Marathi Emotional Story – म्हातारपण नगं देगा देवा….

WhatsApp Group Join Now

” माझी मम्मा “

” नाही माझी मम्मा,”

” अरे भांडू नका रे, मी दोघांचीही मम्मा.”

” नाही फक्त माझी “

” ए जा फक्त माझी ” 

 ” मम्मा तू कोणाची सांग बरं?”

” दोघांचीही रे.”

” मी तुला सोडून कधीच नाही जाणार. तू पण मला सोडू नको.”

Marathi Emotional Story

” अजिबात नाही मी कुठे जाते का ? अरे पळू नका पडाल, पडलेचं बघा.”

धप्प

” सांगितलं होतं रे पळू नका पडलात ना ?”

” आई ग !” असं म्हणत सुनीता ताईंनी हळूचं डोळे उघडत सगळीकडे नजर फिरवली. जो हात मुलांना अडवायला उचलला होता तो हात चष्मा शोधायला जमिनीवरून फिरवू लागल्या. चष्मा लावून लुकलूकत्या डोळ्यांनी बघायचा प्रयत्न करताना आतापर्यंत पुसटसं दिसत असलेलं वास्तव आता त्यांना ठळकपणे दिसू लागलं. आजूबाजूला पांढरीशुभ्र फरशी आणि समोर सताड उघडं असलेलं दार आणि छतावर फिरणारा गर गर फॅन.

” हात्त्तिच्या ! आजही मीच पडले होय पलंगावरून ?” असं म्हणत स्वतःला सावरत सुनीता ताई उठून बेडवर बसल्या. हाताला लागलं होतं; पण त्यावर स्वतःचं फुंकर मारण्याखेरीज इलाज नव्हता. बेडजवळ असलेल्या रॅकमधून बाम काढून त्या मुक्या मारावर मुक्याने चोळत बसल्या. ” हा मार बरा होईल पण मनावरचा मार ? त्यावर चोळणारं बाम कुठून आणू ?” हा प्रश्न जवळपास रोजचाचं त्यांचा स्वतःलाच.

वेदनेने कण्हत त्या दहा बाय दहाच्या खोलीत बेडवरुन खाली पडलेल्या असल्याने पुन्हा वर उठून बसत बेडवर आडव्या झाल्या.

विचार करत करतचं त्या झोपी गेल्या.

सुनीता ताईंना दोन जुळी मुलं होती. मुलं लहान असताना सुनीता ताईंनी त्यांच्या जडणघडणीसाठी नोकरी सोडायचा निर्णय घेतला होता आणि तोच निर्णय त्यांना फार महागात पडला.

मुलं मोठी झाली, शिकली, चांगल्या नोकरीला लागली. मुळात स्वतंत्र झाली. दोन वर्षांपूर्वी सुनीता ताईंचे मिस्टर वारले त्यानंतर मुलांची लग्न झाली. सर्व काही कुशल मंगल; पण कालांतराने दोन्ही भावांनी वेगळं राहायचा निर्णय घेतला. सुनीता ताईंनी स्वतः जवळ असलेले पैसे, दागदागिने आधीच सुनांना देऊन स्वतःला मोकळं केलं होतं. मोकळं कसलं रिक्तच केलं होतं.

त्यानंतर सुनीता ताई कधी या मुलाकडे तर कधी त्या मुलाकडे राहू लागल्या.

” बाई सुनीता एखादी लेक झाली असती तर ग ? “,मावशी म्हणालीचं होती.

” काय करायचंय ? दोन सुना आहेत ना त्या माझ्या लेकीचं.”

असं म्हणणाऱ्या सुनीता ताई त्यांना कुठे माहिती होतं की त्यांना पुढे स्वतः पासून थोडक्यात त्यांच्या आईपणापासून मुलांद्वारे सोयीस्कररित्या दूर करण्यात येणार होतं. दोघं भाऊ रोज भांडायची,” तुझी आई आहे ना तुझ्याकडे राहू दे.”

” का रे तुझी नाही का ? तुला काय त्रास होतो तिचा ? तुझ्याचकडे राहूदे. ” असे सूर घरातून ऐकू येऊ लागले.

