मतदानासाठी हे ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार

WhatsApp Group Join Now

मतदानासाठी हे ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार- (Identity proof for election vote)-

भारतात सध्या सर्वत्र निवडणुकीची धूम पाहायला मिळत आहे.जेव्हापासून भारतात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. त्या दिवसापासून भारतात एक वेगळाच उत्साह सगळीकडे दिसून येत आहे. या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय पक्ष आपले भविष्य आजमावणार आहेत. पण सोबतच एक मतदार म्हणून मतदान करायला जाताना आपल्याला या गोष्टी माहिती असायला हव्यात आजच्या आपल्या या लेखामध्ये आपण मतदानासाठी जाताना इतर कोणती( वोटर आयडी सोडून) ओळखपत्रे ग्राह्य धरली  जाणार आणि संपूर्ण मतदान प्रक्रिया कशी असते याबद्दल ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत,

मतदार म्हणजे काय? (Voter meaning)

      भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्य पैकी एक म्हणजे मतदानाचा अधिकार. मतदान करून आपल्या आवडत्या उमेदवाराला विजयी करण्याचा अधिकार लोकशाहीने आपल्याला दिलेला आहे. भारतीय निवडणूक आयोग वय वर्ष 18 झालेल्या व्यक्तींना एक दस्ताऐवज जारी करते.त्याच दस्ताऐवजाला मतदान कार्ड असे म्हणतात. भारतात 18 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदार असे म्हटले जाते.अशा व्यक्ती या भारतात घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदान करू शकतात. भारतीय नागरिकांसाठी ओळख पुरावा म्हणून मतदानकार्ड काम करते. तसेच भारतात घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांमध्ये या दस्तऐवजाचा भारतीय नागरिक असल्याचा पुरावा म्हणून उपयोग मतदाराला करता येतो.

मतदान म्हणजे काय? (What is mean by Vote)-
  मतदान म्हणजे एक अशी प्रक्रिया आहे. ज्यामध्ये मतदार हा एखाद्या उमेदवारासाठी प्राधान्य व्यक्त करतो. मतदान हे इलेक्ट्रिक मतदान प्रणाली प्रमाणे घेतले जाते आणि नंतर याचे मोजमापन केले जाते.या प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळतात तो उमेदवार विजयी म्हणून घोषित केला जातो.

मतदान कोणाला करता येते? (Who can vote for election?)
     मतदान हा भारतीय लोकशाहीचा पाया आहे. भारतात राहणाऱ्या नागरिकाला मतदान करून त्यांच्या आवडीचा उमेदवार निवडून देण्याचा हक्क राज्यघटनेने दिला आहे
वय-
(Age)
ज्यांचे वय अठरा वर्ष आहे त्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावता येतो. वयाचे अठरा वर्षे पूर्ण केल्यानंतर सदरील व्यक्तीने मतदार यादीत आपले नाव नोंदवलेले असावे.

नागरिकत्व-(Citizenship)
     मतदान करणाऱ्या व्यक्तीचे नागरिकत्व हे भारतीय असणे. गरजेचे आहे मतदान करतेवेळी मतदान करणाऱ्या व्यक्तीने आपण भारतीय नागरिक आहोत याचा पुरावा दाखवणे देखील गरजेचे आहे.

मतदार याद्या-(Voters list)
       मतदान करतेवेळी मतदान करणाऱ्या व्यक्तीचे नाव हे निवडणूक आयोगाच्या यादीत असणे गरजेचे असते. मतदाराचे अधिकृत नाव मतदान यादीत सापडल्यानंतरच मतदाराला आपले मतदान करता येते. मतदान करतेवेळी  यादीमधील पावती सोबत घेणे गरजेचे असते.

निवासस्थान-(Domicile)
        कामानिमित्त बाहेरगावी असणाऱ्या मतदाराला मतदानावेळी वेळी आपल्या निवासस्थानी म्हणजेच मूळ गावी येऊन मतदान करावे लागते जर त्या व्यक्तीची नाव नोंदणी ही मूळ गावच्या मतदार संघात आलेली असेल. मतदान ही एक लोकशाहीतील महत्त्वाची प्रक्रिया आहे.

