SEO-फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कसे लिहावे? l How to Write a SEO Blog Post for Higher Ranking

WhatsApp Group Join Now

How to Write a SEO-Friendly Blog Post for Higher Ranking : आपण एखादा लेख किंवा ब्लॉग पोस्ट लिहिल्यावर Google सारख्या सर्च इंजिन मध्ये तो पहिल्याच पानावर सर्वात वरच्या क्रमांकावर कसा येईल, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? कल्पना करा की, तुम्ही तुमच्या सर्व ज्ञानाचा व अनुभवाचा वापर करून एक अतिशय उत्तम ब्लॉक पोस्ट लिहिलेला आहे. पण सर्च इंजिन पहिल्या दोन पानांमध्ये सुद्धा तो ब्लॉक पोस्ट दाखवत नाही. याचा अर्थ असा होतो की, तुमचा ब्लॉग पोस्ट अधिक लोकांपर्यंत पोहोचत नाही. म्हणजेच जास्तीत जास्त लोकांनी तुमचा ब्लॉग पोस्ट किंवा लेख वाचायचा असेल, तर गुगल सारख्या सर्च इंजिनच्या पहिल्या पानावर पहिल्या-दुसऱ्या क्रमांकावर (High Ranking) तो कसा आणता येईल, याचा विचार करण्याची गरज आहे.

जेणेकरून तुमच्या वेबसाईटवर अधिक वाचक किंवा संभाव्य ग्राहक भेट देतील. एका रिसर्चनुसार, गूगलच्या टॉप पाच निकालांना ६७.६% क्लिक्स मिळतात. याचा अर्थ असा की, जे लोक Google वर काही शोधतात, ते सहसा पहिल्या पानावर दिसणाऱ्या वेबसाइट्सनाच भेट देतात. SEO मुळे तुमच्या वेबसाइटला अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते.  सर्च इंजिनच्या श्रेणीत चांगले रँक मिळविणारे, अर्थात हाई रँकिंग SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कसे लिहावेत, याची इत्यंभूत माहिती तुम्हाला हा लेख वाचल्यावर कळेल.

SEO म्हणजे काय?

SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (Search Engine Optimization). ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामुळे गुगल सारखे सर्च इंजिन्स तुमच्या वेबसाईट किंवा ब्लॉग पोस्टला पहिल्या पानावर दाखवितात. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर जेव्हा लोक गुगलवर काही शोधतात तेव्हा ते पहिल्या पानावर दिसणाऱ्या वेबसाईटवरच जास्त क्लिक करतात. SEO ची मदत घेऊन तुम्ही तुमची वेबसाइट पहिल्या पानावर आणू शकता आणि तुमच्या वेबसाईटला भेट देणाऱ्या लोकांची संख्या वाढवू शकता.

हाई रँकिंग SEO-फ्रेंडली ब्लॉग पोस्ट तयार करण्यासाठी अनेक मुद्द्यांचा विचार करणे आवश्यक आहे. त्यातील काही मुद्दे पुढीलप्रमाणे:

SEO post कशी लिहायची ?

·       आपल्या प्रेक्षकांना ओळखा (Know your Audience): कोणत्याही विषयावर लेखन सुरू करण्याआधी तुम्हाला तुमचा टारगेट वाचक ओळखता आला पाहिजे, म्हणजेच आपण आपला ब्लॉग पोस्ट किंवा लेख नेमके कोणासाठी लिहीत आहोत, याची जाण तुम्हाला असली पाहिजे. तुमच्या वाचकांना काय आवडते, त्यांच्यासमोर कोणकोणत्या समस्या आहेत, त्यांना नेमके काय हवे आहे हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. वाचकांच्या गरजा लक्षात घेऊन जर तुम्ही लेख लिहिला तर ते तो लेख नक्कीच वाचतील.

