भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती l Indian government scholarship to study abroad

WhatsApp Group Join Now

      प्रिन्स्टन विद्यापीठ, हार्वर्ड विद्यापीठ ,ऑक्सफर्ड विद्यापीठ , एमआयटी अशा अनेक नामवंत परदेशी विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्याचे भारतीय विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. परंतु कित्येकदा  आर्थिक अडचणीमुळे त्यांचे स्वप्न स्वप्नच राहते. अशा मुलांना परदेशात जाऊन शिक्षण घेता यावे व विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाते. परदेशात शिकण्यासाठी ‘भारतात शिष्यवृत्ती कशी मिळवावी’ हे अनेक भारतीय विद्यार्थ्यांना माहिती नसते आणि म्हणून असे गुणवंत व पात्र विद्यार्थी अशा नामवंत विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यास मुकले जातात.
            अलीकडे परदेशात शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत असल्याने शिष्यवृत्ती मिळवणे स्पर्धात्मक झाले आहे. भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी असंख्य शिष्यवृत्ती भारत सरकारने उपलब्ध केल्या आहेत .परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी या शिष्यवृत्ती विविध सरकार, संस्था ,विद्यापीठ आणि फाउंडेशन याद्वारे दिली जाते.

भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी अशा कोणकोणत्या उल्लेखनीय शिष्यवृत्ती आहेत  ते जाणून घेऊ.(Indian government scholarship to study abroad)

          
 1. Fulbright – Nehru master’s Fellowship: फुलब्राइट – नेहरू मास्टर फेलोशिप


  हि फेलोशिप गुणवत्ता व गरज यावर आधारित भारत सरकारची शिष्यवृत्ती आहे. जी गुणवत्ता व पात्र भारतीय विद्यार्थ्यांना युनायटेड स्टेट्स मधील काही निवडक महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी येथे संधी दिली जाते. एक किंवा दोन वर्षांची ही फेलोशिप असते. नेतृत्व गुण,समतुल्य पदवी पूर्ण केलेली असावी लागते. किमान तीन वर्षाचा व्यावसायिक कामाचा अनुभव असावा लागतो.
  उमेदवाराने कला आणि संस्कृती व्यवस्थापन ,अर्थशास्त्र ,पर्यावरण विज्ञान, उच्च शिक्षण प्रशासन ,आंतरराष्ट्रीय घडामोडी ,आंतरराष्ट्रीय कायदेशीर अभ्यास ,पत्रकारिता आणि जनसंवाद सार्वजनिक प्रशासन या क्षेत्राशी जुळणारे अभ्यासाचे क्षेत्र निवडणे आवश्यक असते. सार्वजनिक आरोग्य,शहरी आणि प्रादेशिक नियोजन आणि महिला अभ्यास किंवा लिंग अभ्यास या क्षेत्राशी निगडित उच्च शिक्षण घेण्यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते.

पात्रता निकष:
* विद्यार्थ्यांना बॅचलर पदवी,पदव्युत्तर पदवी किंवा पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी.
* पदवीमध्ये किमान 55 % गुण असणे आवश्यक आहे.
*ज्या क्षेत्रात शिक्षण घ्यावयाचे असेल त्या क्षेत्राशी निगडित कामाचा तीन वर्षाचा अनुभव असावा.
*उमेदवारामध्ये नेतृत्व गुण सेवेचा अनुभव असावा.

शिष्यवृत्तीचे लाभाचे स्वरूप:
*भारतात येण्या-जाण्याचा खर्च.
*अध्ययन आणि राहण्याचा खर्च.
*जे-वन व्हीसा.
*शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वैद्यकीय खर्च.

  2. National Overseas Scholarship नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप

     
  नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिपच्या माध्यमातून भूमिहीन, शेतमजूर ,अनुसूचित जाती ,भटक्या विमुक्त आणि अर्ध भटक्या जमाती,पारंपारिक कारागीर श्रेणीतील कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण उदा.पदव्युत्तर पदवी,पीएचडी, पोस्ट डॉक्टरेट अभ्यासक्रमासाठी परदेशात शिक्षण घेण्यास हि शिष्यवृत्ती दिली जाते.

