लहान बाळाचा आहार : स्तनपान हे लहान बाळाचे मुख्य अन्नाचे स्वरूप असले तरी योग्य पोषण ही महत्त्वाची गोष्ट आहे. बाळाच्या सर्वांगीन विकासासाठी व निरोगी राहण्यासाठी त्याचे योग्य पोषण गरजेचे आहे . एखाद्या समाजाच्या आर्थिक सामाजिकतेचे मूल्यमापन करणे म्हणजे पोषण होणे अशी व्याख्या कमी पडेल कारण स्वच्छ आणि पुरेसा आहार. अन्नअभावी आजकाल पोषण मूल्यांमध्ये कमतरता जाणून अनेक रोग होतांना आपल्याला दिसतात. योग्य अन्न न मिळाल्यामुळे कुपोषण बळी पडताना बरीच मुले दिसतात अति कुपोषणामुळे त्यांची बौद्धिक क्षमता घसरते आणि रोगाचा मुकाबला करण्याची शक्तीही कमी होते. जुलाब , जंत, कुपोषण यांचे अगदी घट्ट नाते असल्यामुळे मुलांची वाढ खुंटते त्यामुळे रोगट पणा त्यांच्या मागे लागतो आणि यांची रोगप्रतिकारशक्ती सुद्धा कमी पडते त्यामुळे लहानपणापासून मिळालेला समतोल आहार अति महत्वाचा आहे.

या टप्प्यावर असणारी मुलांसाठी उपयुक्त अशी पोषक तत्त्वे
लहान बाळाची वाढ आणि विकास चांगला होण्यासाठी खालील पोषण तत्त्वाची गरज असते.
1. झिंक: बाळाच्या वाढीस प्रोत्साहन मिळते .पेशींची दुरुस्ती करते.
2.कर्बोदके आणि प्रथिने: आवश्यक ऊर्जा प्रदान करतात त्यामुळे चांगली वाढ होऊ शकते. कर्बोदके बाळाला एक चांगले पोषक तत्व प्रदान करते
3. जीवनसत्वे: आपल्या मेंदूची वाढ ,रोगप्रतिकारक शक्ती, मेंदूतील सगळ्या घटकांना b1 ,b2 ,b3 ,b6 ,b12 यासारख्या जीवनसत्वाची आवश्यकता असते. आपल्या शरीरातील “बिल्डिंग ब्लॉग्स” म्हणून यांना ओळखले जाते हा आपल्या शरीरातील महत्त्वाचा पोषक घटक आहे.स्नायू आणि उतक यांच्या संवर्धनात त्यांचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे बाळाची वाढ वेगाने होते.
4. फोलिक ऍसिड: बाळाच्या शरीरातील पेशी विभाजित करण्याचे काम करते.
5. कॅल्शियम: बाळाची हाडे आणि दात विकसित करण्याचे काम करते. बाळाला दररोज किमान 500 मिलीग्राम कॅल्शियमची गरज असते ती गरज आईच्या दुधातून पूर्ण होते. दात, बाळाची हाडे मजबूत करण्यासाठी आपण त्याला पुरेशी कॅल्शियम देतोय की नाही याची खातरजमा करावी.
6. फॅट: यामुळे त्वचा आणि केस निरोगी राहतात तसेच मेंदूच्या विकासासाठी उपयुक्त असते. हवेत असलेल्या संक्रमणापासून बचाव करते. दृष्टीच्या विकासासाठी उपयोगी ठरते
7.लोह: मेंदूचा विकास होण्यास मदत करते तसेच आपले बाळ केवळ स्तनपान करत असेल डॉक्टर लोह वाढविण्यासाठी आहार किंवा उपाय सुचवतात त्यामुळे रक्तपेशी वाढतात. मेंदूची कार्य चांगले चालवण्यासाठी लोहाची गरज असते आणि सुरुवातीच्या चार महिन्यानंतर लोहाची कमतरता भासू लागते.
बाळाला कसे हाताळावे?
1. बाळाशी सतत बोलावे. आईने बाळाशी सतत बोलणे हे नवजात बाळाच्या मेंदूसाठी गरजेचे आहे कारण विकसित होण्यासाठी आईने आणि घरातील सर्वांनी बोलायला पाहिजे. त्यामुळे ध्वनी आणि शब्दांची सक्रियता राहण्यास मदत होते.
