टणटणटण……. अशी घंटा वाजली आणि पोरं गायी गुरांच्या कळपासारखे बाहेर पळत सुटले. शाळा सुटली पाटी फुटली आई मला भुक लागली असे ओरडत होते. कुणी उगाच ये.. आ…. असं अत्यानंदाने ओरडत होते. परीक्षेला येतानाचे त्यांचे सुतकी चेहरे आता मात्र गुलाबाच्या कळ्यांसारखे खुलले होते.
आज मुलांचा शेवटचा पेपर होता. बोर्डाची परीक्षा संपली आणि मुलांनी सुटकेचा निःश्वास टाकला. दोन चार दिवस छान गेले. मग मात्र पुढे काय हे ज्या मुलांच ठरलेल नव्हते त्यांना टेन्शन येऊ लागले. टीम ‘ इंद्रधनुष्य ’ सात जणांचा शाळेत सर्वांचा लाडका एक ग्रुप होता. अभ्यासात हुशार आणि सामाजिक उपक्रमातही सहभागी असणारे अशी ही गुणी बाळे होती.
शाळेच्या शिक्षकांसह इतर सर्व लोक हे सातजण पुढे काय करणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. पण तसं बघायला गेलं तर टिम ‘इंद्रधनुष्य’ या विषयावर अजून तरी एखाद्या ठाम निर्णयापर्यंत पोहोचली नव्हती. नक्की त्यांच्या करिअरची दिशा काय असावी याबाबत ते सगळेच साशंक होते.
इशिका, स्वराली, मृणाल, युवराज, कुणाल, अंबर, आणि सिद्धार्थ असे हे सात रंग होते.सातही नमुने स्वभावाने अगदी भिन्न होते पण एकत्र आले की त्यांच्याकडे कोणत्याही समस्येवर उपाय तयार असायचा. कोणालाही मदत करायला टिम इंद्रधनुष्य नेहमी तत्पर असायची.
शाळेच्या इतक्या वर्षांमध्ये तर हे सगळे जणू एक कुटुंबच होऊन गेले होते. सगळे रहायला शाळेच्या आजुबाजुलाच होते. त्यांचे आई वडीलही एकमेकांना चांगले ओळखत होते.योगायोगाने त्यांच्या आईवडिलांचे विचार एकमेकांशी छान जुळत असल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा मुलांना होईल असे काही करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
आयुष्यात फक्त एक किंवा दोन बेडरूमच घर घेऊन आणि त्याचे हप्ते भरण्यासाठी काबाडकष्ट करत बसायचे एवढेच आपल्या मुलांचे उद्दिष्ट नसावे असे त्यांना मनापासून वाटत होते. काही तरी नवीन उपक्रम जो इंद्रधनुष्याला फक्त एक उदरनिर्वाहाचे साधन म्हणून नाही तर त्यांचे रंग जगात पसरायला ही मदत करेल.
आपण सर्व जण बसून यावर काही छान तोडगा काढूया असं म्हणत स्वरालीची आई आत किचन मधे जाऊन सर्वांसाठी चटपटीत नाश्ता आणि थंडगार सरबत घेऊन आली. खास या विषयावर चर्चा करून ठोस निर्णय घ्यायला हवा म्हणून सर्व मुले आणि त्यांचे आईवडील स्वरालीच्या घरी एकत्र जमले होते.
आपली मुले नेहमीच्या वही वाटेने चालणाऱ्यांपैकी नाहीत हे स्पष्ट आहे तेव्हा वेगळी वाट निवडली तर मुलांनाच नाही तर आईवडिलांना सुद्धा स्वतःचे सगळे व्याप सांभाळून मुलांच्या ध्येयासाठी कष्ट करण्याची तयारी दाखवली पाहिजे. हे सगळ्यांना मान्य असेल तरच आपण पुढे जाऊ शकतो असे सगळ्या पालकांना वाटत होते.
