How to write an Article in Marathi:तुम्हाला छान छान लिहायचंय पण सुचत नाहीये? मग या ऍक्टिविटी करुन पहा.
लेखन ही एक कला आहे. लेखन करता येणे ही अगदी सहज आणि सोपी गोष्ट आहे. आपण शालेय जीवनापासून लेखन करीत असतो, काहीच नाही तर प्रश्नांची उत्तरे तरी लिहित असतोच. मराठीच्या पेपरमध्ये काल्पनिक निबंध देखील आपण सगळ्यांनीच लिहिलेले असतात. कधी निर्जिव वस्तूंची आत्मवृत्ते तर कधी निसर्गरम्य ठिकाणांची वर्णने. पण मोठेपणी कागदावर दहा ओळी लिहिताना आपल्याला का बरे दडपण येत असेल? कोणी विचार केलाय का? नाही ना?
आपण लहानपणी घरातील ज्येष्ठ मंडळींकडून अनेकदा ऐकलेले असते, पुस्तक वाच, वाचन केलस तरच तुझं काहीतरी पुढे चांगलं होईल. लेखन कर, निबंध लिही असे एक ना अनेक हुकूमवजा सल्ले आपल्याला मिळालेले असतात. मग कसंतरी शाळा संपते, महाविद्यालयीन शिक्षणात मराठी विषय नसल्यास आपण विषयानुरुप, काल्पनिक लिखाणापासून दूर जातो. कारण मातृभाषा हे व्यक्त होण्याचे अत्यंत सोपे माध्यम आहे, म्हणूनच आपण आपल्या आजच्या या लेखातून ज्यांना लेखक बनायचे आहे त्यांनी लेखनाला सुरुवात कशी करायची? हे जाणून घेणार आहोत. how to start article writing in Marathi?

लेख लेखन कसे सुरु करावे – How to write an Article in Marathi
कित्येकदा मित्र मैत्रिणींना तुम्ही तुमचे लेखन वाचून दाखवता तेव्हा त्यांना आवडत असेल. लेख, कवि आपल्या मनातलं मांडण्याची, उत्तमोत्तम कल्पना करण्याची आणि शब्दांच्या माध्यमातून त्या संकल्पना उतरवण्याची देणगी फक्त आणि फक्त मानवालाच मिळालेली आहे. प्राणी आपल्यासारखे व्यक्त नाही होऊ शकत, त्यांना कल्पना नाही करता येत. मग निसर्गाने आपल्याला दिलेल्या देणगीचा इतका छान उपयोग नको का करुन घ्यायला. चला उचला कागद पेन आणि मांडा तुमच्या मनातलं,” How to write an Article in Marathi
लेखनाला सुरुवात कशी करायची?How to write an Article in Marathi
लेखनाला सुरुवात कशी करायची? मी एक चांगला लेखक कसा बनू शकतो? मी माझे लेखन कसे सुरु करू? या प्रश्नांचे खूप सोपे आणि सरळ उत्तर आहे. तुम्हाला जो विषय आवडतो त्याबद्दल लिहायला सुरुवात करा. त्याबद्दलची माहिती मिळवा आणि तुमच्या शब्दात ती माहिती मांडण्याचा प्रयत्न करा.
लेखन सुरु करताना सर्वप्रथम तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतात त्याची एक यादी बनवा, त्यातल्या त्यात सर्वात जास्त आवडणाऱ्या विषयावर अगदी सुरुवातीला लिहिण्यास सुरुवात करा, त्याबद्दल माहिती मिळवा. ती सगळी माहिती तुम्ही तुमच्या शब्दात लिहून काढा. हळू हळू तुम्हाला लेखनाची सवय लागेल. How to write an Article in Marathi
पेनाने लिहिताना सुचते पण टाईप करताना सुचत नाही?