” मला झेपत नाही जास्तीचा खर्च. तुला पगार जास्त आहे तुझ्याकडे ठेव.” एका भावाचं म्हणणं.

” तुझा फ्लॅट मोठा आहे राहूदे तुझ्याचकडे.” दुसऱ्याचं म्हणणं.

“अरे दोघांकडे राहते ना मी.”आईचं म्हणणं.

” तू गप्प बस ग तुला काय कळतं ? तुझा काय कमी खर्च आहे का ?”

” अरे ! पण मी तर काहीचं खर्च करत नाही.” सुनीता ताई.

” हो ना ! जेवण, दवाखान्याचा खर्च कुठून येतो ?” इति मुलं.

” जेवण ?अरे पोट आहे तर लागणारचं ना रे जेवण. तुम्ही जेवण देखील मोजू लागलात ? आणि मला काय कळतं ? अरे मी आई आहे ना मला कळत नाही ? “,सुनीता ताई मुलांशी कळवळीने बोलायच्या.

” एक काम करू, ना तुझं ना माझं, आईला वृद्धाश्रमात ठेऊ तिचे पैसे दोघे मिळून भरु चालेल ?” मुले म्हणाली.

 ” हो चालेल डन.” दोघेही भाऊ तयार झाले आणि 

सुनांनी तर काय आनंदाने शिक्कामोर्तबचं केले.

” अरे पण मला तर विचारा जायचं का म्हणून ? नाही जायचंय मला, नाही जायचंय. नका रे दूर करु तुमच्यापासून मला. मी नाही राहू शकणार रे.” सुनीता ताई तरी कोणासमोर जीव तोडून बोलत होत्या ? त्यांना माहिती होतं बोलून काही उपयोग होणार नाही तरी त्या बोलत राहिल्या.

 “ तुम्हाला आठवतं ? बाबा तुम्हाला हॉस्टेलला घालणार होते; पण तुमची इच्छा नव्हती. जेवण चांगलं नव्हतं तिथे आणि मला सोडून राहायला तुम्ही तयार नव्हतात. तुम्ही दूर जाऊ नये म्हणून मी विरोधात गेली बाबांच्या. तुमच्या इच्छेचा विचार केला. जेव्हा शिक्षणासाठी शहर सोडायची वेळ आली मी तुमच्यासोबत घर सोडून भाड्याच्या घरात राहायला आले. नवं शहर, नवी जागा; पण मी कधी तक्रार केली नाही. नोकरी सोडून फक्त तुम्ही घडावे म्हणून प्रयत्न केला रे. मी कशी राहू एकटी ?

तुम्ही दोघे म्हणायचे ना माझी मम्मा, माझी मम्मा. मग आज असं काय झालं रे ? की म्हणता, तुझी मम्मा, ही तुझी मम्मा. काय चुकलं रे माझं एवढं ? मला राहू द्या ना तुमच्यासोबत. मी एका कोपऱ्यात राहीन. कसलीही तक्रार करणार नाही का काही मागणार पण नाही. राहिला प्रश्न जेवणाचा तर हवतर एकवेळेस जेवण द्या खाईन मी तेवढंच. एकचं चपाती द्या. खर्च नाही होणार जास्त. तो घरात कुत्रा पाळलाय त्याला पोटभर जेवण द्या. दवापाणी करा त्याचं. मी काहीही म्हणणार नाही पण मला डोळ्यांसमोरून दूर नका करू रे. तुम्हाला बघत बघत आयुष्य काढलं आहे मी. बाबा गेले तरी तुम्ही दोन भक्कम आधार आहात म्हणून स्वतःला सावरलं त्या दुःखातून आणि आज तुम्ही दोघे असे कसे वागू शकता ?

