मराठी कथा – सुटका

WhatsApp Group Join Now

         जीवाच्या आकांताने ती धावत होती . तिला आज  पाटलाच्या तावडीतून सुटका करायची होती. धावून धावून तिला दम लागला. आणि शेवटी ती स्टेशन जवळ पोहोचली. तिला कुठे जायचं आहे.  याचा काही विचार न करता ती रेल्वेच्या डब्यातचढली . पाटची माणसंही गाडीत चढले. तशी ती  ट्रेनच्या बाथरूम मध्ये जाऊन लपली.  ट्रेनमध्ये भयंकर गर्दी असल्यामुळे पाटलांच्या   माणसांना ती दिसेनाशी झाली. तेवढ्यात गाडीचा  हॉर्न वाजला.  आणि गाडी सुटू लागली.

ट्रेन मधून  पाटलाची माणसं खाली उतरली. तशी गाडी  वेगाने धावू लागली.ती बाथरूम मध्ये अर्धा तास  बसून राहिली. तिला आता  थोडं बरं वाटलं. तिने आपला चेहरा ओढणीने झाकून घेतला. आणि बाथरूमच्या बाहेर निघाली. डब्यात खूप गर्दी होती. कुठेही बसायला जागा नव्हती. ट्रेनच्या पायऱ्या जवळ एक मुलगा  बसला होता. ती त्याच्याच आडोशाला जाऊन  बसली.त्या मुलाने तिच्या कडे बघितले. 

  तिला त्याचीही भीती वाटत होती. तिला वाटलं  हाही आपला फायदा घेतो की काय?  पण त्याने तिला बसायला जागा करून दिली.   काय माहिती त्याला तिची अवस्था समजली असावी. दोघेही खूप वेळपर्यंत निशब्द होते. पळता पळता तिला धापा लागल्या होत्या, आणि तिचा घसाही कोरडा झाला होता. काही वेळाने एका छोट्या स्टेशनवर गाडी काही मिनिटासाठी थांबली. पाणी विक्रेता गाडीत  चढला. तसे त्या मुलाने पाण्याची एक बॉटल  विकत घेतली,आणि पाणी प्यायला लागला. तिलाही खूप तहान लागली होती. पण पाणी कसं मागाव हे समजेना.

पहिलेच आपण  एका संकटातून बाहेर आलो,लगेच दुसऱ्या  संकटात फसणार तर नाही असं वाटायला लागलं.  पण तरी तिने त्या मुलाला “मलेपण थोडं पाणी देता    का? असं विचारलं” लई वेळची घशाले कोरड पडली हाय..” त्याने तिच्याकडे तिरप्या नजरेने पाहिले. आणि मागे हात करून पाण्याची बॉटल दिली. खूप वेळची तहानलेली ती घटाघटा पाणी प्यायली. आता कुठे तिच्या जीवात जीव आला होता. 

  हा प्रवास आपल्याला कुठे घेऊन जाईल. याची तिला  काही कल्पना नव्हती. पण तिने गाठ बांधली होती. की  पुन्हा त्या गावात जायचं नाही. तिने ती पाण्याची बॉटल त्याला देऊ केली.”थोडं खाते का तु”? “तु खूप थकलेली दिसते.”  ती घाबरली? हा आपल्याशी जवळीक करतो की  काय असं वाटू लागलं. तिला भूकही लागली होती, आणि भीतीही वाटत होती. अशी मुलं एकट्या मुलीशी गोड बोलून मग तिला बाजारात नेऊन  विकतात. तिने खूपदा सिनेमात असे दृश्य पाहिले होते. “मग त्याने तिला विचारले फुटाणे खाते का?” 

मागच्या स्टेशनवर गाडी थांबली होती, तेव्हा   त्याने विकत घेतले होते. “तो म्हणाला कुठे   जायचं आहे तुले” तिने माहित नाही असं उत्तर दिलं. मग त्याने थोड्या वेळाने पुन्हा विचारलं,  “तुय नाव काय? ती काही बोलली नाही. मग त्यानेच  बोलायला सुरुवात केली.

         “माय नाव अविनाश आहे. मी कवठे या गावातला! माझ्या बापाने रात्रंदिवस  शेतात राबून हिरवं गार सोन पिकवलं होतं,पण गावच्या सावकारांने एवढेही पिक नष्ट केलं. कारण आमचं शेत त्याच्याकडे गहान होतं. सावकाराले वाटल यंदा हा पिकाचे पैसे देऊन शेत जमीन सोडून घेणार, म्हणून सावकाराने रात्रीच पूर्ण पीक नष्ट केलं.   हे नुकसान पाहून माझा बा हंबरला,आणि त्याने शेतातच निंबोणीच्या झाडाला गडफास घेतला.मायी माय मी लहान होतो तेव्हाच देवाने नेली. तेव्हापासून माझा बापच माझी माय होता. त्याने  मले माय सारखं लगीत जीव लावला होता.  सावकार मोठा माणूस त्याच्या विरोधात काही सापडलं नाही.आणि त्याले गावातले लोक वचकून  रहाचे. पुढं पिक उगवाले पैसेबी नाहीत ,आन जास्त शिकलोबी नाही. मले मागेपुढे कोणी नाही, म्हणून मी ट्रेन मध्ये चढलो. मले पण माहित नाही कुठे जायचं आहे. गाडी जिथ नेईल तिथ जाईन.”

