स्त्रियांसाठी जीवन विमा कसा निवडावा ? l Life Insurance for Women

WhatsApp Group Join Now

स्त्रियांसाठी जीवन विमा कसा निवडावा ?

 Life Insurance for Women: जीवन विमा हा विमाधारक व्यक्तीच्या आयुष्यात सुरक्षा व मनाची शांती देणारे महत्त्वाचे वित्तीय साधन आहे. याची जाणीव खरे माणसाला अचानक उद्भवलेल्या मोठ्या संकटात जाणवते. जीवन विमा हा एक गुंतवणुकीचा व आर्थिक योजनेचा महत्त्वाचा घटक आहे. जीवन विमा हा फक्त पुरुषांसाठीच बनला गेला आहे हा फार पूर्वीपासूनचा गैरसमज आहे. परंतु तो गृहिणी, आई, नोकरी करणारी स्त्री या सगळ्यांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे स्त्रियांच्या आयुष्यात देखील जीवन विम्याचे महत्त्व हे वाढले आहे. या लेखाचा मुख्य उद्देश हा स्त्रियांना जीवन विमा विषयी माहिती करून देणे व त्याची स्त्रियांनी कशी निवड करावी याची माहिती करून देणे हा आहे.

स्त्रियांसाठी जीवन विमा म्हणजे काय ?

      स्त्रियांसाठी जीवन विमा आर्थिक सुरक्षा देतो. एका चांगल्या जीवन विमा पॉलिसी मधून विमाधारक व्यक्तीला अनपेक्षित परिस्थितीत आर्थिक सुरक्षा मिळते. व्यक्तीचे दीर्घकालीन काही उद्दिष्ट असल्यास ते पूर्ण करायला मदत करतात. तसेच विमाधारक व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबाची आर्थिक सुरक्षा ठेवतात. कुटुंबातील विमाधारक व्यक्तीच्या मृत्यूनंतर विम्याची रक्कम ही परिपक्व झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना दिली जाते. तसेच अनेक विमा कंपन्या ह्या गंभीर आजारांकरिता कव्हरेज देखील देतात. त्यामुळे स्त्रियांसाठी देखील जीवन विमा हा तितकाच महत्त्वाचा आहे.

Life Insurance for Women
Life Insurance for Women

 स्त्रियांसाठी जीवन विमा का महत्वपूर्ण आहे ?

1) उत्पन्नाची सुरक्षा – आजकाल स्त्रिया नुसत्या गृहिणी नसून बरेच कष्टाची कामे देखील करतात. घर सांभाळताना नोकरी देखील सांभाळतात. घरातल्या अर्थव्यवस्थेत त्यांचे मोलाचे योगदान ठरते. स्त्री कमावती असो वा नसो, परंतु तिला उत्पन्नाची सुरक्षा असणे खूप गरजेचे असते. जीवन विमा घेतल्याने स्त्रियांच्या आश्रितांना त्यांच्या अनपेक्षित मरण्याने आर्थिक चणचणींचा सामना करावा लागत नाही.

2) भावुक समस्यांमध्ये मदत होते – एखाद्या प्रियजनाच्या निधनानंतर भावनिक रित्या माणूस थकलेला असतो. अशावेळी जीवन विम्यामुळे कुटुंबाला भरपूर मदत होते. त्याचे मुख्य उद्दिष्ट कुटुंबाचा पुनः निर्माण हाच असतो. 

3) मुलांच्या भविष्यासाठी कव्हरेज – जीवन विमा हा मुलांचे पालन पोषण, शिक्षण, मुलांचे भविष्य या संबंधित खर्चांवर आर्थिक सुरक्षा पोहोचवते. 

4) व्यवसाय साहाय्य – स्त्रिया देखील आजकाल व्यवसाय क्षेत्रात पुढे जात आहेत. व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी देखील जीवन विम्याची स्त्रिया मदत घेऊ शकता. व्यवसायाच्या मालकाचे जरी निधन झाले तरी व्यवसाय हा सतत कार्यरत राहू शकतो.

