(Information about BBA and BCA in Marathi)
येत्या शैक्षणिक वर्षापासून बीबीए, बीएमएस आणि बीसीए या कोर्सेस साठी प्रवेश हा प्रवेशपरीक्षेच्या आधारे दिला जाणार आहे. त्या अनुषंगाने ह्या कोर्सेस ची चर्चा परत घरोघरी होताना दिसत आहेत. म्हणूनच आजच्या या लेखात आपण या कोर्सबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तसेच ही प्रवेशपरीक्षा कशी असणार आहे, त्यासाठी कोणती तयारी करायची हे सुद्धा जाणून घेणार आहोत.
मागच्या वर्षी पर्यंत बीबीए, बीएमएस आणि बीसीए या कोर्स साठी प्रवेश हा बारावीच्या मार्कांवर दिला जात असे. तेव्हा हे सगळे कोर्स हे UGC (युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन) यांच्या अंतर्गत येत होते. परंतु २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षापासून हे कोर्सेस आता अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) यांच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहेत. AICTE सुरुवातीपासून एमबीए आणि एमसीए या पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेत असते. याच अनुषंगाने AICTE ने बीबीए, बीएमएस आणि बीसीए हे पदवी अभ्यासक्रम आपल्या अखत्यारीत घेतले आहेत. CET (राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष) यांच्याकडून हि प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. परंतु परीक्षेबद्दल अधिक माहिती घेण्याआधी आपण या कोर्सेस बद्दल थोडक्यात जाणून घेऊया.
कोर्सेस ची माहिती: (What is BBA and BCA in Marathi)
- बीबीए (बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन) आणि बीएमएस (बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज): जर तुम्हाला पुढे व्यवस्थापन या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर १२ वी नंतर बीबीए हा एक उत्तम पर्याय आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही क्षेत्रांतून १२ वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ह्या कोर्स ला ऍडमिशन घेऊ शकतात. हा ३ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे.
- बीसीए (बॅचलर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन): जर तुम्हाला IT किंवा संगणक क्षेत्रात करिअर करायचे असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी उत्तम आहे. हा सुद्धा ३ वर्षाचा पदवी अभ्यासक्रम असून १२ वी उत्तीर्ण कोणताही विद्यार्थी हा कोर्स करू शकतो. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही पुढे एमसीए हा पदव्युत्तर पदवी कोर्स करू शकता. तसेच पदवी मिळाल्यानंतर तुम्ही कॉम्प्युटर इंजिनियर म्हणून काम करू शकता.
- CET प्रवेश परीक्षा: (How to apply for CET exam in Marathi)
- प्रवेश परीक्षा नोंदणी:CET तर्फे घेण्यात येणाऱ्या या प्रवेश परीक्षेची नोंदणी ३१ मार्च २०२४ रोजी सुरु झाली असून त्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२४ पर्यंत आहे. सुरुवातीला ह्याची शेवटची तारीख ३० मार्च असून आता ती वाढवण्यात आली आहे. १२ वी पास किंवा १२ वीला बसलेला कुठलाही विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरू शकता. (CET registration in Marathi)
- परीक्षेची फी: खुल्या श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फी १००० रुपये एवढी आहे. आणि राखीव श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी फी ८०० रुपये एवढी आहे.
- परीक्षेची तारीख: ही परीक्षा २७ ते २९ मे २०२४ या कालावधी मध्ये घेण्यात येणार आहे.
- परीक्षेचे स्वरूप: ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात असणार आहे. यामध्ये १०० प्रश्न असणार असून प्रत्येक प्रश्नाला १ गुण आहे. हे प्रश्न बहू पर्यायी स्वरूपात असणार असून विध्यार्थ्यांना एक बरोबर पर्याय उत्तर म्हणून लिहायचा आहे. हे प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असून ह्यांची उत्तरे OMR शीट मध्ये लिहायची असतात. ह्या परीक्षेसाठी कोणत्याही स्वरूपाचे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ही परीक्षा फक्त इंग्रजी माध्यमातूनच लिहिता येणार आहे.
- परीक्षेचा कालावधी: परीक्षेचा कालावधी हा ९० मिनिटे एवढा असणार आहे.
- परीक्षेचा अभ्यासक्रम:
विभाग | एकूण प्रश्न | गुण प्रति प्रश्न |
इंग्लिश भाषा | ४० | १ |
बुद्धिमत्ता (Reasoning) | ३० | १ |
सामान्य ज्ञान (General Knowledge) | १५ | १ |
संगणक (Computer) | १५ | १ |
या सर्व विषयांचा सखोल अभ्यासक्रम CET च्या या संकेतस्थळावर मिळेल – cetcell.mahacet.org
परीक्षेची तयारी कशी करावी? (How to prepare for CET in Marathi):
- प्रवेश परीक्षेसाठी ९० मिनिटात १०० प्रश्न सोडवायचे असतात. म्हणजेच विद्यार्थ्यांकडे वेळ हा खूप कमी असतो. म्हणूनच परीक्षेचा सराव करणे खूप महत्वाचे असते. CET च्या संकेतस्थळावर नमुना पेपर दिला आहे. त्यावरून विद्यार्थ्यांना परीक्षेचा अंदाज येऊ शकतो. तसेच ऑनलाईन बऱ्याच साईट्स वर सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध असतात. त्याचा सराव करणे खूपच फायद्याचे ठरेल. ताज्या घडामोडींबद्दल माहिती मिळवणे, त्यासाठी रोज वर्तमानपत्र वाचणे फायद्याचे ठरेल. सर्वात जास्त गुण हे इंग्लिश भाषेला असल्यामुळे रोज इंग्रजी पुस्तके वाचणे, व्याकरणाचा सराव करणे, आणि आपला शब्दकोश वाढवणे हे उपयोगी ठरेल. अभ्यासाचे एक वेळापत्रक तयार करा आणि ते पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. या तणावपूर्ण परिस्थितीत तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि निरोगी जेवण हि त्रिसूत्री अमलात आणा.
परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या कॉलेज मध्ये तुमच्या CET च्या मार्कांनुसार फॉर्म भरू शकता. बीबीए, बीएमएस आणि बीसीए हे कोर्स आता AICTE ने त्यांच्या अखत्यारीत आणल्यामुळे ह्या कोर्सेस ची फी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ह्या परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा!! Best of Luck!! आम्हाला आशा आहे कि या माहितीचा तुम्हाला नक्की फायदा होईल. त्यामुळे ही माहिती आपल्या सर्व विध्यार्थी मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
लेखिका: नेहा करंदीकर – हुनारी, मालवण