मोबाईलचे व्यसन कसे घालवावे? l How to Prevent Mobile addiction in Marathi

WhatsApp Group Join Now

How to Prevent Mobile addiction in Marathi :पूर्वी ट्रेनमध्ये बसलेली माणसं पुस्तकात, वर्तमानपत्र बघण्यात गर्क दिसायची. पण आता चित्र पलटताना दिसतंय ते म्हणजे असं की आता माणसं मोबाईल मध्ये किंवा इयरफोन लावून काहीतरी ऐकत असताना, किंवा बघत असताना दिसतात असं वाटतं की आसपासच्या जगाशी त्यांचा काहीच संबंध नाही. मोबाईल फोन आपल्या आयुष्याचा अवि भाज्य भाग बनलेला त्याच्या अनुपस्थितीत कितीतरी महत्त्वाची कामे ठप्प होताना दिसतात. जेव्हा एखादी व्यक्ती मोबाईल फोनपासून स्वतःला दूर ठेवू शकत त्या स्थितीला मोबाईल चे व्यसन असे म्हटले जाईल.मोबाईल फोन ही क्रांती आली, त्यामुळे आपली बरीचशी सोय झालेली आहे पण त्या सोयीचं गरजेत व्यसनात रूपांतर न होऊ देण्यातच शहाणपणा आहे असं म्हणायला हरकत नाही. देशात सुमारे 70 कोटी लोक मोबाईलचा वापर करतात त्या पैकी 6 लाख लोकांना मोबाईलचे व्यसन जडलेलआहे असे डॉक्टर सांगतात .. आणि सर्वसाधारण पणे 20 टक्के लोकांना इंटरनेटचं व्यसन जडलेलआहे.कोणतेही हॉटेल असो, वा कॉफी शॉप असो जिथे ही आजकाल लोकं एकत्र येतात ते ठिकाण घोळक्यात असल तरीही आपल्याला एकटेपणा जाणवतो कारण सगळे आपापल्या फोन मध्ये गुंतलेले असतात.

तरुणाईमध्ये मोबाईल फोन तर हा एक स्टेटस चाच विषय झालाय ,कोणाचा फोन किती मोठा, किती रुपयांचा, कुठल्या गटाचा, कुठून घेतला आहे यापासून त्यांचा विषय चालू होतो तर थांबायलाच मार्ग नाही यासाठी थोडं थांबून विचार करायची आहे असं मला वाटतं.

विद्यार्थ्यांचा कल आज कल मोबाईल मध्ये जास्त वळताना दिसतोय. ते कनेक्टेड पण “व्हर्च्युअल”.आता खरोखर कनेक्शन म्हणजे काय? तर वेळ आली आहे ती त्यांना यातला फरक समजून देण्याची….

नोमोफोबिया म्हणजे काय?

हरवलेला मोबाईल सापडायला लागणारा उशीर या मधल्या काळात आपण ज्या प्रकारे अस्वस्थ होतो किंवा खूप काळजी वाटते त्यालाच नोमोफोबिया म्हणतात. यामध्ये होणारी अस्वस्थता क्षणभर घाबरण्यासारखे असते. जगभरातील संशोधनात असे आढळून आले की या तक्रारी वेगाने वाढत आहे आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे हा आजार उद्भवतो आहे. क्षणभरही मोबाईल आपण आपल्यापासून दूर ठेवू इच्छित नाही आणि आपल्या जीवनावर त्याचा अवाजवी परिणाम होतो. नोमोफोबियाआपल्याला प्रियजनांना पासून पासून दूर ठेवतोस तसेच डोकेदुखी, मान दुखी , डोळ्यांचे आजार आणि इतर आरोग्याशी संबंधित आजार निर्माण करतातच पण प्रियजन सोबतचे नातेही कमकुवत होऊन बसते आणि व्यक्तीच्या जीवनातील वेगवेगळे पैलू दृष्टिहीन होतात.

नोमोफोबिया ची लक्षणे?

1.मोबाईलची संबंधित स्वप्न पडणे, मोबाईल चोरीला गेल्याची धास्ती असणे सतत चिंता असणे.

2. जेव्हा आपले मौल्यवान वस्तू सापडत नाही तेव्हा ज्याप्रमाणे घाबरायला होतं त्याचप्रमाणे नोमोफोबिया मध्ये एखादी व्यक्ती आपला मोबाईल दिसत नसतो आणि इतका घाबरतो की त्याला पॅनिक अटॅक सुद्धा येऊ शकतो.