·       Keyword Research: कीवर्ड रिसर्च म्हणजे वाचक एखाद्या विषयावर ऑनलाईन सर्च करताना कोणकोणते शब्द किंवा वाक्यांश वापरतात, याचा अभ्यास करणे होय. वाचकांनी सर्चबार मध्ये टाईप केलेल्या शब्दांना किंवा वाक्यंशांना कीवर्ड्स (keywords) असे म्हणतात.

उदाहरणार्थ, जर एखादा वाचक गूगलसारख्या सर्च इंजिनमध्ये स्वादिष्ट आणि सोपे वरण रेसिपी  बद्द्ल माहिती शोधत असेल तर तो सर्च बार मध्ये “सोपे वरण रेसिपी” हा किवर्ड लिहुन सर्च करेल किवा केकला डेकोरेट करण्यासाठी काही टिप्स शोधत असेल तर तो “केक डेकोरेटिंग टिप्स” असे कीवर्ड लिहुन सर्च करेल. किवर्ड रिसर्च SEO साठी अत्यंत महत्वाचे आहे. तुम्ही लिहीत असलेल्या ब्लॉग पोस्ट किंवा लेखासाठी योग्य कीवर्ड वापरल्यावर तुमची वेबसाईट सर्च इंजिन रिझल्ट पेज (SERPs) मध्ये उच्च रँक प्राप्त करू शकते आणि पर्यायाने तुमच्या वेबसाईटवर वाचकांचे ट्रॅफिक वाढण्यास मदत होते.

कीवर्ड रिसर्च करण्यासाठी काही कीवर्ड रिसर्च टूल्स वापरले जातात. कीवर्ड रिसर्च टूल्स हे असे सॉफ्टवेअर प्रोग्रॅम आहेत की जे तुम्हाला तुमच्या वेबसाईट किंवा ब्लॉगसाठी योग्य कीवर्ड शोधण्यास मदत करतात. इंटरनेटवर काही मोफत कीवर्ड रिसर्च टूल्स उपलब्ध आहेत उदाहरणार्थ Google Keyword Planner, Ubersuggest, व Keywordtool.io. याशिवाय अधिक माहिती देणारे पेड टूल्स देखील उपलब्ध आहेत, जसे की SEMrush, Ahrefs, इत्यादी. तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार तुम्ही तुम्हाला हवे असलेले टूल निवडू सकता. या टूलच्या मदतीने तुम्ही कीवर्ड शोधू शकता आणि त्यांची सर्च व्हॉल्यूम (search volume) किती आहे म्हणजे ते किती वेळा सर्च केले जातात, हे देखील बघू शकता.  किवर्ड रिसर्च टूल्सचा योग्य वापर केल्याने तुम्ही तुमच्या वेबसाइटसाठी योग्य किवर्ड्स निवडू शकता आणि तुमची वेबसाइट अधिक लोकांपर्यंत पोहोचवू शकता.

·       आकर्षक शीर्षक तयार करा (Heading and Subheadings):-  सर्च निकालावर क्लिक केल्यावर वाचकाला सर्वात प्रथम दिसणारी गोष्ट म्हणजे लेखाचे शीर्षक. शीर्षक (Headings) आणि उपशीर्षके (subheadings) हे एखाद्या महामार्गावरील दिशादर्शक फलकासारखे (signposts) असतात. सर्च इंजिन्स तुमच्या लेखाची रचना आणि महत्त्व  समजून घेण्यासाठी शीर्षकांचा वापर करतात. लेखाच्या शीर्षकामध्ये योग्य कीवर्ड्स वापरल्याने सर्च इंजिनांना तुमचा लेख नेमके कोणत्या विषयावर आहे, ते कळते. यामुळे तुमच्या वेबसाइटची सर्च निकालांमधील रँकिंग सुधारण्यास मदत होऊ शकते. हे शीर्षक स्पष्ट, संक्षिप्त आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आकर्षक असले पाहिजे. महत्त्वाच्या कीवर्ड्सना शीर्षकात बेमालुमपणे समाविष्ट करा. संख्या असलेली शीर्षके वाचकांना जास्त आकर्षित करतात.

