आज सकाळी सकाळी सरपोतदारांच्या वाडयात लगबग चालली होती. मळ्यातल्या दोन चार बायकाही आल्या होत्या लवकरच. नुकतच लग्न होऊन सासरी आलेल्या सायलीनेही सारी गडबड पाहिली. तिने सासूबाईंना विचारले तशा त्या म्हणाल्या,” अगं पोरी!आज आत्या साब कैरीचं लोणचं करायला घेणार आहेत. पुण्यासारख्या शहरात राहून आलेली सायली हे ऐकून अवाकच झाली.” अहो आई दोन मिनिटात तर दुकानात मिळतं लोणचं, त्यासाठी एवढा व्याप कशाला करायचा?”
” अगं पोरी, राब त्या माणसांचं घर आपलं. त्यात तुझं ते दुकानाचं लोणचं किती सं ग पुरायचं?” असं म्हणतं आत्या साब सोप्यात आल्या. हलका गुलाबी मऊसूत पदर डोक्यावर सारखा करत त्या पाटावर बसल्या. या आत्या साब म्हणजे सायलीच्या आजे सासूबाई.गव्हाळ रंग ,शेलाटी बांधा ,मोठ्या कपाळावर गोंदणाची आडवी र आडवी रेघ ..,त्याच्याखाली ठिपका आणि हनुवटी वरचा काळातीळ त्यांच्या गोडव्यात भर घालत होता .आत्यासाब पाहता क्षणी जिव्हाळा निर्माण करणाऱ्या असल्यातरी वेळप्रसंगी घरातल्या मोठ्या माणसांनाही ठणकावत असेल पण काहीही असलं तरी साईलीला लोणच्याच्या घाटाचा प्रपंच काही पचनी पडला नाही पण आत्या साब पण तशा खमक्याच! त्यांनी सायलीला एका दमात हाक मारली . “ये गं सायली , तू पण बघ लोणच्याची पद्धत .तुझ्या सासुबाई तुला शिकवतीलच् ,पण माझ्याही हातची चव बघ .तशी नाराजीने सायली गेली. तोपर्यंत तिथं शंभर एक कैऱ्यांचा ढीग दोन गडी माणसं फ़ोडून देत होती. बायका निगुतीने फोडी करत होत्या. चुलीवर तेलाचा डबा उकळायला ठेवला होता. एवढा सरंजाम पाहून सायली चपापलीच.”काय हे आत्या साब, कोण खाणार एवढे लोणचं?”कशा बायका गालातल्या गालात हसल्या. आत्या साप म्हणाल्या,” सायली ,तुझं नाव पण तुझ्या सारखाच अकशी गुळमाट हाय बघ. पोरीची नाव कशी कडक आणि तेजतर्रार पाहिजेत.. नद्यांच नाही तर दे०ींची.. लक्ष्मी , गंगी, सावि, रूख मा, यमुना रं जी. न्हाय तर तुझं..तुझ्या नावाच संग मिरची लागली तरी बी जमणार नाही बघ.”हे ऐकताच सायली खळाळून हसली आणि कंपूत सामील झाली.
तशा अत्यासाब अणि एक जाणती बाई उठली. हळद ,मीठ ,मिरची ,मोहरीची डाळ, मीठ ,बडीशेप असा बराच मसाला त्यांनी मापाने काढून घेतला. एका मोठ्या भांड्यात कैरीच्या फोडींना हळद आणि मीठ लावून ठेवलं. तशा त्यांच्या गप्पा रंगल्या .”अगं पोरी,सरपोतदारांच घर हाय आपल!वर्षाकाठी चाराने पैसाअडका कमी मिळेल पण माणसांचा राबता काही कमी व्हायचा नाही .घरात जाणं माणूस हाय. तशा आयांबायांची, पोरींसोरींची पावलं घराकडं वळतात वाडयाकडं वळतात.कधी अन्नाला तुटवडा न्हाय कि माणसांच्या मनाला खळगा न्हाय!ले करू आजारी असलं की माय धावत येती” अत्या साब, आता वं?तसा मूठभर मऊ भात आणि तूप मेतकूट दिलं की त्या पोराला बी उभारी येती.” तशी अन्साक्का म्हणाली,” व्हय तर.. एकांही पोटुशी माहेरवाशीण आली तर हमखास आत्या साब ना हाक देणार . मग त्याबी परसातली एक दोन फळं आणि काय असलं ते पोट भर जेवाय देणार”. तेवढयात मसाला कालवत रंजी म्हणाली ,”तर वं सुनबाई, अशाच एकदा आत्सा साब मळ्यात आल्य व्हत्या. अंगात कणकण घेऊन मी सरी वडत हुती. पर ताकद कुठली पुरायला?तिथं सरी तच आडवी झाली. तर आपत्ती साबने घरी पाठवलं आणि दोन दिवसाचे जेवण लावून दिलं .अंगावर कळा आल्यावरच माझ्याकडे धाडलं पुन्हा!”
