फ्लेमिंगो पक्षाची संपूर्ण माहिती l Full information of Flamingo Bird in Marathi

WhatsApp Group Join Now

फ्लेमिंगो पाहायला जाताय ?.मग त्याआधी ही माहिती वाचा.

Full information of Flamingo Bird in Marathi: पक्षी पहायला सगळ्यांनाच आवडतात. त्यात मस्त गुलाबी पंख असलेला, निमुळते लांब लचक पाय आणि एस आकाराची वळणदार मान असणारा  अतिशय सुंदर असा फ्लेमिंगो पक्षी नजरेस पडणं म्हणजे एकप्रकारच नेत्रसुखच. परदेशी दौरा करणाऱ्यांच्या साईट सीईंग लिस्ट मध्ये हमखास फ्लेमिंगो बर्ड वॉचिंग चा समावेश असतोच. पण आता फ्लेमिंगो पाहण्यासाठी परदेशीच जायला पाहिजे असं नाही. तुम्ही भारतातल्या काही ठिकाणी सुद्धा फ्लेमिंगो पाहू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला कुठेही लांब जायची जरूर नाही. तुम्ही अगदी आपल्या महाराष्ट्रत ही फ्लेमिंगो पाहू शकता. 

फ्लेमिंगो फक्त दिसायलाच वेगळा नसून त्याच्या बऱ्याच गोष्टी या इतर पक्षांपेक्षा वेगळ्या आहेत त्या नेमक्या काय आहेत? त्यांचे नक्की किती प्रकार आहेत? ते काय खातात? त्यांच्या पंखांचा रंग केव्हा बदलतो? ते जगभरात कुठे कुठे आढळतात? ते स्थित्यंतर का आणि केव्हा करतात? याबद्दलची संपूर्ण माहिती या लेखात आपल्याला मिळणार आहे.

फ्लेमिंगोजची वैशिष्ट्ये ( Features of Flamingos)

• फ्लेमिंगो हा अटलांटिक समुद्रा जवळील बहामाज या देशाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखला जातो. 

• बहामाज मध्ये जवळपास 80,000 फ्लेमिंगो आहेत. तसेच इथे फ्लेमिंगोच्या 140 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात.

• हा खूप सुंदर असला तरी हा खूप आवाज करणारा पक्षी आहे.

• फ्लेमिंगोज हे हजारोंच्या वस्तीने एकत्र राहतात. 

• फ्लेमिंगो हे गुलाबी किंवा हलके लाल रंगाचे असतात त्यांचा रंग हा त्यांच्या खाण्यावर अवलंबून असतो.

• फ्लेमिंगो हा सर्वात उंच पक्षी आहे. याची उंची सुमारे 145 सेंटीमीटर इतकी असते.

• त्यांचं वजन अंदाजे 4 किलो असते.

• त्यांचे सरासरी आयुर्मान हे जवळपास 47 वर्ष असते.

• फ्लेमिंगो हे नेहमी एका पायावर उभे राहतात. आणि वैज्ञानिकांच्या मतानुसार दोन पायांवर उभे राहण्यापेक्षा त्यांची एनर्जी वाचवण्यासाठी ते एका पायावर उभे राहतात.

•  हे दिवसापेक्षा रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतात.

•  यांना वास आणि चविच ज्ञान नसते.

• जंगली जनावरांसाठी मुख्यतः सिंह, चित्ता, बिबट्या आणि पायथोन हे या फ्लेमिंगोची शिकार करतात.

• यांची चोच केळाच्या आकारासारखे असते.

फ्लेमिंगोजच्या प्रजाती (Types of Flamingos)

फ्लेमिंगोच्या आकार आणि रंग यानुसार मुख्यतः सहा प्रजाती आहेत. प्रत्येक प्रजाती ही जगातल्या विशिष्ट ठिकाणी आढळून येते.

१) मोठे फ्लेमिंगो (Greater Flamingo) :

ग्रेटर फ्लेमिंगो ही यांची सर्वात जास्त आढळणारी प्रजाती आहे. ते आकाराने खरोखरच इतर फ्लेमिंगो पेक्षा मोठे असतात. यांची उंची जवळपास पाच फूट असते. आणि हे जवळपास चार किलो वजनाचे असतात. यांच्या पंखांचा विस्तार 4 ते 6 फूट असतो.

हे आफ्रिकेतील wetland भागात, युरोपमध्ये आणि दक्षिण आशियात आढळतात.

२) लेसर फ्लेमिंगो (Lesser Flamingo) :

हे आकाराने इतर फ्लेमिंगोच्या तुलनेत सर्वात लहान असतात. त्यांची उंची 2.6 ते 2.9 फूट इतकी असते. त्यांच वजन 1 ते 2 किलो इतक कमी असत. यांच्या पंखांचा विस्तार 3.3 ते 5 फुट इतका असतो.

हे साऊथ आफ्रिकेच्या दक्षिण भागात आढळतात. तसेच हे गिनी (Guinea) च्या किनाऱ्यावर, येमेन (Yemen) च्या उत्तरेत आणि सेनेगल (Senegal) च्या पश्चिम भागात पाहायला मिळतात. 

३) चीलियन फ्लेमिंगो (Chilean Flamingo) :

चीलियन फ्लेमिंगो हे सर्वसाधारणपणे मोठ्या फ्लेमिंगो सारखेच असतात. परंतु यांच्या पंखांचा विस्तार हा मोठ्या फ्लेमिंगो पेक्षा गडद गुलाबी रंगाचा असतो. पण कॅरेबियन फ्लेमिंगो पेक्षा थोडा कमी गुलाबी असतो. हे 3.5 ते 4 फूट इतक्या उंचीचे असतात. यांचे वजन 2.5 ते 3.5 किलो इतके असते. यांच्या पंखांचा विस्तार हा 4.5 ते 5 फुट इतका असतो.

हे दक्षिण अमेरिकेत इक्वाडोर, पेरू, चिली, अर्जेंटिना आणि पूर्वे कडील ब्राझील पर्यंत आढळतात हे मातीच्या किनाऱ्यावर एक छोटा खड्डा करून पांढऱ्या रंगाची अंडी घालतात.   

४) जेम्स फ्लेमिंगो (James Flamingo) : 

निसर्ग शास्त्रज्ञ हॅरी बर्कले जेम्स यांना सर्वप्रथम या फ्लेमिंगोचा शोध लावला. आणि म्हणून यांना जेम्स फ्लेमिंगो हे नाव देण्यात आले. हे  दिसायला अँडीयन फ्लेमिंगो सारखे असले तरीही हे त्यांच्यापेक्षा आकाराने लहान असतात. हे साधारणपणे 2.5 ते 3.2 किलो वजनाचे असतात. आणि त्यांचे वजन सुमारे दोन किलो इतकं कमी असतं.

हे  नैऋत्य अर्जेंटिना,  अँडीजच्या पठारांवरील पेरू, चिली आणि बोलिव्हिया येथे आढळतात.

५) अँडीयन फ्लेमिंगो (Andean Flamingo) :

अँडीयन फ्लेमिंगो हे इतर फ्लेमिंगोच्या तुलनेत जास्त वजनदार असतात. यांचं वजन जवळपास 5 किलो असते. तर यांची उंची 3 ते 3.5 फूट इतकी असते. ही एकमेव फ्लेमिंगो प्रजाती आहे, ज्यांची एका दिवसात 700 मैलांपर्यंत प्रवास करण्याची क्षमता असते. हे मूळतः दक्षिण पेरूपासून ते वायव्य अर्जेंटिना आणि उत्तर ब्राझील पर्यंतच्या उच्च अँडीज च्या पर्वतरांगांच्या प्रदेशात आढळतात.

६) अमेरिकन फ्लेमिंगो किंवा कॅरिबियन फ्लेमिंगो (American Flamingo or Caribbean Flamingo ) : 

हे ग्रेटर फ्लेमिंगो पेक्षा आकाराने बरेच लहान असतात. यांचा वजन साधारण 2.2 ते 2.8 किलो असतं आणि यांची उंची 3.5 ते 4.5 फूट असते. ही प्रजाती मुख्यतः मध्य अमेरिकेत आढळते. तसेच यातील काही फ्लेमिंगो Galapagos Island वर देखील सापडतात. ही एकमेव फ्लेमिंगोची अशी प्रजाती आहे जी नैसर्गिकरित्या उत्तर अमेरिकेत सापडली होती. 

