Marathi Emotional Story2024 : पहाट झाली .रात्रभर गारठलेल्या पाखरांनी आपले अंग झाडली . त्यांच्या चिव -चिवाटान रान गजबजुन गेली . तशी महादूला जाग आली, त्यानं रखमाला हलवलं .रखमा कंबर पकडून या कुशीवरून त्या कुशीवर झाली. तिच्या कमरेत जीव राहिला नव्हता, पाय फुन – फुन करत होत .आदल्या दिवशी तिनं पाटलाच्या वावरात जास्तीचं काम केलं होतं ,किती दिवसाची लागलेली गरिबीची वाळवी काढण्यासाठी दोघांचाही आटापिटा!
आग रखमा ,काय होतंय तुला,अशी का लोळत राहिली आ… कामाला नाय जायचं व्हय.आव जायच हाय . पण आंग कसं जड पडलया बघा , पार उठाया आवाखा राहिला नाही. असं म्हणत रखमा कंबर पकडून कशीबशी उभी राहिली, कंबर थोडी इकडं तिकडं वळवली .केस नीट करून करकचून अंबाडा बांधला आणि तोंडावर पाणी मारून कामाला लागली. महादून चूळ भरली आणि रखमाला म्हणाला वाईस थोडा ‘चा ‘टाक मी बैलास वैरण घालतोया रखमा ‘ हा ‘करत सरपणाची मुळी आणायला गेली ,सरपान आणून रखमान चुलीच्या कोपऱ्यात आदळल .काही काटक्या चुलीत कोंबून तिने चूल पेटवली.
अंधार अजूनही दाटच होता, नाही म्हणून तांबड फुटलं होतं, हवेतला गारवा चांगलाच वाढला होता, अधून -मधून थंड हवेची झुळूक येत होती, रखमा पदर अंगाला गुंडाळून चुलीपुढे बसली होती , चुलीच्या जा ळा चा उजेड तिच्या चेहऱ्यावर तळत होता. त्यात तिचा चेहरा लक्ख उजळला होता. झाला का ग चहा अंगावरची कपडे झटकत महादू म्हणाला, हा म्हणत राखमानं मांडणीवरची चेपलेली पितळी घेतली, आणि त्यात चहा गाळला गरम गरम चहाच्या वाफा गारठलेल्या हवेत मिसळत होत्या ,महादू चुलीपुढे आला आणि तो चुलीला पाय लावून शेकत बसला. रखमान पितळी महादू कडे सरकवली त्यानं पितळी तोंडाला लावली आणि फुरका मारून तो चहा पिऊ लागला, तुला नाही चहा घेतला महादू पितळी तोंडाला लावत बोलला ,मोकार गार सुटलया जणू पोटात कोणी बर्फ कोंबलाया, चहाचा फुरका ओढत महादू बोलला, आता कसं झाक वाटल बघ जणू कोणी पोटात शेकोटी पेटवली ,तू बी घे की थोडा, ह..म्हणत रखमाने मान हलवली ,रखमाने महादूचं मन राखण्यासाठी चहा पिल्या वाणी केलं, टोपात तर काय बी दिसत नाय,तुला चहा नाय होय .रखमाने नाही म्हणून मान हलवली का ग नाही केला तुला ‘चा’ चुलीत लाकडं सारत महादू बोलला, आव एकाच माणसापूर्ती भूक्की आण साखर होती. अगं मग म्हणायचं ना माझ्यातला दिला असता की, नग मी पेले की गरम पाणी त्याला काय होतंय पोटात गरम झाले की बास!