·       परिचय लिहिणे (Writing Introduction):  वाचकांचे लक्ष वेधून घेऊन त्यांची लेखामध्ये रुची निर्माण करण्यासाठी ब्लॉकपोस्टकरिता एक आकर्षक परिचय लिहिणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लेखामध्ये वाचकांना कुतूहल वाटावे, असे एखादे प्रश्न विचारून किंवा विधान करून लेखाच्या परिचयाची सुरुवात करावी. ब्लॉक पोस्टमध्ये ज्या मुद्द्यांचा समावेश केला आहे, अशा मुद्द्यांची ओळख परिचयात करून द्यावी. परिचयामध्ये मुख्य कीवर्डचा (main keyword) समावेश करावा. कीवर्ड्स नैसर्गिकरित्या वापरावे. त्यांची गरज नसतानाही ते मुद्दामहून वापरले गेले आहेत, असे वाचकाला वाटू नये. तसे केल्याने सर्च इंजिनच्या स्कोअरवर वाईट परिणाम होऊ शकतो. याला कीवर्ड स्टफ्फिंग keyword stuffing असे ही मानतात.

·       मथळ्यांचा प्रभावी वापर करावा (Using H1, H2, H3 tags): एक चांगला ब्लॉक पोस्ट लिहिण्यासाठी मथळे (Heading) व उपमथळे (Sub-Headings)यांचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. मथळे व उपमथळे वापरल्यामुळे संपूर्ण लेख वेगवेगळ्या मुद्द्यांमध्ये व्यवस्थित विभागून मांडला जातो आणि वाचक भ्रमित होत नाही. वाचकांना नेव्हिगेट करणे सोपे जाते आणि सर्च इंजिनना सुद्धा तुमच्या कंटेंटची हाईरार्की आणि संबंधितता समजून घेणे सोपे जाते. मथळे व उपमथळे वापरण्यासाठी H1, H2, H3 अशा टॅगचा वापर करावा. H1 टॅग हा तुमच्या संपूर्ण पानाचा मुख्य शीर्षक असतो. संपूर्ण पानावर H1 टॅग फक्त एकदाच वापरावा. H2 टॅग मुख्य मथळ्यांसाठी वापरावे. H3 टॅग हे तुमच्या H2 विभागांत जे उप-मुद्दे आहेत त्यांच्यासाठी वापरावे. मथळ्यांमध्ये व उपमथळ्यांमध्ये कीवर्ड्स नैसर्गिकरित्या वापरावे.

·       कंटेंटची रचना (Content Structure): कोणताही लेख लिहिताना त्याच्या कंटेंटची रचना ही अतिशय महत्त्वाची असते. लेखाच्या कन्टेन्ट साठी योग्य रचना वापरल्यामुळे तुमचा लेख वाचकांसाठी आकर्षक ठरतो. लेखातील उतारे हे विशिष्ट मुद्द्यांवर आधारित असले पाहिजेत. वाचकांना तुमचा लेख व्यवस्थित समजण्यासाठी बुलेट पॉईंट किंवा लिस्ट चा वापर करावा. लेख अधिकाधिक ज्ञानवर्धक, मनोरंजक  व आकर्षक बनविण्यासाठी रेखाचित्रे, छायाचित्रे, टेबल्स, चार्ट, व्हिडिओ, ग्राफिक्स या विविध प्रकारच्या मीडियाचा वापर करायला पाहिजे. वाचकांना गुंतवून ठेवण्यासाठी कथा व उदाहरणांचाही समावेश केला पाहिजे.

