How to reduce electricity bill at home: गेल्या महिन्यात तर बिल कमी होते ह्या महिन्यात जास्ती कसं आलं आहे? अनेकांच्या घरात वीज बील बघून असा प्रश्न पडतो. खास करून उन्हाळा सुरू झाला की वीज बिलामध्ये झालेला फरक जाणवतो. आताही काहीच दिवसांनी हळू हळू वातावरणात बदल होऊ लागेल, उन्हाळा सुरू होईल तशी तापमानाप्रमाणे वीजेच्या बिलातही वाढ होईल. वीज पुरवठा करणाऱ्या विविध कंपन्यादेखील वेळोवेळी वीज दरात करणाऱ्या बदलांमुळेही वीज बिलावर फरक झालेला असतो.
अशा अचानक वाढलेल्या वीज बिलामुळे आपला महिन्याचा ठरलेला खर्च किंवा बजेट बिघडू शकतो. पण वातावरण बदल किंवा वीज वितरण दरात वाढ होवो; आपण घरातल्या घरात काही छोट्या बदलांनी ह्या अचानक वाढणाऱ्या खर्चावर नियंत्रण आणू शकतो. त्यासाठी हे काही वीज बचतीचे उपाय करून पहा.

वीज वाचवण्याचे घरगुती उपाय (Tips to reduce electricity bills)
खोलीतून किंवा घरातून बाहेर पडताना दिवे बंद करा. Switch off the lights before leaving a room.
कित्येकदा आपण घाईघाईत एखाद्या खोलीतून किंवा घरातून बाहेर जाताना दिवे बंद करायचे राहून जातात. ते आठवणीने बंद करायची मूलभूत सवय स्वतःला लावा. घरातील लहान मुलांनाही ह्याची सवय लावा. नियमितपणे ह्या सवयीने तुम्ही तुमच्या मासिक वीज खर्चाचा चांगला भाग वाचवू शकता.
- गरज नसताना उपकरणे काढून ठेवा, बटण बंद ठेवा. Unplug devices when not in use
दैनंदिन आयुष्यात आपण अनेक विद्युत उपकरणे जास्तीत जास्त वापरत असतो. जसे, मोबाईल चार्जर, टिव्ही, संगीत प्रणाली उपकरणे किंवा म्युझिक सिस्टीम (Music System), संगणक (Computer / Laptop), पॉवर बँक(Power Bank), Smart Watch, इत्यादी. अशा सर्व उपकरणांना चार्जिंग करणे गरजेचे असते. पण बरेच जण चार्जिंग पूर्ण झाल्यावर त्याची केबल तशीच सॉकेटला लावूनच ठेवतात. बऱ्याचदा बटणही सुरू ठेवतात.
उपकरण जरी चार्ज होत नसलं तत्रे वीजेचा प्रवाह हा सुरूच असतो आणि ती वीजही मोजली जातेच शिवाय तेवढी वीज फुकट जातेच आणि ते सुरक्षिततेच्या दृष्टीनेही योग्य नाही. तेव्हा कुठलीही अशी उपकरणे काम झाल्यावर सॉकेट पासून वेगळी करा आणि बटण आठवणीने बंद करा. मोबाईल हे सर्वात जास्ती वापरले जाणारे उपकरण असल्याने अनेक जण सारखा चार्जिंग करण्यास ठेवतात. असे कधीही करू नका. सारखे चार्जिंग केल्याने मोबाईल ची बॅटरी खराब होण्याची शक्यता जास्ती असते. आणि त्यामुळे मोबाईल सारखा चार्ज करावा लागतो आणि अतिरिक्त वीज वापरली जाते. मोबाईल ची बॅटरी १५ % च्या खाली गेल्याशिवाय चार्ज करायचाच नाही ह्याची सवय करून घ्या. गरज नसताना सॉकेट पासून अशी उपकरणे वेगळी केल्यानेही वीजेच्या बिलात नक्कीच फरक पडेल.
