उपलब्ध होण्याची सोय आहे. चिखलदरा हे स्थान अमरावती पासून 94 किलोमीटर अंतरावर आहे.

2. लोणावळा: (MOST BEAUTIFUL FIVE HILL STATION IN MAHARASHTRA)

लोणावळा हे हिल स्टेशन पर्वतरांगांच्या मध्यभागी असलेले भारतातील सर्व संस्कृती जपलेले सुंदर हिल स्टेशन आहे. यात पर्वत शिखरांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी लोकप्रिय असे हिल स्टेशन आहे. यातील भव्य नितांत सुंदरता, ऐतिहासिक किल्ले, प्राचीन लेणी ,सुंदर तलाव या लोकप्रियतेमुळे आपल्याला असं वाटेल की कधी कधी जावं. वर्षाच्या कोणत्याही ऋतूमध्ये या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता येथील स्पेशल मिठाई खाऊन ही मिठाई लोकप्रिय व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवावी असेही तुम्हाला वाटेल. यातील काही प्रमुख आकर्षण केंद्रे पुढील प्रमाणे….

1. बुशी धरण:

लोणावळा या रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर बुशी धरण आहे. हे नयनरम्य धरण डोंगराळ प्रदेशात असून सहलीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी आणि निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी एकदम खास आकर्षण केंद्र आहे. पावसाळ्यात तर निसर्गातील नयनरम्य दृश्य बघून आपले मन मंत्रमुग्ध होते. हे स्थान मनापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे.

2. राजमा चा किल्ला:

राजमा चा किल्ला या आकर्षण केंद्राला भेट न देता आपण समोर निघालो तर महाराष्ट्र दौरा अपूर्ण केल्याचा भास होईल. सह्याद्री पर्वतावर एक लहानसे गाव आहे त्यातील एक म्हणजे राजमा चा किल्ला आणि दुसरे म्हणजे श्रीवर्धन किल्ला यावर चढाई करावी लागते लोणावळा मार्गाने आधी कालभैरवनाथ मंदिर छावणी घालून दुसऱ्या दिवशी राजमा चा किल्ला बघू शकतो सुमारे 200 फुट चढण्याची क्षमता आपल्याला ठेवावी लागते.

3. श्रीवर्धन किल्ला:

एक मनोरंजन किल्ला असून सह्याद्री पर्वत रांगेत लोणावळ्यापासून नऊ किलोमीटर अंतरावर समुद्रसपाटीपासून हा किल्ला 900m उंचीवर असून पावसाळ्यात धुके मुळे संपूर्ण अंधुक असे या ठिकाणाचे सौंदर्य पाहण्याजोगे आहे. लोणावळा शहरापासून अवघ्या 13.5 किलोमीटर अंतरावर हा किल्ला सुनी येथे कॅब आणि ऑटो जाण्यास उपलब्ध असतात.

4. लोणावळा तलाव:

लोणावळा शहराच्या बाहेरील बाजूला इंद्रायणी नदीच्या काठावर लोणावळा तलावाचे साधे सुंदर सौंदर्य मन मंत्रमुग्ध करते हाताला गोड्या पाण्याचे सरोवर म्हणून लोकप्रिय आहे.

5. तिकोना किल्ला:

याला विंड गड किल्ला असेही संबोधले जाते. तिकोना किल्ल्यापासून त्रिकोणी टेकड्या शिवाजी महाराजांच्या संपूर्ण इतिहासात आढळतात त्यात कर्नाळा, लोहगड,माहुली, विसापूर असे त्रिकोणी गडआपले सौंदर्य वाढवताना दिसतात.

कसे जायचे?

लोणावळा येथे जाताना जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे खंडाळा हे असून रेल्वे मार्गे मुंबई ते लोणावळा हे अंतर 128 km आहे. रस्ते वाहतूक मार्गाने हे अंतर 104 किलोमीटर दिसून येते. पुणे ते लोणावळा हा मार्ग 64 km असून पुणे पासून आपण कोणत्याही साधनाने येथे पोहोचू शकतो.

3. महाबळेश्वर:(MOST BEAUTIFUL FIVE HILL STATION IN MAHARASHTRA)

महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात वसलेले महाबळेश्वर हे एक सुंदर हिल स्टेशन आहे. निसर्गावर प्रेम करणाऱ्यांपैकी असणाऱ्या पर्यटकांसाठी आश्रय स्थान असून प्रत्येकाने या वातावरणाचा एकदा तरी लाभ घ्यावा असे मला वाटते. सातारा जिल्ह्यातील हे थंड हवेचे ठिकाण असून ब्रिटिश काळापासून महाबळेश्वरला उत्कृष्ट थंडावा लाभला आहे. समुद्रसपाटीपासून 1372 म उंचीवर सह्याद्रीच्या पठारावर हे महाबळेश्वर वसलेले आहे. महाबळेश्वर येथे एक महाबळेश्वर मंदिर तसेच जवळच लागून असलेले जावळीचे खोरे, प्रतापगड ही स्थळे बघून शिवरायांच्या नावाचा एक ऐतिहासिक ठेवा नक्कीच बघावयास आले पाहिजे. महाबळेश्वरला पावसाचे प्रमाण जास्त प्रमाणात असून सदाबहार निसर्ग सौंदर्य, वेगवेगळ्या प्रकारची फळे जसे की स्ट्रॉबेरी, रसबेरी, जांभळी लाल द्राक्षे महाबळेश्वरचा गुलकंद यांचा आस्वादही घेण्यास मिळतो. येथे हॉटेल्स आणि राहण्याची चांगली व्यवस्था असून येथील मुख्य आकर्षणे म्हणजेच पंचगंगा मंदिर, गड किल्ला, लिंगमाला धबधबा, भिलार धबधबा, अति बळेश्वर मंदिर, मोरारजी चा किल्ला या ठिकाणांना आवर्जून भेट द्यावी वर्षभरात तुम्ही कधीही कोणत्याही वेळेस महाबळेश्वरला भेट देऊ शकता येथे गणेश चतुर्थीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो येथील काही लोकप्रिय केंद्रे पुढील प्रमाणे….

1. तपोला महाबळेश्वर मंदिर

2. प्रतापगड किल्ला

3. वेण्णा लेक

4. लिंग माला फॉल्स

5. मॅप्रो गार्डन

कसे जायचे?

महाबळेश्वरला जाण्यासाठी नजीकचे रेल्वे स्टेशन म्हणजे वाठार( वाठार हे स्टेशन पुणे ते कोल्हापूर मार्गावर आहे.) वाहतूक मार्गे मुंबई ते महाबळेश्वर हा मार्ग 290 किलोमीटर आहे. तसेच महाड मार्गे गेल्यास मुंबई ते महाबळेश्वर हा मार्ग 247km आहे. पुणे ते महाबळेश्वर हे अंतर 120 किलोमीटर असून सातारा ते महाबळेश्वर हे अंतर मात्र 76किलोमीटर आहे.

4. पाचगणी:(MOST BEAUTIFUL FIVE HILL STATION IN MAHARASHTRA)

सातारा जवळच वसलेले पाचगणी हे महाराष्ट्रातील लोकप्रिय हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. हा परिसर शांततेचा आणि रोमांच दाई असून निसर्ग रम्य वातावरण लक्ष वेधून घेते. महाबळेश्वरच्या जवळच आणि तेवढ्याच उंचीवर असलेले हे थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वर पासून हे अवघ्या 18 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. इथे जुन्या काळातील पारशी लोकांनी बांधलेले बंगले आजही लक्ष वेधून घेण्यासारखी आहेत. राहण्याच्या आणि जेवणाच्या चांगल्या सोयी असून हे ठिकाण पाच डोंगरांच्या समूहावर विकसित झाल्याने पाचगणी असे नाव पडले गेले. लोणावळा आणि खंडाळा ज्याप्रकारे एकमेकांपासून जवळ आहे त्याच प्रकारे महाबळेश्वर आणि पाचगणी लगतच आहेत. पाचगणीला लाभलेला उत्कृष्ट हवामान आणि निसर्ग संपन्न ठिकाण हे पाचगणीचा मुख्य वैशिष्ट्य इथे असलेले धबधबे, दर्या, इथे असलेला कमलगड किल्ला, पाचगणी चा गुफा, किडीज पार्क, टेबल लँड हे बघण्यासारखे नयनरम्य स्थळे आहेत.

कसे जायचे?

सातारा,पुणे ,वाई, महाबळेश्वर या मार्गे पाचगणीला एसटी बसने जाता येते. मुंबई ते पाचगणी अंतर 295 km आहे.महाबळेश्वरला एकदा भेट दिली की पाचगणी बघितल्याशिवाय मन पुढे जात नाही. पुणे ते महाबळेश्वर हे अंतर 120 किलोमीटर असून पाचगणी लगतच महाबळेश्वर बघावयास मिळते.

5. माथेरान:(MOST BEAUTIFUL FIVE HILL STATION IN MAHARASHTRA)

मुंबई आणि पुणे मार्गे सर्वात जवळचे निसर्ग सौंदर्याने नटलेले असे थंड हवेचे ठिकाण म्हणजे माथेरान. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 2600 फूट अंतरावर पठारावर वसलेले आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून माथेरानची डोंगररांग ही जरा वेगळी हाजी मलंगा पासून सुरू होते. माथेरानला जायचं झाल्यास मुंबई स्टेशन वरून कर्जतला जाताना नेरळ स्टेशनला उतरून माथेरान गाठू शकतो. माथेरान हे नेरळ गावच्या पायथ्याशी वसलेले गाव आहे. माथेरानचे प्रमुख आकर्षण म्हणजे ट्रेनमध्ये बसल्यानंतर पॅनोरमा पॉईंटच्या हिंदीतून ट्रेन माथेरान मध्ये प्रवेश करते कोणत्याही प्रकारच्या वाहनांना प्रवेश नाही. त्यामुळे प्रदूषण मुक्त माथेरान असेही म्हणायला हरकत नाही.