सर्वानुमते असे ठरले की एखादी अशी संस्था उभारावी की जेणेकरून आपल्यासाठी उत्पन्नाचे साधन तर तयार होईलच शिवाय गोरगरिबांना थोडी मदत करून आपण समाजसेवा सुद्धा करू शकतो आणि यासाठी थोडा विचार करून मुलांना डोकं लावायचं होतं की अशी कोणती संस्था तयार करता येईल ज्याच्याने आपण हे दोन्ही हेतू साध्य करू शकतो शिवाय आपले जे काही कौशल्य आहे आपले इंटरेस्ट आहे ते पण सगळे आपण योग्य पद्धतीने वापर करू शकतो असं काहीतरी त्यांना शोधायचं होतं.
कोणती संस्था उभारता येईल अशा विचारात असताना कुणालच्या मनात आले की आपली शाळा जी आहे ज्या शाळेने आपल्याला एकत्र आणलं आपला हा इंद्रधनुष्य चा ग्रुप तयार झाला अशीच एखादी शाळा जिथून आपण ज्ञानदान करू शकतो आणि आपले मॅनेजरीअल स्कील, शैक्षणिक पात्रता आणि क्लेरिकल वर्क ऍडमिनिस्ट्रेशन अशा वेगवेगळ्या स्वतःची ओळख निर्माण करू शकतो शिवाय आपण काही सीट्स अशा मुलांसाठी राखीव ठेवायचे जे की फीज भरायला आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही पण जे विद्यार्थी हुशार आहेत म्हणजे याच्यातून गरीब, होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं कार्य ही साध्य होईल आणि आपला जो समाजसेवेचा हेतू आहे तो पण साध्य होईल. अशा प्रकारे शाळेची कल्पना कुणालने मांडल्यावर सगळ्यांनी होकार दिला कारण नाही म्हणण्यासारखं त्यात काही नव्हतं. ही अतिशय उत्तम कल्पना होती.
फक्त आता गरज होती ती अजून डिटेल प्लान तयार करण्याची. म्हणजे की त्या त्या अनुषंगाने पुढची डेव्हलपमेंट मुलांचे ऍडमिशन अशा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी लागणारे सगळे स्किल्स आता या टीम इंद्रधनुष्यकडे हवे होते तेव्हा कुणालने स्वतः ऍडमिनिस्ट्रेशन विभाग निवडला आणि त्यासाठी त्याने बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन ला ऍडमिशन घ्यायचं देखील मनोमन ठरवून टाकलं. इशिकाला बिजनेस आणि मार्केटिंग मध्ये इंटरेस्ट होता त्यामुळे तिने शाळेची जाहिरात आणि ऍडमिशन प्रमोशन्स यामध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी एमबीए करायचं ठरवलं. त्यानंतर मृणालला आधीपासूनच शिकवण्यामध्ये इंटरेस्ट होता त्यामुळे तिने बीएससी नंतर बीएड करून शिक्षकी क्षेत्राची धुरा हातात घ्यायचं ठरवलं.अर्थात अजून शिक्षकांची सेना केला मदतीला हवीच होती. अंबरला क्लेरिकल कामात इंटरेस्ट होता. युवराजच गणित चांगले होते म्हणून त्यांनी अकाउंट विभाग सांभाळण्यासाठी कॉमर्स साईडची निवड केली.
सिद्धार्थला कन्स्ट्रक्शनची आवड होती तेव्हा शाळेचे इमारत आणि पुढील सगळं कन्स्ट्रक्शन त्याने बघायचं ठरवलं त्यासाठी त्याने सिव्हिल इंजिनिअरिंग नक्की केलं. स्वरालीने योगाभ्यास व फिजीकल फिटनेस ट्रेनर व्हायचं ठरवलं.
