Janmashtami 2024 : श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव, गोपाळकला आणि दहीहंडीच्या खास परंपरा
भारतभर आणि इतर देशांमध्येही उत्साहात साजरा केला जाणारा एक सुंदर सण म्हणजे कृष्ण जन्माष्टमी. हा शब्द ‘जन्म’ आणि ‘अष्टमी’ या दोन शब्दांपासून बनला आहे. ‘जन्म’ म्हणजे जन्म होणे आणि ‘अष्टमी’ म्हणजे महिन्यातील आठवा दिवस. यालाच कृष्णष्टमी, जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात.
कृष्ण जन्माष्टमी हा दरवर्षी साजरा होणारा हिंदू सण आहे. काही हिंदू धर्मग्रंथांनुसार असे मानले जाते की कृष्ण हे सर्वोच्च देवता आहेत आणि ते सर्व अवतारांचे स्रोत आहेत. वैदिक दिनदर्शिकेनुसार हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी साजरा केला जातो.
यावर्षी म्हणजे २०२४ मध्ये कृष्ण जन्माष्टमी २६ ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे.. या दिवशी देशभरातील भाविक विविध धार्मिक विधी, उपवास आणि उत्सवांच्या माध्यमात हा सण साजरा करतात. मथुरा, वृंदावन आणि द्वारका यांसारख्या पवित्र स्थळांवर हा सण विशेष उत्साहात साजरा केला जातो.
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा इतिहास: एक संक्षिप्त माहिती
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा हा भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक आहे. हा सण भगवान विष्णूंच्या आठव्या अवतार असलेल्या मानले जाते. त्यांचा जन्म मथुरेत कंसाच्या अत्याचारापासून मुक्ती मिळवण्यासाठी झाला होता.
श्रीकृष्णाच्या जन्माची कथा
पुराणांनुसार, भगवान विष्णूने अधर्माचा नाश करण्यासाठी श्रीकृष्ण या अवताराने जन्म घेतला होता. कंस हा मथुराचा राजा होता. त्याने आपल्या बहिणी देवकी आणि तिच्या पती वासुदेव यांना कैद करून ठेवले होते. कारण एका भविष्यवाण्यानुसार, देवकीचा आठवा मुलगा कंसचा अंत करेल. त्याच्या कारागृहात श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता. आणि तो जन्म झाला होता श्रावण महिन्यात, अष्टमी तिथीला, मध्यरात्रीच्या वेळी. म्हणूनच या दिवशी आपण सर्वजण खूप आनंदाने जन्माष्टमी साजरी करतो.
मथुरेतून गोकुळला येण्याची कहाणी:
श्रीकृष्णाच्या जन्मानंतर, वसुदेवाने बालकृष्णाला टोपलीत ठेवून यमुना नदी ओलांडली. त्या रात्री मुसळधार पाऊस पडत होता, पण वसुदेवाने निर्धाराने बालकृष्णाला गोकुळातील नंद आणि यशोदाच्या घरात पोहोचवले. वासुदेव यांनी कृष्णाला त्यांची मुलगी योगमाया यांच्याशी बदलले आणि योगमायाला टोपली घेऊन मथुरेला परतले . योगमाया ही यशोदा आणि नंदगोपाळांची मुलगी होती. कंसला असे वाटले की योगमायाच त्याचा अंत करणारी आहे. त्याने तिला मारण्याचा प्रयत्न केला. पण योगमाया देवी होती. ती कंसच्या हातातून सुटली आणि दुर्गेच्या रूपात बदलली. तिने कंसला सांगितले की जो तेचा अंत करणार होता तो जन्माला आला आहे. त्यानंतर ती मथुरेच्या कारागृहातून अदृश्य झाली.
कृष्णाच्या बाललीला
कृष्णांच्या बालपणाच्या काळातील अनेक लीला आजही लोकांच्या ओठावर आहेत. गोकुळात वाढताना त्यांनी अनेक चमत्कारिक कृती केल्या. त्यांच्या या लीलांमुळेच त्यांना ‘मक्खन चोर’ असेही नाव मिळाले.
