Marathi Katha 2024 – प्रभू श्रीरामचंद्र ….अनादी अनंत

WhatsApp Group Join Now

  प्रभू श्रीरामचंद्र ….अनादी अनंत

ए आई,”आजी म्हणत होती आपल्याकडे परत दिवाळी आहे. मला आता परत सुट्टी लागणार का ग? Wow परत सुट्टी लागली तर आपण कुठे जायचे ट्रीपला?” 

“ईशानी किती ग तू बडबड करते आहेस? माझे क्लासेस चालू आहेत आपण नंतर बोलू” अवनीनी तिला जरा दटावले. 

अवनीचे सगळे विद्यार्थी एकदम गलका करून,”काकू क्लासला सुट्टी देणार आहेस का ग तू? परत दिवाळी म्हणजे परत फटाके, नवीन कपडे आणि छान छान खाऊ”

बापरे! ईशानच्या बडबडीने सगळाच गोंधळ उडाला होता.

चार वर्षाची ईशानी सतत आजी आजोबांच्या मागेपुढे करत असायची. सध्या  सगळं वातावरण राममय झाले असल्यामुळे सतत टीव्ही चॅनल वाले, आजीच्या भजनी मंडळातल्या मैत्रिणी एकच एक विषय… या संदर्भातले वारंवार बोलणे कानावर पडत असल्यामुळे ईशानी गोंधळून गेली होती.ईशानीला वेळ देता यावा म्हणून अवनी घरातूनच पहिली ते सातवीच्या मुलांच्या ट्युशन घेत होती.मागच्याच आठवड्यात उत्साही आजी आजोबांनी रामाचा कलश सोसायटीमध्ये आणून अक्षदा वाटप व आमंत्रणाची जबाबदारी स्वीकारली होती.

लहानशा ईशानीला परकरपोलके, छान दागिने घालून  प्रत्येक घरात आमंत्रण पत्रिका व अक्षद वाटप करण्यासाठी घेऊन जात होते.आता सगळ्या मुलांनी एकत्र गलका केला व  अभ्यासाचा सगळ्यांचाच मूड गेला.काकू सांग ना ? असे म्हणत बच्चे कंपनी सुट्टी दे म्हणून लागली.अवनी पण म्हणली “ठीक आहे. पण रामा विषयी एक चांगला गुण ,एक चांगली गोष्ट  जर तुम्ही सांगितली तरच मी तुम्हाला २२ तारखेला सोमवारी सुट्टी देईल.”

कोण गोष्ट सांगणार आहे ?अवनीने विचारताच सगळी बच्चे कंपनी चिडीचूप झाली.ईशानी पण आता गोष्ट ऐकायची म्हणून सरसावून बसली.काकू “तूच सांग की एखादी?”मुलांनी फर्माईश केली.“रामाची कथा” अवनी विचार करू लागली

कुठली एक कथा सांगायची? हा तिचा निर्णय होत नव्हता. आपण एक काम करूया उद्या क्लासमध्ये जेव्हा तुम्ही याल तेव्हा शेवटची दहा मिनिटं दोन विद्यार्थ्यांनी राम कथा सगळ्या क्लासला सांगायची व २२ तारखेला संध्याकाळी मी तुम्हाला रामाची गोष्ट सांगीन.अवनीने मनोमन काही योजना आखल्या.आता तिने सासू-सासर्‍यांची मदत घ्यायचे ठरवले.राम म्हणजे विष्णूचा अवतार …राम म्हणजे पुरुषोत्तम पुरुष …पण अगदी वय वर्ष चार पासून तेरा चौदा वर्षाच्या मुलांना ,त्यांचा वाटेल असा ‘राम’ या पिढीचा ‘राम’ कसा बर मांडता येईल याचा ती विचार करू लागली.सत्ययुगाची व कलियुगाची सांगड घालत “श्रीराम” मांडायचे शिवधनुष्य तिने पेलायचे ठरवले.