…..आणि मग अशीच एक एक असे निघत गेली आणि मन मोकळी होत गेली. आणि सायली आत्या साबशी बांधली गेली ती कायमचीच! त्यांच्या हातच्या सगळ्या चवींची तिने ओळख करून घेतली हौसेने शिकत राहिली धडपडत राहिली आणि मग चुकतमाकत सुगरण म्हणून नावाजली गेली.” आत्या साब , नात सून न०हं.. लेक च हाय तुमची जनू! अशी तुमच्या हाताची चव उचलली हाय पट्टीनं!”मग आती साब आणि सायली एकमेकीकडे बघायच्या. कधी निर्मळ नजरेने तर कधी मिस्कील खोडकर हास्याने!कधीतरी तिला तिच्या सासुबाई म्हणायच्या,”सायली,गाठी कोणाशी काय म्हणून बांधायच्या हे सगळ आपलं प्राक्तन चं असतं.आत्यासाब एवढ्या कष्टात नं वर आल्या पण कधी तोरा नाही मिळवला. म्हणून तर साऱ्या आयाबाया, पोरांच्या,ले की बाळीच्या साऱ्यांच्याच आत्यासाब झाल्या.आम्हीही त्यांच्या हाताखाली राहिलो. तसेच वागलो .पण आम्ही मालकीण बाईच राहिलो. मालकीण बाईची अदब मिळाली पण आत्या साब च्या जि०हाळ्याला मुकलो. सुदैवाने हा जि०हाळा तुम्हाला मिळाला आहे.तो तुम्ही जपा. अदब ही कर्तुत्वाने मिळतेच पण जिव्हाळा हा मनाच्या अंतरंगातच उमटावा लागतो.”
सासूबाई बरोबर बोलत असताना सायलीला अनेक गोष्टी समजत होत्या . आत्या साब सामान्य घरातल्याच ,अल्पशिक्षित पण आपल्या हुशारीने त्यांनी सासरच्या मंडळींना जिंकून घेतले होते . सारे व्यवहार शेतीवाडी यांची सांगड घातली. एकाही नातेवाईकाला घरच्या माणसांना दुखावलं नाही. त्या सर्वांचा परिपाक म्हणून सर्व मंडळींचा त्यांच्यावर अतूट असा विश्वास बसला होता . मोठे मंडळी जशी त्यांच्यावर विश्वास टाकत होती तशीच लहान मंडळी ही मायेनं जवळ यायची.
शेतामध्ये घरामध्ये माणसांना गोड बोलून , प्रसंगावधानाने मदत करत त्यांनी घरातील राबता कायम ठेवला. आत्यासाब च्या रूपाने सरपोतदारांच्या घराला एक भक्कम आधार मिळाला. केवळ पारंपरिक शेतीच कसायची नाही तर त्याचा विस्तार करायचा .वाढवायचा .भविष्याची तरतूद करायची. हे सारे आत्यासाबनी केले .सायलीला फार कौतुक वाटायचं .आपल्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा आत्यासाबचा चा अनुभव खूप मोठा आहे याची तिला जाणीव झाली .मुळातच लाघवी आणि गोड बोलण्याने आपलंसं करून घेणारी सायली आत्यासाबची लाडकी बनली .सायली सुद्धा प्रश्न विचारून शंका विचारून आत्यासाबना बोलता करायची. त्यातून तिला विविध रीतीभाती ,परंपरा समजायच्या .गावातील पद्धती समजायची .माणसे जपण्याची कला समजायची. यात तिला फार आनंद व्हायचा .यातूनच तिच्या मनात एक कल्पना आली.
सायलीने मसाल्याचा उद्योग करायचे ठरवले. त्यात आत्यासाबांची मदत घेतली. घरच्यांना विश्वासात घेतले.सर्वांच्या मदतीने तिला खूप हुरूप आला. हळूहळू व्यवसायाचा विस्तार वाढू लागला .आत्यासाबनी सायलीचे हे सारे यश डोळ्यात सामावून घेतले. समाधानाने तिची पाठ थोपटली .केवळ मसाल्यांच्या रूपाने चालू झालेला हा उद्योग आता अन्नप्रक्रिया व्यवसायामध्ये स्थिरावत होता आणि याची चुणूक सर्वांना जवळपास झाली होती .सायलीचे नाव पंचक्रोशीत गाजले होते. पण ‘सायली सरपोतदार ‘या नावापेक्षा तिला ‘आत्यासबची लाडकी नातसून’ ही पदवी फार सुंदर आणि छान वाटत होती.
__आणि आज सायलीला हे सारे आठवत होते.एक प्रथितयश उद्योजिका म्हणून मिळालेले सोनेरी मानपत्र आज तिच्या समोर होतं ,आत्या साब च्या हाताखाली शिकून ,त्यात प्रावीण्य मिळवून तिने हा व्यवसाय सरपोतदार यांच्या वाड्यात आणला होता.”सायली फूडस् .. चव घराघरातील!” या तिच्या ब्रँडला तिने नावारूपाला आणलं होतं.त्यासाठी आत्या साबच्या हातची चव. वळण, संस्कार, जिव्हाळा हे सारं सारं तिनं आपल्या मध्ये असोशीनं टिपून घेतलं होतं. ‘ हे आमच्या संस्कारात बसतच नाही,असा आमचं वळण चं नाही, आमचं कुळ चांगलं बारा कोसांत नावाजलेल आहे…”अशी भल्यामोठ्या बेगडी वाक्यांनी नव्या सुनेचे नवे पण कोमेजून टाकणारी वाक्य आत्यासाबनी कधीच ऐकवली नाहीत.जो काही भला वारसा असेल तो त्यांनी खरेपणाने, आंतरिक मायने, कळत नकळत, मनाच्या गाठी सोडवत पुढच्या पिढीकडे सुपूर्द केला होता.म्हणूनच”पारंपारिक चवींचा उत्कृष्ट मिलाफ” अशी स्तुती उधळणाऱ्या सोनेरी मानप त्रा पेक्षा ” बयो! अगदी जल्माची चव हाय तुझ्या हाताला….”! हे आत्या साब नी केलेलं कौतुक तिला आज राहून राहून आठवत होतं …!
गौरी संतोष जंगम
कशी वाटली तुम्हाला ही कथा. ? अशाच नवनवीन आणि सुंदर कथांसाठी आमच्या “लेखक मित्र” या वेबसाईटला भेट द्या .कमेंट करा आणि नक्की शेअर करा ..धन्यवाद !
उत्कृष्ट कथा
छान