कृष्ण लहानपणापासूनच बुद्धिमान आणि शक्तिशाली होते. ते गायींचे पालन करत असत आणि त्यांच्या गोपाला मित्रांसोबत खेळत असत. त्यांनी राक्षसांचा वध करून गोकुळातील लोकांचे रक्षण केले. त्यांच्या लीलांमध्ये काळिया सर्पाला जखडणे, पुतना राक्षसीचा वध करणे, आणि बांसुरीच्या माधुर्यपूर्ण ध्वनीने गोपिकांना मोहित करणे हे विशेष उल्लेखनीय आहे.
गोवर्धन पर्वताची कथा देखील खूप प्रसिद्ध आहे. इंद्रदेवाच्या कोपामुळे जोरदार पाऊस पडत होता, तेव्हा कृष्णाने आपल्या लहान अंगठ्याने गोवर्धन पर्वत उचलून सर्व गावकऱ्यांना संरक्षण दिले. त्यांच्या या अद्भुत लीलांनी सर्वांना त्यांच्या दिव्यतेची अनुभूती दिली आणि गोकुळवासीयांच्या जीवनात आनंद, प्रेम, आणि भक्तीचा संदेश दिला.
गोकुळाष्टमी उत्सव साजरा करण्याची पद्धत
गोकुळाष्टमी हा सण भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या परंपरांनी मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावनेने साजरा केला जातो. श्रीकृष्ण यांचा जन्म मध्यरात्री झळाल्यामुळे लोक रात्रभर जागरण करून पुजा – अर्चना करतात. गोकुळाष्टमी साजरी करण्याच्या काही प्रमुख पद्धती खालीलप्रमाणे आहेत:
व्रत आणि उपवास
गोकुळाष्टमीच्या दिवशी व्रत आणि उपवास करण्याची परंपरा आहे. भक्तगण या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करतात आणि मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करून उपवास सोडतात. उपवासामुळे आत्मशुद्धी होते आणि श्रीकृष्णाच्या प्रति भक्ती व्यक्त केली जाते. हा दिवस आध्यात्मिक साधनेचा आणि आत्मनिरीक्षणाचा असतो.
मंदिरांत भक्तिमय पूजा आणि अभिषेक:
गोकुळाष्टमीच्या दिवशी मंदिरांमध्ये विशेष पूजा आणि अभिषेक आयोजित केले जातात. श्रीकृष्णाच्या मूर्तीला दूध, दही, मध, आणि घृताने अभिषेक केले जाते. या पूजेत भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि मंत्रोच्चार करून श्रीकृष्णाच्या चरणी भक्ती अर्पण करतात. या पूजांमध्ये भक्तिमय वातावरण तयार होते आणि सर्व भक्तगण भक्तीमध्ये तल्लीन होतात.
सांस्कृतिक कार्यक्रम आणि कीर्तन:
गोकुळाष्टमीच्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामध्ये बालकृष्णाची माखन चोरीची लीला, गोवर्धन पर्वत उचलण्याची कथा, आणि अन्य कृष्ण लीला रंगमंचावर सादर केल्या जातात. यासोबतच, मंदिरात कीर्तनाचे आणि भगवद्गीता पाठ ही आयोजन केले जाते, जिथे भक्तगण भजन, कीर्तन आणि गीतांमधून श्रीकृष्णाची स्तुती करतात. या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे सर्वांना श्रीकृष्णाच्या लीलांचा अनुभव घेता येतो आणि त्यांच्याप्रती भक्ती वाढते.
बाळ कृष्णासाठी पालणा सजवणे
गोकुळाष्टमीच्या निमित्ताने बाळकृष्णाची मूर्ती पालण्यात ठेवून त्याची पूजा करणे एक खास परंपरा आहे. साधारणपणे बाळकृष्णाच्या क्रिडामय मूर्तीला पालण्यात ठेवून झुलवण्याची पद्धत आहे, जी बाळाच्या जन्माच्या आनंददायी क्षणाची पुनरावृत्ती करते.
या दिवशी बाळकृष्णाची मूर्ती पालण्यात ठेवण्याआधी पालणाला सजवण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. पालण सजवण्यासाठी ताज्या किंवा कृत्रिम फुलांच्या माळांचा वापर केला जातो, ज्यामुळे पालण अधिक आकर्षक आणि रंगीत दिसतो. पालण्यात मऊ गादी ठेवली जाते आणि त्यावर दोन गोल उश्या ठेवल्या जातात, ज्यामुळे बाळकृष्णासाठी आरामदायक जागा तयार होते. पालण्याच्या आजूबाजूला रंगीत रांगोळी काढून त्याचे सौंदर्य वाढवले जाते.