रात्रीची जेवणे आटोपली आणि तीने विषयाला हात घातला,” बाबा मला संपूर्ण श्रीराम कथा मुलांना सांगायच्या आहेत पण त्याची सांगड आताच्या युगाशी मिळतीजुळती पाहिजे ,आताची परिस्थिती आताचे प्रश्न आणि श्रीरामांचा आदर्श” अवनी भराभर बोलत होती.

सगळेच एकदम विचाराधीन झाले.कल्पना उत्तम आहे पण हे कसे करुयात? रात्रभर सगळ्यांनी विचार करून दोन दिवसात गोष्टीचा कार्यक्रम कसा करू याची रूपरेषा आखायचे ठरवले.सोसायटीतल्या मंदिरात २२ तारखेला संध्याकाळी श्रीरामांची पूजा, आरती, भजन व महाप्रसाद असा भरगच्च कार्यक्रम ठरला होता. आता अवनीच्या श्रीरामांविषयीच्या कथा  हा पण कार्यक्रमाचा एक भाग करू असे सर्वानुमते  ठरले.दोन तीन दिवस मुलांनी उत्साहात गोष्टी सांगितल्या पण ती नुसतीच पोपाटपंच्ची होती.मुलांनी युद्ध कथा शूर्पणखा वध,रावण वध, अशोकवनात हनुमंतानी घातलेला गोंधळ हे सगळे रटून सांगितले पण अवनी खुश न्हवती काहीतरी missing होते…. त्यांच्या कथेत “राम” नाही असेच तिला वाटत होते….

आता कार्यक्रम आठवड्यावर येऊन ठेपला होता. सोसायटीत इतर कामांची लगबग चालू होती.पूर्ण सोसायटीला फुलांनी सजवायचे होते.नेहमीच्याच फुलवाल्याला देशपांडे काकांनी (अवनीच्या सासर्‍यांनी)ऑर्डर दिली होती.प्रत्येकाने आपापल्या घरून जेवढे सदस्य तेवढे दिवे व रामाच्या नावाने एक अशा मातीच्या पणत्या ,तिळाचे तेल व कापसाची वात घेऊन यावी  ही कल्पना पाटील काकूंची होती.अवनीच्या सासूबाई, देशपांडे काकूंनी भजनी मंडळात सगळ्यांनी छानशी नऊवारी साडी व पारंपारिक दागिने घालून भजनाचा बेत आखला होता. रामाच्या भजनांची त्यांची जय्यत तयारी सुरू होती.

आजीच्या बरोबर जाऊन जाऊन ईशानीने पण “रामा रघुनंदना” हे भजन बोबड्या बोल खूपच सुरेख वाटत होते.देशपांडे म्हणजे अवनीचे सासरे सेक्रेटरी असल्यामुळे संपूर्ण सूत्रे त्यांच्या हातात होती.पुरुष मंडळींनी उपरणं,झब्बा व सोवळे नेसायचे ठरवले.अवनीनी पण सासूबाईंच्या पार्टीत जाऊन नऊवारी साडी व पारंपारिक दागिन्यांना  पसंती दिली.ईशानी “बाबा, तू काय घालणार आहेस रामबाप्पाच्या दिवाळीला?”समीरच्या मागे भूणभुण करत फिरत होती. अखेरीस समीरने पण बाबांच्या पार्टीत जायला पसंती दर्शवली.आजीबाईंनी हौसेने ईशानी साठी नऊवारी साडी आणली.

