International Woman’s Day l आंतरराष्ट्रीय महिला दिन का साजरा केला जातो? 

WhatsApp Group Join Now

International Women’s Day in Marathi: दरवर्षी 8 मार्च हा दिवस आपण ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा करतो पण हा हक्क महिलाना मिळवून देण्यासाठी एका शतकाहून अधिक जुनी परंपरा आहे. कारण या दिवशी महिला दिन नव्हे तर जागतिक स्तरावरील महिला दिन साजरा केला जातो. क्लारा झेटकीन यांनी हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करावा अशी कल्पना आणली. क्लारा झेटकीन या साम्यवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्या आणि महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी ही कल्पना सर्वप्रथम काम किंवा नोकरी करणाऱ्या महिलांच्या परिषदेत कोपेनहेगनमध्ये 1910 साली मांडली होती. या दिवसाचा उगम महिला कामगार चळवळीतून झाला.

जागतिक महिला दिन हा दिवस आज जरी समाजात महिलांचा सत्कार करून साजरा केला जात असला तरी, हा दिवस उजाडण्यामागे एक इतिहास आहे. हा इतिहास नेमका काय? महिला दिन का साजरा केला जातो आणि याचं महत्त्व काय ते समजून घेणं गरजेचे आहे.   

जागतिक महिला दिनाचा इतिहास:-

विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत संपूर्ण जगातील स्त्रियांना मतदानाचा हक्क्च नव्हता, अगदी अमेरिका युरोप यांसारख्या पुढारलेल्या देशातही हीच परिस्थिति होती. पुरुषप्रधान संस्कृतीचे हे एक ठसठशीत उदाहरण आहे. या अन्याया विरुद्ध प्रत्येक  स्त्री ही आपआपल्या परीने संघर्ष करीत होती. अमेरिकेमध्ये १८९० साली मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन’ याची  स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा काही प्रमाणात वर्णद्वेषी आणि स्थलांतराविषयी पूर्वग्रह दूषित असणारी होती. यात स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन तर केले जात होते. १९०७ साली स्टुटगार्ड येथे ही पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.

क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने या परिषदेमध्ये `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे स्त्रियांचे कर्तव्य आहे.’ अशी वाच्यता केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमधील कापड उद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स या  चौकात एकत्र येऊन प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. त्यावेळी महिलांना दहा दहा तास काम करावे लागे, तसेच कामाच्या जागी सुरक्षितताही असणे स्वाभाविक होते. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही केली गेली. क्लारा या स्त्रियांच्या या व्यापक कृतीने अतिशय प्रभावित झाल्या. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून साजरा करावा. हा जो ठराव क्लारा यांनी मांडला, तो पास झाला. या क्रांती नंतर युरोप, अमेरिका सारख्या आणखी काही देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी चळवळी केल्या गेल्या. याचा योग्य परिणाम व्हायचा तो झालाच, म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये  व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.

८ मार्च १९४३ रोजी पहिला महिला दिवस भारतात मुंबई येथे साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ला महिला दिंनासाठी पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. १९७५ साल हे `जागतिक महिला वर्ष’ म्हणून युनोने जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. पुढे परिस्थितीनुसार स्त्रीयांचे सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता सर्वच ठिकाणी म्हणजे बँका, कार्यालये, काही राजकीय मंडळे यांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे. सन १९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने सुद्धा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करावा यासाठी आवाहन केले.

जागतिक महिला दिनाची 8 मार्च हीच तारीख का?

क्लारा झेटकिन यांनी महिला दिनाची संकल्पना मांडली त्यावेळी कोणता दिवस किंवा तारीख ही ठरलेली नव्हतीच. त्यावेळी पहिलं महायुद्ध सुरू होत. याचवेळी रशियन महिलांनी भाकरी आणि शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून संप पुकारला होता. काही दिवसांनी  राजकीय उलथापालथ झाली आणि झार यांना त्यांचं नेते पद सोडव लागले. त्यानंतर जे हंगामी सरकार स्थापन झाले त्यांनी महिलाना मतदानाचा अधिकार बहाल केला.

रशियामध्ये त्यावेळी ज्युलियन कॅलेंडर वापरले जात होते त्या कॅलेंडर नुसार महिलांनी संपाचे शस्त्र हाती घेतले तो दिवस होता 23 फेब्रुवारी आणि ग्रेगोरियन कॅलेंडर नुसार ( जे आपण आता वापरतो ) त्यानुसार ही तारीख होती ८ मार्च होती. त्यामुळेच त्या ऐतिहासिक चळवळीची आठवण म्हणून ८ मार्च या दिवशीच जागतिक महिला दिन साजरा केला जातो.

महिला दिन कशा प्रकारे साजरा केला जातो?  

रशिया आणि रशियासारखीच इतर अनेक देशात जागतिक महिला दिनी राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली जाते. रशियामध्ये या दिवशी फुलांची विक्री दुप्पट प्रमाणात होते.

भारताच्या बाजूचा चीन, चीनमध्ये जागतिक महिला दिनी हाफ दे दिला जातो. इटली मध्ये या दिवसाला ‘फेसटा डेला डोना” असे संबोधले जाते. या दिवशी महिलाना पिवळ्या रंगाची मिमोसची फुले दिली जातात. आता याची सुरुवात नक्की कधी झाली हे सांगता येणार नसले तरी दुसर्‍या महायुद्धांनंतर याची सुरुवात रोममध्ये सुरू झाली.

अमेरिकेत म्हणजेच युएसए मध्ये मात्र संपूर्ण मार्च महिना हा महिलांसाठी खास असतो तो “महिलांच्या इतिहासाचा दिवस” म्हणून साजरा केला जातो. अमेरिकन महिलांना या दिवशी राष्ट्राध्यक्षांकडून सम्मानीत केले जाते.