टिफिनमध्ये एक दिवस जरी भाजी आवडली नाही तरी घरी येऊन कुरबुर करायचे तुम्ही दोघं मला हे करून दे, ते करून दे सारखा हट्ट असायचा. सकाळी लवकर उठून डब्बे करून द्यायची तेव्हा तुमचा आनंदी चेहरा पाहून सर्व ताण पळून जायचा रे. रोज डब्ब्यात काय देऊ काय नाही यातचं अर्धा मेंदू खर्च व्हायचा माझा. तेव्हा मला किती धारेवर धरायचे रे तुम्ही दोघे तुला लक्षात कसं राहत नाही म्हणून; पण का तसं व्हायचं आईची एनर्जी कुठे जातेय याचा विचार नाही केला कधी ? अर्थात तुम्हांला बोलून तर काय फायदा तर नाही. मी तरी कुठे लक्ष दिलं स्वतःकडे ?

जोपर्यंत मोठं व्हायचं असतं, गरज असते तोपर्यंत आईबाबा हवे असतात तुम्हाला. जगात येण्यासाठीचं फक्त एक माध्यम. मोठे झाले, स्वतंत्र झाले की आईबाबा अडगळ होते हो ना ?

अरे ! आईबाबा मोठं व्हायचं माध्यम नाही तर आईबाबा आयुष्यभराची मायेची शिदोरी असते कधीही न संपणारी. लहानपणी काढलेलं आजारपणं, जागरणं, तुमच्यासाठी सोडलेली नोकरी, फक्त तुम्ही आणि तुमचं शिक्षण यासाठी झटणारे आई बाबा आता नकोसे होतात का ? 

 तुम्ही, तुमचं कुटुंब राहा ना आनंदात आम्ही कुठे मध्ये येतो ? माझी मम्मा ते तुझी मम्माच्या प्रवासात दिलेले संस्कारमूल्य, चांगलेपणा , पुण्याई कुठे उडून जाते रे बाळांनो ?

तुम्ही तर नेऊन टाकता आम्हाला वृद्धाश्रमात; पण झुरतात तिथे आईबाबा. झुरुन झुरुन जीर्ण होऊन मरतात. वृद्धाश्रम नावाच्या पिंजऱ्यात. अगदी त्या पिंजऱ्यातल्या पोपटासारखे. सगळी सोय असते अगदी सगळी; पण तुम्ही नसता ना रे तिथे. एक एक दिवस मोजतात फक्त आयुष्याच्या शेवटाचा. नका रे, नऊ महिने सोसलेल्या, आर्थिक, मानसिक, भावनिक, शारीरिक त्रासाच्या तपश्चर्येंची अशी फळं देऊ आम्हाला.

तुम्ही पण उद्या आईबाबा होणारचं ना ? ही वेळ तुमच्यावर आली तर तयार रहा.

आणि हो बरोबर बोललास आईला कुठे काय कळतं ? अरे तिला तिचीचं लेकरं कळलेली नसतात मग अजून दुसरं काय कळावं तिला ?”

सुनीता ताईनी कितीही जीवाच्या आकांतांनी समजावलं असलं तरीही भावनांच्या पार्थिवाला पाझर फुटणार होता का ? कधीच नाही.

  मग काय शेवटी मिळाली त्यांना ऍडमिशन वृद्धाश्रम नावाच्या विद्यापीठात कारण त्यांच्याजवळ डिग्री होती ना म्हातारपणाची. 

” ठाक – ठाक ! चला जेवायची वेळ झालीय.”

 दारावर वाजवून वृद्धाश्रमातली सिस्टर निघून गेली.

जेवण ?

 सुनीता ताईंच्या प्रेमाची, मायेची भूक अन्न कुठे भागवणार होतं ? सुनीता ताई बेडवर झोपल्या होत्या त्या परत कधी जेवायला ना परत कधीही उठायला. 

म्हातारपण खरोखरचं नगं देगा देवा….

तुम्हाला हि कथा कशी वाटली… अश्याच अनेक वेगवेगळ्या कथा वाचण्यासाठी वेबसाईट ला अवश्य भेट द्या… आपल्या मैत्र परिवारासोबत शेयर करायला विसरू नका…

ऍड. रश्मी दर्शन कोळगे 

फ्लॅट नं.5, प्रणव सोसायटी, वनाज कॉर्नर, कोथरूड, पुणे….

