मुलाखत आणि मुलाखतीचे प्रकार | What is an Interview and Types of Interview

WhatsApp Group Join Now

मुलाखत म्हणजे काय ? मुलाखतीचे प्रकार कोणते ?

What is an Interview ? Types of Interview in Marathi 

प्रत्येकाच्या शालेय आणि कॉलेज विश्वाची सांगता झाली की सुरुवात होते ती नोकरीच्या संधी शोधण्याची. वर्षानुवर्षे झाली तरी इंटरव्ह्यूच्या चक्रव्यूहातून बाहेर पडल्याशिवाय नोकरीचे जग अनुभवता येत नाही. आजच्या या लेखामधून इंटरव्यू म्हणजे काय ? इंटरव्यू किती प्रकारे घेतला जातो याची माहिती जाणून घेऊ !

अ . मुलाखत म्हणजे नेमके काय ? नोकरीसाठी मुलाखतीचे महत्व : 

( what is interview in marathi ; importance of interview in marathi )

  • नोकरी मिळवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या या मुलाखती चे काळाप्रमाणे बदलते स्वरूप पाहायला मिळते.मुलखाती मध्ये एक प्रश्न विचारणारा आणि दुसरा उत्तर देणारा असतो.
  • साधारण या प्रश्नोत्तराच्या एकूण सत्रामध्ये तुमच्या उत्तरामुळे मुलाखत घेणाऱ्याला अपेक्षेप्रमाणे समाधानकारक उत्तरे मिळाली तर नोकरी मिळण्याची शक्यता वाढते.
  • त्यामुळे मुलाखतीचा सराव आणि कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा अभ्यास करणे गरजेचे ठरते. 
  • मुलाखत द्यायला आलेला उमेदवार नोकरीच्या पदावर घेण्यासाठी किती पात्र आहे, विशिष्ट पदावर काम करण्यासाठी त्याच्याकडे आवश्यक ती पात्रता, गुण, क्षमता आहे की नाही हे पडताळले जाते. 
  • त्यामुळे मुलाखत म्हणजे नोकरी मिळवण्यासाठीचा पहिला दरवाजा आहे असं म्हणता येईल. 

ब. मुलाखतीचे प्रकार : ( types of interview in marathi )

