संस्कार नेहमी मानवी मूल्यांशी निगडित असतात. मनुष्य जन्माला येऊन त्याच्या अगदी मृत्यूपर्यंत समाज जीवनात अथवा कुटुंबात त्याला काही मूल्ये नक्कीच पाळावे लागतात. जेणेकरून त्याचे स्वतःचे जीवन सुखी होईल व तो इतरांनाही सुखी ठेवेल.
मनुष्यामधील सद्गुणांचा विकास होऊन संवर्धन करणे व त्यातील त्यातील दोषांचे निराकरण करणे हा संस्कारांचा पाया असतो. म्हणूनच हिंदू धर्मामधील त्यांच्या ऋषीमुनींनी अथवा पूर्वजांनी काही संस्कारांची योजना केली आहे. या संस्कारांद्वारे मनुष्य त्या निसर्गातील चेतनेशी जोडला जातो. व त्याला त्याच्या उन्नतीचा मार्ग सापडतो. उन्नत व्यक्ती चांगला समाज आणि प्रखर राष्ट्र निर्माण करतात. म्हणूनच लहानपणीच चांगले संस्कार होणे अतिशय आवश्यक आहे.
संस्कारांमध्ये साधना सुद्धा येते. हे संस्कार त्या व्यक्तीवर आई-वडील अथवा गुरूकडून केले जातात. म्हणूनच आवश्यक असे सोळा संस्कार आपल्या वैदिक धर्मात सांगितलेले आहेत. त्याशिवाय सुद्धा अनेक असे संस्कार आहेत की ज्यांचा उल्लेख यामध्ये नाही पण ते केले जातात.
तर हिंदू धर्मातील सोळा संस्कारांची माहिती information of sixteen Sanskars in Hindu religion in marathi या लेखामध्ये हे सोळा संस्कार कुठले आहेत व त्याच्या बद्दल माहिती बघू.

या संस्कारांना षोडश संस्कार असे म्हणतात.
१) गर्भाधान—या संस्काराला ऋतुशांती संस्कार असेही म्हणतात.
लग्न झाल्यानंतर पवित्र वातावरणात मंगलमय मुहूर्तावर स्त्री आणि पुरुषांनी एकत्र येऊन चांगली संतती समाजाला द्यावी हा या संस्कारा मागचा उद्देश आहे.
संस्कार करताना सर्वप्रथम संकल्प केला जातो. त्यानंतर गणपतीपूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, होम, करून दुर्वांचा रस स्त्रियांच्या उजव्या नाकपुडीत सोडला जातो. विवाहानंतर स्त्रीला पहिल्यांदा रजोदर्शन झाल्यानंतर पहिल्या सोळा रात्री हा संस्कार केला जातो. याकरता सुद्धा अनेक नियम वेदांमध्ये सांगितलेले आहे. स्त्री पासून नवीन संतती तयार होते. उत्तम प्रजेची निर्मिती करण्याच्या दृष्टीने स्त्रीवर हे संस्कार केले जातात. या संस्कारा करता मुहूर्त बघितला जातो.
२)पुंसवन संस्कार –गर्भाधान संस्कार झाला की, गर्भधारणा झाली की, लगेच पुंसवन संस्कार केला जातो. गर्भधारणेनंतर तिसऱ्या महिन्यात हा संस्कार केला जातो. शुद्ध एकादशी पासून वद्य पंचमी पर्यंत मधली एखादी रिक्त तिथी सोडून हा संस्कार करता येतो. पुष्य किंवा श्रवण नक्षत्रावर हा संस्कार करता येतो. बुधवार गुरुवार किंवा शुक्रवारी हा संस्कार केला जातो.
३)अनवलोभन संस्कार –गर्भधारणा झाली की हा संस्कार करतात. यामध्ये मुलीच्या हाताने दुर्वांना सहाणेवर वाटले जाते व त्याची गोळी केली जाते. पूर्वेकडे तोंड करून, गर्भवती स्त्रीला बसवल्या जाते व तिच्या मागून एका स्वच्छ वस्त्रातून त्या दुर्वांचा रस तिच्या उजव्या नाकपुडीत जोडला जातो. उजव्या नाकपुडीत पिंगला नाडी असते .बहुतेक कार्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पिंगला नाडी कार्यरत होणे आवश्यक असते.
४)सीमंतोन्नयन संस्कार –या संस्कारामध्ये पति स्त्रीच्या पश्चिम बाजूस पूर्वेकडे तोंड करून उभा राहतो. या संस्काराचा उद्देश असा आहे की एकदा स्त्रीने गर्भधारणा केला की त्या स्त्रीच्या गर्भाचे रक्षण केले जावे. तिचा गर्भपात होऊ नये, याकरता पती तिचा भांग भरतो. उंबराचे घोस, साळी जनावराचे काटे, आणि तीन गर्भाचे कावळे घेऊन स्त्रीचे चार वेळा केस विंचुरून बांधतात.