एकंदर देशपांडे कुटुंबीयांनी पारंपारिक कपड्यात पूजेला येणार आहेत असे समजल्यावर बिल्डिंग मधल्या सगळ्यांनीच या वेशभूषेला पसंती दिली.अवनीच्या बिल्डिंग मधल्या मैत्रिणींनी रविवार पेठ गाठली आणि सगळ्यांनी मनसोक्त नऊवारी साडी व पारंपारिक दागिन्यांची खरेदी केली.एकंदर चार बिल्डिंग व ६४ फ्लॅट असलेल्या या सोसायटीने प्रसादासाठी कुणी काय काय करायचे ते ठरवले.सोसायटीत मध्ये असलेले बेंद्रे काकांचा केटरिंग चा बिजनेस असल्यामुळे त्यांच्याकडून मोठाली पातेली व सर्व स्वयंपाकाचे साहित्य घेऊन  पार्किंग मध्येच सगळ्या महिला मंडळाने एकत्र मिळून स्वयंपाक करायचा बेत आखला.कधी नव्हे ते चारही बिल्डिंगचे एकमताने एकत्र येऊन उत्साहात २२ तारखेचा सण साजरा करायचे ठरवले. 

या उत्साहात अवनीनी कबूल केलेले रामायणातल्या गोष्टी आजच्या युगाची सांगड घालत आणि सोप्या पद्धतीने मुलांपर्यंत कसे पोहोचवायचे याबद्दल घरामध्ये दररोज रात्री खलबते चालू होती.आजी, आजोबा आणि आई सारखे काहीतरी चर्चा करत असल्यामुळे ईशानी आता बाबाच्या मागेपुढे करत होती. इतर वेळेस सतत आजी आजोबांच्या मागे मागे करणारी ईशानी आता बाबाला बडबड करून सतावत होती ,त्यामुळे बाप लेकीची छानच गट्टी जमली होती. बाबा बरोबर रात्री दंगा घालताना छोटी ईशानी  खूपच खुश होती.अवनीच्या ट्युशन मधल्या मुलांनी सांगितलेल्या गोष्टी व त्यांना समजलेला “राम” या सगळ्याचा एकवार विचार करून काही निवडक प्रसंग पण त्याच्यामध्ये दडलेला बोध मुलांपर्यंत पोहोचवूयात असे अवनी व तीच्या सासू-सासर्‍यांना वाटले.

ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट बघत होते तो प्रसंग म्हणजे श्रीरामांच्या अयोध्येतील भव्य प्राणप्रतिष्ठा. सकाळपासून प्रत्येक चॅनेलवर अयोध्या व रामप्रतिष्ठेवर राम मंदिर व सुबक मुर्त्यांची घरबसल्या दर्शने होत होती.दुपारीच महिला मंडळ खाली जाऊन महाप्रसादाची सर्व तयारी करून आल्या.साधारण पाच सव्वापाचला सगळेजण नटून थटून पारंपारिक वेशात खाली उतरले.देशपांडे काका, काकू व समीरने अवनीला   शुभेच्छा दिल्या.ईशानीने आईच्या गळ्यात पडून  पापा घेत गोष्ट छान सांग म्हणत ‘ऑल द बेस्ट’ म्हणाली.अवनीने पण सासूबाईंना भजनासाठी शुभेच्छा दिल्या.

खाली सर्व बच्चे मंडळी अवनीची आतुरतेने वाट पाहत होते.अवनी एकदम हुशार व चुणचुणीत होती. श्रोत्यांना खिळवून ठेवायची तिच्याकडे एक जबरदस्त ताकद होती.एकंदर सुरुवातीला अवनीच्या श्रीराम कथा  नंतर देशपांडे काकूंच्या भजनी मंडळ व पूजा, रामरक्षा व भीमरूपी व महाप्रसाद असा बेत ठरला.सगळ्यांची उत्सुकता शिगेला  पोचली होती.अवनींनी सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली.प्रथम श्रीरामांना वंदन करून मग सर्व श्रोत्यांना वंदन करून तिने बोलायला सुरुवात केली.