                तिलाही त्याची व्यथा ऐकून हा पण आपल्या सारखा दुःखी आहे. असं वाटू लागलं. आणि तिनेही आपली व्यथा त्याला सांगितली. “मी सुरेखा  कवठे गावापासून 7 किलोमीटर अंतरावर जळका           या गावची, मायी पण आई लहानपणातच गेली. माया बाप पण दारोड्या पिऊन कुठेही पडून राहाचा. मले जशी जशी समज आली, तशी कोणाच्याही वावरात  कामाले जायची. मलेही शिकाची लई आवड होती. पण दरोड्या बापापाई कोणीबी जवळ करत नव्हत. दिसभर बाप दारूच्या गुत्यावर राहे. आपली पोरगी मोठी होत हाय, याचं त्याले भान नव्हतं. पोरगी लग्नाची झाली हाय,गावातल्या भामट्यांचे डोळे  रोज आपल्या पोरीच्या शरीराचे लचके तोडते. याचं त्याले काय बी देणं घेणं नव्हतं.  रोज मायाकडे दारू प्यासाठी पैसे मागत राहे. म्या नाही द्यायची पैसे ! म्या सारं दीसभर वावरात राबू ,त्याले दारू प्यायले पैसे देऊ. मग तो पाटलाच्या  चापती करून गावातील कोणाचेही घरातील सामान चोरून पैसे मिळवे. कधी कधी तर काही  गावातल्या लोकांनी खूप हाणल,पण जन्म देणारा बाप  होय म्हणून मीच लोकांपुढे गयावया करायची. माझ्याकडे पाहून लोकबी त्याले सोडून द्यायची. पण आता पाणी डोक्यावरून गेलं. 

       दारूसाठी त्यानं माया सौदा पाटलाशी केला. रात्री  सगळं गाव नीजून गेल् होत. सगळ गाव दिसभर काम  करून थकून जात, आणि रात्री लवकर खाट जवळ करत. म्यापण दिसबर काम करून थकली होती.आणि दिसभरचा थकव्यापाई मलेपन झोप लागली. तसाच माया पायापाशी  कुणाचातरी हात लागला. म्या  दचकून उठली,पाहिलं तर काय पाटील मायासमोर  उभा होता.म्या त्याला जाब विचारला, तर त्यानं  म्हटलं”तुया बापान दारूसाठी तुया सौदा केला.” अशी तळपायाची आग मस्तकात गेली,आणि वाटलं  बापाला तिथेच उभा गाढून टाकाव.  काहिबी झालतरी याले आपल्या अंगाला हात लावू द्याचं नाही.

 मी  उषाच्या बाजूलेच कोयता घेऊन झोपाची. तो कोयता हातात घेऊन त्याच्या पायावर मारल.तो पिसाळला मार जोरात   लागला नाही,पण तो जोरात  किंचाळला.  त्याची माणसं दाराबाहेर पायरा देत होती. माया बापाण पहिलेच बाहेरून घराची कडी लावली होती.पण मीपण वाघीण होती. म्यापान जोरात दाराले लाथ मारली,आणि दार खाली पाडलं,आणि तिथून  जोरात धावत सुटली. जोपर्यंत स्टेशन आलं नाही तोपर्यंत  म्याकुठबी थांबली नाही.  

       तर काही मैलाच्या अंतरावर पाटलाची माणसं माया  मागं धावत दिसली. अन “म्या स्टेशनवर उभी असणाऱ्या गाडीत चढली,शेवटी तू मले इथ भेटला”

               “अविनाश म्हणाला” तूय न माय दुःख सारखच  हायव. आपण दोघेही एकमेकांच दुःख वाटून घेऊ शकतो.आपल्याले कायले पाहिजे कोणाची साथ, आपणच एकमेकांचे साथीदार बनू. पण मी काय तुले      जबरदस्ती करत नाय, तुले पटत असंत पाय बा!     आणि तिलेही वाटलं आपल्यालेही कोनिबी नाही.

    या भामट्यांच्या जगात असे अनेक शिकारी बसले आहे. आपली शिकार कराले. तिने सुद्धा होकार दिला. आणि इथून त्यांचा नवीन प्रवास सुरू झाला.

धन्यवाद.

1 thought on “मराठी कथा – सुटका”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top