अग पण गार लय सुटलया डोक्याला मफलर गुंडाळत महादू बोलला, जाऊ द्या चला आवरा पटापट पाणी तापल्या या, घ्या अंघोळ करून मला बी पाटलीन बाईने लवकर बोलवल या, जास्ती पैसे देईल म्हणल्या होत्या, रखमा झपा झप काम आवरू लागली, मला बी चीमा तात्यानं लवकर बोलवलया,लाकडं फोडायला लाकडं फोडायचं काम चांगलं 2-4 दिवस पुरल बघ,. तेवढंच आपलं मीठ मिरची सुटल, महादूं न बादलीत पाणी ओतून अंघोळीला सुरुवात केली, रखमान एक टोप पाणी तापवून घेतलं ,आणि लगेच तवा चुलीवर टाकून दोन भाकरी थापल्या ,दोघांनाही चटणी भाकरी कपड्यात बांधून घेतल्या, आता दिवस चांगलाच वर आला होता. सदा अंथरुणातच लोळत होता. गार भरल्याने फाटकी गोधडी अंगावर ओढत अंगाचे मुटकुळ करून झोपला होता, सदा अरे लेकरा.. उठ की ..उठ की माझ्या सोन्या… आज सुट्टी हाय व्हय साळला माझ्या ध्यानातच नाही आलं बघ ,सदा मी पाटलीन बाईकडे खुरपया चालले बघ तू आंघोळ करून जेवून घे, आणि जा रम्याक खेळायला लांब कुठे जाऊ नका बोरं चीचा काढाया. मोठाल्या झाडावर चढू नका आम्ही येतो संच्याला घरी. सदा ‘हा ‘म्हणत आळीपीळी देत उठ ला, रखमाचा लई जीव लेकरावआणि नवऱ्यावर कपाळाचे बाशिंग सुटल्यापासून नुसती राब राब राबती ,कवा नवी साडी नाही का नवा दागिना, गरीबी न त्यांना पोखरून काढलं होतं, रखमा आणि महादू आप आपल्या कामाला निघून गेले.

निरनिराळ्या रंगांच्या फुलपाखरांनी जमिनीवर उत्तरावर तसं पाटलीन बाईच्या वावरात बायका वेगवेगळ्या रंगांची शर्ट घालून खुरपत होत्या. खुरपणी करता करता बायांच्या तोंडाचा पट्टा असा सुटला जणू रेल्वेच्या डब्यांनी एका मागोमाग सप सप करीत जावा ,जी ती आप आपल्या परिण बोलत होती ,काही जणी दुखनी सांगत ,काही जणी गाऱ्हा नी सांगत, काहीजणी नुसत्या खुरापती काढत. पाटलीन बाईचा गरका आला की मुक्या असल्यावानी खाली माना घालून खुरपाया लागत. काय ग रखमा तू का ग गप तू बी काहीतरी सांग अशी काय कोऱ्या कागदा वाणी बसली, शेवंता काकू भुवया उंचावून बोलल्या ,बोला तुम्ही ऐकते हाय, म्या तरी काय बोलू रखमा खुरप्याचा चिकटलेला पेंड काढत बोलली, अग तुझ्या प्रपंचात नाही का काय बोलायला शेवंता काकू म्हणाल्या, माझं एकच सपान आहे सदाला लई शिकवायचं आणि मोठा साहेब बनवायचं आपलं तर दिस ले वंगाळ चालल्यात पण त्याचं तरी सुखाने जातील, तो शाळेला लय हुशार आहे, असं त्याचं गुरुजी म्हणतात, रखमा भान हरपून बोलली.