2. बाळाने रडायला सुरुवात केल्यास अजिबात हलवू नये. अशा वेळेला आपण त्याला कुशीत घेऊन हलवतो पण त्यामुळे मेंदूला झटका बसू शकतो आणि डोक्यावर परिणाम होण्याची शक्यता असते म्हणून हलविण्यापेक्षा त्यांना उचलून हळूहळू चालावे आणि पाठ थोपटून द्यावी .
3. त्वचेला स्पर्श करत रहावा. आई झाल्यानंतर बाळाकडे सगळ्यात जास्त लक्ष ठेवावं लागतं, त्याला सतत स्पर्श करावा लागतो या स्पर्शातून त्याला प्रेम आणि काळजी कळते. आईची उब जाणवते. त्यामुळे बाळाचे ठोके नियमित मदत होऊन उत्तम विकासही होतो.
4. बाळाला कुशीत घ्यावे. आईने नेहमी बाळाला कुशीत घ्यावे जेणेकरून बाळ झोपते आणि आईचा स्पर्श होत राहतो नवजात बाळाला प्रेम आणि काळजी हवीहवीशी वाटते.
स्तनपान (Baby care tips in Marathi)
जन्मापासून सुरुवातीचे सहा महिने बाळाला स्तनपान द्यावे डॉक्टर सांगतात कारण तो बाळासाठी सर्वोत्तम आहार असतो. जन्मतः लगेच अर्धा तासानंतर बाळाला सुरुवातीचे दूध पाजायला डॉक्टर सांगतात. त्या दुधामध्ये चिकाचे प्रमाण म्हणजेच प्रथिने व रोगप्रतिबंधक क्षमता जास्त प्रमाणात असते. यामुळे दूध येण्याची क्रिया लवकर वाढते आणि त्याला दूध पाजणे सहज होते. बाळ जन्मल्यानंतर सलग तिसऱ्या ते चौथ्या दिवशी हे दूध संपून नेहमीप्रमाणे दूध येणे सुरू होते. आईचे दूध हे बाळाच्या सर्व गरजा पूर्ण करते म्हणून त्याला पूर्णब्रह्म असं संबोधले जाते. त्यामुळे अनेक रोगांचा मुकाबला करण्याची ताकद बाळात निर्माण होते.
1. नवजात बाळाला दूध पाजताना अनेक गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्याच्या भुकेच्या हिशोबानेच त्याला दूध पाजावे. जेव्हा ते रडू लागतात किंवा आपली हाताची बोट तोंडात घालतात तेव्हा आईने समजावे की हा भुकेचा इशारा आहे.
2. बाळाच्या भुकेच्या वेळेलाच त्याला दूध द्यावे. साधारणतः तीन ते चार तासाने दूध पाजणे गरजेचे आहे. स्तनपान करताना कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटे एक स्तनपान बाळाला द्यावे.
3. सगळे नवजात बालकास स्तनपानाच्या वेळी तोंडात हवा भरून घेतात त्यामुळे त्यांचे पोट फुगते स्थानापन्न झाल्यानंतर त्यांना उभं पकडून पाठीवर थोपटून ढेकर येईपर्यंत थोपटत राहावे त्यामुळे त्यांचे पोट स्थिर राहते.
4. स्तनपान देणाऱ्या आईने आपल्या खाण्यावर योग्य लक्ष द्यावे. सुरुवातीला आहारात पातळ घन पदार्थांचा समावेश करावा.
किती प्रमाणात आणि किती वेळा स्तनपान करावे?
ज्याप्रमाणे बाळ मोठे होते त्या स्तनपानाची वेळही कमी होत जाते दिवसातून कमीत कमी सहा ते आठ वेळा स्तनपान देण्यात यावे. त्यामुळे तो जास्तीत जास्त झोपू लागेल.जर बाळ आनंदी असेल, वजन नीट वाढत असेल, त्याचा विकास चांगला होत असेल, त्याला शौचास किंवा मूत्रविसर्जन चांगले होत असेल तर नीट स्तनपान होत आहे असे समजावे. याउलट जर बाळ स्तनपान केल्यावरही आनंदी दिसत नसेल, त्याला आणखी स्तन पण करायचे असल्यास, रडत असल्यास आपण अपुरे स्तनपान करीत आहोत असे समजावे.