बरेचदा नव्या लेखकांना दडपण येते की वृत्तपत्रे किंवा वेबसाईट्ससाठी मागितलेले लेख हे योग्य पद्धतीने टाईप करुन द्यायचे असतात. परंतु अनेक लेखकांचे असे म्हणणे असते की, “मी पेनाने कागदावर लिहायला बसतो तेव्हा मला पटपट सुचतं. काल्पनिक कथा, कविता, लेख अगदी सहज सुचत जातात. परंतु हेच लिखाणाचं काम कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर टाईप करायला बसताना मात्र काहीच सुचत नाही. अगदीच ब्लँक व्हायला होतं” तुमच्यासोबत देखील असंच काही होत असेल तर, काळजी करु नका, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे. ते आधी आपण समजून घेऊ.
न्युरॉलॉजीस्टच्या म्हणण्यानुसार आपल्या मेंदूमध्ये लेखनासंबंधीचे जे न्यूरॉन्स असतात ते आपल्या बोटांशी कनेक्ट असतात. हा कनेक्ट आपण अगदी शालेय जीवनापासून जपलेला असतो. त्यामुळे आपल्याला सुचण्याची, विचार मांडण्याची क्षमता पेनाने लिहिताना अगदी सहज होत असते. परंतु लेखकाने तंत्रज्ञानातील बदल देखील आत्मसात करणे आवश्यक असल्याने, आपल्याला पेनाने कागदावर लिहिताना सुचते तसेच संगणकावर टाईप करताना सुचणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. मग यासाठी उपाय म्हणजे आपण रोज वेळ काळून किमान 10 मिनिटे आपल्याला सुचेल ते टाईप करण्याचा सराव करावा.
बरेचदा एखाद्या क्लिष्ट विषयावर लिहायला घेतल्याने विचारांचा गुंता होऊ शकतो. म्हणूच अगदी सोप्या सोप्या गोष्टी म्हणजे दैनंदिन जीवनातील सवयींविषयी, अगदी किराणा सामानाच्या यादी देखील तुम्ही टाईप करुन ठेवू शकता. ही देखील एक विचारप्रक्रियाच आहे. दिवसभर करावयाच्या गोष्टींची यादी, आपली बकेट लिस्ट अशा एक ना अनेक गोष्टी आहेत ज्या आपण टाईप करुन ठेवू शकतो. या गोष्टी लिहिताना अपल्याला अलंकारिक लिहिण्याची गरज नसते. अगदी सहज सोप्या रोजच्या वापराच्या भाषेत या गोष्टी लिहून काढा. यामुळे आपला मेंदू आणि आपली टायपिंग करण्याची क्षमता यांमध्ये ताळमेळ बसेल. ही ऍक्टिविटी तुम्ही रोज केली तर जेव्हा तुम्हाला एखाद्या विषयावर सखोल विचार करुन लिहायचे असेल तेव्हा तुम्ही अगदी सहजपणे सुचत जाईल तसे तुम्ही टाईप करीत जाल. नक्की प्रयत्न करुन बघा. How to write an Article in Marathi
उत्तम लेखनासाठी उत्तम वाचन अत्यंत गरजेचे असते.
आपला मेंदू हा एक हंडा आहे असे आपण समजू, त्यामध्ये आपण वाचनाच्या माध्यमातून माहिती भरत राहतो, सततच्या वाचनाने हा हंडा भरतो आणि त्यानंतरच लेखनाची प्रक्रिया सुरु होते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. वाचन वाढत गेले की लेखन हे ओघाने होतेच त्यासाठी वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत. म्हणून तुमच्या आवडीच्या विषया संदर्भातील माहिती वाचा.
जास्तीत जास्त वाचन करा. बरेचदा आपण लेख, कथा, कादंबऱ्या यांच्या पुस्तकांचे दडपण घेतो, पण तुम्हाला या सगळ्याची आवड नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयासंदर्भात माहिती वाचायला सुरुवात करा. सध्या गुगलसारख्या व्यासपीठामुळे माहितीची कवाडे सर्वांसाठी खुली आहेत. वाचन म्हणजे कायम पुस्तके किंवा वृत्तपत्रेच हातात घेऊन वाचली पाहिजेत असे अजीबात नाही.