अगं पण एवढं मोठं कराया परिस्थिती आहे का तुमची, मजुरीचा पैसे तर तुमच्या तेला- मिठातच जाते की कुठून आणणार एवढा पैसा.. इथली पोरं येरवाळलीच आपल्या बापाला शेतीवाडीत मदत करतात, आणि तू काय मोठा सपान बघायली.गरिबांना एवढं मोठं सपान बघायचं नसतं बाई …आपली पायरी ओळखूनच राहायचं बघ आपल्या गरीबाचा कोण वाली नसत सपान सपानच राहत. सगळ्या बाया कान लावून शेवंता काकूच बोलन ऐकत होत्या. शेवंता काकू असं म्हणाल्यावर रखमाच्या डोक्यात विचारांच्या भूग्यानं कोरायला सुरुवात केली, दिवसेंदिवस पाहिलेली स्वप्न फीकी वाटू लागली, सगळ्या जनी खुरपायला लागल्या ,पण रखमा विचार चक्रातच अडकून पडली ,शेवंता काकू म्हणती ते काय खोटं नाही किती बी पैक गाठीला बांधून ठेवायचा प्रयत्न केला, तरी गाठ फाडून ते पडून जातात ,सदा अजून लहान हाय पण तो मोठ्या वर्गाला गेल्यावर अजून खर्च वाढणार कसं करायचं, कमावणार हात थोडंच वाढणार हाय. पण लगेच विचारांचा जाळ झटकून रखमाच्या मनात पुन्हा तोच विचार तराळत गेला, काय बी झालं तरी सदाला शिकवायचं ,नाही तर ही दळिंद्री कव्हर बी हटायची नाही आपल्या गरीबीची झ ळ लेकरास बी बसतीया विचारांचा खेळ तिच्या डोक्यात चालूच राहिला.
घरी सदा आणि रम्या दोघं खेळत होते मधीच रम्याला थांबवत सदा म्हणाला, मी ढवळ्या पवळ्यास पाणी दावतो ,बैलाच खाणं कमी असल्याने कातडी हाडाला चिकटली होती त्यांना पाणी पिऊ वाटानी, पवळ्यांनी बसूनच घेतलं होतं, आरं सद्या.. तू लय काम करतो बघ घरचं मी तर काय बी करत नाही, तुझं आई बा नाही तर तू गुरांना चारापाणी ,त्यांचं शान काढणं, झाडलोट करतो ,मला तर कोण बी काय काम सांगत नाही ,काठी नाचवत रम्या बोलला ,आर रम्या तुझ्या घरी लई चांगलं आहे बघ.. तुला गरजच पडत नाही तुमच्याकडे चांगलं आहे, माझं आई बा रा बत्यात, मला चांगली शाळा शिकता यावी म्हणून लय जीव काढतात, बघ पण, मी बी शिकून मोठा होणार ,त्यांना काय बी काम करून देणार नाही हे सांगताना सदाचा चेहरा फुलला होता. दिवस मावळ तिला गेला, सूर्य दिसान असा झाला, माणसं काम करून घराकडे वळाली ,सूर्याचा तांबू पिवळा रंग सगळीकडे पसरला होता, माणसा वाणीच पाखरांनाही घरची ओढ लागली होती, सदाचा ओढीने झपाझप पाऊल टाकत रखमा घरी आली, घराची आवरावर बघून रखमाचा शिन भाग उतरला, तिने सगळ्या घरावर नजर टाकली आणि मनाशीच म्हणाली कसं बाई माणसा वाणी घर आवरले लेकरांन…
आय…आय…म्हणत तो रखमाला बिलगला, कशाला एवढं काम करत बसला मी आल्यावर करेन की सगळं रखमा त्याच्या डोक्यावरून हात फिरवत बोलली ,किती दमून येते ,काय होतय त्याला, रखमाच्या हातातली भाकरीची पिशवी घेत सदा बोलला ,गरिबीने कमी वयातच समजूतदार केलं होतं सदाला. अरे तुवा बा नाय आल अजून.पार अंधार प डायला लागला की, तेवढ्यात मागून महादू आला. वाहना त्यानं कोपऱ्याला सरकावल्या, काही न बोलता हात पाय धुवायला गेला ,काय झालं लईच चेहरा पडलाय तुमचा बरं नाही वाटत, रखमा म्हणाली, तोंडावर पाणी मारत महादू बोलला, आज लई काम केले, पण तुला पैसे नाही देणार असं चिमा तात्या म्हणाला, तुझं मागचं देणं घेणं राहिलय. आव नका एवढा त्रास करून घेऊ, आज ना उद्या त्यांचं द्यायला लागलं असतं की पाटलीन बाईंनी आजच पैसे दिले मला आजच.. होईल कसं बी उद्याचं उद्या बघू तेवढ्यात दरवाजावर थाप आली, रखमाबाई…. आहे का घरात वाण्याचा घडी आला म्हणाला, वाण्याने उधारी द्यायला सांगितली नाही दिली तर उद्यापासून रखमा आणि महादूला इथं उभी नका करू त्यांना म्हणावं कोणत्याही दुकानात जा मी काय उधार देणार नाही, आरं पण घरात काय राहिलं नाही आजच्या दिवस दे की उद्या देते, रखमा म्हणाली .
