All about kanika tekriwal : येणाऱ्या अडथळ्यांमुळे हार न मानता आपले ध्येय निश्चित करून ते पूर्णत्वाला नेणाऱ्या तरुण स्त्री उद्योजिकेच्या अविश्वसनीय कथेने प्रेरित होण्यासाठी तुम्ही तयार आहात का? तुमच्यात हिम्मत आणि काहीतरी करून दाखवण्याची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही फक्त जमिनीवरच नाही तर आकाशातही उंच भरारी घेऊ शकता. नशीबासोबतच धैर्य आणि मेहनतही आवश्यक असते. जेट सेट गोची संस्थापक कनिका टेकरीवाल यांनी ही म्हण खरी करून दाखवली आहे.
चला तर मग अशाच एका Hero बद्दल आपण माहिती पाहूया. जिने वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी कॅन्सरवर मात केली आणि त्यानंतर स्वतःची कंपनी उघडली.आज तिच्याकडे १० प्रायव्हेट जेट आहेत. होय! अनेकदा असं म्हटलं जातं की एखाद्या व्यक्तीने काहीतरी साध्य करण्याचा निश्चय केला तर त्याच्यासाठी आकाशही ठेंगणं वाटू लागतं. अशीच गोष्ट आहे भारतातील सर्वात मोठ्या खाजगी जेट कंपनीची मालकीण कनिका टेकरीवाल हिची.
भोपाळ येथील मध्य प्रदेशातील एक तरुण आणि उत्साही महिला जिने विमान उद्योगात आपला ठसा उमटवला आहे. ती भारताची आकाशराणी म्हणून ओळखली जाणारी कनिका टेकरीवाल.अवघ्या ३३ वर्षांची कनिका ही जेट सेट गोची भारतातील पहिली विमान भाडेतत्त्वावर देणाऱ्या कंपनीची सीईओ आहे आणि तिची एकूण संपत्ती 420 कोटी आहे. पण तिचा हा यशाचा मार्ग सोपा नक्कीच नव्हता. कर्करोगाशी झुंज देण्यापासून ते व्यवसायाच्या सुरुवातीला आर्थिक संघर्षांना तोंड देण्यापर्यंतचा तिचा हा प्रवास अतिशय खडतर होता. कनिकाने तिचे ध्येय साध्य करण्यासाठी अनेक अडचणींवर मात केली.
कनिका टेकरीवाल शिक्षण (Kanika Tekriwal Education)
दिल्लीची रहिवासी असलेली कनिका मारवाडी कुटुंबातील आहे.भोपाळ मधील मारवाडी व्यावसायिक कुटुंबात वाढलेल्या कनिकाने आयुष्याच्या सुरुवातीलाच व्यवसायाचे धडे घेतले.कनिकाला वयाच्या सोळाव्या वर्षापासून विमान वाहतूक क्षेत्राची आवड होती.तिने तिचे शालेय शिक्षण दक्षिण भारतातून केले आणि मुंबईतून अर्थशास्त्राची पदवी घेतली व डिझाईन इन डिप्लोमा केला. तिने मुंबईतून अर्थशास्त्र आणि व्हिज्युअल कम्युनिकेशन मध्ये पदवी प्राप्त केली आणि नंतर लंडनमधील coventry University in London विद्यापीठातून एमबीए केले.
एव्हिएशन इंडस्ट्री हे पुरुषांचे वर्चस्व असलेले क्षेत्र आहे असे म्हटले जाते. पण भोपाळमधील एका मुलीने या उद्योगात केवळ प्रवेशच केला नाही तर यशही मिळवले आहे आणि ती हे कार्य सातत्याने करत आहे. हे व्यक्तिमत्व म्हणजे कनिका टेकरीवाल. तिचा सात वर्षांपेक्षा जास्त काळचा विमान वाहतूक उद्योगातील अनुभव आणि तीव्र निरक्षणामुळे तिला हे जाणवू लागले की केवळ काही लोकांनाच खाजगी जेट घेणे परवडते.त्यामुळे ज्यांना ते परवडत नाही अशा लोकांना खाजगी जेटचा अनुभव देण्याचे तिने ठरवले.
