Jyanpith purskar Maharshtra:भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराची नुकतीच घोषणा झाली 2023 चा ज्ञानपीठ पुरस्कार हा प्रख्यात कवी गुलजार आणि महापंडित जगद्गुरु रामभद्राचार्य यांना मिळाला. साहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान यासाठी या दोन दिग्गज व्यक्तींना यावर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. यावर्षी ज्ञानपीठ पुरस्कारांसाठी उर्दू आणि संस्कृत भाषेतील दोन मान्यवरांची निवड करण्यात आली. याआधी 2022 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार गोव्यातील लेखक दामोदर मावजी यांना देण्यात आला होता .यावर्षीचा हा 58 वा ज्ञानपीठ पुरस्कार आहे.
ज्ञानपीठ विजेते गीतकार गुलजार यांचा परिचय-
कवी गीतकार गुलजार सर्व परिचित आहेतच. आपल्या खास शब्दशैलीसाठी प्रसिद्ध असणारे गीतकार गुलजार हे एक कवी, लेखक, दिग्दर्शक आणि चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत. याआधीही गीतकार गुलजार यांना विविध पाच राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. साहित्य क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना 2002 मध्ये दुवा या कथासंग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता, त्यानंतर 2004 मध्ये त्यांना पद्मभूषण हा राष्ट्रीय सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले होते व 2013 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके हा पुरस्कार देखील मिळाला आहे , तसेच गीतकार गुलजार यांना “स्लॅमडॉग मिलेनियर” या चित्रपटातील जय हो या गीताचा लिखाणासाठी ऑस्कर पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. तसेच गीतकार गुलजार यांना चित्रपट क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी फिल्मफेअर या पुरस्काराने अनेकदा सन्मानित करण्यात आले आहे.
महापंडित जगद्गुरु रामभद्राचार्य यांचा परिचय-
यावर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले जगद्गुरु रामभद्राचार्य हे उत्तर प्रदेश मधील चित्रकूट येथील एक प्रख्यात विद्वान, प्रवचनकार, शिक्षकतज्ञ, संस्कृत पंडित, गद्य लेखक, कवी, तत्त्वज्ञान,संगीत रचनाकार आणि गायक ही आहेत. आजवर त्यांनी शंभरहून अधिक पुस्तके लिहिली आहे. ते रामानंद संप्रदायाचे आहेत. जगद्गुरु रामभद्राचार्य यांनी चित्रकूट मध्ये तुलसी पीठ ही एक सेवाभावी संस्था स्थापन केली.तसेच 23 ऑगस्ट 1996 मध्ये जगद्गुरु रामभद्राचार्य यांनी चित्रकूट येथे तुलसी स्कूल फॉर द ब्लाइंड या शाळेची स्थापना केली. जगद्गुरु रामभद्राचार्य यांनी वयाच्या सातव्या वर्षी तुलसीदासाचे रामचरित्र मानस पूर्णता पठण केले होते. बाल वयातच त्यांनी अनेक ग्रंथ अभ्यासले होते. जन्मापासूनच दृष्टिहीन असलेले जगद्गुरु रामभद्राचार्य हे एक विविध भाषेचे गाढे अभ्यासक आहेत. जगद्गुरु रामभद्रचार्य यांना एकूण 22 भाषा येतात. जगद्गुरु रामभद्राचार्य यांनी अभ्यासासाठी ब्रेन लिपीचा वापर कधी केला नाही ते बहुभाषिक असून लिखाण करताना ते सहाय्यकाची मदत घेतात. याआधीही त्यांना भारत सरकारने 2015 मध्ये पद्मविभूषण हा सन्मान देऊन सन्मानित केले आहे.