ते काय बी चालायचं नाही मला पैसे घेतल्या शिवाय येऊ नको म्हणाला. एवढ्या विनवण्या करून सुद्धा तो काही ऐकायला तयार नव्हता नाईलाजाने कमरेला खोचल्याली पैशाची वळकुटी काढून जड मनानं गड्या च्या हातावर टेकवली, ये बी कमीच आहे पाचशे रुपये उधारी हाय, गडी रुबाबात बोलला, एवढेच हाय बाबा उरलेलं करीन परत नंतर मी येऊ का देशील का उसाक किराणा मला रखमा तोंड बारीक करून म्हणाली ,नको बाई का तू वान्याचं वाईट वंगाळ बोलणं ऐकती, असं म्हणून गडी झपाझप पाऊल टाकत निघून गेला. रखमाचा दिवसभर काम करून कमावलेल्या पैशाचा आनंद जास्त वेळ टिकला नाही.
रखमा आणि महादू परिस्थिती न पार खंगले होते, पण एकमेकांच्या साथीने त्यांना काम करायला नवबळ येत होतं ,पण दररोज चीच उसनवारी आणि मोकार काम यांचा पाठशिवणीचा खेळ काही केल्या संपायला तयारच नव्हता. आज वाटलं होतं माझ्या लेकराच्या आवडीचं कालवण बनाव पण या वाण्यांशी ते बी बघवलं नाही, कुठे कामाला गेलं का लगेच देतो माणूस धाडून पैसे न्यायला पिशवी कुठेला अडकवत रखमा म्हणाली. नाराज मनानं रखमा स्वयंपाकाला लागली ,एकाच भाकरीचे पीठ डब्यात शिल्लक होतं दोन चार काटक्या कडा कड हाताने मोडून चुलीत घातल्या. ढन -ढणा चूल पेटली .कशीबशी एकच भाकर केली खाणारी तोंड तीन आणि भाकर एक शेजाऱ्यांच्या घरातील कालवण खद खदू लागली ,त्यांचा खमंग वास सगळीकडे पसरला पण रखमाच्या चुलीवर फक्त भाकरच व्हायची आणि तिचाच वास यायचा कारण कालवण कधीतरीच व्हायची. आणि आत्ता कित्येक दिवस ते बी झालं नाही. आई …आज पण मिरचीच . सकाळी पण तीच आणि आत्ता पण दररोज मिरची खाऊन पोटात आग पडली, घास तोंडातच फिरतोय बघ फाटका सदरा अंगावर चढवत सदा बोलला ,भाकर ताटात वाढत रखमा म्हणाली, खारं लेकरा ..आजच्या दिस उद्या बघू काहीतरी जुगाड होतंय का? आरं बाळा उधारीने पार नको नको केले ,तेल मीठ आणायला पैसे पुरत नाही.