मानसिक स्वास्थ्य-(Mental health)
     मानसिक स्वास्थ्य ठीक नसलेल्या व्यक्तींना मतदान करता येत नाही.कारण अशा व्यक्तीने केलेले मतदान हे ग्राह्य धरले जात नाही. मानसिक आरोग्य ठीक असणाऱ्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे, अशा व्यक्तीसाठी भारत सरकारने वोटर आयडी दिले आहेत.

मतदानासाठी अपात्र-(Who cannot vote?)
    ● मानसिक स्वास्थ्य ठीक नसणारे.
    ● गुन्हेगार.
    ● भारताचा नागरिक नसणे.
    ● दिवाळखोर.
    ●18 वर्षाखालील
पुढील सर्व व्यक्ती हे मतदानासाठी अपात्र आहेत.

मतदानासाठी गेल्यानंतर जर तुमच्याकडे वोटर आयडी कार्ड नसेल तर काय करावे? (If you don’t have voter id for vote, what will you do?)


मतदानाचा हक्क बजावताना मतदाराकडे निवडणूक आयोगाने दिलेले वोटर आयडी कार्ड असणे गरजेचे आहे. पण जर तुमच्याकडे वोटर आयडी कार्ड नसेल तर खालील लिस्ट प्रमाणे कुठलाही एक अधिकृत पुरावा दाखवून तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजावू शकता,

लिस्ट पुढीलप्रमाणे- (List)
◆मतदान कार्ड.
◆पासपोर्ट.
◆कर्मचारी ओळखपत्र फोटो असलेले.
◆फोटो असलेले बँक आणि पोस्टाचे पासबुक.
◆लोकसंख्या नोंदणीद्वारे मिळालेले स्मार्ट कार्ड.
◆मनरेगा जॉबकार्ड.
◆ आरोग्य विमा स्मार्टकार्ड (कामगार मंत्रालय).
◆वाहनचालक परवाना.
◆ निवृत्तीवेतन दस्तऐवज फोटो असलेले.
◆ आधारकार्ड.
◆ खासदार आमदार विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र
◆ पॅनकार्ड

हे तितकेच गरजेचे-(Important)
        मतदान करायला जाताना मतदार यादीमध्ये तुमचे नाव असणे हेही तितकेच गरजेचे आहे मतदार यादीत तुमचे नाव असेल तरच तुम्ही वरीलपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करू शकता.

आपले नाव मतदार यादीमध्ये आहे का हे कसे पहावे? निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वरती जाऊन मतदार व्यक्ती त्यांचे नाव मतदान यादीत आहे का नाही हे तपासून पाहू शकतात निवडणूक आयोगाची वेबसाईट ही पुढील प्रमाणे आहे, Http://electoralsearch.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या नावाची खात्री करून घेऊ शकता व आपला मतदानाचा हक्क बजावू शकता.

मतदानाचे महत्त्व-(Importance of vote)

मतदान करणे म्हणजे आपल्याला संविधानाने दिलेल्या कर्तव्याचा वापर करणे होय.मतदान करून आपण लोकशाहीला अधिकच बळकट करत असतो. निवडणुकीमध्ये आपला आवडता उमेदवार निवडून आल्यानंतर आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील व गावातील विविध गोष्टींचा विकास होत असतो. देश हितासाठी प्रत्येकाने मतदान हे केलेच पाहिजे लोकशाहीचा पायाच मुळात मतदान व निवडणूक प्रक्रिया आहे.

2024 च्या निवडणुकीच्या अनुषंगाने लिहिण्यात आलेला माझा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा.  मतदानाला गेल्यानंतर वोटर आयडी सोबत नसेल तर तुम्ही वरती सांगितलेल्या टिप्सचा उपयोग करू शकता,तसेच माझा हा लेख तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला की नाही हे देखील सांगायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स आणि सूचनांचे स्वागतच राहील.अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या लेखकमित्र वेबसाईटला भेट देत रहा आणि हो या निवडणुकीमध्ये मतदान करायला विसरू नका.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top