3. स्वतःपासून मोबाईल ला कोणत्याही परिस्थितीत दूर ठेवू शकत नाही. जिथे तिथे मोबाईल घेऊन जाणे ज्या व्यक्तीला आवडते झोपला तरीही तो स्वतःजवळ मोबाईल ठेवूनच झोपतो.

4. ज्यामध्ये व्यक्तीला वारंवार कॉल येण्याची संभावना असते .

जेव्हा आपण आपला मोबाईल फोन हातात घेतो आणि अक्षरशा इतके बुडून बसतो की बालपणातील किंवा प्रौढ जीवनातील क्षणांची परत परत आठवण मोबाईलद्वारे होत असते यावेळेस मेंदूतील रासायनिक तत्त्व डोपा माईन आणि प्रेम हार्मोन ऑक्सिटोसिन हे महत्त्वाचे भूमिका बजावतात आणि मोबाईल शीसंबंधित आसक्ती निर्माण करतात. मोबाईल फोनची व्यसन ही एक अशी संयुक्त अवस्था आहे ज्यात आत्यंतिक लालसेने केलेला मोबाईल फोनचा अतिवापर शारीरिक व मानसिक कमजोरी साठी कारणीभूत ठरतो. मोबाईल फोनचा दीर्घ वापर हा नुकताच झालेला एक व्यसनाचा प्रकार आहेच पण जगभरातील अनेक वैद्यकीय व्यावसायिक संशोधकांनी एक वर्तणूक व्यसन म्हणूनही उच्चारना केली आहे. त्याप्रमाणे अति जास्त गोड आरोग्यासाठीचांगलं नसतं त्याचप्रमाणे “मोबाईल एक वरदान “हे सुद्धा घातक ठरलेल आहे.

व्यसनाची अधीनता म्हणजे काय? ते नक्की काय असतं? How to Prevent Mobile addiction in Marathi

1.खिशात नसलेला मोबाईल ही व्हायब्रेट झाल्याचा भास होणं.

2. फोन उषाशीच आहे ना हे परत परत पाहणे.

3. मोबाईल न आढळल्यास तो शोधत राहणे.

4. सतत मोबाईल आपल्या दृष्टी समोर ठेवणे.

5. जर काही मिनिटाला सतत मोबाईल बघणे जरीही मेसेज किंवा रिंग न आली तरीही.

मोबाईलच्या व्यसनाचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम

कोणत्याही गोष्टीचे व्यसन समस्यांनी घेरते त्यामुळे माणसाच्या जीवनात कळत नकळत अनेक समस्या निर्माण होतात त्यातलेच काही पुढीलप्रमाणे

1. मोबाईलची व्याख्या द्यायची झाली” प्रिया जणांशी कनेक्टिव्हिटी” अशी न होता प्रियजन पासून दूर राहण्याचं एकमेव साधन असं म्हणायला हरकत नाही. काही ठिकाणी एकत्र एका खोलीत राहूनही त्या व्यक्ती एकमेकांसोबत बोलण्यात रस न घालवता मोबाईलची स्क्रीन स्क्रोल करण्यात रस घालवतात यामुळे नाते कमकुवत होते.

2 मोबाईलच्या अतिवापरामुळे खरच रेडिएशन डोळ्याच्या दृष्टीवर पडतात यामुळे निद्रानाश चिडचिड स्मरणशक्ती कमी होणे संबंधित समस्या आढळतात.

3. या तंत्रज्ञानाच्या जगात याच माध्यमातून आपण विकासा कडे वाटचाल करतोय . पण प्रत्येकाला अभ्यासासाठी लॅपटॉप संगणक किंवा मोबाईल फोन याचा अतिवापर शंकांचं निरसन करून देत नाहीत. त्यामुळे आपण पूर्णपणे अभ्यासाला महत्त्व देत नाही. फक्त निमित्तमात्र कारणासाठी मोबाईलचा वापर करावा.

4. ज्याप्रमाणे दारू सिगरेटच्या व्यसनामुळे माणसाचा जीव धोक्यात जाऊ त्याचप्रमाणे मोबाईल व्यसन अनेक समस्येला घेरते. आणि आपण जीवनाच्या शर्यतीत मागेच राहतो.

मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून कसे मुक्त करावे?