५) जातक कर्म–या संस्कारांमध्ये बाळाचा जन्म झाल्यावर आई वडील सगळेजण आनंद दर्शवतात व वडील बाळाच्या कानामध्ये मंत्रांचा जप करतात. ज्यातून बाळ जन्माला आल्यावर त्याला सकारात्मक दिशा दाखवण्याचे हे कर्म आहे. बाळाच्या ओठांना मधाचे चाटण लावले जाते.
६)नामकरण संस्कार–जन्म झाल्यापासून मुलाला बाराव्या दिवशी व मुलीला तेराव्या दिवशी पाळण्यात ठेवतात. त्याला नामकरण संस्कार किंवा बारसे असे म्हणतात. हे दिवस शुभ असतात. याच दिवशी हिंदू संस्काराप्रमाणे मुलाचे व मुलीचे कान टोचले जातात. या दिवसाच्या व्यतिरिक्त बारसे करायचे असल्यास शुभवार व तिथी बघितली जाते. यावेळी आधी संकल्प केला जातो. मग गणपती पूजन केले जाते. पुण्याहवाचन मातृकापूजन, नांदी श्राद्ध करून, तांदळाच्या राशीवर बाळाचे नाव लिहिले जाते.
७) सूर्यावलोकन–सोळा संस्कारांपैकी हा सातवा संस्कार आहे.
बालक जन्माला आल्यानंतर ते आपल्या आईसह अंधाऱ्या खोलीमध्येच पूर्वी असायचे. त्यामुळे त्याला सूर्याचे तेज व प्रकाश दाखवण्यासाठी उजेडाचा अनुभव घेण्यासाठी सूर्यदर्शन करवायचे. असा हा या संस्काराचा हेतू आहे.
८)निष्क्रमण–या संस्कारांमध्ये लहान बाळाला चंद्राची ज्योती दाखवली जाते. चंद्राची शीतलता बाळाला दाखवून त्याचे तेज बाळामध्ये यावे असा या संस्काराचा हेतू आहे. या संस्काराद्वारे बाळाला जगाचे दर्शन घडवणे हा देखील हेतू आहे.
९)अन्नप्राशन–सोळा संस्कारांपैकी हा नववा संस्कार आहे. जन्म झाल्यापासून बाराव्या महिन्यात हा संस्कार करतात. देवतांची पूजा केल्यानंतर दही दूध तूप यांनी युक्त असे अन्न बाळाला खाऊ घालतात. यावेळी होम सुद्धा केला जातो. गृह्यसूत्र या ग्रंथामध्ये या संस्काराची माहिती दिलेली आहे. मुलाला अन्नाचा घास भरवून झाला की त्याच्यासमोर वस्त्र, शास्त्र, ग्रंथ अशा अनेक वस्तू ठेवल्या जातात व तो पहिल्यांदा ज्याला स्पर्श करेल तेच तो चरितार्थासाठी वापरेल असा समज आहे. या संस्कारातून बाळाला तेज मिळेल असा हेतू असतो.
१०) वर्धापन–जन्म झाल्यापासून एक सौर वर्ष पूर्ण झाल्यावर बालकाचा वाढदिवस साजरा केला जातो. यालाच वर्धापन दिन असे म्हणतात हा दहावा संस्कार आहे. वर्धापन हा तिथीनुसार साजरा केला जातो. जन्म नक्षत्राच्या दिवशीच हा वाढदिवस साजरा केला जातो.
११) चूडाकर्म–मनुष्याच्या डोक्यावर सहस्त्रार चक्र असते. तिथे शेंडी ठेवून बाकीचे केस काढणे याला चूडा कर्म किंवा चौलकर्म असे म्हणतात चूडा म्हणजे शेंडी. याला मुंडन संस्कार असेही म्हणतात. १,३अथवा५ या वर्षी हा संस्कार करता येतो . जन्म झाल्यावर आईच्या पोटात बाळाचे जे केस उगवलेले असतात ते काढणे म्हणजेच चूडाकर्म. या कर्माच्या वेळी वैदिक मंत्रोच्चार केले जातात. मुलाच्या आयुष्यात बल आणि तेज याची वृद्धी व्हावी म्हणून हा संसार केला जातो. ब्रम्हांडातील सत्व लहरी शेंडीद्वारे शरीरात प्रवेश करून सत्व गुण वाढवणे हा या संस्काराचा उद्देश आहे.