- एलईडी किंवा वीज बचत करणारे दिवे वापरा. Use LED / Energy saving light bulbs
पारंपरिक बल्बपेक्षा आधुनिक एलईडी दिवे (LED Bulbs) हे केवळ दिसायला छान नसून तेवढाच प्रकाश देणारे असतातच आणि त्यासाठी वीजेचा वापरही कमी करतात. इतर लाईट बल्ब पेक्षा ९०% ऊर्जा कमी वापरतात. अतिशय चांगल्या गुणवत्तेचे/ दर्जाचे बल्ब(Best quality LED Bulbs) हे दीर्घकालीन टिकणारेही असतात. शिवाय परवडणारे सुद्धा असतात. तेव्हा जुने बल्ब बदला आणि एलईडी बल्ब वापरा.
- नैसर्गिक प्रकाशाचा वापर करा. Use Natural Lights
शक्य तेव्हा म्हणजे दिवसा नैसर्गिक प्रकाशाचा पुरेपूर वापर करा. खिडक्या मोठ्या असल्या तर नैसर्गिक प्रकाश पूर्णपणे घरात पोहोचतो. गरज नसताना पडदे आणि खिडक्यांचे दार बंद ठेवू नका. त्यामुळे काळोखे वातावरण वाटून दिवसाही दिवे लावावे लागतात. आणि पर्यायाने आपण अतिरिक्त ऊर्जेचा/वीजेचा वापर करतो. सुशोभीकरणासाठी वेगवेगळ्या रंगांचे सोयीचे बल्ब हल्ली बाजारात उपलब्ध आहेच. परंतु त्यांचा वापर दिवसा अजिबात करू नका. दिवस मावळल्यावर गरजेनुसार दिवे लावा. छोटे छोटे सुशोभीकरणासाठी लावलेले किंवा कपाटाच्या आरश्याजवळ असलेले दिवे गरज नसताना सुरू ठेवू नका. किंवा काम झाल्यावर आठवणीने बंद करा. (Switch off the dressing table light when not in use.)
- बल्ब किंवा ट्यूबलाईट स्वच्छ ठेवा. Keep Bulbs Clean
घरातले बल्ब आणि ट्यूब लाईट नेहमी स्वच्छ राहतील ह्याची काळजी घ्या. त्यावर धूळ साचून राहिल्यास प्रकाश कमी होतो, त्यामुळे जास्ती दिवे चालू ठेवले जाऊन अधिकची वीज खर्च होते.
- ओव्हनचा दरवाजा बंद राहील ह्याची दक्षता ठेवा.
मायक्रोव्हेव किंवा ओव्हन ह्यांचा वापर करताना योग्यप्रकारे केला तरी वीज बचत करता येते. जेवण गरम करताना ओव्हनचा दरवाजा पूर्ण बंद आहे हे तपासा. आणि काम झाल्यावरही दरवाजा परत पूर्ण बंद ठेवा. प्लग सॉकेट पासून वेगळा करा आणि बटण सुद्धा बंद करा. ओव्हनप्रमाणेच मिक्सर आणि इंडक्शन स्टोव (Induction Stove) चा वापर करून झाल्यावर सॉकेट पासून वेगळे करण्याची सवय करून घेणे गरजेचे आहे.
- वेळोवेळी पंखा तपासा. Check your Fan on time
इतर विद्युत उपकरणांपेक्षा पंखा हा सर्वात जास्ती वीज वापरतो. म्हणून घरातले जुने पंखे असतील तर ते नीट तपासून घ्या. शक्य असल्यास बदला आणि बीईई चे ५ स्टार रेटिंग असलेले उत्तम दर्जाचे पंखे वापरा. काहींना ते थोडे खर्चिक वाटले तरी ते परवडणारे ठरते; कारण ते वीज बचत करणारे असतात आणि त्यामुळे तुमचे वीजेचे बील कमी करण्यात मदत होते.
- एसी योग्य प्रकारे वापरा. Use Air Conditioner in a correct way
एसीचा वापर ही काळाची गरज आणि दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असला तरी त्याचा वापर योग्य प्रकारे नाही केला तर वीजेच्या बिलात वाढ करण्यात कारणीभूत ठरते. त्यासाठी ह्या काही गोष्टी ध्यानात असूद्या.
- तुमच्या एसीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी धूळ आणि घाण काढून टाकण्यासाठी तुमचे एसी फिल्टर वेळोवेळी स्वच्छ करा.