1.डब्ल्यूएचओ(WHO) च्या म्हणण्यानुसार आजच्या काळात मोबाईल फोन पासून पूर्णपणे मुलांना दूर ठेवता येत नाही पण ते जर करायचे असेल तर त्यांना कुठल्याही खेळण्यात व्यस्त ठेवले पाहिजे.

2. घरातील कौटुंबिक सदस्यांचा मोबाईल प्रतीचा कल एकच असला पाहिजे नाहीतर आई मोबाईल पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल पण वडिलांनी ही त्या गोष्टीला संमती नक्कीच द्यावी.

3. प्रत्येक दिवशी आपल्या मतांशी सुसंगत राहा. मुलांचे इमोशनल नाटक सहन करायला नको

जर ती रडायला लागल्यास लक्ष देऊ नका आणि प्रेमाने समजून सांगण्याचा प्रयत्न करा.

4. मोबाईलचा वापर मुलांसमोर करणे टाळा. त्यामुळे मोबाईल ला ते विसरण्याचा प्रयत्न करतीलच.

5. मुलांमध्ये भावनिकता आणण्याचा प्रयत्न करा एखादी पाळीव प्राणी, किंवा त्यांच्याशी असलेले नाते सुधारण्याचा प्रयत्न करा एकंदरीत मुलांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक केल्याने ते मोबाईल पासून दूर होतीलच पण त्यांच्यात भावनिक सुधार होईल.

जगातील प्रत्येक तंत्रज्ञानाप्रमाणे किंवा डिवाइस प्रमाणे मोबाईलचे ही काही फायदे वा नुकसान आहेत. आजच्या काळात मोबाईल हा एक खरोखर सर्व शक्तिशाली डिवाइस आहे त्यापासून बरंच काही शिकायला मिळते आणि काही दुष्परिणाम सुद्धा होऊ लागले याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्यामुळे भवितव्यावर परिणाम न होता त्यांचे कल्याण केले जाऊ शकते आणि संपूर्ण जीवन सुस्वरूप होऊ शकते. त्यामुळे मोबाईलचा सय्यम रुपी वापर लाभदायक ठरेल.

मुलांवर मोबाईलचे होणारे दुष्परिणाम ?

1. मोबाईल मधून निघणारे रेडिएशन बऱ्याच मुलांसाठी हानिकारक ठरू शकते त्यामुळे गंभीर प्रकारचा त्रास उद्भवू शकतो.

2. मुलांना चष्मा लागणे , डोळ्यांची जळजळ होणे यासारख्या समस्याही उद्भवतात.

3. एखाद्या भौतिक ऑब्जेक्ट ला पण चिपकून बसलो तर फिजिओलॉजीकल एडिक्शन सारखी गंभीर समस्या उद्भवू शकते याला देखील एक व्यसन म्हणायला हरकत नाही. लहानपणापासून मुलांच्या हातात मोबाईल दिला तर त्यांना याची सवय तर लागतेच .

4. मुलांचा मानसिक विकास प्रतिबंधित होऊ शकतो त्यांच कोणत्या कामात लक्ष राहत नाही आणि सामाजिक आणि व्यावहारिक दृष्ट्या सक्षम बनत नाही मुलांच्या वयानुसार जो विकास व्हायला पाहिजे होता तो कुठेतरी कमी दिसून येतो.

5. मुले असतील मोबाईलवर गेम खेळतात नवीन गोष्टी पाहतात, कार्टून्स पाहतात, ज्यामध्ये त्यांना रुची आहे त्या गोष्टी वारंवार प्रमाणात पाहिल्यामुळे झोप न येणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

6. वारंवार मोबाईल चा वापर केल्यामुळे त्यांच्या वागण्यातही बदल जाणवतो कोणत्याही कामात ते परिपूर्ण लक्ष देत नाहीत. व त्यामुळे सतत चिडचिडपणा करतात, रडतात ,जेवण करत नाहीत.

7. मोबाईलचा सतत चा वापर या गोष्टीमुळे त्यांना राग व डिप्रेशन यासारख्या समस्या ही उद्भवतात.

8. आजकाल वरच्या मुलांमध्ये वजन कमी असणे किंवा वजन जास्त असणे, कुपोषण याशिवाय जेवण करताना फोन पाहणे ,गेम खेळणे या गोष्टीमुळे त्यांना डेफिसिट डिसऑर्डर, हायपर ऍक्टिव्हिटी, स्लीप डिसऑर्डर सारख्या समस्या जाणवतात.