  1. वन ऑन वन / फॉर्मल इंटरव्यू : (one on one interview in marathi )
  • यात मुलाखत घेणारा आणि उमेदवार हे समोरासमोर बसून मुलाखतीची प्रथम फेरी, दुसरी फेरी आणि तिसरी फेरी अशी टप्प्या टप्प्याने मुलाखत घेतली जाते.
  • मॅनेजर, टेक्निकल मॅनेजर , एच आर या सर्व फेरी मधून मुलाखत घेतली जाते. 
  • यात बऱ्याच वेळा काही ठराविक प्रश्नावली विचारली जाते ज्यात तुमचे शिक्षण, आवड , तुमच्यातील सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी , आधीच्या नोकरीतील अनुभव या गोष्टी विचारल्या जातात.
  1. टेक्निकल इंटरव्यू : ( technical interview )
  • टेक्निकल इंटरव्यू मध्ये तुम्ही नोकरीच्या ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदाशी निगडीत तांत्रिक गोष्टींची तुम्हाला किती जाण आहे, तुम्ही त्या पदासाठी किती योग्य आहे.हे यात बघितले जाते. 
  • तुमच्या क्षेत्रामध्ये तुमचा अनुभव किती आहे, तुमच्या कडे आवश्यक ते गुण आणि कौशल्य  (skill ) आहे का या सर्व गोष्टीचा टेक्निकल इंटरव्यू  मध्ये समावेश असतो. 
  1. सिचवेशनल / स्ट्रेस इंटरव्यू : ( situational/ stress interview in marathi )
  • अशा  प्रकारच्या इंटरव्यू मध्ये उमेदवाराला एखाद्या परिस्थितीची कल्पना करायला सांगतात आणि अशा परिस्थितीत तुम्ही असल्यास तुम्ही कसे सामोरे गेले असता हे विचारतात. 
  • यामुळे उमेदवाराची विचार करण्याची पद्धत, त्याचा दृष्टिकोण, निर्णयक्षमता अशा गुणाचा परिचय होतो.
  • सकारात्मक विचार (positive thinking ) आणि दृष्टिकोण ठेवल्यास कोणत्याही परिस्थिती वर मात करत येते यातून हे दिसून येते. नोकरीमध्ये येणारे प्रसंग आणि त्याला सामोरे जाण्याची क्षमता यातून तपासली जाते. 
  •  स्ट्रेस इंटरव्यू मध्ये देखील तुम्हाला मुद्दाम एखादी अवघड परिस्थिती सांगून अशा द्विधा मनस्थितीत तुम्ही कसे निर्णय घेतात , कंपनीच्या हिताचे आहे का ? स्वतः चा आणि कंपनीचा फायदा तोटा याच किती विचार करता या सर्व गोष्टी बघितल्या जातात.  
  1. टेलिफोन / विडिओ  इंटरव्यू : ( telephone / video interview in marathi )
  • यात उमेदवाराला टेलिफोन वरून किंवा विडिओ वरून मुलाखत घेतली जाते. याचा सर्वात जास्त उपयोग कोविड मध्ये झाला.
  • यात उमेदवाराला अधिक लक्षपूर्वक मुलाखत देणे गरजेचे असते. कारण तुमचे विचार योग्य शब्दात मांडून समोरच्यापर्यंत पोहोचवणे गरजेचे असते.
  • कमीतकमी शब्दात तुमचे म्हणणे योग्य प्रकारे मांडणे हे देखील जमणे आवश्यक असते.शब्दांचा योग्य वापर, मुद्देसूद बोलणे गरजेचे असते. 
  • तुमचा आवाज (clear voice ), स्पष्ट उच्चार, आवाजातील चढ-उतार ( vioce modulation )  यावर समोरच्याचे लक्ष असणार तेव्हा या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आत्मविश्वासाने बोलणे महत्वाचे ठरते.
  •  विडिओ इंटरव्यू मध्ये उमेदवारांना विडिओ कॉन्फरन्स द्वारे प्रश्न विचारली जातात. उच्च अधिकारी वेळेअभावी इच्छित स्थळी येऊ शकत नसल्यास हा पर्याय उपयुक्त ठरतो.
  • यात देखील तुमचे शिष्टाचार ( manners ,eticates ) तपासले जातात. तुमचे दिसणे, वागणे, बोलणे यावर अधिकाऱ्यांचे लक्ष असते. 

मुलाखतीचे प्रकार आपण वर बघितले आता मुलाखतीचे स्वरूप कसे असू शकते ते आपण पाहूया . 

क. मुलाखतीचे स्वरूप ( Format of Interview )

