पाकिस्तानातील कराची येथे जन्म झालेल्या लालकृष्ण आडवाणी यांचा कराची ते भारतातील सर्वोच्च सन्मान भारतरत्न इथपर्यंतचा प्रवास कसा होता ते आपण आपल्या आजच्या या सदरात पाहणार आहोत. 8 नोव्हेंबर 1927 साली लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म कराची येथील एका उद्योगपती कुटुंबात,किशनचंद डी आडवाणी आणि ग्यानी देवी यांच्या पोटी जन्म झाला.फाळणी नंतर आडवाणी कुटुंब भारतात दाखल झाले. देशभक्तीची प्रेरणा घेऊन राजकारणात दाखल झालेले लालकृष्ण आडवाणी हे भारतातील राजकारणाचा सर्वात मोठा भाग कसे झाले ते आपण आता पाहू.
1) शिक्षण
2) विवाह
3) राजकीय कारकीर्दीला सुरुवात-
4) भाजपचे संस्थापक लालकृष्ण अडवाणी
5) रथयात्रा
6) भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांनी लिहिलेली पुस्तके
7) पंतप्रधान मोदी यांनी केलेले कौतुक-
- लालकृष्ण अडवाणी शिक्षण-
भारतरत्न लालकृष्ण आडवाणी यांचे प्राथमिक शिक्षण हे सिंध कराची इथून घेतले.फाळणीनंतर हे कुटुंब मुंबई येथे स्थायिक झाले. लालकृष्ण आडवाणी यांनी मुंबई येथील लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली.वयाच्या चौदाव्या वर्षी लालकृष्ण आडवाणी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएस मध्ये दाखल झाले.1947 साली ते राजस्थान आरएसएसचे प्रचारक बनले.
आर एस एस चे पूर्ण वेळ कार्यकर्ता बनल्यानंतर लालकृष्ण आडवाणी यांनी आरएसएसच्या विविध शाखा विकसित केल्या .
2) लालकृष्ण अडवाणी विवाह-
25 फेब्रुवारी 1965 मध्ये लाल कृष्ण आडवाणी यांचा विवाह कमला आडवाणी यांच्या सोबत झाला. त्यांना दोन मुले आहेत.
3) लालकृष्ण अडवाणी राजकीय कारकीर्दीला सुरुवात-
वयाच्या चौदाव्या वर्षी जेव्हा भारतरत्न लालकृष्ण अडवाणी आरएसएस मध्ये दाखल झाले,तेव्हाच खरे तर त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली होती.एक संघ कार्यकर्ता ते भारताचे उपपंतप्रधान तसेच सलग तीन दशके राज्यसभा सदस्य,केंद्रीय गृहमंत्री, माहिती व प्रसारण मंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशी एकूण त्यांची सर्व राजकीय कारकीर्द. तळागाळातील कार्यकर्ता म्हणजे लालकृष्ण आडवाणी यांची ओळख. राष्ट्रवादीची प्रेरणा घेऊन राजकारणात दाखल झालेले लालकृष्ण आडवाणी संघासाठी काम करतच भारताचे उपपंतप्रधान बनले.
१९४७ साली राजस्थान आरएसएसचे प्रचारक बनलेले भारतरत्न लालकृष्ण अडवाणी हे डॉक्टर शाम प्रसाद मुखर्जी यांनी स्थापन केलेल्या जनसंघात दाखल झाले. 1957 साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या मदतीसाठी लालकृष्ण आडवाणी यांना दिल्ली येथे पाठविण्यात आले. 1970 साली घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांची राज्यसभा सदस्य निवड झाली. त्यानंतर लगेच 1972 साली लालकृष्ण अडवाणी यांची जनसंघाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली .1975 मध्ये इंदिरा गांधी यांच्या सरकार त्यांच्या सरकार काळात लादण्यात आलेल्या आणीबाणीच्या विरुद्ध लालकृष्ण अडवाणी यांनी आवाज उठवला. या आणीबाणीनंतर 1977 मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा पक्षाने विजय मिळवला,मोरारजी देसाई यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली तर भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री पद भूषवले.
पुढे 1980 मध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. अटल बिहारी वाजपेयी या नवीन पक्षाचे अध्यक्ष होते अयोध्येतील राम मंदिर या विषयावर भारतीय जनता पार्टीने घेतलेल्या भूमिकेचे लालकृष्ण अडवाणी हे चेहरा होते. त्यांनी 1980 मध्ये बाबरी मशिदीच्या जागी राम मंदिर बांधण्यासाठी आंदोलन सुरू केले आणि इथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीने एक नवीन वळण घेतले.