आज पाचशे वर्षानंतर अयोध्येमध्ये श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे व त्यानिमित्ताने फक्त भारत नाही तर सर्व जगामध्ये आजचा दिवस उत्साहात, आनंदात व भावपूर्ण वातावरणात साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने श्रीरामांच्या जीवनातले काही प्रसंग मुलांसमोर मांडताना मला अत्यंत आनंद होत आहे.गेले चार-पाच दिवस क्लास संपल्यावर मुलांनी श्रीरामांच्या कथेचे वर्णन खूप छान केले, अर्थात सर्वांना कथा भाग माहीतच आहे पण खुद्द श्रीराम किती जणांना समजले हा मला प्रश्न पडला व म्हणून हा सर्व प्रपंच….अवनी बोलत होती व आता बाळ गोपाळ बरोबर सर्व मोठ्यांची पण उत्सुकता वाढतच होती. सध्या टीव्हीवर जे कार्टून दाखवले जाते शिनचेन एक उद्धट मुलगा जो आई-वडिलांचे न ऐकणारा मित्रांना व शिक्षकांना त्रास देणारा, सिंड्रेला म्हणजे सावत्र आईने व बहिणीने केलेली छळवणूक, कुठलीही सिरीयल किंवा पिक्चर जरी बघितला तरी मालकांनी नोकरावर केलेला अन्याय, दुसऱ्याला लुबाडून , कटकारस्थानाने  व द्वेष भावनेने वागणारी माणसे… मग या परिस्थितीत श्रीरामांचे चरित्र आपल्या मुलाबाळांना सांगून एक आदर्श पिढी घडवण्यासाठी सर्वांनीच एकजुटीने प्रयत्न करूयात…. युग बदलले पण परिस्थिती कायम तीच होती. राक्षसी प्रवृत्ती तेव्हाही होती व आताही आहे पण रामाने  घेतलेले निर्णय

त्या परिस्थितीतून काढलेले मार्ग हे नक्कीच  सर्वांसाठी कायमच एक आदर्श व अनुकरणीय आहेत.श्रीराम हे पुरुषोत्तम पुरुष आहेत म्हणजेच ते १६ गुणांनी युक्त आहेत. दशरथ राजाला एकूण तीन राण्या होत्या.कौसल्या ,सुमित्रा व कैकयी.रामाची आई कौसल्या व त्याला दोन सावत्र आई होत्या सुमित्रा व कैकयी.लक्ष्मण व शत्रुघ्न हे दोघे सुमित्रेची मुले  रामाचे सावत्र भाऊ व भरत हा कैकयीचा मुलगा अर्थात सांगायचा मुद्दा म्हणजे हे सर्व तीन भाऊ हे सावत्र होते तरी ते “गुण्यागोविंदाने एकत्र राहायचे”. 

रामाला त्याची सावत्र आई कैकयीनी १४ वर्ष वनवासात पाठवले. सावत्र आईची इच्छा हीच आज्ञा मानून रामाने वनवासात जायचे मान्य केले. पुत्र असावा तर रामा सारखा  “आदर्श पुत्र” म्हणून कायमच गौरवला गेला.  राम वनवासात गेल्यावर भरतानी राजगादीवर बसायचे नाकारले  व रामाच्या पादुका तिथे विराजमान करून राम येईपर्यंत राज्य सांभाळायची जबाबदारी घेतली.  लक्ष्मणाने १४ वर्षे राम व सीतेची सेवा अतिशय निष्ठेने केली. भाऊ असावा तर“हे होते बंधुप्रेम” गुरु वशिष्ठांची आज्ञा मानून राम लक्ष्मण यांनी वनात जाऊन धार्मिक यागात व्यत्यय आणणाऱ्या राक्षसांबरोबर लढून गुरु आज्ञेचे पालन केले. विद्यार्थी असावा तरअतिशय “सामर्थ्यशील” ,”धर्मज्ञ”,”गुणवान” “ज्ञानी” “आदर्श विद्यार्थी”श्रीरामांच्या प्रतीक्षेत अनेक वर्ष शबरीने तपश्चर्या केली व जेव्हा खुद्द श्रीराम तिच्या भेटीला गेले तेव्हा तिने रामाला आपली उष्टे बोरे खायला दिली. तिचा भक्ती भाव पाहून रामाने तिला भक्तांमध्ये श्रेष्ठ भक्त म्हणून युगायुगापर्यंत तुझेच नाव घेतले जाईल असा आशीर्वाद दिला.