  1. वैयक्तिक मुलाखत / वन ऑन वन / फॉर्मल इंटरव्यू : ( personal interview in marathi )
  • यात मुलाखत घेणारा आणि उमेदवार हे समोरासमोर बसून मुलाखतीची प्रथम फेरी, दुसरी फेरी आणि तिसरी फेरी अशी टप्प्या टप्प्याने मुलाखत घेतली जाते.
  • मॅनेजर, टेक्निकल मॅनेजर , एच आर या सर्व फेरी मधून मुलाखत घेतली जाते.
  1. पॅनल इंटरव्यू : ( panel interview in marathi ) 
  • यात मुलाखत घेणारे एकापेक्षा जास्त व्यक्ती असतात. यामध्ये उत्तर देताना अधिक सतर्कता गरजेची असते. 
  • समोर बसलेले अधिकारी विविध प्रकारची प्रश्न विचारून तुमच्यातील उत्तर देण्याची क्षमता, देहबोली, आत्मविश्वास, परिस्थिती ला हाताळण्याची पद्धत या सगळ्यावर नजर ठेवून असतात. 
  • जो अधिकारी प्रश्न विचारतो त्याच्याकडे आत्मविश्वासाने समर्पक उत्तर देणे आवश्यक असते. 
  • ऑफिस कल्चर मध्ये शिष्टाचाराचे ( manners ,etiquette ) महत्व आहे .तेव्हा योग्य रीतीने शिष्टाचाराचे पालन केले जाते का हे तपासले जाते.
  1. ग्रुप इंटरव्यू : ( group interview in marathi )
  • ग्रुप इंटरव्यू मध्ये एकत्रित रित्या उमेदवार चर्चेसाठी जमतात. एखादा ज्वलंत विषय दिल्यावर त्यावर तुमचे वाचन , ज्ञान , पुढाकार घेण्याची क्षमता , टीम मध्ये काम करण्याची कला ( teamwork ) या सर्व गोष्टी दिसून येतात. 
  • एखादे कार्य सोपवून तुमची निर्णय क्षमता ( decision making ) , मानसिक दबावाखाली काम करण्याची वृत्ती ( performance under pressure ) या सारखी कौशल्य तुमच्याकडे आहे का , गरज पडल्यास याचा वापर तुम्ही कसा करता हे  तपासून नोकरीतील दाबाबदरी चे काम सोपवताना या महत्वाच्या गोष्टींचा विचार केला जातो. 
  1. कॉप्युटर असिस्टेड इंटरव्यू : ( computer assisted interview in marathi )
  • आजकालच्या AI च्या जमान्यात प्रत्येकाला आय टी ( I T ) , टेकनॉलॉजि, त्याचा वापर कसा करावा, दैनंदिन कामकाजात व्यवहार कसे करावे, त्यामुळे वेळ आणि पैसे वाचतो. कामा मधील चुका कमी होतात.
  • मोठ्या प्रमाणात डेटा ,इन्फॉर्मशन सोप्या पद्धतीने कॉप्युटर वर टाकता येणे, त्याचे व्यवस्थापन करता येणे अशा नोकरी संबंधी जर अपेक्षा असतील तर उमेदवाराने हे आधीच याचा याचा सराव करणे गरजेचे असते. 
  • त्यामुळे कॉप्युटर असिस्टेड इंटरव्यू म्हणजे तुम्ही किती अपडेट आहेत आणि किती सहजपणे तुम्ही कॉम्पुटर आणि त्यासंबंधी गोष्टी हाताळू शकता हे अशा प्रकारच्या इंटरव्यू मध्ये पहिले जाते.
  • यासाठी तुम्हाला नवीन येणाऱ्या तंत्रज्ञानाला आपलेसे करणे गरजेचे आहे. मुलाखतीच्या आधी या सर्व गोष्टींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. 

ड. मुलाखती साठी जाताना “ या” छोट्या पण महत्वाच्या गोष्टी चे पालन करणे गरजचे असते. 

  • मुलाखती साठी तयारी करणे आणि आत्मविश्वासाने त्याला सामोरे जाणे ही पहिली पायरी आहे.
  • तुम्ही काय पेहराव करता इथपासून ते तुमच्या बोलण्याची पद्धत बघितली जाते.  
  • नजरेला नजर देऊन आत्मविश्वासाने बोलणे, हॅन्ड शेक करताना न घाबरता कॉन्फिडन्टली हसून बोलणे हे सर्व अपेक्षित असते. 
  • पेहराव अति भडक नसणे,केस नीट असणे, गोंधळलेल्या स्थितीत नसून उठावदार व्यक्तिमत्व ठेवणे. 
  • अति जोरात किंवा अति हळू आवाजात बोलणे टाळावे. 
  • अवश्य ती कागदपत्रे फिले करून ठेवल्यास वेळेवर सापडायला मदत होते आणि अधिकाऱ्यांसमोर नामुष्की ओढण्यापासून वाचते. 
  • अशा छोट्या पण अति महत्वाच्या गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते.  

तुमच्या मधील कलागुण, कौशल्य दाखवण्याची ही उत्तम संधी असू शकते. जेणेकरून तुमच्या करिअर ची सुरुवात मनाप्रमाणे होऊन भविष्यात उत्तरोत्तर प्रगती होत जावी. 

नोकरीसाठी तयारी करणाऱ्या प्रत्येकाला आणि “लेखकमित्र ” च्या वाचकांना अनेक शुभेच्छा !

असेच माहितीपर लेख आणि कथा वाचण्यासाठी “लेखकमित्र ” ला भेट द्या आणि व्हाट्स अँप चॅनेल ला जॉईन करा. 

धन्यवाद !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top