5) रिटायरमेंट प्लॅनिंग – रिटायरमेंट नंतर स्वतःची आर्थिक स्थिती नीट ठेवण्यासाठी देखील विमा योजनेचा फायदा होतो. रिटायरमेंट नंतर एक पूरक उत्पन्न मिळत असल्यास त्याचे म्हातारपणात चांगली मदत होऊ शकते व जीवन जगण्यास आर्थिक मदत देखील होते. 

स्त्रियांसाठी जीवन विमा पॉलिसी कोणत्या आहेत?

पुढे काही जीवन विमा पॉलिसी दिल्या आहे, ज्या स्त्रिया निवडू शकतात.

1) टर्म लाईफ इन्शुरन्स – टर्म इन्शुरन्स हा व्यक्तीचा मृत्यूनंतर त्याचा कुटुंबाची काळजी घेतो. हे पैसे व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या नॉमिनीला मिळतात. यात कुटुंबातील इतर लोकांची आर्थिक काळजी घेतली जाते. परंतु मुदतीनंतर जर विमाधारक व्यक्ती ही जिवंत असेल तर त्यांना मात्र याचा लाभ होत नाही. त्यामुळे स्त्रियांना आपल्या पश्चात कुटुंबाच्या आर्थिक समस्या सोडवायच्या असल्यास ही पॉलिसी निवडू शकता.(Life Insurance for Women)

     घरातली कर्ती व्यक्ती ही आपल्या कुटुंबीयांचा आर्थिक गरजा भागवत असते. टर्म इन्शुरन्स मध्ये कमी हफ्त्यात मोठा फायदा मिळतो. टर्म इन्शुरन्सचा हप्ता तुलनेने कमी असतो. ज्याच्या नावावर टर्म इन्शुरन्स आहे त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या नॉमिनीला विम्याची ही सगळी रक्कम मिळते. मुदत पूर्ण होईपर्यंत विम्याचा हप्ता देखील एकच राहतो. काही टर्म प्लान बरोबर रायडर बेनिफिट देखील मिळतात. म्हणजे थोडा जास्त हप्ता भरला की आरोग्य विम्याचे फायदे देखील त्यात मिळू शकतात. यात फक्त एकाच गोष्टीची भीती असते ती म्हणजे जर एखादा हप्ता चुकला तर विमा पॉलिसी ही रद्द होऊ शकते. त्यामुळे हप्ता नियमित भरणे हे गरजेचे असते.

2) कायमस्वरूपी जीवन विमा – यात केवळ मृत्यू लाभच मिळत नाही. परंतु बचत व रोख रक्कम देखील मिळते. याचा उपयोग पॉलिसीधारक अनेक प्रकारे करू शकतात. यात विमाधारकाच्या संपूर्ण आयुष्यभर हप्त्याची रक्कम ही समान असते. यात एकंदरीत बचत होते. पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तर नॉमिनीला विम्याची रक्कम मिळते. अनेक परिस्थितीत ते करमुक्त असते. तसेच ही रक्कम रोख स्वरूपात मिळू शकते.