·       लिंक्स वापरणे (Using Links): हायपर लिंक्स हे इंटरनेटचे अविभाज्य आणि महत्त्वाचे भाग आहेत. ते निरनिराळ्या वेब पेजेस ना एकमेकांशी जोडतात आणि वाचकांना अधिकाधिक माहिती मिळविण्यासाठी मदत करतात. तुमच्या ब्लॉग पोस्टमध्ये लिंकचा वापर केल्यामुळे तुमचे कंटेंट अधिकच समृद्ध व उपयुक्त बनते. तसेच ते एसइओ रँकिंग वाढविण्यासाठी देखील उपयोगी ठरते. लिंक्स दोन प्रकारचे असतात जसे की –

o   आंतरिक लिंक्स (Internal Links): आंतरिक लिंक्सहेतुमच्या वेबसाइटवरील इतर पानांना जोडणारे लिंक्स आहेत. एखादा वाचक जर तुमचा लेख वाचत असेल आणि त्यात त्याला अशी काही माहिती पाहिजे असेल जे तुम्ही तुमच्या आधीच्या ब्लॉग पोस्टवर लिहिलेले आहे तर तुम्ही त्या आधीच्या ब्लॉग पोस्टची लिंक तिथे दिली तर तो त्या लिंक वर क्लिक करून त्याला हवी असलेली माहिती वाचू शकतो. असे केल्याने वाचकांना तुमच्या वेबसाईटवर अधिक माहिती शोधण्यास व तुमच्या वेबसाईटवर अधिकाधिक वेळ घालवण्यास मदत होते. एवढेच नव्हे तर सर्च इंजिन्सना सुद्धा तुमच्या वेबसाईटची रचना समजण्यास मदत होते.

o   बाह्य लिंक्स (External Links): बाह्य लिंक्स हे तुमच्या वेबसाईटवरून इतरांच्या वेबसाईटच्या पानाला जोडणारे लिंक असतात हे लिंक तुमच्या वाचकांना अधिक माहिती मिळविण्यासाठी उपयुक्त ठरतात. उदाहरणार्थ, जर तुमच्या ब्लॉग पोस्टचा विषय “फोटोग्राफी टिप्स” (photography tips) असा असेल तर तुम्ही कॅमेरा सेटिंग्जवर एखाद्या प्रतिष्ठित कॅमेरा निर्मात्याच्या वेबसाइटवर असलेल्या माहितीची लिंक देऊ शकता. असे केल्याने वाचकांना तुम्ही देत असलेल्या माहितीची विश्वासार्हता पटतेआणि सर्च इंजिनमध्येही चांगले रँक मिळविण्यास मदत होते.

·       मेटा डिस्क्रिप्शनचा वापर (Using  Meta Description): तुमच्या वेबसाइट किंवा ब्लॉग पोस्टसाठी तुम्ही जसे एखादे शीर्षक (title) निश्चित करता, तसेच तुम्ही त्यासाठी मेटा डिस्क्रिप्शन (meta description) देखील लिहू शकता. मेटा डिस्क्रिप्शन हे तुमच्या ब्लॉग पोस्टचे थोडक्यात वर्णन असते जे शोध इंजिनच्या निकालांमध्ये तुमच्या ब्लॉग पोस्टच्या शीर्षकाच्याखाली दिसते. मेटा डिस्क्रिप्शन चांगले लिहिणे खूप महत्वाचे आहे. ते तुमच्या वेबसाइटवर अधिक लोकांना आकर्षित करण्यास मदत करते. तुमचे मेटा डिस्क्रिप्शन स्पष्ट, संक्षिप्त आणि तुमच्या पानाच्या विषयाशी संबंधित असावे. त्यामध्ये तुम्ही कीवर्डचा समावेश करा परंतु कीवर्डचा भरमार करू नका. तुमच्या मेटा डिस्क्रिप्शनमध्ये थोडेसे रहस्य ठेवा, जेणेकरून वाचक तुमच्या संपूर्ण लेख वाचण्यासाठी प्रेरित होतील.

How to Write a SEO Blog Post for Higher Ranking उदाहरणार्थ:

जर तुमच्या ब्लॉग पोस्टचा विषय “घरी बसून ऑनलाइन पैसा कसा कमवायचा?” (how to earn money online from home?) असा असेल तर तुमच्या ब्लॉग पोस्टचे मेटा डिस्क्रिप्शन खालीलप्रमाणे असू शकते:

“घरबसल्या अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग शोधत आहात का? आमच्या ब्लॉगमध्ये इंटरनेटवरून पैसे कमवण्याच्या अनेक खात्रीशीर मार्गांची माहिती आहे. वाचा आणि लगेचच तुमची ऑनलाइन उत्पन्न सुरु करा!”

