गुरुकुल शिक्षण पद्धत म्हणजे काय?
गुरू म्हणजे शिक्षक आणि कुल म्हणजे घर, गुरुच्या घरी राहून शिक्षण घेणे म्हणजे गुरुकुल शिक्षण पद्धत. गुरूकुल शिक्षण पध्दत ही पौराणिक काळापासून चालत आलेली एक शिक्षण पध्दत .भगवान श्रीकृष्ण, पाचपांडव,राम,लक्ष्मण भरत,शत्रुघन,लवकुश सगळ्यांचेच शिक्षण हे गुरुकुलातच झाले.
पूर्वीच्या काळी ही गुरुकुल पद्धत कशी होती तसेच सध्या भारतात गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये काय शिकवले जाते इत्यादी विषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
1) गुरुकुल शिक्षण पद्धत म्हणजे काय?
2) गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये काय शिकवले जाते?
3)सध्या भारतात किती गुरुकुल आहेत?
1) गुरुकुल शिक्षण पद्धत म्हणजे काय?
गुरुकुल किंवा गुरुकुलम म्हणजेच निवासी शाळा. प्राचीन काळी भारतात अस्तित्वात असणारी ही एक शिक्षण पद्धत यात शिष्य गुरूच्या घरी जाऊन शिक्षण घेत असे. गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये गुरु कडून शिष्याला व्यवहारिक ज्ञान,धार्मिक संस्कार,कौशल्य विकास इत्यादी सर्व गोष्टी शिकवल्या जात असत.
गुरुकुलात ज्ञानार्जनासोबतच,नीतिमत्ता व्यवहारिक ज्ञान, विधी आयुर्वेद शास्त्र धनुर्विद्या इत्यादी विविध गोष्टी शिकवल्या जात असत. शिष्याच्या सर्वांगीण विकास करण्यावर गुरुचा भर असे.ज्ञानार्जनासोबतच दिवसभर विविध छोटे छोटे उपक्रम गुरुद्वारे शिष्यांसाठी घेतले जात असत.यातूनच मुलांचे कौशल्य पाहून मुलांना त्यात पारंगत केले जात असत. मुलांवरती संस्कार केले जात असत. गुरु शिष्यांवर आपल्या विचाराचे एक वेगळे प्रभुत्व निर्माण करत असत.गुरु विचारांना डावलून शिष्य कोणतीही कृती करत नसत.
गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये शिष्याचा संपूर्ण दिवस हा गुरुच्या सहवासात जात,सूर्यादयापासून सूर्यास्तापर्यंत गुरूंच्या गोष्टीचे अनुकरण नकळतपणे शिष्य करू लागत. गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये दिवसभर गुरु आणि शिष्य एकत्र राहत यातूनच त्यांचे वेगळे एक असे ऋणानुबंध तयार होत असत.
2) या शिक्षण पद्धतीमध्ये काय शिकवले जात असे?
वयाच्या सातव्या किंवा आठव्या वर्षी गुरु घरी पाठवण्याचा प्रघात होता. गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये वैद्यकशास्त्र,तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र,अर्थशास्त्र,शारीरिक शिक्षण योगअभ्यास, धनुर्विद्या,नृत्यकला,चित्रकला,अध्यात्म,योग पौरहीत्य,इत्यादी सर्व गोष्टी शिकवल्या जात असे. गुरुकुल म्हणजे एक प्रकारची शाळाच म्हणजे अगदी आजच्या भाषेत सांगायचे झाले तर बोर्डिंग स्कूल. गुरुकुलातील दिनचर्येचे आणि शिस्तीचे विविध नियम असतात यानुसारच शिष्य त्यांचे कार्य करत असत. गुरुकुल शिक्षण पद्धत ही अगदी पौराणिक काळातील पद्धत आहे.राम,कृष्ण पाचपांडव हे देखील गुरुकुलातच राहिले आणि घडले सुद्धा.