2014 मध्ये तिने ola आणि uber प्रमाणे जेट सेट गो चार्टर्ड विमान व्यवसायाची स्थापना केली. परंतु हा व्यवसाय सुरू करणे इतके सोपे नव्हते. कारण सुरुवातीलाच कनिकाला पैशांची आणि ग्राहकांची कमतरता या महत्त्वाच्या आव्हानांचा सामना करावा लागला. तिने या अडथळ्यांवर मात केली. विमानाचा आकाशातील वेळ वाढवण्यासाठी,ग्राउंड टाइम कमी करण्यासाठी आणि चार्टर्डला परवडणारे बनवण्यासाठी ॲडव्हान्स तंत्रज्ञान आणि स्मार्ट व्यवस्थापन वापरले. आज जेट सेट गो मुंबई ,दिल्ली, चेन्नई आणि हैदराबाद येथील कार्यालयांसह सुमारे 200 कर्मचारी आणि दीडशे कोटी turnover ची कंपनी बनली आहे. 2020 ते 2021 दरम्यान त्यांनी एक लाख फ्लायर्स हाताळले आणि सहा हजार उड्डाणे घेतली.
कनिकाला वयाच्या 21 व्या वर्षी कर्करोगाने ग्रासले होते या आजाराला पराभूत केल्यानंतर त्यांनी भारतातील सर्वात मोठी खाजगी जेट कंपनी स्थापन केली.गेट सेट गो असे या कंपनीचे नाव आहे. कनिका टेकरीवाल या जेट सेट गोच्या सीईओ आणि संस्थापक आहेत. जेट सेट गो दिल्ली येथील खाजगी jet concierge सेवा कंपनी आहे. ही कंपनी एक प्लेन ऍग्रीगेटर आहे जी हे विमान मालकांसाठी चालवते, कठोर परिश्रम करते आणि एकत्र उड्डाण करते.जेटसेट गो लोकांना खाजगी जेट आणि हेलिकॉप्टर देखील भाड्याने देते.
कंपनी क्लाऊड आधारित शेड्युलिंग विमान व्यवस्थापन ,सेवा आणि त्यातील भागांसाठी एक inbuild मार्केट प्लेस ऊपलब्ध करून देते. कनिका ह्या सध्या 10 प्रायव्हेट जेटच्या मालकीण आहे आणि स्वतःच्या मेहनत आणि हिमतीवरच तिने आकाशाला गवसणी घातली आहे. कनिकाला 2011 मध्ये कर्करोग झाल्याचे निदान झाले जेव्हा ती 21 वर्षांची होती आणि नऊ महिने उपचार केल्यानंतर ती बरी झाली.वयाच्या 21व्या वर्षी तिने कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराशी झुंज दिली आणि त्यावर यशस्वीपणे मात देखील केली.ही लढाई जिंकल्यानंतर तिने 2012 सा*ली वयाच्या 22 व्या वर्षी जेट सेट गो नावाने विमान वाहतूक आधारित स्टार्टअप सुरू केले. तिला वयाच्या 32 व्या वर्षी यश मिळाले आणि आता तिच्याकडे दहा खाजगी विमाने आहेत. कनिका भारतातील 100 श्रीमंत महिलांमध्ये सामील आहे.
गेट सेट गो कंपनी ही एक प्लेन ऍग्रीकेटर आहे जी लोकांना खाजगी विमाने आणि हेलिकॉप्टर भाड्याने देते.याशिवाय ही कंपनी इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग एअरक्राफ्ट चा वापर करून भारतातील इंटरसिटी कनेक्टिव्हिटी असलेल्या एअर टॅक्सी मध्ये अग्रणी बनली आहे.कनिकाची कंपनी देखील विमानात स्मार्ट मॅनेजमेंट साठी , युनिक मेंटेनन्स साठी आणि मिश्र तंत्रज्ञानाचा वापर केला जातो ज्यामुळे ते ग्राहकांची आवडती विमान कंपनी बनत आहे. अशा विमानांमध्ये देखभालीचा खर्च कमी होतो , एअरtime कमी होतो आणि ग्राउंड टाईमही कमी होतो त्यामुळे नफा तर वाढतोच पण चार्टर्ड प्लेन चा खर्चही मोठ्या प्रमाणात कमी होतो.
कनिका आपल्या जेट सेट गो या कंपनीचा उल्लेख बऱ्याचदा आकाशातील उबर असाही करतात. अशी कंपनी सुरू करण्याची कल्पना कशी सुचली या प्रश्नाचे उत्तर देताना कनिका सांगते की 2011 मध्ये जेव्हा ती तिच्या भयानक आजारांशी झुंज देत होती,तेव्हा तिला आपल्या या मिशनचा विचार आला होता. हे स्वप्न सत्यात उतरवताना एक वर्षाचा विलंब झाला असला तरी एक चांगली गोष्ट अशी होती की तोपर्यंत भारत आणि देशात या कल्पनेवर अजूनही काम सुरु झाले नव्हते. त्यामुळे कॅन्सर मधून मुक्त होताच ती या कामात गुंतली.