म्हातारपण नगं देगा देवा….

” माझी मम्मा “

” नाही माझी मम्मा,”

” अरे भांडू नका रे, मी दोघांचीही मम्मा.”

” नाही फक्त माझी “

” ए जा फक्त माझी ” 

 ” मम्मा तू कोणाची सांग बरं?”

” दोघांचीही रे.”

” मी तुला सोडून कधीच नाही जाणार. तू पण मला सोडू नको.”

” अजिबात नाही मी कुठे जाते का ? अरे पळू नका पडाल, पडलेचं बघा.”

धप्प

” सांगितलं होतं रे पळू नका पडलात ना ?”

” आई ग !” असं म्हणत सुनीता ताईंनी हळूचं डोळे उघडत सगळीकडे नजर फिरवली. जो हात मुलांना अडवायला उचलला होता तो हात चष्मा शोधायला जमिनीवरून फिरवू लागल्या. चष्मा लावून लुकलूकत्या डोळ्यांनी बघायचा प्रयत्न करताना आतापर्यंत पुसटसं दिसत असलेलं वास्तव आता त्यांना ठळकपणे दिसू लागलं. आजूबाजूला पांढरीशुभ्र फरशी आणि समोर सताड उघडं असलेलं दार आणि छतावर फिरणारा गर गर फॅन.

” हात्त्तिच्या ! आजही मीच पडले होय पलंगावरून ?” असं म्हणत स्वतःला सावरत सुनीता ताई उठून बेडवर बसल्या. हाताला लागलं होतं; पण त्यावर स्वतःचं फुंकर मारण्याखेरीज इलाज नव्हता. बेडजवळ असलेल्या रॅकमधून बाम काढून त्या मुक्या मारावर मुक्याने चोळत बसल्या. ” हा मार बरा होईल पण मनावरचा मार ? त्यावर चोळणारं बाम कुठून आणू ?” हा प्रश्न जवळपास रोजचाचं त्यांचा स्वतःलाच.

वेदनेने कण्हत त्या दहा बाय दहाच्या खोलीत बेडवरुन खाली पडलेल्या असल्याने पुन्हा वर उठून बसत बेडवर आडव्या झाल्या.

विचार करत करतचं त्या झोपी गेल्या.

सुनीताताईंना दोन जुळी मुलं होती. मुलं लहान असताना सुनीता ताईंनी त्यांच्या जडणघडणीसाठी नोकरी सोडायचा निर्णय घेतला होता आणि तोच निर्णय त्यांना फार महागात पडला.

मुलं मोठी झाली, शिकली, चांगल्या नोकरीला लागली. मुळात स्वतंत्र झाली. दोन वर्षांपूर्वी सुनीता ताईंचे मिस्टर वारले त्यानंतर मुलांची लग्न झाली. सर्व काही कुशल मंगल; पण कालांतराने दोन्ही भावांनी वेगळं राहायचा निर्णय घेतला. सुनीता ताईंनी स्वतः जवळ असलेले पैसे, दागदागिने आधीच सुनांना देऊन स्वतःला मोकळं केलं होतं. मोकळं कसलं रिक्तच केलं होतं.

त्यानंतर सुनीता ताई कधी या मुलाकडे तर कधी त्या मुलाकडे राहू लागल्या.

” बाई सुनीता एखादी लेक झाली असती तर ग ? “,मावशी म्हणालीचं होती.

” काय करायचंय ? दोन सुना आहेत ना त्या माझ्या लेकीचं.”

असं म्हणणाऱ्या सुनीता ताई त्यांना कुठे माहिती होतं की त्यांना पुढे स्वतः पासून थोडक्यात त्यांच्या आईपणापासून मुलांद्वारे सोयीस्कररित्या दूर करण्यात येणार होतं. दोघं भाऊ रोज भांडायची,” तुझी आई आहे ना तुझ्याकडे राहू दे.”

” का रे तुझी नाही का ? तुला काय त्रास होतो तिचा ? तुझ्याचकडे राहूदे. ” असे सूर घरातून ऐकू येऊ लागले.