बाळकृष्णाच्या मूर्तीला मोर मुकुट घालून आणि तुळशीची माळ परिधान करून सजवले जाते. मोर मुकुट श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक आहे, तर तुळशीची माळ हिंदू धर्मात पवित्र मानली जाते. या सजावटीमुळे बाळकृष्णाच्या मूर्तीला अधिक पवित्र आणि आकर्षक स्वरूप मिळते.
गोकुळाष्टमी हा सण भक्ती, आनंद, आणि एकात्मतेचा उत्सव आहे. या दिवशी उपवास, पूजा, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून श्रीकृष्णाच्या जन्माचा आनंद साजरा केला जातो.
गोपाळकाला
गोपालकाला हा कृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवात, विशेषतः दहीहंडीच्या निमित्ताने बनवला जाणारा एक पारंपरिक प्रसाद आहे. २०२४ मध्ये गोपालकालाचा उत्सव २७ ऑगस्ट रोजी साजरा होईल. हा उत्सव श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी साजरा होतो. हा दिवस कृष्ण जन्माष्टमीनंतर येतो.
गोपाल म्हणजे गायींचा पालन करणारा, आणि काला म्हणजे विविध गोष्टी एकत्र मिसळणे. पोहे, ज्वारीच्या आणि धानाच्या लाह्या, लोणचे, दही, ताक, भिजवलेली चणाडाळ, साखर, आणि फळांच्या तुकड्यांनी बनवलेला हा पदार्थ आहे. असे म्हणतात की हा पदार्थ श्रीकृष्णाला अतिशय आवडत होता. श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसह यमुनेच्या काठावर हा पदार्थ तयार करून एकत्रितपणे खात असे, अशी कथा आहे.
घरी गोपाळकाला कसा बनवायचा-
या रेसिपीसाठी तुम्हाला एक वाटी धानाच्या लाह्या, एक वाटी ज्वारीच्या लाह्या, एक वाटी जाड पोहे, एक काकडी, दोन ते तीन हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा किसलेलं आलं, एक चमचा लिंबाचा रस, दोन चमचे बेदाणे, ५० ग्रॅम दही, ५० ग्रॅम भाजलेले डाळे, एक चमचा लिंबाचे गोड लोणचे, एक चमचा आंब्याचे गोड लोणचे, एक चमचा साखर, चवीनुसार मीठ, चिरलेली कोथिंबीर आणि दोन चमचे डाळिंबाचे दाणे लागतील.
सर्व साहित्य एकत्र करून त्यात डाळिंबाचे दाणे आणि कोथिंबीर वरून घालावी. गोपाळकाला ही एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन रेसिपी आहे, जी प्रत्येक घरात प्रसाद म्हणून खास बनवली जाते. दहीहंडीच्या आतही हाच रुचकर पदार्थ भरला जातो.
गोपालकाला हा केवळ एक स्वादिष्ट पदार्थ नसून त्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. हा पदार्थ कृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे या दिवशी गोपालकाला खाणे ही एक परंपरा बनली आहे. याशिवाय, गोपालकाला हे एक पौष्टिक पदार्थ असून, त्यात वापरलेले पदार्थ आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत.
दहीहंडी
दहीहंडी हा उत्सव श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे कृष्ण पक्षाच्या नवमीला साजरा केला जातो. यालाच ‘गोपालकाला’ असेही म्हणतात. दहीहंडी हा उत्सव प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा येथे साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये दहीहंडीचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
या दिवशी शहरातील विविध भागात दहीहंडी स्पर्धाही आयोजित केल्या जातात आणि हा स्पर्धेसाठी लाखो रुपयांची बक्षिसे ही ठेवली जातात, ज्यामुळे स्पर्धकांचा उत्साह अधिकच वाढतो. दहीहंडी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अनेक लोक एकत्र जमतात.
दहीहंडी का साजरी केली जाते?