आव बसा की जेवायला रखमानी ताट महादूकडं सारंत बोलली ,माझ्या पोटात काय बरं नाही आज जेवण न ग वाटते बघ. तुम्ही जे व्हा . का खोटं बोलता असा भाकर तुकड्यावर रुसू नाही ,जे व्हा गुमान लई खायची तर आपली दोन-चार घास तरी खा सदाला बरं वाटलं.. नाहीतर तो बी जेवणार नाही. रखमाच्या पदराला हात पुसत सदा बोलला , आई… उद्या गुरुजींन शंभर रुपये आणायला सांगितलं परीक्षेसाठी भरायला, तालुक्याच्या गावाला स्पर्धा आहे, गुरुजींनी माझं नाव दिले .मला म्हणले तुझा नंबर येईल. अरे सदा ते जरी खरं असेल तरी पण आता कुठून अनु र शंभर रुपये. इथ पाच पैसे बी जवळ नाही. गेल्या बारीला तुझ्या गुरुजींनीच भरलं होतं बघ पण असं सारखं सांगाया बरं वाटत नाही, तूझ गुरुजी लय ‘देव माणूस’ कायम आपल्या पाठीशी उभा आहे, त्यांनी आपल्याला लय मदत केली ,त्यांचं लई उपकार आहेत आपल्यावर त्यांनी कधीही आपल्याकडे मागितलं नाही अन आपलं बी द्यान झालं नाही. असं कव्हर त्यांच्या मदतीची आशा करायची. महादू आपला गप भीतीला पाठ ला वून बसला होता, तंद्री लागल्यावानी एकटक पाहत होता. चिमा तात्याचं पैसे, वाण्याची उसनवारी, गुरुजींची मदत, आता पार कर्जाचा डोंगर उभा राहिल्यावाणी वाटत होता .
कोळ्याच्या जाळ्यापाशी कीडकान जावं अन गप्प क न त्याचा पाय जाळ्यात ओढून घ्यावा कधी न सुटण्यासाठी, तशी आता महादूची रखमाची तरा झाली होती . महादूला काही केल्या झोप येईना तो छपरा क बघत विचार करू लागला ,झोपा आता नका विचार करू, रखमा पदराला हात पुसत बोलली, अगं आपल्याकडं स्वतःचं असं काय बी नाही एखादा तुकडा असता तर त्यातच भागवलं असतं, पवळ्या ढवळ्याची जोड हाय पण आता ते बी नुसती भार झालेत .आपलं आबा वतं तोवर लोकांची शेताची काम करून त्याच्यावर पोट पाणी बरं चाललं होतं. आता आबा बी नाही आपल्यात, अन खाण्यापिण्याच्या आब ळीन पवळ्या उठवणा झालाय ,आणि ढवळ्याचा पार आप गेलाय त्याचं त्याला चालवत नाही. रखमान मोडकळीस आलेलं कवाड लावलं लावताना ते असं आवाज करी जणू आता गळून पडेल .अग.. आज पर्यंत येळला सदाचा गुरुजींनी शाळेचा खर्च उचलला, पण आता त्याचं वझ कव्हर ठेवायचं उसनवारी बाकी आहे चिमा तात्याचा आधीच उचल घेतली. रखमा कड नजर टाकत महादू बोलला.उद्याचं उद्या पाहू.आत्ताच डोक्याला नका पोखरू . असं म्हणत रखमान अंथरुन टाकली, दोघांनी बी त्यावर अंग टाकलं.