भक्ताची भक्ती जाणणारा “ सदाचारी”हनुमान स्वतःला श्रीरामांचे दास म्हणायचे.हनुमाना एवढी निष्ठा कोणीही रामा वर केली नाही. मी स्वामी तू दास असा भेदभाव कधीही न करता हनुमंताच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याच्या हृदयात ते कायमचे बंदिस्त झाले . “कृतज्ञ”रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा जटायू नी रावणाबरोबर युद्ध करून सीतामाईला सोडवायचा केलेला प्रयत्न व त्याचा गमावलेला जीव. जटायुचे बलिदान व्यर्थ जाऊ नये म्हणून रावण वधाची  केलेली “दृढ प्रतिज्ञा”सीतेच्या शोधात असताना वानर सेना, सुग्रीव, जांबुवंत व सेतू बांधताना खारीची मदत घेऊन सर्व प्राणीमात्रांचा पण उद्धार करणारा..  कोणालाही तुच्छ न लेखणारा अतिशय “विद्वान”जेव्हा जेव्हा गर्व ,कपट, मत्सर ,द्वेष वाढू लागतो तेव्हा तेव्हा विनाश अटळ असतो.सत्याच्या बाजूने राम कायमच आहे आणि म्हणूनच रावण वधानंतर रावणाचा भाऊ बिभीषणाला लंकाधिपती, वालीला मारून सुग्रीवाला राज्य प्रदान करणारा “सत्यवादी व धर्मनिष्ठ मित्र”श्रीराम म्हणजे आदर्शपुत्र, आदर्शभाऊ, आदर्श पती, आदर्श वडील, सत्यवचनी, सामर्थ्यशाली राज्यकर्ता, अतिशय प्रियदर्शन शांत स्वभावाचे म्हणून त्रैलोक्यात  गौरविण्यात आले.आज अयोध्ये मध्ये भव्य मंदिराची स्थापना होणार आहे, तेव्हा परत एकदा रामराज्य यावे हीच श्रींच्या चरणी नम्रप्रार्थना. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर आपणा सर्वांना चालायची सुबुद्धी होवो व त्यांच्यातले काही गुणांचे आपण अनुकरण करावे हीच इच्छा .

रामायणातल्या गोष्टी सर्वांनाच माहित आहेत पण रामरायांना आचरणात आणण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करूयात व नवीन पिढी पुढे एक सकारात्मक व आदर्श आयुष्य घडवूयात.अवनीच्या रामकथेनंतर सर्वजणच भारावून गेले होते. सगळ्यांनीच टाळ्यांच्या गजरात अवनीचे कौतुक केले.अवनीने पण विनम्रपणे सगळ्यांची दाद स्वीकारून एक वचन मागितले ,”माझा गोष्टीचा कार्यक्रम आपल्याला जर आवडला असेल तर या क्षणापासून आपण चांगल्या गुणांचे अनुकरण करूया तरच माझा उद्देश सफल होईल”. 

“I  promise” अवनी काकू म्हणत बच्चे कंपनीने मनसोक्त दाद दिली.