3) संपूर्ण जीवन विमा – (Whole life Insurance Policy)  ही एक पारंपारिक जीवन विमा पॉलिसी आहे. यात विमाधारकाचे संपूर्ण आयुष्य कवर होते. यात जवळपास 99 वर्षांपर्यंत सर्व संरक्षण दिले जाते.  शंभर वर्षांमध्ये ही पॉलिसी परिपक्व झाल्यावर परिपक्वतेचा पूर्ण लाभ पॉलिसी धारकाला मिळतो. यात विमाधारक व्यक्तीच्या निधनानंतर नॉमिनीला पॉलिसीची रक्कम मिळते. यात हप्ते भरण्याचे दोन प्रकार पाहायला मिळतात. अ) व्यक्ती संपूर्ण आयुष्य साठी प्रीमियम भरू शकते. ब) मर्यादित कालावधीसाठी प्रीमियम भरू शकते. परंतु दोन्ही प्रकारात व्यक्तीला आजीवन संरक्षण मिळते. तसेच पॉलिसी परिपक्व लाभ हा पूर्णपणे करमुक्त असतो. तसेच विमाधारक व्यक्तीच्या मृत्यूनंतर नॉमिनीला बोनस सह विम्याचा लाभ मिळतो. तसेच पॉलिसी परिपक्व झाल्यानंतर सर्व्हायवलं बेनिफिट देखील मिळतो.

4) सार्वत्रिक जीवन विमा – (Universal Life Insurance Policy) यात पॉलिसी धारकांना विमा संरक्षणासोबत गुंतवणुकीचा पर्याय देखील उपलब्ध असतो. ही भारतातील लोकप्रिय विमा पॉलिसी आहे. कारण याच प्रीमियमची रक्कम व मृत्यूनंतर लाभ हे दोन्ही निवडण्याची संधी असते. यात जे प्रीमियम भरायचे असते ते दोन भागांमध्ये विभागले जातात. एक भाग जीवन विमा योजनेत तर दुसरा भाग गुंतवणूक खात्यात. तुम्हाला किती प्रीमियम भरायचा आहे हे तुमच्या हातात असते. प्रीमियम हे संपूर्णपणे मृत्यूनंतर मिळणारा लाभ, वय आणि आरोग्य यावर अवलंबून असते. याचा फायदा म्हणजे पॉलिसीधारक जो प्रीमियम भरतो त्याचा एक भाग रोख मूल्यांमध्ये गुंतवला जात असल्याने तो नंतरच्या आयुष्यात विम्याचा भरणा करण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो. तसेच यात भरले जाणारे प्रीमियम हे कर सवलत देते. तसेच पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला जी रक्कम मिळते ती करमुक्त असते. तसेच युनिव्हर्सल लाईफ इन्शुरन्स पॉलिसीला दुसऱ्या प्रकारच्या जीवन विमा पॉलिसीमध्ये रूपांतरित करता येऊ शकते. जर तुमच्या गरजा, परिस्थिती बदलली असेल आणि वेगळ्या प्रकारचे धोरण जर तुमच्या गरजा पूर्ण करू शकत असेल, तर हा तुमच्यासाठी अगदी उत्तम पर्याय असू शकतो.

कोणतीही विमा पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी विचारात घेण्यासारखे घटक 

1) तुमचे वय आणि आरोग्य – जर तुमचे वय जास्त असेल किंवा तुम्हाला काही आरोग्य समस्या असल्यास हप्त्याची रक्कम ही वाढू शकते.

 2) कव्हरेज मिळते – तुमचे उत्पन्न, कर्जे व तुमच्यावर अवलंबून असणारे कुटुंबातील सदस्य यांच्या संख्येवर हे अवलंबून असते.

3) प्रीमियम – तुम्ही दरमहा किती हप्ता भरू शकता याचा विचार केला पाहिजे. 

4) गुंतवणुकीचे पर्याय – तुम्हाला बचत करायचे असल्यास तसा पर्याय उपलब्ध आहे का याचा विचार केला पाहिजे.

5) सरेंडर शुल्क – तुमची पॉलिसी रद्द केल्यानंतर किंवा रोख रक्कम काढण्याचा विचार केल्यास किती सरेंडर शुल्क लागू शकते हे सगळे समजून घेतले पाहिजे.

कोणत्या स्त्रियांनी जीवन विमा हा पर्याय निवडला पाहिजे?

प्रत्येक स्त्रीचे जीवनातील उद्दिष्ट हे वेगवेगळे असतात. त्यामुळे जीवन विमा हा त्यांच्यासाठी एक उत्तम आधार असू शकतो.