4) भारतीय जनता पार्टीचे संस्थापक लालकृष्ण आडवाणी-
हिंदुत्ववादी विचारसरणीचे असलेले भारतरत्न लालकृष्ण आडवाणी हे राष्ट्रीय स्वयंसेवक आरएसएस राजस्थानचे प्रचारक बनल्यानंतर काही दिवसात ते नवीन स्थापन झालेल्या जनसंघात ते दाखल झाले.पुढे काही दिवसातच नवीन पक्ष भारतीय जनता पार्टी ची स्थापना झाली आणि या स्थापनेमध्ये लाल कृष्ण आडवाणी यांनी मुख्य भूमिका निभावली
5) रथयात्रा-
अयोध्या राम मंदिर उभारणीसाठी भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांनी सुरू केलेले हे आंदोलन आणि या आंदोलनाचे पुढचे स्वरूप म्हणजे त्यांनी सुरू केलेली रथयात्रा. 5 सप्टेंबर 1990 मध्ये सोमनाथ ते आयोध्या पर्यंत रथयात्रा सुरू केली. लालकृष्ण आडवाणी यांनी सुरू केलेल्या या रथयात्रेचे उद्दिष्ट हे होते की कारसेवक आणि स्वयंसेवकांना एकत्रित आणणे .ही रथयात्रा एका गाडीतून निघाली होती, या गाडीला रथाचे स्वरूप देण्यात आले होते.यानंतर लालकृष्ण अडवाणी हे एक हिंदुत्ववादी आक्रमक आणि लढाऊ विचारसरणीचे नेते म्हणून उदयाला आले. तळागाळापासून काम करणे हे भारतरत्न लालकृष्ण आडवाणी यांचे वैशिष्ट्ये.1980 च्या दशकात विश्व हिंदू परिषदेने राम जन्मभूमीच्या जागेवर मंदिर बांधण्यासाठी चळवळ सुरू केली या चळवळीचा भारतरत्न लालकृष्ण अडवाणी हे ओळख बनले होते.
6) भारतरत्न लालकृष्ण अडवाणी-
एक संघ कार्यकर्ता हिंदुत्ववादी विचारसरणी असलेले भारतरत्न लालकृष्ण आडवाणी भारतीय विकासात खूप मोलाचे योगदान दिले आहे. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माझी उपपंतप्रधान लाल कृष्ण आडवाणी यांना सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच भारतरत्न देण्यात आला आहे. 1980 साली स्थापन झालेल्या भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या अध्यक्षपदी जास्त काळ राहिलेले लालकृष्ण अडवाणी हे एकमेव नेते आहेत.खासदार म्हणून सलग तीन दशके त्यांनी संसदेत काम केले.राम मंदिर आंदोलनाचे नेते ही त्यांची ओळख,भारतरत्न लालकृष्ण अडवाणी हे चार वेळा राज्यसभेचे आणि सहा वेळा लोकसभेचे सदस्य राहिले आहेत. भारतरत्न लालकृष्ण अडवाणी 2004 ते 2009 या काळात लोकसभेतील विरोधी पक्ष नेते सुद्धा राहिले.1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर अनेकांनावर आरोप ठेवण्यात आले होते,त्यात लालकृष्ण आडवाणी यांचे देखील नाव होते.नंतर न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले. 1997 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांनी स्वर्णजयंती आशीर्वाद यात्रा काढली होती.लालकृष्ण अडवाणी हे भारतीय जनता पार्टीचे दुसरे मोठे नेते आहेत ज्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न मिळाला आहे.याआधी भाजप नेते दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
7) भारतरत्न लालकृष्ण आडवाणी यांना मिळालेले पुरस्कार-
उत्कृष्ट वक्ते दूरदृष्टीकोन असलेले लालकृष्ण आडवाणी यांना 1999 मध्ये उत्कृष्ट संसद पटू म्हणून सन्मानित करण्यात आले होते.त्यानंतर 2015 मध्ये भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण या सन्मानाने सन्मानित करण्यात आले आणि त्यानंतर आज भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न या सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
8) भारतरत्न लालकृष्ण आडवाणी यांनी लिहिलेली पुस्तके-
नजरबंद लोकतंत्र
माय टेक
राष्ट्र सर्वपरी
दृष्टिकोन
9) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक-
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न सन्मानाने सन्मानित करण्यात येत आहे याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्विट द्वारे दिली. या ट्विटमध्ये भारताच्या विकासात लालकृष्ण अडवाणी यांनी मोठे योगदान दिले आहे. करोडो भारतीयांची राम मंदिर उभारणीचे स्वप्न आज पूर्ण होत आहे हे स्वप्न लालकृष्ण अडवाणी यांनी पाहिले होते.राम मंदिर उभारण्याचे श्रेय हे भारतरत्न लालकृष्ण आडवाणी यांना जाते.
कराची ते भारतरत्न इथपर्यंतचा लालकृष्ण आडवाणी यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे.लालकृष्ण आडवाणी हे एक उत्कृष्ट व्यक्ती,उत्कृष्ट कार्यकर्ते आणि समाजबांधणीसाठी मोलाचे योगदान देणारे नेते आहेत. रथयात्रेच्या माध्यमातून लालकृष्ण आडवाणी यांनी हिंदुत्वाची भावना निर्माण केली. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची राजकीय कारकीर्द ही थक्क करून सोडणारी आहे म्हणूनच भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेमध्ये मोलाचे योगदान करणाऱ्या या ज्येष्ठ नेत्याकडे आदराने पाहिले जाते.
Adv.विनिता झाडे मोहोळकर