- एसीचे तापमान 20 अंशांपेक्षा कमी करू नका. आणि टाइमरसह तुमच्या एसीमध्ये वेगवेगळे मोड वापरून पहा. तुम्ही ज्या तापमानात तुमचे एअर कंडिशनर सेट केले आहे त्याचा तुमच्या वीज वापरावरही लक्षणीय परिणाम होतो. तापमान एक युनिटने कमी केल्याने विजेचा वापर 6 टक्क्यांनी वाढतो.
- असे मानले जाते की एसी किमान तापमानावर सेट केल्याने खोली जलद थंड होते. मात्र, हे खरे नाही. (Air Conditioner) एसीचे तापमान 24-25 अंश सेल्सिअस राखण्याचा सल्ला दिला जातो कारण ते निरोगी शारीरिक कार्यांसाठी सर्वात इष्टतम मानले जाते. हे तापमान केवळ आरामदायी वातावरण निर्माण करणार नाही तर एसीवरील ताण कमी करेल, ज्यामुळे एसीची कार्यक्षमता सुधारेल आणि कमी वीज वापर होईल.
- एसी सुरू असताना खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा.
- नेहमी एनर्जी स्टार असलेले एसी वापरा कारण ते विजेचा वापर कमी करण्यात आणि तुमचे बिल कमी करण्यात मदत करू शकतात.
- एनर्जी स्टार असलेलाच फ्रिज वापरा. Use only energy star rated Refrigerator
फ्रिज (Refrigerator) हा देखील सर्वात जास्ती वीज वापरतो. फ्रिज हे असं उपकरण आहे ज्याला सातत्याने वीज वापरावी लागते. ऊर्जा-कार्यक्षम उपकरण खरेदी करताना, एनर्जी स्टार लेबल पहा. महत्त्वाचे म्हणजे, विशिष्ट उपकरणाच्या आधारे ऊर्जा बचत भिन्न असते. उदाहरणार्थ, एनर्जी स्टार-प्रमाणित कपडे धुण्याचे यंत्र मानक मॉडेल्सपेक्षा अंदाजे 20 टक्के कमी ऊर्जा वापरतात, तर एनर्जी स्टार रेफ्रिजरेटर्स 9 टक्के कमी ऊर्जा वापरतात. रेफ्रिजरेटर आणि डिप फ्रिजर अशी उपकरणे उष्णता नसलेल्या आणि सूर्यप्रकाश पोहोचत नसलेल्या ठिकाणी ठेवायला हवे. याशिवाय भिंतींमध्ये आणि अशा उपकरणांमध्ये किमान १० सेंटीमीटर एवढे अंतर असायला हवे जेणेकरून उष्णता शोषून घेण्याच्या भिंतीमध्ये असलेल्या वैशिष्ट्यांमुळे वीजेचा वाढणारा वापर कमी करता येऊ शकतो. फ्रिजचा दरवाज़ा पूर्ण बंद असल्याची खात्री करा
- इस्त्रीचा वापर ठराविक वेळी करा. Iron you clothes on certain day
इस्त्रीसुद्धा जास्ती वीज वापरणारे उपकरण आहे. कपड्यांना इस्त्री करणे आपण टाळू शकत नाही. पण इस्त्रीचा वापर ठराविक वेळी करण्याची सवयही वीजेचा खर्च कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते. रोज इस्त्री वापर केल्याने जास्त वीज वापरली जाते. ठराविक दिवशी आणि किमान आठवड्याचे कपडे एकत्र करून इस्त्री केल्यास महिन्यातला इस्त्रीमुळे विजेवर होणारा खर्च कमी करू शकतो. आणि विजेची बचत होते.
- वॉशिंग मशीनचा वापर योग्य प्रकारे करा. Use Washing Machine in Proper way
कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन सोयीची आणि काळाची गरज वाटत असली तरी त्याचा वापरही नेमका आणि ठराविक दिवशीच केला तर वीज बचत करू शकतो. मशीनच्या ठराविक क्षमतेनुसार कपडे धुतले गेले पाहिजे. अती दबावामुळे मशीनवर भार येऊन ते लवकर बिघडण्याची आणि त्यामुळे अतिरिक्त वीज खर्च होण्याची शक्यता जास्ती असते. म्हणून कपडे रोज वॉशिंग मशीन मध्ये धुण्यापेक्षा दर २/३ दिवसांनी असे मशिनीच्या क्षमतेनुसार धुतले गेल्यास महिन्यातला वॉशिंग मशीन मुळे होणारा विजेवराचा खर्च निम्मा करता येऊ शकतो.