अशाप्रकारे हे इंद्रधनुष्याच्या सात रंग सात वेगवेगळ्या फील्डमध्ये जाऊन आपलं फक्त नॉलेज बेस्ट तयार करून पुन्हा एकत्र आले नाहीत तर या एवढ्या वर्षांच्या मेहनतीमध्ये अथक परिश्रमामध्ये ते कुठेही आपला हेतू आणि टार्गेट विसरले नाहीत. सगळ्यांचे शिक्षण पुढे मागे एक-दोन वर्षात पूर्ण होतील असं वाटत असतानाच शाळेसाठी मुलांच्या आई-वडिलांनी वर्गणी काढून पैसे एकत्र करून एक छानसा प्लॉट खरेदी केला. मुलांची शिक्षणे आज जवळजवळ संपत आली होती आणि आता कन्स्ट्रक्शन चालू करून पुढच्या ऍडमिशनची तयारी करून घेण हे सगळं महत्त्वाचं होतं. कन्स्ट्रक्शन साठी आणि मार्केटिंगसाठी असे दोन इंद्रधनुष्यचे वीर कंबर बसून तयार व्हायला लागले तोपर्यंत बाकीच्या सगळ्यांनी आपापल्या परीने तयारी चालू केली होती.
जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही हे टिम इंद्रधनुष्य वारंवार सिद्ध करत होती आणि त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळणारच होते यात काही वादच नव्हता.
दोन वर्षातच शाळेच्या सर्व इमारती तयार झाल्या आणि शाळेसाठी मैदान, कॉम्प्युटरची प्रयोगशाळा इतर प्रयोगशाळा आणि शाळेसाठी आवश्यक असणारे सर्व साधने अशी सगळी तयारी करण्यात आली. कुठेही काही कमी ठेवली नव्हती.
हे बोलणं जितकं सहज वाटतं तेवढं सोपं नव्हतं त्यासाठी प्रचंड मुलांचीच नव्हे तर त्यांच्या आई-वडिलांची कसोटी लागली होती.
दोनच महिन्यांत सर्व ॲडमिशन्स फुल झाल्या आणि ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, अशा मुलांना तिकडे राखीव सीट्सवर प्रवेश देण्यात आला अशा प्रकारे मुलांनी सर्व डिपार्टमेंट सांभाळून घेतले आणि एक मोठी संस्था शहरात नावारूपाला आली.
टिम इंद्रधनुष्यवर लक्ष ठेवून असणारे बघतच एक राहिले एवढी छोटी छोटी मुलं अशी वाऱ्याच्या वेगाने पुढे गेली आणि आज त्यांच्या संस्थेला एक वेगळाच मान आहे, शहरात त्यांचं मोठं नाव आहे, इथे ऍडमिशन मिळणं म्हणजे भाग्य समजले जाते. तिथे फक्त मुलं शाळेचा अभ्यास शिकत नाहीत तर ती सर्वांर्थाने घडवली जातात. सुजाण नागरिक तयार करण्याचं कर्तव्य ‘इंद्रधनुष्य विद्यालय’ अभिमानाने पार पाडते आहे आणि पाडत राहील.
जिद्द मनात असेल हे काहीही अशक्य नाही हे पुन्हा एकदा दाखवून देऊन शाळेच्या मुलांसाठी एक खूप छान आदर्श घालून दिला आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढची नवीन पिढी अजून चांगली घडणार यात काही शंकाच नाही. टीम इंद्रधनुष्यला मनापासून समाजाने आशीर्वाद दिले आणि या आशीर्वादाचे फळ म्हणून टीमने स्वतःच्या नवनवीन शाखा सुरु केल्या.
त्याही यशस्वीरित्या चालवण्यात हे सगळे सक्षम आहेत. पुढे जाऊन पूर्ण भारतात त्यांच्या वेगवेगळ्या संस्था असतील आणि हे विद्यादानाचं काम टीम इंद्रधनुष्य मनापासून पार पाडत राहील, यात काही शंका नाही.
लेखिका- सौ. माधुरी शेलार, नवी मुंबई
तुम्हाला ही कथा कशी वाटली, ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !