नमस्कार मंडळी,
आज आपण पाहणार आहोत एका अशा महिलेची माहिती जी वैक्यक्तिक,कौटुंबिक, सामाजिक , राजकीय अशा सर्व पातळ्यांवर आपल्याला प्रेरणादायी आहे , मनात आदर निर्माण करणारी आहे . मंगते चुंगनेजंग – मेरी कोम , ‘मॅग्निफिसेंट मेरी’ असे टोपणनाव असलेली सुप्रसिद्ध भारतीय महिला बॉक्सिंग चॅम्पियन आहे. तिचा जन्म १ मार्च १९८३ साली इम्फाल, मणिपूर या खेडेगावात एका शेतकरी कुटुंबात झाला.मेरी कोम नावाने ती जगभरात ओळखली जाते. तिच्या वयाला ४० वर्षे पूर्ण होत आहेत. अंतर राष्ट्रीय बॉक्सिंग फेडरेशन (INBF) च्या नियमानुसार ती आता स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकणार नाही अशी बातमी सध्या चर्चेत आहे.
आजच्या लेखात मेरी कोम च्या जीवनाविषयी आपण जाणून घेणार आहोत. या लेखात आपण तिच्या आयुष्यातील सर्व महत्वाच्या टप्प्यांवरील प्रवास पाहणार आहोत.
मेरी कोम – तिने इतिहास घडवला !
मेरी कोम चा जन्म – मणिपूर येथील कांगथेई या दुर्गम भागातील खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. सर्व सामान्य गरीब शेतकऱ्यांच्या कुटुंबात जसे वातावरण असते तशाच वातावरणामध्ये तिचे बालपण व्यतीत झाले . कुटुंबातील संस्कार हे भारतीय जुन्या संस्कृती प्रमाणे मुलीला जसे वागवयास हवे त्या प्रमाणेच होते . मात्र मूलतः मेरी चा कल हा एका अस्सल खेळाडूला शोभेल असा होता. अर्थातच वडिलांना हे पटणारे नव्हते . मुलीने मुलीसारखेच वागावे असे त्यांना वाटत होते. तिच्या लग्नाला तिच्या खेळाडू होण्याने अडचणी येतील आणि तिचे लग्न होणारच नाही असे देखील त्यांना वाटत होते . हे त्यांच्या बाजूने रास्तच होते.
मेरीच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना सुरुवातीपासून पाहू (Mary Kom information in Marathi)
दुर्दम्य इच्छा शक्ती – खेडेगावातील पुरातन संस्कार घट्ट पणे धरून ठेवणाऱ्या कौटुंबिक वातरवरणा मध्ये मेरी शेतामध्ये आई वडिलांना मदत करत होती, भावंडांना सांभाळत होती. मात्र तिच्या मनातील खेळाची ओढ तिला एकीकडे अस्वस्थ करत राहिली.
अखेर बँकॉक च्या आशियाई स्पर्धेमध्ये जेव्हा मणिपुरी बॉक्सर डिंको सिंग यांना सुवर्णपदक मिळाले तेव्हा मेरी ला प्रकर्षाने बॉक्सिंग क्षेत्रात उतरावे असे वाटू लागले. त्या वेळी तिचे वय सतरा वर्षाचे बंडखोरी करण्याचे होते.आतला आवाज ऐकण्याचे होते. हृदयाचा आवाज ऐकून, घरच्यांचा विरोध पत्करून २००० साली तिने बॉक्सिंगच्या रिंगणात पाहिले पाऊल टाकले. तिने बॉक्सिंग शिकायला सुरुवात केली. नरजीत सिंह हे तिचे पाहिले बॉक्सिंग क्षेत्रातील गुरू होते. सुरुवातीच्या काही दिवसातच तिने आपल्या खेळात दमदार प्रगती केली आणि त्याच वर्षी म्हणजे वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षीच मेरी कोम ने राज्य स्तरीय स्पर्धेत विजय मिळवला. या घटनेने घरचा विरोध मावळायला सुरुवात झाली.
आपला आतला आवाज काय सांगतो आहे हे ओळखायला हवे आणि आपले पाहिले धाडसाचे पाऊल आपणच टाकावे लागते हे तिने सिध्द केले .त्या नंतर ती थांबली नाही. तिचे जीवन सर्वार्थाने फुलू लागले.

पहिले सुवर्ण पदक आणि पदकांची दमदार सुरुवात
-मेरी कॉम् ने आपले पाहिले सुवर्ण पदक सातव्या ईस्ट इंडिया महिला बॉक्सिंग स्पर्धेत मिळवले.
-दुसऱ्या आशियाई आंतरराष्ट्रीय महिला बॉक्सिंग स्पर्धेत मेरी ने सुवर्ण पदक पटकावले .
-तैवान मध्ये झालेल्या महिला बॉक्सिंग स्पर्धेत तिने पुन्हा पदक पटकावले.
अमेरिका येथे झालेल्या पहिल्या जगितिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत तिला रौप्य पदक मिळाले.
तिच्या यशाचा आलेख उंचावतच राहिला.