दहीहंडी हा उत्सव खरंतर श्रीकृष्णाच्या बाललीलांशी जोडला गेला आहे. पौराणिक कथेनुसार, बालकृष्णाला दही, लोणी खूप आवडायचे. त्यामुळे तो आपल्या मित्रांसोबत गोकुळातील घरांतून दही, लोणी चोरत असे. त्या काळात लोकांनी दही, लोणी वाचवण्यासाठी ते उंचावर लटकवले. त्यामुळे कृष्ण आणि त्याचे मित्र त्यांना मिळवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असत. यावरूनच दहीहंडीची परंपरा सुरू झाली.
हा उत्सव बालकृष्णाच्या चंचलतेचे आणि त्याच्या मित्रांच्या एकतेचे प्रतिक आहे. यातून तरुणांमध्ये धाडस, शारीरिक क्षमता आणि संघर्षात्मक भावना वाढते. तसेच हा उत्सव एकाच वेळी अनेक लोकांना एकत्र आणतो, त्यामुळे सामाजिक बंधनातही वाढ होते.
दहीहंडी कशी साजरी केली जाते?
या उत्सवात एक मातीची हंडी उंचावर लटकवली जाते आणि त्यात दही आणि साखर भरली जाते. या हंडीला फोडण्यासाठी तरुण मुले एकमेकांच्या पाठीवर चढून एक मानवी पिरॅमिड तयार करतात. या पिरॅमिडला ‘गोविंदा पाथक’ असे म्हणतात. या पाथकातील सर्वात वरच्या गोविंदा या हंडीला फोडण्यासाठी तरुण मुले एकमेकांच्या पाठीवर चढून एक मानवी पिरॅमिड तयार करतात. या पिरॅमिडला ‘गोविंदा पाथक’ असे म्हणतात. या पाथकातील सर्वात वरच्या गोविंदालाच हंडी फोडण्याची जबाबदारी असते. हा एक धाडसी आणि कठीण काम आहे.
या पिरॅमिड तयार करण्यासाठी खूप मेहनत आणि समन्वय लागते. खालच्या स्तरावर मजबूत मुले असतात. त्यांच्यावर दुसरे स्तर, मग तिसरे असे करत सर्वात वरचा माणूस पोहोचतो. हे करण्यासाठी खूप धाडस आणि शारीरिक क्षमता लागते.
पूर्वी फक्त मुलेच दहीहंडीमध्ये भाग घेत असत. पण काही वर्षांपूर्वी मुलींनीही या क्षेत्रात पाऊल ठेवले. आता मुलींचेही गोविंदा पाथक आहेत. त्यांनीही मुलांसारखेच धाडस दाखवून हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात.
गोविंदा पाथकातील मुले दहीहंडी फोडण्यासाठी खूप उत्साही असतात. मुली किंवा गोपिकांनी त्यांच्यावर पाणी टाकतात. यामुळे हंडी फोडणं कठीण होतं. पण गोविंदा पाथक हार मानत नाहीत. ते पुन्हा पिरॅमिड बनवून प्रयत्न करतात. सर्वत्र ‘गोविंदा आला रे’ चा जल्लोष असतो.
दहीहंडी हा केवळ एक खेळ नाही तर एक उत्सव आहे. यातून मैत्री, एकता आणि सहकार्य वाढते. लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात आणि या दिवशी सर्वत्र उत्साह आणि धमाल असते.
निष्कर्ष
श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला हे सण भक्तिभाव, आनंद, आणि उत्साहाने श्रीकृष्णाच्या लीलांच्या स्मरणार्थ साजरे केले जातात. श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध घटनांची आठवण करून देणारे हे सण आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. या सणांच्या माध्यमातून आपण आपली संस्कृती आणि परंपरा जपावी आणि आपल्या आगामी पिढ्यांना या सणांची महत्त्वकता सांगावी. जन्माष्टमी, गोपाळकाला आणि दहीहंडी आपल्या जीवनातील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांची जाणीव करून देणारे एक सण आहे. त्यामुळे या सणांचा आनंद आपल्या कुटुंबासोबत घ्यावा आणि भक्तिभावाने श्रीकृष्णाची आराधना करावी.
तुम्हाला “ Janmashtami 2024 : श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव, गोपाळकला आणि दहीहंडीच्या खास परंपरा ” या बद्दलची माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
लेखिका – अश्विनी ढंगे, इचलकरंजी