पात्रता निकष:
* शिष्यवृत्तीसाठी पदव्युत्तर पदवी, पीएचडी किंवा पोस्ट -डॉक्टरेट पदवी मध्ये किमान 60% गुण प्राप्त करणारा उमेदवार शिष्यवृत्ती अर्जासाठी पात्र ठरतो.
*उमेदवाराचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
*उमेदवाराचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8,00,000 लाखापेक्षा जास्त नसावे.
* शिष्यवृत्ती मध्ये महिला उमेदवारांसाठी 30% जागा राखीव असते.

शिष्यवृत्तीचे लाभाचे स्वरूप:
*अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क दिले जाते.
*परदेशात येण्या जाण्याकरिता इकॉनॉमि क्लासचा विमान प्रवास खर्च दिला जातो.
*भारतीय रुपयांमध्ये व्हिसा शुल्क दिले जाते.
*वैद्यकीय विमा प्रीमियमची रक्कम दिली जाते.
*आकस्मिक प्रवास खर्च दिला जातो.
* Poll Tax तसेच राहण्याचा खर्चही दिला जातो.

  3. The JN Tata Endowment scholarship : जेएन टाटा एंडोव्हमेंट स्कॉलरशिप

हि स्कॉलरशिप भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी पूर्णवेळ पदव्युत्तर,पीएचडी, पोस्टडॉक्टरल
आणि संशोधन फेलोशिप साठी एक वेळ कर्ज शिष्यवृत्ती देते.एकूण एक लाख ते दहा लाख दरम्यान कर्ज रक्कम देण्यात येते. स्कॉलरशिप मध्ये विद्यार्थ्यांना 50,000
रुपयांपर्यंतचे प्रवास अनुदान देण्यात येते.
        निवड प्रक्रियेत पात्र होणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन चाचणी आणि मुलाखतीसाठी हजर राहावे लागते. ऑनलाइन परीक्षा हि थिंकिंग स्किल्स असेसमेंट (TSA)वर आधारित असते. एक कठोर तांत्रिक मुलाखत उमेदवाराच्या वर्तमान आणि भविष्यातील विषयांच्या आकलनाचे मूल्यांकन करते. उमेदवाराची अंतिम निवड
चाचणी गुण ,मुलाखत कामगिरी आणि शैक्षणिक निकाल यात प्राप्त झालेल्या गुणांवर अवलंबून असते.

पात्रता निकष:
*उमेदवार हा भारतीय रहिवासी असावा.
*पदवी पूर्व पदवी असणे आवश्यक आहे.
*60% गुण प्राप्त करणारा उमेदवार पात्र ठरवला जातो.
*उमेदवाराचे वय 45 वर्षापर्यंत असावे.

शिष्यवृत्तीचे लाभाचे स्वरूप:
*एक ते दहा लाखापर्यंत कर्ज शिष्यवृत्ती.
*50,000 पर्यंत प्रवास अनुदान रक्कम.

  4. Lady Meherbai D Tata Education Scholarship : लेडी मेहेरबाई डी टाटा एज्युकेशन स्कॉलरशिप


लेडी मेहेरबाई डी टाटा एज्युकेशन स्कॉलरशिप फक्त भारतीय महिलांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी डिझाईन केली गेली आहे. गुणवत्तेवर आधारित ही शिष्यवृत्ती देण्यात येते. सामाजिक विज्ञान, सार्वजनिक आरोग्य ,सामाजिक कार्य,महिला व मुलांचे कल्याण या विषयात पदवीधर पदवी घेतलेल्या महिलांसाठी 1933 मध्ये ही शिष्यवृत्ती लागू करण्यात आली. या शिष्यवृत्तीची निवड प्रक्रिया मुलाखतीच्या कामगिरीवर अवलंबून असते.

  पात्रता निकष:
*उमेदवार हा भारताचा नागरिक (महिला) असणे आवश्यक आहे.
*उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर घेणे आवश्यक आहे.
*उमेदवाराला कामाचा किमान दोन वर्ष अनुभव असावा.
*उमेदवाराने युके,युरोप,युएस मधील मान्यता प्राप्त विद्यापीठात अर्ज केलेला असावा.

शिष्यवृत्तीचे लाभाचे स्वरूप:
*महिलांना फायदा.
*3,60,000 शिक्षण शुल्क देण्यात येते.

   5. Agatha Harrison Memorial Fellowship : अगाथा हॅरीसन मेमोरियल फेलोशिप


ही एक प्रगत फेलोशिप असून भारतीय मानव संसाधन व विकास मंत्रालया कडून देण्यात येते. ही फेलोशिप गुणवत्तेवर आधारित असून दरवर्षी एका भारतीय विद्यार्थ्याला उपलब्ध असते. तसेच त्याला सेंट अँटनी कॉलेज ऑक्सफर्ड लंडन विद्यापीठात ज्युनियर रिसर्च फेलो म्हणून संशोधन करण्याची संधी देण्यात येते.ही शिष्यवृत्ती फक्त एक वर्षासाठी दिली जाते. विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर पुढे हा कार्यकाळ वाढविला जातो. इतिहास,अर्थशास्त्र किंवा राज्यशास्त्र या क्षेत्रातील स्पेशलायझेशन करणारे विद्यार्थी या फेलोशिपचा लाभ घेऊ शकतात.

पात्रता निकष:
*विद्यार्थी भारताचा रहिवासी असावा.
*विद्यार्थ्याचे वय 30-40 वर्षापर्यंत असावे.
*विद्यार्थ्याने पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये किमान 60% गुण असणे आवश्यक आहे.
*विद्यार्थ्याला किमान तीन वर्षे पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावरील अध्यापनाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

शिष्यवृत्तीचे लाभाचे स्वरूप:
*शैक्षणिक व राहण्याचा खर्च.
*वैद्यकीय खर्च दिला जातो.
*इकॉनॉमि क्लासचा विमान प्रवास भत्ता.
*इतर शुल्क व कॉलेज लंच/ डिनर साठी स्टायपेंड.

    6. Erasmus Mundus Joint Master Degree : इरास्मस मुंडस जॉईंट मास्टर डिग्री


इरास्मस मुंडस हा युरोपियन युनियन (EU) चा पूर्ण अनुदानित असलेला उपक्रम आहे. जागतिक पातळीवर उच्च शिक्षण व संशोधन याला चालना देण्याचा त्यांचा हेतू असतो. हे युरोपियन विद्यापीठे आणि संस्थांच्या संघटनाद्वारे विकसित आणि वितरित केलेले मास्टर्स प्रोग्रॅम आहेत.
यामध्ये विद्यार्थी तीन विविध देशातील तीन विविध विद्यापीठात अर्ज करू शकतात. या शिष्यवृत्ती द्वारे विद्यार्थ्यांना युरोपियन विद्यापीठात पदव्युत्तर किंवा डॉक्टरेट पदवीचा अभ्यास करण्याची संधी देण्यात येते.
विद्यार्थ्यांना कोणत्याही दोन युरोपियन देशांमध्ये शिक्षण घेता येते.तसेच अभ्यासादरम्यान इंटर्नशिप करण्याची संधी हि मिळते.

पात्रता निकष:
*विद्यार्थी भारताचा नागरिक असावा.
*विद्यार्थी परदेशात गेल्या 5 वर्षात एकूण 12 महिन्याहून अधिक काळ वास्तव्यास नसावा.
*विद्यार्थ्याने 16 वर्षांचे शालेय शिक्षण पूर्ण केलेले असावे.

शिष्यवृत्तीचे लाभाचे स्वरूप:
*विद्यार्थ्यांना 1100 -1500 युरो मासिक वेतन
*अभ्यासादरम्यान प्रवास करण्यास प्रवास भत्ता.
*युरोपला जाण्यासाठी विमान प्रवास खर्च.
*राहण्याचा खर्च व शैक्षणिक शुल्क.
*आरोग्य विमा संरक्षण.
*अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर वर्क व्हिसा दिला जातो.

भारत सरकारच्या या शिष्यवृत्ती योजनांचा ज्यांना परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा आहे त्यांनी जरूर लाभ घ्यावा व आपले स्वप्न साकार करावे.

तुम्हाला हा माहितीपर लेख कसा वाटला हे जरूर कळवावे व मित्र परिवारास शेअर करायला विसरू नका.अशाच नवनवीन कथा,माहिती पर लेख, बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवू त्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या तसेच आमचा व्हाट्सअप ग्रुप ही जॉईन करा.
                            धन्यवाद!
                    

4 thoughts on “भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती l Indian government scholarship to study abroad”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top