२००३ मध्येअर्जुन पुरस्कार तिला मिळाला.
नॉर्वे (2004) रशिया (2005) आणि दिल्ली (2006) येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत तिने अजिंक्यपद मिळवले.
खेळामध्ये प्रतिस्पर्ध्याला पळायला लावून त्याची दमछाक करणे हे तंत्र तिने अवलंबून विजयाचा आपला मार्ग निश्चित केला. अर्थातच तिचा स्वतःचा स्टामिना जबरदस्त होता म्हणूनच हे जमले.
लग्न आणि करिअर – हा सर्व प्रवास होत असतानाच किंबहुना हेच निमित्त होऊन मेरी च्या वैयक्तिक आयुष्यात प्रेम फुलू लागले.
बेंगलोर येथे ट्रेनने प्रवास करताना मेरीचे सामान चोरीला गेले. त्यावेळी तिला मदत करणारा फुटबॉल खेळाडू करुंग ऑनलर यांचेशी मेरीची मैत्री झाली. तेव्हा ऑनलर पंजाब यथे कायद्याचे शिक्षण घेत होते आणि त्या आधी ते विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते.मेरी आणि ऑनलर यांच्या मैत्रीचे रूपांतर २००५ मध्ये लग्नात झाले.
लग्नानंतर मेरीने काही काळ खेळाला विराम दिला आणि ती मनापासून संसार करण्यात रमली. मात्र आपल्या वैयक्तिक स्वप्नांचे भान देखील तिने कायम ठेवले .
२००७ मध्ये तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. २०१३ मध्ये तिला ३रा मुलगा झाला.
वैवाहिक जीवन आणि करिअर कालखंड –
१) पुनः आगमन आणि पदके – पहिल्या बाळंतपणानंतर काही दिवसांनी मेरी ने पुन्हा आपला सराव सुरू केला आणि भारतातील २००८आशियाई महिला बॉक्सिंग चॅम्पियन शिप मध्ये रौप्य पदक जिंकले.
याच वर्षी चीन मध्ये झालेल्या AIBA महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धे मध्ये सुवर्णपदक आणि त्या नंतर २००९ मध्ये आशियाई इनडोअर खेळात सुवर्ण पदक जिंकले.
२०१० मध्ये मेरी ने कझाकस्थान येथील झायाना शेकेरबेकोवा हीचा ५१ किलो फ्लाय वेट साठी पराभव केला आणि बार्बाडोस येथे महिला जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
उपस्थित असूनही भाग न घेतलेली स्पर्धा – २०१० सालीच मेरीला संजय जैन आणि हर्षित जैन यांच्या समवेत दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनासाठी क्वीन्स बॅटन धारण करण्याचा मान मिळाला. मात्र या स्पर्धेत महिला बॉक्सिंगचा समावेश नसल्याने तिने स्पर्धा केली नाही.
२०१२ मध्ये AIBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप साठी तयारी करत असतानाच मेरी लंडन येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती ज्या ऑलिंपिक सामन्यात महिला बॉक्सिंगला प्रथमच विशेष स्थान देण्यात येणार होते. यात तिला कास्य पदक मिळाले मात्र उपांत्य फेरीत ५१ किलो युकेच्या निकोला ऍडमस् कडून पराभव पत्करावा लागला होता.
बॉक्सिंग स्पर्धेस पात्र ठरणारी ती एकमेव भारतीय महिला होती. याचा सन्मान म्हणून मेरी कोम ला ९ ऑगस्ट २०१२ च्या मंत्री मंडळाच्या बैठकीत 50 लाख रुपये आणि 2 एकर जमीन दिली गेली.
२०१७ मध्ये व्हिएतनाम ,होची मिन्ह येथील आशियाई बॉक्सिंग कॉन्फेड्रेशन (ASBC) महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप (४८ किलो)मध्ये अभुत पूर्व सुवर्ण पदक मिळवले.
न जिंकलेली एकमेव स्पर्धा –
मेरी ही लाईट फ्लाय वेट श्रेणी मध्ये खेळत होती. ही श्रेणी २०१८ च्याकॉमनवेल्थ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत समाविष्ट करण्यात आली नव्हती. मात्र २०१४ च्या याच कॉमनवेल्थ अंतर राष्ट्रीय स्पर्धेत तिने महिलांच्या लाईट फ्लाय वेट ४८ किलो मध्ये सुवर्ण पदक मिळविले. असेही होऊ शकते.
हा सर्व काळ तिचा सुवर्णकाळ म्हणता येईल. लग्न संसार करून योग्य वेळी विराम घेऊन आणि योग्य वेळी पुन्हा नव्याने सुरुवात करून आपले सर्वोच्च ते प्रावीण्य मिळवता येते आणि स्वतःची लढाई स्वतः जिंकता येते हे तिने असे सिध्द केले.
२) करूणा आणि मानवता – मेरी ने संपूर्ण केंद्र शासित प्रदेशांच्या आणि भारतातील राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहून पेटाचा मानवीय शिक्षण संदर्भातील अभ्यासक्रम सर्व शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करा असे विनंती पत्र पाठवले . ही तिची योग्य कारणासाठी निस्वार्थी, सकारात्मक कृती अनुकरणीय आहे.