1) गृहिणीसाठी जीवन विमा – गृहिणीचे प्रत्यक्ष उत्पन्न दिसत नसले तरी त्यांचे घर चालवण्यात खूप मोठे योगदान असते. घर चालवण्यापासून ते मूळ सांभाळणे, मोठे करणे यात स्त्रीचे मोलाचे सहाय्य असते. एकंदरीत संपूर्ण कुटुंब हे घरातील गृहिणींवर अवलंबून असते. त्यामुळे गृहिणीने सुद्धा जीवन विमा हा निवडणे गरजेचे असते. कारण अचानक झालेला स्त्रीच्या मृत्यूने कुटुंबाची आर्थिक स्थिती कोलमडून जाते. अशावेळी जर विमा पॉलिसी असेल तर त्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते.

2) नोकरदार महिलांसाठी जीवन विमा – ज्या स्त्रिया नोकरी करतात, त्यांना या जीवन विम्याची आपले उत्पन्न स्थिर करण्याकरिता मदत होते. त्यामुळे त्यांच्या अचानक झालेला मृत्यूमुळे मिळालेल्या पॉलिसी मधून त्यांच्या कुटुंबाची आर्थिक उद्दिष्ट पूर्ण होऊ शकतात.

3) जोडीदारासाठी जीवन विमा – विवाहित स्त्री काम करत असो वा नसो, आपल्या जोडीदाराला आपल्या नंतर मदत व्हावी याकरता जीवन विमा याचा विचार करू शकता. या विमा पॉलिसीमुळे स्त्रीच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे जोडीदारावर असलेले कर्ज , तसेच भविष्यातील उद्दिष्ट पूर्ण करण्यास मदत होऊ शकते.

4) आईसाठी जीवन विमा – मुलांचे संगोपन, पालन-पोषण करण्यामध्ये आईचा हा मोठा वाटा असतो. जीवन विमा मुळे मुलांचे शिक्षण, तब्येतीची देखभाल व इतर गरजांसाठी आर्थिक मदत होते. आईच्या मृत्यूनंतरही मुलांचे भविष्य हे सुरक्षित राहू शकते.

      थोडक्यात आजच्या जगामध्ये स्त्रियांसाठी आर्थिक भविष्य हे सुरक्षित राहण्याकरता जीवन विमा हे एक महत्त्वाचे साधन आहे. स्त्रीच्या समोर असणाऱ्या वेगवेगळ्या समस्या व तसेच स्त्रीच्या अचानक मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबासमोर उभे राहणारे प्रश्न याचा सामना जीवन विमा मुळे होऊ शकतो. जीवन विम्यामुळे स्त्रीला मनःशांती सोबत भविष्यात संबंधित एक सुरक्षा मिळू शकते. त्यामुळे स्त्री ही आत्मविश्वासी व भविष्याविषयी चिंता मुक्त होऊ जीवन.

तुम्हाला Life Insurance for Women हा माहितीपूर्ण लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. हा लेख आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशीच माहिती, कथा जाणून घेण्यासाठी आमचा ‘लेखक मित्र’ वेबसाईटला नक्की भेट द्या व आमचा whatspp ग्रुप जॉईन करा.

धन्यवाद….

2 thoughts on “स्त्रियांसाठी जीवन विमा कसा निवडावा ? l Life Insurance for Women”

  1. मी स्वतः insurance sector मध्ये काम करते . याबद्दल विषयाबद्दल फारच कमी वेळा बोलले किंवा लिहिले जाते. आजच्या काळात स्त्रियांनी खरच या गोष्टी वर विचार करून निर्णय घेण्याची गरज आहे.
    मिडल क्लास मध्ये फार कमी माहिती आहे किंवा स्वतः स्त्रियांनी हा दृष्टीकोन बदलला पाहिजे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top