श्रीकृष्ण आणि सुदामाची भेट ही गुरुकुलातच झाली होती ज्यावेळेस सुदामा कृष्णाच्या भेटीला गेला त्यावेळेस गुरुकुलातील आठवणीने सुदामाचे मन गहिवरून आले होते. पाचपांडव गुरुकुलात शिक्षण घेत असताना ची प्रसिद्ध गोष्ट म्हणजे एकलव्याची गोष्ट.गुरु आणि शिष्य यांच्यातील नाते किती पवित्र असावे याचे उदाहरण ही गोष्ट आहे. गुरुला आपले सर्वस्व मानून एकलव्याने गुरूंना गुरुदक्षिणा म्हणून अर्पण केलेला अंगठा हे गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याचे उत्तम उदाहरण आहे. गुरुकुलातील शिष्य कडक शिस्त नियम याचे तंतोतंतपालन करत असत. गुरुकुल म्हणजे त्याकाळी ज्ञान मिळवण्याचे ठिकाण होते.
3) सध्या भारतात किती गुरुकुल आहेत?
भारतात पूर्वी गुरु शिष्य परंपरेनुसार शिक्षण दिले जात असे.मुले हे गुरुकुलात राहत शिक्षण करीत आणि विविध विषयात पारंगत होत असत. काळाच्या औघात ही शिक्षण पद्धती बदलत गेली.सध्या ही शिक्षण पद्धत वेदपाठ शाळेच्या रूपात पारंपारिक परंपरेनुसार विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. अशा वेदपाठ शाळेत मुले राहून शिक्षणासोबतच वैदिक ज्ञान देत देखील घेता. सध्या भारतात 5000 हून ही अधिक वैदिक गुरुकुल आहेत. सध्या भारतात अस्तित्वात असलेल्या काही प्रसिद्ध गुरुकुलांविषयीची माहिती आता आपण पाहू,
1) श्रीस्वामीनारायण संप्रदाय-
भारतातील प्रसिद्ध गुरुकुल यामध्ये वैदिक नानासोबतच सीबीएससी पॅटर्नचे देखील शिक्षण दिले जाते. सध्या यांचे 49 गुरुकुल भारतात तसेच भारताबाहेर सुरू आहेत.
2) शंकराचार्य मठ-
निशुल्क सेवा देणारे गुरुकुल या गुरुकुलात वैदिक ज्ञान दिले जाते.
3) संत श्री आसारामजी बापू प्रतिष्ठान-
या प्रतिष्ठानचे संपूर्ण भारतात एकूण 22 गुरुकुल आहेत हे गुरुकुल वर्षभरासाठी अगदी कमी शुल्क आकारते आणि विद्यार्थ्यांना वैदिक ज्ञान देते.
4) आर्ट ऑफ लिविंग फाउंडेशन-
आर्ट ऑफ लिविंग फाउंडेशन चे भारतात सध्या सहा गुरुकुल आहेत आणि हे सशुल्क गुरुकुल आहे.
5) इस्कॉन-
इस्कॉन हे देखील काही गुरुकुल चालवते यामध्ये प्राचीन पद्धतीचे अनुकरण केले जाते.
बदलती शैक्षणिक पध्दत लक्षात घेता गुरुकुल शिक्षण पद्धत ही काळ ओघात थोडी मागे राहिलेली आहे. भारतातील सर्वात जुने असणारे गुरुकुल म्हणजे श्री स्वामीनारायण गुरुकुल या गुरुकुलने आपली शैक्षणिक पद्धत बदलत सीबीएससी पॅटर्न अभ्यासक्रमाचा अंतर्भाव आपल्या शिक्षणात केला आहे.यामुळेच विद्यार्थ्यांना पदवी सोबत वैदिक ज्ञानही घेता येते. वैदिक ज्ञानासोबत विद्यार्थ्यांना सध्या गुरुकुलात राहून शैक्षणिक परीक्षा देखील देता येतात त्यातून त्यांचे ज्ञानार्जन होते. जागतिक स्तरावरील शिक्षण व्यवस्थेतील बदल आणि वाढते तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल झालेला आहे. शाळेत प्रत्येक विषयाला असणारे वेगळे शिक्षक व गुरुकुलात प्रत्येक विषयासाठी असणारा एक शिक्षक हा एक महत्त्वाचा फरक गुरुकुल शिक्षण पद्धत आणि सध्याची शिक्षण पद्धत यामध्ये आहे.
गुरुकुल शिक्षण पद्धत याविषयीची देण्यात आलेली माहिती व पूर्वीच्या काळी असलेली गुरुकुल शिक्षण पद्धत कशी होती यावर लिहिण्यात आलेला,आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच अशाच नवनवीन गोष्टीसाठी आमच्या लेखक मित्र वेबसाईटला भेट देत रहा.
Adv.विनिता मोहळकर.