“लापता लेडीज”- महिला सशक्तिकरणाचा एक सुंदर चित्रपट,  जाणून घ्या रिव्ह्यू!!

WhatsApp Group Join Now

‘लापाता लेडीज’Laapata Ladies चित्रपट आपल्याला जुन्या काळातील साधेपणा आणि नातेसंबंध जपणाऱ्या चित्रपटांची आठवण करून देतो. हा असा चित्रपट आहे जे आपल्याला जगातील चांगलेपणा दाखवतो.  लोकांना चित्रपट पाहण्याची इच्छा होते, विशेषतः जेव्हा ती सुज्ञपणे आणि खेळकरपणे एक शक्तिशाली सामाजिक संदेश देतात.

1 मार्च रोजी किरण रावचे नवीन चित्रपट ‘लापाता लेडीज’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेळा आहे आणि  ओ. टी. टी. प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स वर तुम्ही हे चित्रपट पाहू शकता. हा चित्रपट किरण रावने दिग्दर्शित केले आसून  आमिर खान, ज्योती देशपांडे सोबत तेंनी स्वता निर्मिती  पण केले आहे.

लेखिका स्नेहा देसाई, बिप्लब गोस्वामी आणि दिव्यानिधि शर्मा यांच्यासह,  तेणी नाट्यकथेत विविध सामाजिक मुद्दे प्रभावीपणे समाविष्ट केले आहे. ती प्रेक्षकांना रूपकात्मक घुंघट काढून या मुद्द्यांचा शोध घेण्यास आणि ओळखण्यास प्ररीत करते. नितांशी गोयल, प्रतिभा रांता, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम आणि रवी किशन ही सगळे कलाकार मुख्या भूमिकेत आहेत.

कथानक

कथा २००१ साली काल्पनिक निर्मल प्रदेशात सुरू होते, जिथे दीपक कुमार (स्पर्श श्रीवास्तव) आपल्या  पत्नी फूल कुमारी (नितांशी गोएल) सोबत ट्रेन मध्ये चढतो. तिच्या चेहऱ्यावर लांब घुंघट असतो ज्यामुळे तिला दीपकचे  बूट शिवया बाकी काहीच दिसत नसते. रंजक बाब म्हणजे, हा दुसऱ्या श्रेणीचा गाडीचा डबायात  लग्न केलेल्या अनेक जोडप्या होत्या , ज्या सर्वांनीच सारख्या रंगाचे लांब घुंघट घेतलेळे असतात॰

थोड्या वेळाने गाडी एका स्टेशनवर थांबते. रात्रीच्या वेळी दीपक जागा होतो आणि तेला लक्षात येते की  आपल्या स्टेशन आलेला आहे. तो त्याच्या पत्नी फूल कुमारीला सांगतो की आपल्याला इथे उतरायला हवे आणि दीपक आपल्या सामान घेतो  आणि फूलकुमारी चा हात धरून गडबडीत ट्रेन मधून उतरतो. ते सूरज मुखी गावात पोहोचतात. गावात पोहोचल्यावर, दीपकचे कुटुंब उत्सुकतेने त्यांच्या सूनेची वाट पाहत असतात. दीपकची आई आरती कारणासाठी हातात  आरतीची ताट घेऊन ऊभी असते आणि आपल्या सुनेना घुंघट उचलायला सांगते. घुंघट उघड केल्या क्षणी सगलयांचा गोंधळ उडतो कारण ती त्यांच्या मुलाने लग्न केलेली वधू नसते .  दीपकला कळते की रात्रीच्या अंधारात स्टेशनवर उतरताना तो  फुलऐवजी दुसऱ्याच कोणाच्या तरी नववधूचा हात पकडून उतरतलेला असतो.  

घुंघटात असलेली जया (प्रतिभा रांता)  आता चूकीच्या व्यक्तीसोबत असल्याचे जाणून, आपले खरे नाव न सांगण्याचा निर्णय करते. दीपक आणि त्याच्या कुटुंबियाने तिला तिचे नाव आणि माहिती विचारलेवर  ती त्यांना स्वतःबद्दल खोटी माहिती सांगते की तिचे नाव पुष्पा राणी आहे. आणि मग गोंधळाचा प्रवास सुरू होतो.

दुसरीकडे फूल स्वतःला पुष्पाचा  नवरा प्रदीपचा घरी जाण्यापासून स्वताला  वाचवते आणि स्टेशनवरच लपून  राहते. स्टेशनवर चहाची टपरी चालवणाऱ्या मंजू माई (छाया कदम) तिला स्वताचा घरी आसरा देते. यांनी कौटुंबिक हिंसाचार आणि अयोग्य पतीला नकार देऊन एकटीने आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला असतो.

एकीकडे दीपक फुलचा खूप शोध घेतो आणि पोलिस स्टेशनला जाऊन इन्स्पेक्टर श्याम मनोहर (रवि किशन) कडे तक्रार नोंदवतो, आणि दुसरी कडे  जयाचा नवरा प्रदीप जयाचा  विरोधात दागिने चोरी करून पळून गेल्याची तक्रार पोलिस स्टेशनला दाखल करतो.

तपासादरम्यान, पोलिसांना पुष्पा एका टोळीचा भाग असल्याचा संशय येतो॰ ते नेहमी तिचे पाठलाग करतात आणि तिचे वर नजर ठेऊन असतात. तपशील नंतर कळतेकी ती पुष्पा नाही जया आहे आणि ती काहीतरी लपवत असते. ती आपली ओळख का बार लपवत होती? दीपक फूलला शोधू सकतो का? या सगळे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला चित्रपट बगितलेवर मिळतील.