” मला झेपत नाही जास्तीचा खर्च. तुला पगार जास्त आहे तुझ्याकडे ठेव.” एका भावाचं म्हणणं.

” तुझा फ्लॅट मोठा आहे राहूदे तुझ्याचकडे.” दुसऱ्याचं म्हणणं.

“अरे दोघांकडे राहते ना मी.”आईचं म्हणणं.

” तू गप्प बस ग तुला काय कळतं ? तुझा काय कमी खर्च आहे का ?”

” अरे ! पण मी तर काहीचं खर्च करत नाही.” सुनीता ताई.

” हो ना ! जेवण, दवाखान्याचा खर्च कुठून येतो ?” इति मुलं.

” जेवण ?अरे पोट आहे तर लागणारचं ना रे जेवण. तुम्ही जेवण देखील मोजू लागलात ? आणि मला काय कळतं ? अरे मी आई आहे ना मला कळत नाही ? “,सुनीता ताई मुलांशी कळवळीने बोलायच्या.

” एक काम करू, ना तुझं ना माझं, आईला वृद्धाश्रमात ठेऊ तिचे पैसे दोघे मिळून भरु चालेल ?” मुले म्हणाली.

 ” हो चालेल डन.” दोघेही भाऊ तयार झाले आणि 

सुनांनी तर काय आनंदाने शिक्कामोर्तबचं केले.

” अरे पण मला तर विचारा जायचं का म्हणून ? नाही जायचंय मला, नाही जायचंय. नका रे दूर करु तुमच्यापासून मला. मी नाही राहू शकणार रे.” सुनीता ताई तरी कोणासमोर जीव तोडून बोलत होत्या ? त्यांना माहिती होतं बोलून काही उपयोग होणार नाही तरी त्या बोलत राहिल्या.

 “ तुम्हाला आठवतं ? बाबा तुम्हाला हॉस्टेलला घालणार होते; पण तुमची इच्छा नव्हती. जेवण चांगलं नव्हतं तिथे आणि मला सोडून राहायला तुम्ही तयार नव्हतात. तुम्ही दूर जाऊ नये म्हणून मी विरोधात गेली बाबांच्या. तुमच्या इच्छेचा विचार केला. जेव्हा शिक्षणासाठी शहर सोडायची वेळ आली मी तुमच्यासोबत घर सोडून भाड्याच्या घरात राहायला आले. नवं शहर, नवी जागा; पण मी कधी तक्रार केली नाही. नोकरी सोडून फक्त तुम्ही घडावे म्हणून प्रयत्न केला रे. मी कशी राहू एकटी ?

तुम्ही दोघे म्हणायचे ना माझी मम्मा, माझी मम्मा. मग आज असं काय झालं रे ? की म्हणता, तुझी मम्मा, ही तुझी मम्मा. काय चुकलं रे माझं एवढं ? मला राहू द्या ना तुमच्यासोबत. मी एका कोपऱ्यात राहीन. कसलीही तक्रार करणार नाही का काही मागणार पण नाही. राहिला प्रश्न जेवणाचा तर हवतर एकवेळेस जेवण द्या खाईन मी तेवढंच. एकचं चपाती द्या. खर्च नाही होणार जास्त. तो घरात कुत्रा पाळलाय त्याला पोटभर जेवण द्या. दवापाणी करा त्याचं. मी काहीही म्हणणार नाही पण मला डोळ्यांसमोरून दूर नका करू रे. तुम्हाला बघत बघत आयुष्य काढलं आहे मी. बाबा गेले तरी तुम्ही दोन भक्कम आधार आहात म्हणून स्वतःला सावरलं त्या दुःखातून आणि आज तुम्ही दोघे असे कसे वागू शकता ?