साहित्य क्षेत्रातील नोबेल समजले जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कार. हा पुरस्कार भारतीय साहित्यिकांच्या गौरवार्थ सुरू करण्यात आला असून, या पुरस्काराचा इतिहास, समितीची स्थापना, स्वरूप आणि पुरस्काराची निवड प्रक्रिया आता आपण पाहू-
1} ज्ञानपीठ पुरस्कारची प्रेरणा कोणाची होती?-
2} ज्ञानपीठ पुरस्कार कोण देते?-
3} ज्ञानपीठ पुरस्काराची निवड प्रक्रिया कशी असते?-
4} पुरस्काराचे स्वरूप कसे असते?-
5} पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला होता?-
6} मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला आहे?-
1} ज्ञानपीठ पुरस्काराची संकल्पना कोणाची होती?(Jyanpith purskar Maharshtra)-
भारतीय लेखकांचा गौरव म्हणून हा पुरस्कार सुरू करण्यात यावा अशी रमा जैन यांची इच्छा होती त्यांचे पती शाहू शांतीप्रसाद जैन यांनी भारतीय साहित्यिकांसाठी हा पुरस्कार सोहळा सुरू केला. 2 एप्रिल 19 61 या दिवशी 300 विद्वानांना देशभरातून आमंत्रित करण्यात आले होते. या दिवशी ज्ञानपीठ पुरस्कार सोहळ्याचा
पहिला ठराव दिल्ली येथे मांडण्यात आला 22 मे 1961 या दिवशी म्हणजेच शाहू जैन यांच्या वाढदिवशी जैन या कौटुंबिक ट्रस्ट मधून पहिल्या ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा करण्यात आली. 16 सप्टेंबर 1961 रोजी पुरस्काराचा पहिला ठराव मांडण्यात आला. या पुरस्काराचा संपूर्ण आराखडा हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मांडला.
2} ज्ञानपीठ पुरस्कार कोण देते?-
भारतीय ज्ञानपीठ ट्रस्ट हे ज्ञानपीठ पुरस्कार देतात. हा पुरस्कार 22 भाषेतील साहित्यिकांच्या योगदानासाठी दिला जातो प्रत्येक भाषेतील त्यासाठी एक वेगळी सल्लागार समिती असते ज्यात तीन व्याख्याते,समीक्षक आणि विद्वान असे सदस्य असतात.
3} ज्ञानपीठ पुरस्काराची निवड प्रक्रिया कशी असते?-
भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान प्राप्त करणारी व्यक्ती ही भारताची नागरिक असावी लागते तसेच संविधानाच्या आठव्या अनुसूची मध्ये सूचीबद्ध केलेल्या 22 भाषेपैकी कोणत्याही एका भाषेत साहित्यिकांनी लिखाण केलेले असावे लागते. साहित्यिकाचे पुस्तक प्रकाशित होऊन पाच वर्षे झालेल्या पुस्तकांचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात येतो. वर नमूद केलेल्या बावीस भाषा साठी वेगवेगळी सल्लागार समिती असते.या समितीमध्ये तीन सदस्य असतात हे सदस्य तीन वर्षासाठी नियुक्त करण्यात आलेले असतात वरील सदस्यांची चर्चा करून समीक्षकांचे व विद्वानाचे मत लक्षात घेऊन या पुरस्काराची घोषणा करण्यात येते.
4} ज्ञानपीठ पुरस्काराचे स्वरूप नेमके कसे असते?-
एक पुरस्कार पत्र देवीची प्रतिमा अकरा लाख रुपयाचा धनादेश आणि प्रशस्ती पुस्तक यांचा समावेश असतो. ज्ञानपीठ पुरस्कारात मिळणारी देवीची प्रतिमाही धार मध्य प्रदेशातील सरस्वती मंदिरातील मूर्तीची प्रतिकृती आहे.
5} पहिला ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणाला मिळाला होता?-
पहिला ज्ञानपीठ पुरस्कार हा मल्याळम कवी श्री गोविंद शंकरकुरूप यांना त्यांच्या बासरी या काव्य कृतीसाठी देण्यात आला होता.
6} मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला होता?-
मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार हा वि स खांडेकर यांना 1974 मध्ये ययाती या कादंबरीसाठी मिळाला होता. आतापर्यंत मराठी साहित्यिकांना चार वेळेस ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
वर्ष 1965 पासून ते 2023 पर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे. (Jyanpith purskar Marathi Writers)
वर्ष. विजेत्याचे नाव भाषा
1965 जी शंकर कुरूप मल्याळम
1966 ताराशंकर बंडोपाध्याय बांगला.
1967 केवी पुत्तप्पा कन्नड
1967 उमाशंकर जोशी गुजराती
1968 सुमित्रानंदन पंत हिंदी.