३)आत्म चरित्र लेखन – बालपणातील गरिबी, सांस्कृतिक समस्या, करियर, यश, लग्न, संसार , अनेक सुवर्ण पदके, आपल्याच गावाकडून सन्मान , राजकारणात भाग अशा अनेक विविध क्षेत्रात यशस्वी प्रवास करून झाल्यावर तिने तिचे आत्मचरित्र लिहिले आणि तिचे सह लेखक डीना सेर्टो आणि हार्पर कॉलिन्स यांनी २०१३ मध्ये “ (unbreakable )अन ब्रेकेबल नावाने प्रसिद्ध केले. याचा मराठी अनुवाद विदुला टोकेकर यांनी केला आहे. आजच्या पिढीला हे पुस्तक नक्कीच प्रेरणा देईल आणि स्वतःची नवी स्वप्ने पाहण्यास मदतगार होईल .
४)सिनेमा – २०१४ मध्ये ओमांगकुमार यांनी दिग्दर्शित केलेला “ मेरी कोम”(MERI KOM) हा चित्रपट प्रदर्शित झाला. यातील प्रमुख भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने केली आहे.
५)माहितीपट -२०१६ मध्ये “with this ring” हा माहिती पट मेरी कोम ने प्रदर्शित केला . हा माहितीपट २००६ ते २०१२ या सहा वर्षातील महील बॉक्सिंग संघाच्या अनुभवाने समृध्द आहे.
६) लहान मुलांचे एक पुस्तक आहे . “द गुड नाईट स्टोरीज फॉर रिबेल गर्ल्स”, ज्यात लहान मुलांसाठी लिहिलेल्या महिला रोल मॉडेल्सच्या कथा आहेत, त्यात मेरी कोमची कहाणी समाविष्ट आहे.
७)सामजिक भान – २००७ मध्ये जुळी मुलं, त्या नंतर २०१३मध्ये तिसरा मुलगा झाल्यानंतर २०१८ मध्ये मेरी आणि तिच्या पतीने मॅरिलिन नावाची मुलगी दत्तक घेतली आहे. या निर्णयाचे सर्वांनाच कौतुक असेल यात दुमत नसावे. कृती च सारे सांगून जाते आहे.
८)सारांश – मेरी कोम भारतीय महिला बॉक्सर खेळाडू आपल्या ४० वर्षाच्या आयुष्यात आणि २५ वर्षाच्या करियर कारकीर्दीत सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप किताब मिळवणारी ही जगातील एकमेव बॉक्सर महिला आहे. २०१२ ची ती ऑलिंपिक विजेती आहे. नुकतेच मीडिया माध्यमांनी तिच्या निवृत्तीबद्दल बातमी जाहीर केली. मात्र मेरी कोम ने याला जाहीर नकार दिला आहे. ती म्हणते मी अजून खेळू इच्छिते. खेळू शकते. केवळ मी ४० वर्षाची झाले म्हणून मला खेळता येणार नाही. पण हा माझा निर्णय नाही. अंतर राष्ट्रीय बॉक्सिंग फेडरेशनच्या नियमांमध्ये माझे वय बसत नाही ही अडचण आहे.
हा आहे आत्मविश्वास, हा आहे स्वप्नांचा विजय, हे आहे सर्वकष यश आणि हे आहे ताठ मानेने थांबणे !
वाचक हो, आशा आहे हा लेख तुम्हाला आवडेल, भावेल आणि तुम्ही स्वतः यातून प्रेरित व्हाल आणि इतरांना देखील प्रेरित कराल.
हे माहिती वजा व्यक्ती चरित्र कसे वाटले ते नक्की कळवा. आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
अनेकविध नवीन विषयांवर माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या “लेखक मित्र” या वेबसाईट ला नक्की भेट द्या.तसेच आमचा व्हॉटस् अप ग्रुप ही जॉईन करा. (Mary Kom information in Marathi)
धन्यवाद !
लेखिका -सौ.ज्योती आनंद एकबोटे,पुणे
खूपच विस्तृत आणि प्रेरक लेख आहे.
मेरी कॉम चे व्यक्तिमत्त्व , तिच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना याबाबत नेमकी. माहिती दिलीआहे.
लेख आवडला.
विशेषतः मेरी कॉमच्या दत्तक मुलीचा उलेलेख आवडला.
खूप खूप धन्यवाद! आपल्या स्नेहालय परिवारात अवश्य शेअर करणे. कुणी त्यातून motivation घेईल ही. शाळेत देखील विद्यार्थ्यांना गोष्ट सांगावी अशी आहे. 😊 मला स्वतःला हा लेख लिहिताना खूप छान वाटले आहे.
खूप छान माहिती दिली.
🙏🏼😊
नेमकी आणि सर्वांगीण माहिती मेरी कोम बद्दल दिली आहे.लेखाचा शेवट छानच.
🙏🏼😊