पुन्हा तोच दिवस आणि तीच काम शाळेतली पोरं पाठीवर दप्तर टाकून घराकडे पळत सुटली,आर ये पोरांनो… आज लवकर का शाळा सुटली, शेवंता काकू हात वर करत म्हणाली. त्यातलं एक पोर म्हटलं आमचे सोनवणे गुरुजी वारले, बाया आ…. करत एकमेकींकडे बघत उद्या राहिल्या ,रखमा धक्क्यानी डोक्याला हात लावून बसली, सदाच भविष्य तिच्या पुढे नाचू लागलं.आतापर्यंत ढाल बनुन सोनावने गुरुजी मागे उभे राहीले.आता कस होणार माझ्या सदाच ? कोण घेईन त्याला समजून? विचारांच्या गर्दीने डोक्यात जणू कालवा कालव केली. गुडघ्यात डोकं घालून सदा रडत होता. अंगावर शाळेचे कपडे तसेच, शाळेच दप्तर जवळ पडलेल होत .सदा….. रुक्मिणीने सदाला जवळ घेतलं, बाळा रडू नकोस, सोनवणे गुरुजी लय’ देव माणूस’ पण देवापुढे आपलं काय चालतंय . आज बोलणारा माणूस कधी गायब होईल सांगता येत नाही बघ. (रडतच) आय….पण मला गुरुजींन शिवाय शाळेत जावा वाटत नाही. आमचे गुरुजी मला दोन दिवसांनी तालुक्याला स्पर्धेला नेणार होतं .मला म्हणाले सदा तुझं अक्षर छान आहे. अगदी मोत्या वाणी तुझा तिथे नंबर येईल मी घेऊन जातो तुला. जी माणसं का नाही सर्वांना आवडतात तेच देवाला आवडतात बघ, सदाच डोळ पुसत रखमा म्हणाली.
हातातली कुऱ्हा ड कोपऱ्यात ठेवून महादू आहे तिथेच डोक्याला हात लावून पटकन बसला. गुरुजीच्या जाण्याने महादूला बी धक्का बसला होता, होता तो आधार निघून गेला आणि सकाळपासून वन-वन करून ही कोणी काम दिलं नाही ,अडकित्यात सुपारी सापडावा तशी महादूची अवस्था झाली. रखमा पाण्याचा तांब्या घेऊन महादू कडू आली ,मला पाणी न ग असं म्हणून महादू त साच सरकत भिंतीला पाठ लावून बसला. मी चहा टाकते रखमा म्हणाली, नको मला चहा आज काय दिस चांगला नाही, गुरुजीच तर लय वंगाळ झालं पण ज्याच्याकडून उसणं घेतलया ,त्यांनी पार तडतडा तोडलया, डोक्याचं पार भूस्काट पडलय विचार करून.
सदा तिथेच अंगाचा मुटकुळे करून झोपला सदा.. आर कापडं तरी बदल की असं म्हणून रखमान त्याच्या डोक्यावर हात ठेवला. आर तुला ताप आलाय सदा… ये सदा… बाळा तुला ताप आलाय ,चल घरात चल, रखमा सदाला घेऊन घरात गेली. मागोमाग महादू पण आला अग त्याच्या कपाळावर थंड कापड ठेव मी औषध भेटतात का बघतो ,म्हणजे बरं वाटेल त्याला. रखमान मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवल्या ,सदाच तापन डोळे उघडत नव्हतं . महादुला दुकाना वाल्यांनी औषध दिलं नाही, उधार द्यायचं बंद केले, असे म्हणतोय. रखमा शांत होती महादू बी शांत झाला. गरीबीन त्यांना फार त्रासून सोडलं होतं जणू 18 विश्व दारिद्र्यच घरात ठाण मांडून बसले होते. माहेर वाशिन पाहुण्यासारखी येते आणि निघून जाते पण गरिबी काही केल्या हटायचं नावच घेत नव्हती, त्या रात्री पवळ्या बैलाने जीव सोडला . खाण्याच्या आबळीन त्याचा जीव घेतला, सदाच आजारपण आणि पवळ्या बैलाचं जाणं या दुहेरी दुःखात रखमा आणि महादू बुडाले होते.