खरं म्हणजे नवे वाचक तायर न होण्यामागचा हा सर्वात मोठा गैरसमज आहे. म्हणून ज्यांना नव्याने लेखन सुरु करायचे आहे त्यांना मी नेहमी त्यांच्या आवडीच्या विषयांबद्दल वाचण्याचा सल्ला देते. उदा. एखादा मुलगा जीम ट्रेनर असेल त्याला कथा कादंबऱ्यांमध्ये रस नसेल पण व्यायाम, आहार या गोष्टींबद्द्ल तर आवड असेलच ना? त्याने त्याबद्दल वाचन सुरु ठेवावे, जेणेकरुन कालांतराने लेखन करणे सोपे होईल. एखाद्या मुलीला नाचायला आवडत असेल तर तिने नृत्याचे प्रकार, इतर देशांतील नृत्यसंस्कृती यांबद्दल माहिती मिळवायला काहीच हरकत नाही. यामुळे तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयासोबत कनेक्ट राहता आणि तुमचे वाचनही सुरु राहते.
वाचन वाढले ही ओघाने लेखन हे आलेच. मग वाट कसली बघताय? उचला पेन आणि सुरु करा तुमच्या आवडीच्या विषयाबद्दल लिहायला. जस जसे तुम्ही लिहू लागाल, तस तसे तुम्हाला समजेल की लेखन ही अत्यंत आनंद मिळवून देणारी कला आहे, मनाला मोकळं आणि विचारांना सुसाट वेग देणारी ही लेखनाची कला कालांतराने तुम्हाला उत्तम पैसेही मिळवून देऊ लागेल. आज माहितीच्या या विश्वात तुमचे अनुभव, तुमचे एखाद्या विषयासंदर्भातील मत अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्याला डिजिटल स्वरुपात उतरवण्याची क्षमता तुमच्यात असेल तर तुम्ही पुढील काही वर्षांत उत्तम पैसे कमाऊ शकता. सध्या उत्तम मराठी कंटेण्ट लिहिणाऱ्या लेखकांची खूप गरज आहे. अनेक क्रिएटिव्ह कंपन्या मराठी कंटेण्ट रायटरच्या शोधात असतात. तुम्ही देखील त्या कंपन्यांचे भाग होऊ शकता. How to write an Article in Marathi
उत्तम लेखनासाठी उत्तम ऐकण्याची कला आत्मसात करा
आपण स्वतःतचं इतके गुंतलेले असतो की दुसऱ्याच्या विचारांकडे, दुसऱ्याच्या मतांकडे आपण दुर्लक्ष करतो. ऐकण्याची क्षमता कमी होऊन बोलण्याकडेच अनेकांचा कल असतो. तुमच्याकडून चांगले लेखन व्हावे असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही चांगले श्रोते असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. उत्तमोत्तम विषयांवरील तज्ञांची मते ऐका, विविध विषयांवरील व्याख्यानांना उपस्थित राहून वक्त्यांची मते समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्यातील श्रोता उत्तम असेल तर नक्कीच तुमच्याकडून होणारे लेखन हे चौफेर आणि इतरांसाठी दिशादर्शक होऊ शकेल.
लेखन करण्यास कशी सुरुवात करावी? लेखन कोशल्य कसे वाढवावे? याबाबतचा माझा हा लेख कसा वाटला? याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरु नका. तसेच तुम्हाला अजून कोणकोणत्या विषयांसदर्भात माहिती मिळवायला आवडेल ते जरुर कळवा. बातम्या, माहितीपर लेख, विविध कथा, संस्कृती याबद्दल अभ्यासपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला रोज भेट द्या! तुमच्या प्रतिक्रिया हेच आमचे काम सुरु ठेवण्याचे इंधन आहे. How to start writing content in Marathi?
विशालाक्षी चव्हाण, मुंबई
खूप छान आणि माहितीपूर्ण लेख आहे हा. याचा उपयोग आमच्यासारख्या नवोदित लेखकांना नक्कीच होईल. धन्यवाद
फारच उत्तम लेख .छान माहिती मिळाली
छानच माहिती दिली.
छान लिहिलाय लेख