·       कॉल टू ऍक्शन वापरा (Using Call To Action):  तुमच्या वाचकांनी तुमचे लेख वाचून झाल्यानंतर ते फक्त बाहेर पडतील असे होऊ देऊ नका! त्यांना पुढे काय करायचे आहे ते सांगा. बळकट कॉल टू अॅक्शन (CTA) वाचकांचा सहभाग वाढवते आणि चांगले परिणाम देऊ शकते. खाली काही उदाहरणे दिली आहेत.

“अधिक बेकिंग टिप्ससाठी माझ्या न्यूजलेटरची सदस्यता घ्या! “

“खाली कमेंट करा आणि मला तुमची आवडती केक डेकोरेटिंग टेक्निक सांगा!”

“अधिक माहितीसाठी आमचे वेबसाईटला नक्की भेट द्या!”

वर दिलेल्या सर्व माहितीचा वापर करून तुम्ही हाई रँकिंगसाठी एक चांगला SEO-फ्रेंडली ब्लॉग पोस्ट लिहू शकता.

तुमचा ब्लॉग पोस्ट प्रकाशित करण्यापूर्वी, त्यात व्याकरणामधील चुका नाहीत आणि ते वाचण्यास  व समजण्यास सोपे आहेत, याची खात्री करा. प्रकाशनानंतर, Google Analytics सारख्या टूल्स वापर करून तुम्ही पानांचे Page Views – तुमची पोस्ट किती लोकांनी वाचली, बाउन्स रेट (Bounce Rate) – तुमच्या पानावर येऊन लगेच बाहेर पडलेल्या लोकांची टक्केवारी, पानावर घालवलेला वेळ (Time Spent on Page) – वाचकांनी तुमची पोस्ट वाचण्यावर किती वेळ घालवला या बाबी ट्रॅक करू शकता.

निष्कर्ष:

       एक अतिशय उत्तम दर्जाचा आणि SEO-फ्रेंडली ब्लॉग पोस्ट लिहिण्यासाठी वाचकांची गरज ओळखणे, योग्य कीवर्ड रिसर्च करणे, आकर्षक शीर्षक आणि परिचय लिहिणे, मथळ्यांचा वापर करून कंटेंटची योग्य रचना करणे, लिंक्स वापरणे, आणि मेटा डिस्क्रिप्शन लिहिणे अत्यंत महत्वाचे आहे. या प्रक्रियेमध्ये गुणवत्ता आणि वाचकांच्या पसंतीचा समावेश केला गेला पाहिजे, जेणेकरून सर्च इंजिनमध्ये चांगले रँक मिळवून अधिकतम वाचकांपर्यंत पोहोचता येईल. तुमच्या ब्लॉग पोस्टचा अंतिम ध्येय न केवळ सर्च इंजिनच्या रँकिंगमध्ये चांगले स्थान मिळवणे नाही तर वाचकांना उपयुक्त, माहितीपूर्ण आणि आकर्षक कंटेंट पुरवणे देखील आहे. तुमच्या ब्लॉगवरील माहिती जितकी वाचनीय आणि वाचकांसाठी उपयुक्त असेल, तितकीच त्याच्या लोकप्रियतेमध्ये वाढ होईल. How to Write a SEO Blog Post for Higher Ranking

तुम्हाला  “उच्च रँकिंगसाठी SEO-फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कसे लिहावे” या बद्दलची माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.

धन्यवाद !                 

13 thoughts on “SEO-फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कसे लिहावे? l How to Write a SEO Blog Post for Higher Ranking”

  1. सुंदर सविस्तर अभ्यासपूर्ण विवेचन. अप्रतिम मार्गदर्शन. आपल्या पुढील लेखन प्रवासा करिता भरपूर शुभेच्छा.

  2. खूप छान माहिती मिळाली. या बाबींचा उपयोग करून मी माझे लिखाण सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करिन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top