१२)अक्षरारंभ–सोळा संस्कारांपैकी हा बारावा संस्कार आहे. यामध्ये वयाच्या पाचव्या वर्षी बालकाला अक्षर आरंभ करणे शिकविले जाते. योग्य दिवशी व योग्य वारी शुभ तिथीला अक्षर आरंभ करणे सुरुवात केले जाते. गणपती विष्णू लक्ष्मी सरस्वती गुरु व ब्राह्मण यांना वंदना करून सुरुवातीला ओम अक्षर काढले जाते व त्यानंतर बाकीचे अक्षर गिरवले जातात.
१३) उपनयन –16 संस्कारांपैकी हा तेरावा संस्कार आहे. कुमार वयाच्या मुलांसाठी हा संस्कार आहे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या समाजातील मुलांसाठी हा संस्कार सांगितलेला आहे. या संस्कारात मुलाचे केस काढून त्याची शेंडी खेळतात व त्यांना गुरुकुलामध्ये पाठवले जाते. या संस्कारानंतर बालक आपल्या पालकांपासून दूर होऊन गुरूकडे विद्या शिकायला जाते. यज्ञोपवीत धारण करणे हा या संस्काराचा मुख्य भाग मानला जातो. या संस्कारामध्ये बटूला इंद्रिय निग्रह शिकवला जातो. उपनयन अथवा मुंज झालेल्या मुलाला द्विज असे म्हणतात म्हणजेच त्याचा हा दुसरा जन्म मानला जातो. पहिला जन्म आई-वडिलांपासून तर दुसरा जन्म गायत्री मंत्रापासून झाला असे म्हणतात. ब्राह्मणांमध्ये आठव्या वर्षी, क्षत्रियांमध्ये अकराव्या वर्षी, तर वैश्यां मध्ये 12 व्या वर्षी उपनयन केले जाते. उपनयन झाले की त्या कुमाराला गुरु कडे राहूनच शिकावे लागते व ब्रह्मचर्य पाळावे लागते.
१४)समावर्तन–हिंदू धर्मातील हा चौदावा संस्कार आहे. उपनयन झाल्यानंतर म्हणजेच मुंज झाल्यानंतर, याला सोडमुंज असे म्हणतात. पूर्वीच्या काळी गुरुकुलातून बाहेर पडताना सोडमुंज केली जायची. यावेळी गुरूला दक्षिणा दिली जायची. यावेळी गुरु शिष्याला गृहस्थाश्रम संबंधात उपदेश करत असतं.
१५) विवाह —या पंधराव्या संस्कारांमध्ये उपवर वधू आणि वर ब्राह्मण अग्नी आणि नातेवाईक यांच्या साक्षीने विवाहाची गाठ बांधतात. यालाच पाणीग्रहण असे म्हणतात. हे एक सामाजिक बंधन आहे. विवाह हा संतती अथवा वंश पुढे नेण्यासाठी असलेला सामाजिक व कायदेशीर मार्ग आहे. विवाहा मध्ये वधू आणि वर सप्तपदी चालून आपले नाते दृढ करतात. वधु ही वराच्या घरी गृहलक्ष्मी म्हणून प्रवेश करते व वंश पुढे नेते.
१६) अंत्येष्टी –हा सोळा संस्कारांपैकी शेवटचा संस्कार आहे.
माणसाच्या मृत्यूनंतर केले जाणारे दाह कर्म व श्राद्ध करणे याला अंतेष्टी असे म्हणतात. यामध्ये दिवंगता विषयी आस्था व सद्भावना विधीं मधून व्यक्त केल्या जातात. भारतीय तत्त्वज्ञानानुसार शेवटच्या क्षणी व्यक्ती जो विचार करते तोच जन्म त्याला पुढचा मिळतो तसा आपल्या संस्कृतीमध्ये समाज आहे. म्हणून परमेश्वराचे अखंड नामस्मरण करत असावे असे वैदिक संस्कृती सांगते.
हिंदू धर्मातील सोळा संस्कारांची माहिती information of sixteen Sanskars in hindu dharma in marathi हा लेख आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा. त्या करता आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला जरूर भेट द्या. तसेच आपल्या मित्र आणि मैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा व अशाच नवनवीन लेख आणि कथांसाठी आमचे व्हाट्सअप चॅनेल पण जॉईन करा. धन्यवाद!
लेखिका –वैशाली देव (पुणे)
Important information very few know these details.
Very informative and descriptive article 👍
छान माहिती मिळाली 🙏🙏
छान आहे माहिती