1969 फिराक गोरखपुरी उर्दू
1970 विश्वनाथ सत्यनारायण
तेलगू
1971 विष्णू डे बांगला
1972 रामधारी सिंह दिनकर हिंदी
1973 दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे कन्नड
1974 विष्णू सखा खांडेकर मराठी
1975 पी.व्ही.अकिलानंदनम तमिळ
1976 आशापूर्णा देवी बांगला
1977 के.शिवराम कारंत कन्नड
1978 एच.एस. अज्ञेय हिंदी
1979 बिरेंद्र कुमारभट्टाचार्य अस्मिया
1980 एस के पोट्टेकट मल्याळम
1981 अमृता प्रीतम पंजाबी
1982 महादेवी वर्मा हिंदी
1983 मस्ती व्यंकटेशअंयगर कन्नड
1984 पक्षी शिवशंकरा पिल्लाई
मल्याळम
1985 पन्नालाल पटेल गुजराती
1986 सच्चिदानंद राऊतराय ओडिया
1987 विष्णू वामन शिरवाडकर
मराठी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते:
कुसुमाग्रज
1988 डॉ.सी नारायण रेड्डी तेलगू
1989 कुर्तुल एन हैदर उर्दू
1990 वी के गोकक कन्नड
1991 सुभाष मुखोपाध्याय बांगला
1992 नरेश मेहता हिंदी
1993 सीताकांत महापात्र ओडिया
1994 यु.आर.अनंतमूर्ती कन्नड
1995 एम टी वासुदेव नायर मल्याळम
1996 महाश्वेता देवी बांगला
1997 आली सरदार जाफरी उर्दू
1998 गिरीश कर्नाड कन्नड
1999 नीलम वर्मा हिंदी गुरुदयाल सिंह पंजाबी
2000 इंदिरा गोस्वामी अस्मिया
2001 राजेंद्र केशवलाल शहा गुजराती
2002 दण्डपाणी जयकांतन तमिल
2003 विं.दा करंदीकर मराठी
2004 रहमान राहील काश्मीरी
2005 कुवर नारायण हिंदी
2006 रवींद्र केळकर कोंकणी सत्यव्रत शास्त्री संस्कृत
2007 ओ.एन.वी.कुरूप मल्याळम
2008 मल्याळम उर्दू
2009 अमरकांत हिंदी श्रीलाल शुक्ल हिंदी
2010 चंद्रशेखर कम्बार कन्नड
2011 प्रतिभाराय ओडिया
2012 रावुरी भारद्वाज तेलगू
2013 केदारनाथ सिंह हिंदी
2014 भालचंद्र नेमाडे मराठी रघुवीर चौधरी गुजराती
2015 रघुवीर चौधरी गुजराती
2016 शंख घोष बांगला
2017 कृष्ण सोबती हिंदी
2018 अमिताव घोष इंग्लिश
2019 अक्कीतम अच्युतम तमिल
नंबुद्री
2020 नीलमणी फुकन आसामी
2022 दामोदर मावजी कोंकणी
भाषेनुसार आस्मी या भाषेसाठी आत्तापर्यंत तीन वेळा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला आहे, तसेच इंग्रजी या भाषेसाठी एक वेळेस, मराठी भाषेसाठी चार वेळेस,मल्याळम भाषेसाठी सहा वेळेस,संस्कृत भाषेसाठी एक वेळेस,हिंदी भाषेसाठी दहा वेळेस, गुजराती भाषेसाठी चार वेळेस, कोकणी भाषेसाठी दोन वेळेस,तमिळ भाषेसाठी दोन वेळेस, तेलगू भाषेसाठी तीन वेळेस, पंजाबी भाषेसाठी दोन वेळेस, बंगाली भाषेसाठी सहा वेळेस, कन्नड भाषेसाठी आठ वेळेस, ज्ञानपीठ पुरस्कार हा देण्यात आलेला आहे.
ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल (Jyanpith purskar Maharshtra) देण्यात आलेली माहिती तुम्हाला परिपूर्ण वाटली ना नक्की सांगा.लेखन क्षेत्रातील विविधं संधीबद्दल माहिती देणाऱ्या लेखांसाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला भेट देत रहा. माझा हा लेख कसा वाटला ते कमेंट करुन नक्की कळवा. तुम्हाला या लेखाबद्दल काही सुचना करायच्या असतील तरी तुमच्या सुचनांचे स्वागतच राहील. वाचत रहा,हसत राहा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवून नेहमी आनंदी राहा.
Adv.विनिता झाडे मोहळकर