फॉर्मुला मिल्कचे प्रमाण?
फार्मूला मिल्क हे पचायला जड असून शक्यतो कमी वेळा देण्यात यावे. जर आईला स्तनपान करायला जमत नसेल तशाच वेळेला हे मिल्क देतात. स्तनपान घेणाऱ्या बाळापेक्षा या फीडिंगची संख्या कमी असते. जर आपण आपल्या बाळाला जास्त प्रमाणात पाजू शकत नाही त्याच वेळेला फॉर्मुला फीडिंग करावे कारण बाळाला आईचे दूध पिण्यापेक्षा बाटलीचे दूध पिणे सोईस्कर जाते.
लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी
1.काही बाळांची वाढ झपाट्याने होत असते मात्र काही बाळांची वाढ हे दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला ते नंतर तीन ते सहा आठवड्यानंतर होऊ शकते.
2. लहान बाळांनी उलटी करणे सामान्य आहे कारण त्यांच्या अन्ननलिका आणि पोट यांनी जोडणाऱ्या स्नायू काही प्रमाणात अपरिपक्व असतात. त्यामुळे त्यांच्या पोटातील अन्न वर येण्याची दाट शक्यता असते.
3. स्तनपान केल्यानंतर बाळाला शौचास होऊ शकते.
4. बाळ पाच-सहा महिन्यांचे होईपर्यंत त्याला सर्व अन्नपदार्थ द्रव स्वरूपात देण्यात यावे तसेच घनपदार्थ देण्याचे टाळावे.
5. स्तनपान करताना काही वेळेला स्तन बदलून स्तनपान करावे त्यामुळे बाळाला सतत दुधाचा पुरवठा होत राहतो कमीत कमी 15 मिनिट एक स्तन रिकामे होण्यास लागू शकते जर तुम्ही ते लवकर बदलले तर बाळ दूध पिण्यापासून वंचित राहू शकेल हे अत्यंत पौष्टिक असते बाळाचे पोट भरते.
6. प्रत्येक वेळी दूध पिल्यानंतर आपण बाळाला उभे पकडल्यास आणि पाठीवरून हात फिरवल्यास बाळाची ढेकर निघण्यास मदत होते ते प्रत्येक वेळेला व्हायलाच हवे.
बाळाला घनपदार्थ ची सुरुवात कशी करावी?
जेव्हा बाळ पावलं टाकायला सुरुवात करते बाळाला घन पदार्थांची ओळख करून दिली पाहिजे म्हणजे बाळ चार ते सहा महिन्याचे असताना त्याची पचनसंस्था घनपदार्थ साठी तयार होते तसेच दूध ते रोजचे जेवण यामध्ये घन पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. त्यावेळेस बाळाचे गिळण्याचे कौशल्य विकसित होते अशा वेळेला घनपदार्थाची सुरुवात करावी .आलू, गाजर यासारखे पदार्थ उकडून प्युरी करून किंवा मॅश करून देण्यास सुरुवात करावी त्यामध्ये फळे, भाज्या ,अन्नपदार्थ यांचा समावेश करावा. एक पदार्थ दोन ते तीन दिवस द्यावा बाळाला त्याची एलर्जी तर नाही ही गोष्ट निदर्शनास येते. सुरुवात छोट्या चमच्याने करावी त्यात मीठ साखर अजिबात घालू नये. बाळाचे अन्न विषयीची प्रतिक्रिया जाणून घ्यावी. ते खाण्यास नकार देत असेल तर जबरदस्तीने भरवू नये.
चार ते सहा महिन्याच्या कालावधीत बाळाला दिवसातून एक स्पून भरवावे. असे करत थोडे थोडे वाढवत न्यायला हवे. या कालावधीत बाळाला तुम्ही काय खात आहात याची उत्सुकता लागलेली असते. अशा वेळेला ते थोडे मान ताठ करायला लागते आणि वजनही जन्माच्या वजनाच्या दुप्पट असते या काळातच घनपदार्थ सुरुवात करावी. घनपदार्थ देताना सुरुवातीला बाळाच्या सहाव्या महिन्यापासून त्याच्या शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात होते त्याच कालावधीत पालक हा एकमेव घटक आहे जे लोहाची कमतरता भरून काढते तसेच केळी, रताळे, आलू ,प्युरी, फळे ज्यांचा समावेश करावा. हे पदार्थ जास्त मऊ असावे जेणेकरून ते बाळाला खाताना सोयीचे असेल.बाळाला घनपदार्थ देण्याची वेळ निश्चित असावी. स्तनपान करताना लक्षात येईल की दूध कमी होत आहे अशा वेळेला घनपदार्थ देऊ शकतो दिवसातून एकदा एक घन पदार्थ भरविण्यास सुरुवात करायला हरकत नाही तसेच संध्याकाळी एक घनपदार्थ देऊ शकतो असे करता करता घनपदार्थ देण्याच्या वेळा आपण वाढवू शकतो त्याचप्रमाणे आपले वेळापत्रक तयार करावे. जेव्हा बाळ सहा ते नऊ महिन्याचे असते तेव्हा घन पदार्थांच्या वेळा वाढवून नाश्ता , दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण असे नियमित वेळापत्रक तयार करावे.
सहा महिन्याच्या बाळासाठी कोणत्या पदार्थांचा समावेश करावा? (लहान बाळाचा आहार)
बाळ लहान असताना त्याचे पोट देखील लहान असते त्यामुळे हळूहळू केली पाहिजे अन्नपदार्थाचे छोटे छोटे घास छोट्या चमचा मी भरवायला सुरुवात करावी उदाहरणार्थ:
1. केळी: केळी मध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते त्यामुळे ते एक सर्वोत्कृष्ट बेबी फूड आहे. ते मऊ करायला आणि मॅश करायला योग्य आहे आणि उत्तम खनिज केळीमध्ये भरपूर प्रमाणात असते.
2. ओट्स: ओट्स मध्ये फायबरचे प्रमाण आणि खनिजांचे प्रमाण जास्त असते ते आपण फॉर्मुला मिल्क किंवा आईच्या दुधात हे देऊ शकतो.
3. सफरचंद: सफरचंद देताना त्याला कापून आणि चम्मच ने खरवडून त्याचा पल्प बाळाला देऊ शकतो किंवा सफरचंदाचे तुकडे करून पाण्यामध्ये उकळून मॅश करून सुद्धा देऊ शकतो.
4. भात: हा अन्नपदार्थाचा चांगला पर्याय आहे तो आईच्या दुधात बाळाला भरवता येतो.
5. बटाटे: यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते त्यामुळे मॅच केलेल्या बटाट्यामध्ये मीठ घालून बाळाला खाऊ घालू शकतो.
6. गाजर: फायबर चा एक उत्तम स्त्रोत आहे गाजर उकडून मॅश करून त्याचे मुठभर मीठ घालून खाऊ घालायला सुरुवात करावी हा सुद्धा एक अन्नपदार्थाचा उत्तम पर्याय आहे.
7. मटर: हिरवे मटार उकडून पण त्यात थोडे मीठ घालून बाळाला खाऊ घालू शकतो.
8. एवोकॅडो: केळी प्रमाणे हे फळ सुद्धा मऊ असते आणि सहज मॅश होऊ शकते त्यात जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.
6 महिन्यानंतर बाळाचा आहार:
1.तांदूळ किंवा ओट्स मिलचे मिश्रण आईच्या दुधात किंवा फार्मूला मिल्क मध्ये उकळून, गार करून, अगदी मऊ करून बाळाला भरवावे.
2. घरीच तांदूळ आणि मुगाच्या डाळीला स्वच्छ धुऊन, पुसून, वाळत घालून मिक्सरमध्ये त्याचा रवा करावा आणि ती पेज मऊ शिजवून बाळाला देऊ शकतो.
3. वर नाच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून सुख म्हणून देऊ शकतो.
4. वरील प्रमाणे फळे मॅश करून किंवा पल्प करून देऊ शकतो. साधारणतः सहा महिन्याच्या बाळाला जे घनपदार्थ भरवतात त्यात काही वेळा वाढवून 6 ते 8 महिन्याच्या बाळाला घनपदार्थ द्यावेत.