सासुबाईंचे व त्यांच्या मैत्रिणींचे भजन अतिशय सुरेख झाले. सगळ्यांनी खड्या आवाजात रामरक्षा व भीमरूपीचे पठण केले.महापूजा व आरती उत्साहात पार पडली.पूर्ण सोसायटीमध्ये सुरेख  रांगोळ्या व पणत्यांनी सोसायटी उजळून निघत होती.सुग्रास जेवणाचा गंध सगळीकडे दरवळत होता व आता सगळ्यांची भूक चाळावली होती.आजूबाजूच्या सोसायटीतून सुद्धा बघ्यांची गर्दी व या आनंदात सहभागी होण्यासाठी धडपड सुरू होती.अवनीचे शब्द प्रत्येकाच्या मनावर कोरले गेले होते.

पुराणातल्या गोष्टी फक्त वाचून सोडून द्यायच्या नव्हत्या तर ते रामतत्व आत्मसात करायचे होते….•|| राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्त्रनामततुल्यम राम नाम वरा नने||•

एवढा सुरेख कार्यक्रम “रघुनंदन को-ऑपरेटिव्ह सोसायटी”मध्येच होऊ शकतो असे बाकीचे लोक म्हणत होती.

धन्यवाद,

अश्याच नवनवीन कथांसाठी आमच्या website ला भेट द्या आणि आमचा watsapp group जॉईन करा. (Marathi Katha 2024)

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. लेखिकेने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखिकेच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)

15 thoughts on “Marathi Katha 2024 – प्रभू श्रीरामचंद्र ….अनादी अनंत”

  1. Amit Hanmant More

    माहित असलेला राम आणि माहीत नसलेला देखील राम उत्कृष्ट सादर केला आहे.

    1. आपल्या प्रतिक्रियेमुळे नवीन लेखनासाठी ऊर्जा मिळाली.
      खूप खूप धन्यवाद.

    2. Swapna Kshirsagar

      अतिशय सुंदर कथा आणि उत्कृष्ट मांडणी 👌🏼👌🏼
      राम भावला कथेतुनी🙏

      1. खूप खूप धन्यवाद… आपला अभिप्राय नवीन लिखाणासाठी ऊर्जा देतो..

    1. आपल्या प्रतिक्रियेमुळे नवीन लेखनासाठी ऊर्जा मिळाली.
      खूप खूप धन्यवाद.

    1. आपल्या प्रतिक्रियेमुळे नवीन लेखनासाठी ऊर्जा मिळाली.
      खूप खूप धन्यवाद.

    2. खूप खूप धन्यवाद… आपला अभिप्राय नवीन लिखाणासाठी ऊर्जा देतो..

  2. अभिजीत पुराणिक

    प्रभू श्रीरामचंद्रांच्या आदर्शाची आजच्या कलियुगाशी घातलेली उत्कृष्ट सांगड

  3. अभिजीत पुराणिक

    , प्रभू श्री रामचंद्र यांच्या आदर्शांची आजच्या कलियुगाची घातलेली उत्कृष्ट सांगड

  4. जयश्री देशपांडे

    सत्यायुगाची कलियुगाशी घातलेली सांगड छान जुळून आली. मर्यादा पुरुषोत्तम राम समजून घेऊन आचरणात आणणे तसे अवघडच! पण प्रयत्न पूर्वक तो राम हृदयात विराजमान करण्याची इच्छा या कथेतून मनामनात निर्माण झाली हेच कथेचे यश आहे.
    वृषाली, अभिनंदन!
    लिहित रहा. विचार वाटत रहा.
    अनेक शुभेच्छा

  5. जयश्री देशपांडे

    सत्य युग ते कलियुग्राम कथेची मांडणी उत्तम झाली.मर्यादा पुरुषोत्तम रामाचे काही गुण जरी अंगी बनता आले तरी आपल्या जन्माचे सार्थक होईल.
    प्रभू श्री रमांच्या प्राण प्रतिष्ठेच्या समयी आपण असण्याचे भाग्य लाभले यासाठी श्रीरामाच्या चरणीसाष्टांग दंडवत

    1. खूप खूप धन्यवाद… आपला अभिप्राय नवीन लिखाणासाठी ऊर्जा देतो..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top