- स्मार्ट ऑटोमेटेड प्रणालीचा वापर करा. Use smart automated devices system
आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित झालेली ही प्रणाली थोडी खर्चिक असली तरी वीजेची बचत करण्यामध्ये उपयुक्त ठरू शकते. स्मार्ट ऑटोमेशन सिस्टीम तुम्ही यापुढे एखादे उपकरण वापरत नसाल तेव्हा ते शोधून काढेल आणि वीज पुरवठा बंद करेल. म्हणजेच तुम्ही विसरलात तरीही स्मार्ट ऑटोमेटेड डिव्हाइस तुमचे ऊर्जा बिल कमी करू शकतात.
- किचन चिमणी बंद ठेवा. Close your Chimney
स्वयंपाकघरात असलेल्या किचन चिमणीमुळे धूर बाहेर काढण्यास मदत होते त्यामुळे दुसऱ्या खोलीत धूर जात नाही. पण अशा चिमणीचा स्वयंपाक करून झाल्यावर बंद करा. सॉकेटचं बटन बंद करा किंवा ऑटो शूट ऑफ (Use auto shut off chimney) प्रणाली असणाऱ्या चिमणीचा वापर करा.
- सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे वापरा. Use a Solar Power System
सौर ऊर्जा, सौरऊर्जेचे महत्व हे सर्वानांच माहीत आहे. तेव्हा जर वीज वापरात आणि बिलामध्ये बचत करायची असेल तर सर्वात फायदेशीर ठरणार उपाय म्हणजे सौर ऊर्जा(Solar Power). सौरऊर्जा पॅनल जर आपण आपल्या घरावर/ इमारतीवर बसवून घेतला तर दिवसा प्रकाशाच्या वेळेत आपण स्वतःच स्वतःची वीज निर्माण करू शकतो. जिथे वर्षभर भरपूर सूर्यप्रकाश मिळतो अशा ठिकाणी तुमचे घर असल्यास सोलर पॅनल बसवून ऊर्जेची लक्षणीय बचत करू शकता. सोलर पॅनल हा एकदाच बसवावा लागतो. सुरुवातीला थोडा खर्चिक वाटला तरी ही गुंतवणूक एकाच वेळी होणारी आणि फायद्याची आहे. ज्यामुळे तुम्ही नक्कीच वीज बचत करू शकाल. पुन्हा पुन्हा खर्च करावा लागणार (How to reduce electricity bill at home) नाही.
दैनंदिन जीवनातील अशा छोट्या सवयींपासून ते मोठ्या गुंतवणुकीपर्यंत घरगुती ऊर्जा संवर्धनासाठी (Effective Energy Saving) असे अनेक उपाय आपण करू शकतो जे केवळ पर्यावरणालाच मदत करत नाहीत तर तुमचे ऊर्जा बिल देखील कमी करतात. तेव्हा वीजेचा वापर योग्य प्रकारे करून वीज आणि वेजेवर होणारा खर्च वाचवूया.
घरच्या घरी वीजेच्या बिलावर नियंत्रण मिळवण्याचे हे उपाय (Tips for reduce electricity bill at home) सांगणारा हा लेख तुम्हाला कसा वाटला? वीज बचत करण्यासाठी तुम्ही काय करता? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतो आहे.
आपल्या मित्र परिवाराला हा लेख नक्की पाठवा. अशा अनेकविध विषयांवर सविस्तर माहितीपर लेखांसाठी, बातम्यांसाठी, नवनवीन कथांसाठी आपल्या ‘लेखकमित्र’ वेबसाईटला नेहमी नक्की भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप चॅनल ही फॉलो करा.
वाचक मित्रहो, खूप खूप धन्यवाद.
नाव – नंदिनी हाटकर, मुंबई.
छान विस्तृत माहिती👌👌
राधिकाजी, धन्यवाद.🙏🏻🙂