8 ते 11 महिन्यांपर्यंत बाळाचा आहार:
बाळ साधारण सात ते आठ महिन्यांचे झाल्यानंतर त्याच्या हालचाली आई-वडिलांसाठी महत्वपूर्ण असतात याच काळात बाळ खूप करामती करण्यास सुरुवात करतो. हातातला चमचा घेण्याची उत्सुकता असते हीच वेळ असते त्याला नवीन आहार सुरू करण्याची यावेळी आपण त्याला पूरक आहार दिला तर पोषणतत्वे भरून निघतात त्यात तृणधान्य, भाजी ,फळे यांचा समावेश करावा. नाश्त्याला स्तनपान दिले तरी चालेल पण त्यानंतर घनपदार्थ द्यावेत.
1. मूग डाळीची खिचडी मऊ करून त्याला मिळायला सोपी अशी करायला हरकत नाही. किंवा मऊसर भात, गव्हाच्या ओट्स ची लापशी असे पदार्थ द्यावेत.
2. शिजवलेले गाजर किंवा उकडलेला बटाटा थोडासा मीठ घालून रात्री द्यायला हरकत नाही.
3. रात्री झोपताना बाळाला स्तनपान करून झोपवावे.
4. भाज्या, फळे उकडून त्यांचा आहारात समावेश करावा. सुरुवातीला पालक, भोपळा, रताळे, गाजर अशा भाज्या स्वच्छ धुवून उकडून, मॅश करून खाऊ घालाव्यात.
5. फळांमध्ये सफरचंद ,पेरू, केळी, चिकू ही फळे साल काढून, बिया काढून, खरवडून किंवा मॅश करून खाऊ घालावे मात्र एकावेळी एकच फळ द्यावे याप्रमाणे साधारण वेळापत्रक असायला हवे बाळाच्या क्षमतेनुसार त्याचा आहार कमी जास्त करावा. त्याचे पोट भरलेले असेल तर स्तनपान देऊ नये.
एक वर्षाच्या बाळाचा आहार:
ज्याप्रमाणे आपण 11 महिन्यापर्यंत च्या बाळाचे आहाराचे नियोजन केले त्याचप्रमाणे एक वर्षाच्या बाळाला अन्नपदार्थ शिजवताना आपण जे खातो देताना यायला पाहिजे त्यासाठी अन्नपदार्थ बनवताना होण्यासाठी हिंग, सुंठ, जिरेपूड, धनेपूड यांचा वापर करावा. थोडसं जड आणि वेगळं अन्न ते यावेळी खाऊ शकतात. त्यामुळे त्यांना खाऊ घालणं सोपे जाते. या कालावधीत त्यांच्या तक्रारीदेखील चालू होतात. आहारातला बदल त्यांना आवडतो कधी खाताना ते जास्त त्रास देतात तर कधी अजिबात नाही याप्रकारे वेळापत्रक असते. स्तनपानाविषयी बोलायचं झालं तर एक वर्ष पूर्ण होईल परंतु स्तनपान बंद करू नये. पुन्हा सहा महिने वाढवायला काही हरकत नाही म्हणजेच साधारणतः 15 -18 महिने होईपर्यंत आहारात स्तनपानाचा समावेश असावा.
1. नवीन पदार्थ दिल्यावर बाळाला काय पचते हे जाणून घेण्यासाठी एक पदार्थ दोन ते तीनदा देवा आणि त्यावर बाळाची प्रतिक्रिया बघावी.
2. नवीन पदार्थ भरवताना त्याची काही तक्रार वाटले नाही तर त्याचा समावेश बाळाच्या अन्नपदार्थात करावा.
3. सुरुवातीच्या काळात एक पदार्थ फक्त एकदाच भरवावा.
4. बाळ साधारणता एक वर्षाचे होईपर्यंत त्याला मीठ ,साखर, तळलेले पदार्थ, अंड्याचा पांढरा भाग, चहा, कॉफी यासारखे पदार्थ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय देऊ नये.
तर वरील प्रमाणे दिलेली माहिती (लहान बाळाचा आहार) तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला फॉलो करा. आणि ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. त्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा ,शेअर करा…..
धन्यवाद!!
लेखिका: शुभांगी चुनारकर, नागपूर.