इंटरनेट आणि मोबाईल यांची सवय लागणे यांची कारणे वेगवेगळी असू शकतात. आधुनिक गॅजेट्स चीआवड असणे, घरात स्पष्ट सुसंवाद नसणे . दर तीन-चार महिन्यांनी बाजारात येणारे नवीन नवीन महागडे उपकरणे विकत घेणे आणि त्यात वेळ घालवणे जर त्या गोष्टी दूर गेल्या तर अस्वस्थ होणे. या व्यसनांमध्ये 35 वर्षाच्या आतील व्यक्तींचा जास्त समावेश दिसून येतो आणि त्यात विद्यार्थी आणि आयटी कर्मचारी यांची संख्या जास्त प्रमाणात दिसून येते. आजच्या युगात आई-वडील दोघेही आपल्या करिअरमध्ये व्यस्त असतात घरी मुलांशी संवाद साधायला कोणी नसतं ही पोकळी भरून काढण्यासाठी मुलं इंटरनेट आणि मोबाईलचा अतिवापर करताना दुसरं म्हणजे त्यांना कमी वयात मोबाईल उपलब्ध करून देना, इंटरनेट उपलब्ध करून देणे त्यामुळे तरुण वयात एकटेपणा दूर करण्यासाठी मोबाईल मध्ये गेम खेळण्यासाठी चॅटिंग करण्यासाठी किंवा तासन तास मोबाईल मध्ये काहीही बघणे यात त्यांचा किती वेळ जातो त्यांनाच कळत नाही इंटरनेट एडिक्शन डिसऑर्डर चे प्रमाण भारतात देखील वाढत आहे तसेच चीन ,कोरिया ,अमेरिका या देशांमध्ये उपचार करण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्र चालवली जातात काही दिवसांनी भारतातही या प्रकारची केंद्रीय चालवली जातीलाच यात काही शंका नाही. पुण्यात प्रसिद्ध मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र याद देखील उपचार प्रायोगिक रित्या केले जातात या केंद्राच्या प्रमुख मुक्ता तांबेकर यांच्या मते मोबाईलचा कामापुरता वापर करावा शक्यतो मुलांना आधुनिक मोबाईल फोन देऊ नका त्यात इंटरनेट सुद्धा टाकू नका असा सल्ला त्या देतात. पालकांचं लक्ष असेल अशा ठिकाणी पाल्यांना मोबाईल किंवा लॅपटॉप घेऊन बसायला सांगा व. मुलांचा हट्ट न पुरवता पालकांनी या गोष्टीवर ठाम राहावं आणि त्यांना सावध करावं असं त्यांचं म्हणणं आहे. मोबाईल सर्फिंग सारख्या आपल्याला जो आनंद मिळतो त्याचं कारण असं की मेंदूमध्ये डोप मीन नावाचा रसायन स्त्रवत असते ते एक न्यूरो ट्रान्समीटर असून दोन पेशींना जोडायचं कम्युनिकेशन च काम करतात. त्यामुळे क्षणापुरती आनंदाची भावना निर्माण होते आणि मग सतत त्या गोष्टीला हातात घेण्याची जिज्ञासू वृत्ती तयार होते.

डोप मीन बद्दल बोलताना डॉक्टर सांगतात की हे अनेक कृतींमधून तयार होत असतं सतत मोबाईलवर सर्फिंग, कम्प्युटरवर गेम, तीच तीच गाणी ऐकणे अशी कृती करावीशी वाटणे अनेक क्षणाचा आनंद मिळवणे असे सतत करावस वाटतं. त्यामुळे प्रत्येक कृतीतून मिळणाऱ्या डोप मीन घेण्याऐवजी मोबाईल सारख्या व्यसनातून घेण्याकडे लोकं लक्ष केंद्रित करतात. हे आनंदाचे रसायन नसून आनंद पुढे मिळणार आहे या अपेक्षेची ती भावना असते .असं वारंवार झालं की मेंदू त्याला”यूज इट ऑर लूज इट” अशा सूचना देतो. त्यामुळे डोप मीन द्वारे जेव्हा उभारी घेण्याची गरज असते तेव्हा मग मोबाईल सारख्या व्यसनांची गरज भासते. शरीरात काहीही घडत असताना किंवा कुठल्याही गोष्टीचा व्यसन असताना माणसांना स्वतःच्या शरीरावर असलेल् स्वातंत्र्य कधीच गमावू नये असं मला वाटतं…….

या (How to Prevent Mobile addiction in Marathi) व्यसनाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top