टिफिनमध्ये एक दिवस जरी भाजी आवडली नाही तरी घरी येऊन कुरबुर करायचे तुम्ही दोघं मला हे करून दे, ते करून दे सारखा हट्ट असायचा. सकाळी लवकर उठून डब्बे करून द्यायची तेव्हा तुमचा आनंदी चेहरा पाहून सर्व ताण पळून जायचा रे. रोज डब्ब्यात काय देऊ काय नाही यातचं अर्धा मेंदू खर्च व्हायचा माझा. तेव्हा मला किती धारेवर धरायचे रे तुम्ही दोघे तुला लक्षात कसं राहत नाही म्हणून; पण का तसं व्हायचं आईची एनर्जी कुठे जातेय याचा विचार नाही केला कधी ? अर्थात तुम्हांला बोलून तर काय फायदा तर नाही. मी तरी कुठे लक्ष दिलं स्वतःकडे ?

जोपर्यंत मोठं व्हायचं असतं, गरज असते तोपर्यंत आईबाबा हवे असतात तुम्हाला. जगात येण्यासाठीचं फक्त एक माध्यम. मोठे झाले, स्वतंत्र झाले की आईबाबा अडगळ होते हो ना ?

अरे ! आईबाबा मोठं व्हायचं माध्यम नाही तर आईबाबा आयुष्यभराची मायेची शिदोरी असते कधीही न संपणारी. लहानपणी काढलेलं आजारपणं, जागरणं, तुमच्यासाठी सोडलेली नोकरी, फक्त तुम्ही आणि तुमचं शिक्षण यासाठी झटणारे आई बाबा आता नकोसे होतात का ? 

 तुम्ही, तुमचं कुटुंब राहा ना आनंदात आम्ही कुठे मध्ये येतो ? माझी मम्मा ते तुझी मम्माच्या प्रवासात दिलेले संस्कारमूल्य, चांगलेपणा , पुण्याई कुठे उडून जाते रे बाळांनो ?

तुम्ही तर नेऊन टाकता आम्हाला वृद्धाश्रमात; पण झुरतात तिथे आईबाबा. झुरुन झुरुन जीर्ण होऊन मरतात. वृद्धाश्रम नावाच्या पिंजऱ्यात. अगदी त्या पिंजऱ्यातल्या पोपटासारखे. सगळी सोय असते अगदी सगळी; पण तुम्ही नसता ना रे तिथे. एक एक दिवस मोजतात फक्त आयुष्याच्या शेवटाचा. नका रे, नऊ महिने सोसलेल्या, आर्थिक, मानसिक, भावनिक, शारीरिक त्रासाच्या तपश्चर्येंची अशी फळं देऊ आम्हाला.

तुम्ही पण उद्या आईबाबा होणारचं ना ? ही वेळ तुमच्यावर आली तर तयार रहा.

आणि हो बरोबर बोललास आईला कुठे काय कळतं ? अरे तिला तिचीचं लेकरं कळलेली नसतात मग अजून दुसरं काय कळावं तिला ?”

सुनीता ताईनी कितीही जीवाच्या आकांतांनी समजावलं असलं तरीही भावनांच्या पार्थिवाला पाझर फुटणार होता का ? कधीच नाही.

  मग काय शेवटी मिळाली त्यांना ऍडमिशन वृद्धाश्रम नावाच्या विद्यापीठात कारण त्यांच्याजवळ डिग्री होती ना म्हातारपणाची. 

” ठाक – ठाक ! चला जेवायची वेळ झालीय.”

 दारावर वाजवून वृद्धाश्रमातली सिस्टर निघून गेली.

जेवण ?

 सुनीता ताईंच्या प्रेमाची, मायेची भूक अन्न कुठे भागवणार होतं ? सुनीता ताई बेडवर झोपल्या होत्या त्या परत कधी जेवायला ना परत कधीही उठायला. 

म्हातारपण खरोखरचं नगं देगा देवा….

तुम्हाला ही कथा कशी वाटली… अश्याच अनेक वेगवेगळ्या कथा वाचण्यासाठी वेबसाईट ला अवश्य भेट द्या… आपल्या मैत्र परिवारासोबत शेयर करायला विसरू नका…

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. लेखिकेने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखिकेच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)

6 thoughts on “Marathi Emotional Story – म्हातारपण नगं देगा देवा….”

  1. सौ. राधिका जोशी

    डोळ्याच्या कडा ओलावणारी सुंदर कथा👌👌

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top