माथेरान मधील विविध पॉईंट्स पुढील प्रमाणे:

1. पॅनोरामा पॉइंट:

पॅनोरमा पॉईंटच्या पूर्वी बाजूला नेरळ तर पश्चिम बाजूला गाडेश्वर तलाव आणि पनवेल बघता येते. उत्तर पॉइंटला एक खोल दरी असून त्यात असलेले निसर्ग सौंदर्य वाखाणण्याजोगी आहे. पनवेल पासून दिसणारा मुलुख हा म्हणजे 5:30 किलोमीटर अंतरावर पॉईंट पासून दिसून येतो.

2. गार्बट पॉइंट:

या पॉइंटला एका बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला जंगल अशी आगळीवेगळी मजा दिसून येते इथे पावसाळ्यात खरी मजा असते . धुक्यानी वेढलेल्या या जंगलातून भटकंती कन्या चा एक वेगळाच आनंद पावसाळ्यात आपण घेऊ शकतो तसे पण उन्हाळ्यातही इथे असलेला गारवा मन वेधून घेतो. इथल्या लोकांचा उदरनिर्वाह पर्यटनावर अवलंबून आहे. इथे असलेल्या हस्तकौशल्य स्टॉल, काठ्या, छोट्या छोट्या चपलांचे सेट विक्रेते विकताना दिसतात.

3. सनसेट पॉइंट:

या पॉईंटच्या समोरच प्रबळगड दिसतो या पॉईंटपासून साधारण साडेतीन किलोमीटर अंतरावर ट्रॅकिंग करता येते. तिथे असलेल्या दऱ्याखोऱ्या मुळे निसर्गाला सौम्य रूप प्राप्त झाले आहे . वळणावळणाचे रस्ते आणि ठिकठिकाणी नदीवर बांधलेले छोटे पुलं तसेच सनसेट पॉइंट इथल्या सृष्टी सौंदर्यात अधिकच भर पाडतो.

4. चौक पॉईंट:

हा पॉईंट माथेरानच्या दक्षिणेकडे आहे येथून खाली चौक गाव दिसते त्यामुळे तू ओळखला जातो इथे जवळच एक वन ट्री हिल पॉईंट आहे त्या पॉइंट वर एक भीषण दरी असून इथली पायवाट एका सुळक्याला जाऊन मिळते. तो सुळका म्हणजेच वन ट्री हिल पॉईंट त्यावर बरीच वर्षे एक झाड होते ते झाड म्हणजेच वन ट्री हिल पॉईंट समोरच्याची मती गुंग करण्याजोगी आहे. हा प्रवास अतिशय सुखद असून घाटात वळण घेत जाणाऱ्या गाडीतून बाहेरची निसर्ग सौंदर्य पाहताना मन थक्क होते. नेरळ पासून हा प्रवास 11 किलोमीटर अंतरावर आहे. मथुरा 1850 मध्ये ब्रिटिश पर्यटकांनी लावला त्यानंतर ब्रिटिशांनी व पारशी लोकांनी एक छोटं गाव वसवलं. त्यात अश्वारोहण, गिर्यारोहक त्यांनी मनमुराद भटकंतीचा आनंद घेतला त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक दृष्टी सुख मिळवण्यासाठी माथेरानच्या या 33 पॉइंटला ला अवश्य भेट देतात.

कसे जायचे?

माथेरान मध्ये राहण्याच्या बऱ्याच सोय असून दस्तर पॉईंटला लागूनच रेस्ट हाऊसेस आहे तसेच बरेच छोटे-मोठे हॉटेल्स सुद्धा आहेत. नेरळ ते माथेरान गाड्याही मोजके वेळा असल्याने त्या वेळेवर पाळाव्या लागतात . त्याशिवाय काही गाड्या दस्तुरी पॉईंट जवळच लावतात. याशिवाय में नेरळ ते माथेरान टॅक्सी उपलब्धअसतात.जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे नेरळ मध्य रेल्वे .मुंबई-पुणे मार्गे मुंबई -नेरळ- माथेरान हेअंतर 108km आहे. पुणे ते माथेरान हे अंतर141 किलोमीटर आहे.

याप्रमाणे महाराष्ट्रातील अजून काही थंड हवेच्या ठिकाणांबद्दल माहिती हवी असल्यास आमच्या LEKHAKMITRA.COM या वेबसाईटला नक्की भेट द्या. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे आणि पर्यटन स्थळांची माहिती तुम्ही आमच्या लेखाच्या माध्यमातून नक्की वाचू शकता त्यासाठी आमच्याWHATSAPP CHANNEL ला भेट द्यायला विसरू नका आणि ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकां पर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top