संध्याकाळची वेळ पाखर आप आपल्या घरट्यात परतली, शेतातली माणसं घरी आली, रानात चराया गेलेली गुरे माघारी फिरली, दिवस मावळ तिला गेला .रखमा आणि महादू मात्र घरीच. रखमा सदा कड आणि महादूला कोणी कामाला बोलवीना. ढवळ्या बैल टीप गाळत पडक्या गोठ्यात गप गुमान बसला होता. पोट खपाळ झालेलं ,नुसतेच कातडी अंगाला चिटकून बसलेली फक्त सांगाडा उरलेला जीव जाईना म्हणून जणू हात पाय खोडत होता. सदाचा ताप काही केल्या उतरेना. रखमाचा जीव वर खाली होत होता, सदा…. ये बाळा…. डोळं उघड सदान कीलकिल्या डोळ्यांन आईकडे बघितलं. आय…मलाभूक लागलीय.काय खायला हाय का? बघते बर का राजा असं म्हणत टोपलं उचक लं तर त्यातून एक पाल झरकन पळाली, टोपल्यात एक भाकरीचा तुकडा आणि तोही पालीन गराडा घातलेला. रखमाने टोपल शिंक्याला अडकवलं आणि महादुला म्हणाली , सदाला ना भूक लागली या घरात काय बी शिल्लक नाही काय करायचं ,आता महादू जवळ गेला ,आणि म्हणाला माझ्या लेकराला भूक लागली होय मी ना चिमा तात्या का जातो,
कामाला नाही बोलवलं म्हणून काय झालं पण माणुसकी खातर काहीतरी दिल बघ, पहिले तर तुला दुकानातून खाऊ आणतो काय खावं वाटतं तुला.मला बाबा भेळ आणा . रखमान सदाचा तोंडावरून मायने हात फिरवला. एवढं समजु तदार पोरगं देवानं आमच्या फाटक्या झोळीत टाकले, पण त्याचं बी हालत होत्यात. रखमाच्या गालावरून थेंब ओघळू लागले. सदाने आपल्या गरम हाताने रखमाचे डोळे पुसलं. महादू न रखमाला धीर दिला ,आणि तुटक्या बंदाची चप्पल घालून फरकित तो तिथून निघून गेला. महादू गेला तसाच परत आला सदाचा चेहरा उजळला, मिळाला का व काही रखमाने अशाने विचारलं. महादून नाही म्हणत मान हलवली, नाही म्हटल्यावर भुकेने सदाचा पोटात खड्डा पडला ,त्याने रडक्या चेहऱ्याने आईकडे पाहिलं ,रखमाला कळवळून आलं.
चिमा तात्या काय म्हटलं रखमान विचारलं ,आता तुला काम नाही म्हटल्यावर तू आता असाच भिकाऱ्या वाणी माझ्या दारात येत राहशील तू काय बी सोय कर पण माझ्या दारात येत जाऊ नका, मला बी नातवंड हाय त्यांच्या तोंडच ओढू का आता तुझ्या पायी .असं म्हणून त्यांनी दार बंद केलं ,आता काय करू गं रखमे …..मला काहीही सूचना झाले, मी एवढा गड्यावानी गडी पण मला तुला आणि सदाला पोटभर खायला बी देता येत नाही. माझ्या फाटक्या च्या घरी येऊन पडलात. असं म्हणून महादू न तोंड बडवायला सुरुवात केली. रखमाने त्याचा हात धरला, आदल्या दिवसापासून तिघांच्याही पोटात अन्नाचा कण नव्हता. फळी वरचा चिरट लेला डबा उचलत रखमा म्हणाली, मी
सदाला आता थोडी साखर आहे त्याचं पाणी करून देते, आणि सकाळच्याला पाटलीन बाईक काय मदत मिळते का पाहते असं म्हणून साखरेचे पाणी करून सदा जवळ गेली सदा …ए बबड्या… डोळे उघड . मी साखरच पाणी केले, एवढं पी मग सकाळी तुझ्यासाठी दुकानातून भेळ आणते. आ… सदानं हा ..म्हणून मान हलवली आता तेवढी शक्ती त्याच्यात उरली नव्हती.