लापाता लेडीज मूवी रिव्यू

तलब १४ वर्षांच्या नंतर, किरण राव दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करतात. ती एक आकर्षक कथा सादर करते जिथे सामाजिक संदेश सूक्ष्मपणे देलेला आहे . विनोद आणि घुंघट या प्रतिकाचा वापर करून, ती गहनरित्या रुजलेल्या पुरुषप्रधानता आणि त्याच्या परिणामांवर चर्चा करते. तिची कथा वास्तविक जीवनातील महिलांच्या समानता, शिक्षण आणि सबलीकरणाला प्रोत्साहन करते. हा चित्रपट कुटुंबातील खुल्या संवादाला प्रोत्साहन देतो जसे की सासू आणि सून हे मित्र का असू शकत नाहीत आणि कुटुंबातील स्त्रियांना व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य असावे.

अशिक्षित फूल लग्न झाल्यावर  स्वतःला आनंदी समजते, परंतु जेव्हा ती स्टेशनवर  राहते तेव्हा तिला तिचे स्वयंपाक कौशल्य कळते आणि ती स्वत: ला स्वावलंबी बनवते.

दुसऱ्या बाजूला पुष्पा आहे, तिला तिच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सामाजिक अडथळा मोडून काढण्याच्या तिला श्ंघर्स करायल्या लागते.

पोलीस कर्मचारी मनोहर भले भ्रष्ट आणि लोभी असेल, पण तो योग वेळ आळेवर पुष्पाला योग माद्द ही करतात.

किरण रावनि या चित्रपटात  अनेक मुद्दे हाताळूळ लावलेले आहे  आणि  चित्रपट बागताना   कंटाळवान्या जाणवत  नाही. चित्रपट मनोरंजक, हसवणारा आणि महिला सशक्तीकरण आणि स्वप्नपूर्ती यासारख्या गंभीर विषयांवर विचार करायला लावणारा आहे.

लापता लेडीज आणि चित्रपटात  कलाकार:

कलाकाराचा भूमिके विषेय सांगायचं झाला तर, स्पर्श श्रीवास्तव, प्रतिभा रांता आणि नितांशी गोयल हे  नवोदित कलकारानने आपली भूमिका उत्तम पणे साकारली आहे आणि प्रेक्षकाचे मन जिंकलेळे आहे.

या चित्रपटात पोलिस अधिकारी श्याम मनोहरची भूमिका सकरणारे रवी किशन ची भूमिका कौतुकस्पद आहे. ते हलक्या- फूलक्या विनोदाणी प्रेक्षकाचे मनोरंजन ही करतात.

छाया कदम यांनी चित्रपटात उत्तम कामगिरी केली आहे. त्यांच्या अभिनयात भावना आणि सूक्ष्मता आहे, जी प्रेक्षकांना त्यांच्या पात्रासोबत जोडते. सहाय्यक कलाकाराणी पण अनेकदा शब्दांशिवायचं, आपल्या चेहऱ्यावरील भाव, डोळे आणि देहबोली द्वारे आपल्या भूमिकांमध्ये बरेच काही व्यक्त केलेले आणि ते  चित्रपटाला अधिक समृद्ध आणि वास्तववादी बनवले आहे॰

उत्कृष्ट छायाचित्रण आणि संगीत:

विकास नौलखा यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांनी कॅमेऱ्याद्वारे ग्रामीण जीवनाचे सौंदर्य आणि वास्तवता बारकाईने टिपले आहे. राम संपत यांनी चित्रपटासाठी सुंदर आणि भावपूर्ण संगीत दिले आहे. स्वानंद किरकिरे, प्रशांत पांडे आणि दिव्यानिदी शर्मा यांनी लिहिलेली गीतं चित्रपटातील ग्रामीण पार्श्वभूमीला उत्तम प्रकारे दर्शवतात.

किरण राव यांनी हा चित्रपट दिग्दर्शन करून एक उत्तम कामगिरी केळे आहे. लापाता लेडीज चित्रपट मध्ये सूक्ष्मपणे एक शक्तिशाली संदेश दिले आहे . हा चित्रपट महत्त्वाच्या सामाजिक विषयांना हाताळतो जसे की  लैंगिक समानता, सक्षमीकरण आणि त्यातील पात्रांनी सहन केलेल्या संघर्षांद्वारे निर्णय घेण्याचे मूल्य याबद्दलची मजबूत संकल्पना नाजूकपणे मांडण्यात आली आहे. त्यांनी  हा विषय इतक्या चोख रीतीने मांडला आहे की हे चित्रपट पूर्णपणे मनोरंजक आणि प्रेक्षकांना शेवट परत गुंतवून ठेवतात. पण, या चित्रपटाची सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे त्यांनि या महिलांना बळी ठरवल्यासारखं दाखवत नाही. उलट, त्यांनि  त्यांच्या ताकदी आणि जिद्दीचा जयघोष करताना दाखवलं आहे.

हे असा चित्रपट आहे ज्याचा आनंद सर्वच जण घेऊ शकतात. तर, तुम्हाला एखादा हृदयस्पर्शी, विनोदी आणि स्त्रियांच्या जीवनातील वास्तविकतांना सोप्या पद्धतीने प्रतिबिंबित करणारा चित्रपट पाहण्याची इच्छा असेल तर , ‘लापाता लेडीज’Laapata Ladies हा चित्रपट  नक्की पाहा.

तुम्हाला  “लापता लेडीज”  या चित्रपटचा रिव्ह्यू कशी वाटलीते आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या लेखक मित्र‘ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.

धन्यवाद !                 

2 thoughts on “ “लापता लेडीज”- महिला सशक्तिकरणाचा एक सुंदर चित्रपट,  जाणून घ्या रिव्ह्यू!!”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top