भारतात मात्र एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. भारतात महिलांच्या हक्कांना मूर्त स्वरूप देण्याचे मौल्यवान आणि धडाडीचे काम हे स्वातंत्र्य पूर्व काळापासून सरोजिनी नायडू यांनी केले आहे. सरोजिनी नायडू या राजकीय कार्यकर्त्या तर होत्याच तसेच भारताच्या स्वातंत्र्यानंतर संयुक्त प्रांताच्या त्या पहिल्या राज्यपाल होत्या. यांनी आपल्या वक्तृत्व कौशल्याचा आणि कवितांचा उपयोग हा महिलांच्या हक्कांना चालना देण्यासाठी केला. महिलांच्या हक्कासाठी वेळोवेळी त्यांनी जे योगादान दिले त्यामुळे सरोजिनी नायडू यांचा जन्म दिवस १३ फेब्रुवारी या दिवशी भारतात महिला दिन म्हणूनही साजरा केला जातो.

महिला दिनाची गरज काय?

बाविसाव्या शतकातही महिला आपल्या  हक्कांसाठी लढताना दिसत आहेत. आपल्याला माहिती  आहेच की सध्या अफगाणिस्तान, इराण, युक्रेन येथे युद्धजन्य परिस्थिति आहे. तालिबानच्या कारवाया या संपूर्ण जगाला माहिती आहेत. आणि हेच तालिबान आता अफगाणिस्थांनमध्ये पुन्हा सत्तेत आले आहे. या तालिबान्यांमुळे महिलांच्या हक्कांवर  एक प्रकारची बाधा आली आहे. तेथील महिला या शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेऊ शकत नाहीत. एकट्या दुकटया प्रवास करू शकत नाहीत. घराबाहेर पडताना त्यांना आपला चेहरा झाकून घ्यावा लागतो. तसे न केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाते. एवढेच कारण  नसून महिलांना पैसे कमविण्यापासून रोखले जात आहे. त्या शेती किंवा तत्सम घरातील उद्योगधंदे करूनही त्या कमवू शकत  नाही. त्यांच्या स्वकमाईलाही चाप बसविला आहे. यूएन ने अफगाणिस्थांनला मानसिक आरोग्य संकटाचा ईशारा दिला आहे.International Women’s Day in Marathi

येमेन आणि सिरिया मध्ये सुद्धा अशाच प्रकारचा दहशतवाद चालला आहे. यामुळे  हे देश सध्या निराशेच्या गर्तेत सापडले आहेत.

इराण मध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात हीच परिस्थिति आहे. इराणमध्ये हिजाब वरून वाद सुरू आहे. हिजाब हे काय प्रकरण आहे? तर शमसुद्दीन तांबोळी यांनी एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिले आहे ही “हिजाब” म्हणजे फक्त आपले डोके झाकणे. एवढाच अर्थ आहे. मेहसा अमिनी या महिलेने हिजाब व्यवस्थित घातला नव्हता म्हणून तिला पोलिसांनी अटक केली. नंतर तिचा मृत्यू झाला. आता इराण आणि त्यांचे पोलिस हे याची काहीही कारणे देवोत. पण मुद्दा हाच आहे की अजूनही महिलांना त्यांचे हक्क मिळत  नाही आहेत.

आपण जरा भारतातील महिलांच्या हक्कांविषयी लक्षं देण्याची गरज आहे.

मणीपुर मध्ये झालेल्या दोन गटांच्या हिंसाचारात दोन महिलांना *वि*व*स्त्र* करून त्यांची रस्त्यावर धिंड काढली गेली. त्यानंतर त्यांच्यावर सामूहिक ब*ल*त्का*र* केला गेला. ही अगदी आता आता घडलेली घटना आहे. अशा प्रकारच्या घटना या कमकुवत मानसिकता दर्शवितात. एखाद्या क्षुल्लक गोष्टीसाठी स्त्रियांचा अपमान करून बदला घेतला गेला. सुप्रीम कोर्टानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

तीच गोष्ट बिलकीस बानो या प्रकरणी सुद्धा झाली होती. पण सुप्रीम कोर्टाने यात दखल घेऊन योग्य  निर्णय दिला गेला. काही ठिकाणी महिलांना लिहिण्यावाचण्याचे साधे शिक्षण ही मिळू शकत  नाही तिथे तिच्या हक्काविषयी कोण बोलणार? म्हणजे फक्त जागतिक महिला दिन साजरा करताना या गोष्टींकडे ही लक्ष देणे गरजेचे आहे. एक मुलगी वाढवताना तिच्या आई वडिलांना तिचे संरक्षण कुठे कुठे आणि कुठपर्यंत करणे गरजेचे आहे? आणि ही परिस्थिति बदलली पाहिजे की नाही? या बद्दल अजूनही महिला सुरक्षित नाहीत असाच अर्थ होतो ना? त्यासाठी अशा कुठल्या उपाययोजना करणे गरजेचे आहे? पोलिस यंत्रणा या बाबत महिलांना मदत करण्यास सक्षम आहे का? कारण मणीपुरमध्ये झालेल्या हिंसाचारात तर पोलिस अधिकारीही सामील होते.

तुम्हाला “आंतरराष्ट्रीय महिला दिन” International Women’s Day ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. तुम्हाला ही माहिती आवडली का? हा लेख कसा वाटला? तेही कमेन्ट बॉक्स मध्ये कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhaApp ग्रुप हि जॉईन करा.

12 thoughts on “International Woman’s Day l आंतरराष्ट्रीय महिला दिन का साजरा केला जातो? ”

  1. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
    लेख छान आहे पण मध्येच International women’s day in Marathi असे का लिहिले आहे?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top