फ्लेमिंगोचे प्रजनन (Reproduction of Flamingos )

फ्लेमिंगो मध्ये प्रजनन चक्र हे त्यांच्या वयाच्या सहाव्या वर्षी म्हणजेच ते पूर्णतः परिपक्व झाल्यावर सुरू होते. तसे पाहता फ्लेमिंगो हे मोठ्या संख्येने एकत्र राहतात. आणि त्यांना प्रजननासाठी देखील एकांता ऐवजी गर्दीचीच परिस्थिती हवी असते.

प्रजननासाठी अगोदरच नर आणि मादी फ्लेमिंगो हे दोघेही मिळून एका खांबाच्या आकाराचे मातीचे घरटे बांधतात. दोघे मिळूनच मादीने घातलेली अंडी उबवतात. अंड्यातून बाहेर आलेल्या पिलाला फ्लेमिंग्लेट (Flaminglet) असं म्हणतात. या पिल्लांचा रंग दोन-तीन वर्षांपर्यंत राखाडीच असतो. त्यानंतर हळुहळू त्यांना गुलाबी रंग मिळतो. 

तसेच मुलांना भरवतानाच्या काळात नर आणि मादी यांच्या पंखांचा रंगही हळूहळू पांढरा पडत जातो. पिल्ले जेव्हा स्वतः खायला सुरुवात करतात तेव्हा त्या दोघांच्या पंखांचा रंग देखिल परत गुलाबी होत जातो.

फ्लेमिंगोचा आहार ( Flamingos food)

फ्लेमिंगो हे त्यांच्या प्रजातीनुसार वेगवेगळा आहार घेतात. तरी सामान्यतः हे एकपेशीय वनस्पती, प्लँक्टन, कोळंबी, मोलस्क, कीटक आणि आळ्या खातात.

सर्व प्रकारच्या प्रजातींमध्ये अन्न खाण्याची पद्धत ही सारखीच असते. हे पक्षी डोके उलटे करून खातात आणि तोंडभर पाणी पितात. केसांसारख्या लॅमेले (व्हेल बेलीन सारखे) सोबत अन्न गाळून घेतात, नंतर मागे राहिलेला चोथा खाऊन टाकतात.

फ्लेमिंगोचे स्थित्यंतर (Migration of Flamingos)

फ्लेमिंगो हे वातावरणातील बदलामुळे प्रजनना दरम्यान स्थित्यंतर करतात. 

गुजरात मधल्या कच्छच्या रणला फ्लेमिंगो सिटी (flamingo city) म्हणुन ओळखले जाते. येथील महाराव खेनगर्जी यांनी सर्वात पहिल्यांदा इथल्या फ्लेमिंगो वसाहतीचा शोध लावला. 

पावसाळ्यात हे फ्लेमिंगो गुजरात करून मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत प्रवास करत येतात. साधारणतः नोव्हेंबर पर्यंत ते मुंबईत पोहोचतात आणि मग मे पर्यंत ते इथेच राहतात. मुंबईतील भिगवन पक्षी संग्रहालय, ठाणे क्रीक आणि नवी मुंबईच्या किनारपट्टीवर मोठ्या संख्येने फ्लामिंगो पाहायला मिळतात.

तर आता तुम्ही फ्लेमिंगो पाहिला कधी जाताय?

तुम्हाला ही Full information of Flamingo Bird in Marathi माहिती कशी वाटली? हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा. तसेच अशा नवनवीन माहितीसाठी आणि कथांसाठी आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला सतत भेट देत रहा.  आणि आमच्या what’s app ला देखील लगेच जॉईन करा.

9 thoughts on “फ्लेमिंगो पक्षाची संपूर्ण माहिती l Full information of Flamingo Bird in Marathi”

  1. Raghvendra Vanjari

    wow!
    पक्षी प्राणीविषयी अधिक माहिती वाचायला आवडेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top