ALL ABOUT JET SET GO
तिने विमान वाहतूक उद्योगात संशोधन सुरू केले. तिच्या लक्षात आले की खासगी जेट वापरणाऱ्या लोकांना बऱ्याचदा दलालांना सामोरे जावे लागते आणि त्यांच्या मनमानी कारभार पद्धतीला लोकं त्रासल्याचे आढळून आले.ही व्यवस्था संपवण्याचा निर्णय तिने घेतला. यानंतर तिने ज्यांच्या मदतीने एवढा मोठा स्टार्टअप सुरू केला अशा लोकांची भेट घेतली. कंपनीने Hawker 800 XP आयात केले आहे. जेट सेट गोच्या गुंतवणूकदारांमध्ये सिमेंट व्यवसायिक पुनीत दालमिया आणि क्रिकेटर युवराज सिंग यांचाही समावेश आहे. कनिकाला भारताच्या विमान वाहतूक उद्योगात खाजगी स्टेट स्पेसमध्ये ॲग्रीगेटर ची गरज भासू लागली होती. kanika tekriwal
कनिका अशा अनेक लोकांना भेटली त्यांनी सांगितले की भारतात खाजगी जेट बुक करण्याचा त्यांचा अनुभव फारच वाईट होता आणि अनेक खाजगी जेट मालक असे होते जे वाढत्या किमती,नियमित देखभाल आणि इतर समस्यांमुळे त्यांची विमाने आणि जेट्स विकत होते. दरम्यान ब्रिटन मधील तिच्या एका सह कर्मचाऱ्याशी बोलताना कनिकाला जेट सेट गोची कल्पना सुचली. जेट सेट गोचे सुरुवातीचे उद्दिष्ट अशा ग्राहकांना टार्गेट करणे होते जे दिवसातून तीन ते चार शहरांमध्ये कामानिमित्त फिरत असतात. आणि जे पर्यटनासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत विमाने भाड्याने घेऊन इच्छितात.
कनिका टेकरीवाल संपत्ती
आज कनिकाकडे सुमारे 280 कोटी रुपयांची संपत्ती आहे जी तिला तिच्या कंपनीकडून मिळाली आहे. जेट सेट गो याच वर्षी एअरक्राफ्ट थेट इम्पोर्ट करणारी पहिली वहिली भारतीय विमान कंपनी ठरली आहे.कनिकाला तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अनेक पुरस्कार आणि वारंवार प्रशंसादेखील मिळाली आहे. ज्यात बीबीसीच्या जगातील शंभर प्रेरणादायी महिलांपैकी ती एक ठरली आहे. तसेच जागतिक आर्थिक मंचाने एक तरुण जागतिक नेता म्हणून तिला सन्मानित केले आहे.फोर्ब्स मासिकात देखील कनिकाच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली आहे. kanika tekriwal
2016 मध्ये retail आणि ई-कॉमर्स च्या बाबतीत आशियातील टॉप 30 बिझनेस महिलांच्या फोर्ब्स लिस्टमध्ये देखील तिचा समावेश आहे. कनिकाला भारत सरकारकडून ई-कॉमर्स साठी राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार देखील मिळाला आहे. 2017 मध्ये forbes ने एशियामधील सर्व माझी स्टार विद्यार्थ्यांच्या 30 under 30 यादीत कनिकाचा समावेश केला होता. कणिका ला kotak wealth Hurun leading wealthy women 2020 list मधे स्थान मिळाले आहे.
आणि अशाप्रकारे कनिका टेकरीवालने भारतातील सर्वात मोठी खासगी जेट कंपनी स्थापन केली. लक्षात ठेवा यश हे गंतव्यस्थान FINAL DESTINATION नाही तर एक आनंददायी प्रवास JOURNEY आहे. जर कनिका हे करू शकत असेल तर तुम्हीही मोठी स्वप्ने पहा आणि तुमच्या या स्वप्नांचा पाठलाग करा. मला आशा आहे की तिची ही यशोगाथा प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरेल.
तुम्हाला हा लेख kanika tekriwal कसा वाटली,ते नक्की कळवा. आपल्य मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप ही जॉईन करा.
लेखकाचे नाव – प्रिती यादव, पुणे
खूपच प्रेरणादायी प्रवास. कनिका टेकरीवाल ह्यांना सलाम. खूप छान लिहिलं आहे. धन्यवाद.
खुप खुप आभार आणि धन्यवाद😚