महादू भिंतीला पाठ देऊन बसला, तसाच त्याला डोळा लागला, त्याचं शरीर आणि मन दोन्हीही थकलं होतं, रखमा सदा जवळ पडली. रात्र जणू भयान झाली होती ,त्या भयान शांततेत रातकड्यांचा आवाज वाढवू लागला. घराच्या आड्यावरून उंदीर इकडून तिकडं पळत होते, कोळी जाळ्यातून आत बाहेर करत होते, तुटलेल्या कौलांमधून येणाऱ्या हवेने अडकलेली जळमट हलत होती, रात्र जणू भकास झाली होती, रात्रीच्या दोनच्या सुमारास धाडकन पडल्याच्या आवाजाने महादूला जाग आली. रखमानेही डोळे उघडले. खुणेनेच काय झालं म्हणून विचारलं महादू न मोडक कवाड उघडलं, तर गोठ्यात ढवळ्यांन अंग टाकलं होतं. महादु जवळ गेला तर ढवळ्याचं पाय तहाट झालं, डोळे उघडेच ,केस वाऱ्यावर उडत होती, ढवळ्याची तर तरसलेल्या जीवातून सुटका झाली. महादूच्या जीवाची कालवा कालव झाली .बाहेर झोपलेला गणपा आला आणि म्हणाला गेला वाटतं ढवळ्या तुला म्हणत होतो विकून टाक कसाब्याला. थोड्या दिवसाचं पोट पाणी सुटलं असतं. महादू कंठ दाटलेल्या आवाजात म्हणाला, मला कसाब्याला द्यायचं नव्हतं आणि त्याला बी जायचं नव्हतं, सुटला बिचारा दळिंद्र मालकाच्या गोठ्यातून.
आतून रखमाच्या ओरडण्याचा आवाज आला तसा महादू आणि गणपा घराकडे पळत निघाली. रखमा काय झालं महादू न विचारलं रखमा सदाला
हलवत म्हणाली अव सदापार गार झालाय डोळबी उघडत नाही .बघाना काय झाले रखमाची पार बोबडी वळाली होती महादून डोक्याला, आन गणपा ने नाकाला हात लावला गणपा ने मानेने नकार दाखवला ,तशी रखमा कोलमडली चार-पाच विंचवांनी डंक मारावा तशा तिच्या काळजात वेदना सुरू झाल्या. रखमा गरबड्या लोळू लागली तिच्या घशातून आवाज निघत नव्हता .तिने सदाचा डोक्याजवळ तोंड नेेले .चेहऱ्यावरून डबडबत्या डोळ्यांनी नजर फिरवली. जणू नजरेत त्याला सामावून घेत होती. रखमाची वाचा गेली, ती खाली बसली ते परत उठलीच नाही .महादू ला धक्का बसला . त्याने टाहो फोडला. मेल्याहून मेल्यासारखी त्याची अवस्था झाली. एकीकडे लेकरू आणि दुसरीकडे खांद्याला खांदा लावून काम करणारी कारभारी. आता त्याला काही सुचेना गरीबी न सोन्यासारखा संसार गिळून टाकला होता. संसार उध्वस्त झाला आणि हो त्याचं नव्हतं झालं , होत्याचं नव्हतं झालं…….Marathi Emotional Story2024………
लेखिका- शितल औटी, जुन्नर
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. लेखिकेने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखिकेच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
अप्रतिम कथा. गरिबीने गांजलेले कुटुंब .अतिशय सुंदर वर्णन केलेले आहे.
Thank you
खरोखर दारिद्र्याचे.अस्सल चित्र उभं केलं आहे… पण देव करो आणि अशी वेळ कुणावरही न येवो.. पुढील लेखनास शुभेच्छा
Thank you
खूप अप्रतिम कथा… भयाण वास्तव मांडलय.. निःशब्द
Thanks 🙏
खुप सुंदर आणि अप्रतिम कथा.
Thank you
garibiche bhayan vastvya
🙏