ध्यानाचे महत्व l Meditation Benefits in Marathi

WhatsApp Group Join Now

Meditation Benefits in Marathi :करावे ध्यान योग .रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण माणसे मन रिफ्रेश करण्यासाठी,  कामात पून्हा जुंपून घेण्यासाठी जी एनर्जी लागते त्यासाठी आपला कुटूंबकबिला घेऊन चार दिवस गावाला, नातेवाईकांकडे,  नाहितर कुठेतरी फिरायला जातो. आजूबाजूचे वातावरण, परिसर, काहीतरी नविन बघितले की पूढचे चार दिवस ते महिना अगदी छान वाटते. 

पण प्रत्येकाला ते जमेलच असे नसते कारण वेळ नसतो, पैसाही बराच खर्च होतो. पण कायम स्वरूपी काहीतरी उपाय हवा जेणेकरून रोज सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटेल.  रोजच्या ताणतणावाला तोंड देता येईल. यासाठी ध्यान करणे हाच उत्तम उपाय.

ध्यान कुटूंबातील प्रत्येकासाठी:-

हो,  ध्यान अगदी सहज व सोपा असा योग प्रकार आहे. जो लहानांपासून ते मोठयापर्यंत करू शकतो. लहान वयातच मुलांना ध्यानाची सवय लागल्याने ते बरेच शांत होतात.  मन एकाग्र होते. मोठ्यांचा थकवा नाहीसा होतो. चिडचिड कमी होते. असे खूप फायदे आहेत. वाचकमित्रहो, तर चला जाणून घेऊया.

ध्यानाचा इतिहास (History of Meditation in India)

ध्यान म्हणजे चिंतन. ध्यान करणे ही एक भारतीय प्राचीन वैदिक प्रथा आहे. सहाव्या शतकाच्या आधीपासून हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात आली आहे. 

ध्यान करणे म्हणजे मनाचा व्यायाम. अनेक तज्ञ निरोगी व समाधानी व सक्रिय जीवन जगण्यासाठी ध्यान करण्याचा सल्ला देतात.

ध्यान किंवा मेडिटेशन म्हणजे काय?

जसा मेंदू आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव, प्रत्येक पेशी, स्नायू सर्वांवर हुकूमत गाजवतो. शरीर आजारी पडले तर औषध घेऊन बरे होऊ शकतो. पण मन आजारी झाले किंवा थकले असेल, निराश असेल तर त्या मनासाठी औषध म्हणून मेडिटेशन हेच औषध आहे.

ध्यान योग कसे करावे ?

ध्यान करण्यासाठी सकाळ किवा संध्याकाळ निवडा. शांत जागा असेल तर उत्तमच. सुटसुटीत कपडे घालून पूर्व दिशेला तोंड करून बसावे.  पोट हलके भरलेले असावे. सुरुवातीला श्वासावर लक्ष केंद्रित करावे.

ध्यान योग करण्याचे प्रकार (Types of Meditation):-

मंत्र मेडिटेशन:- 

मंत्राचा उच्चार करून आपण आपले नकारात्मक विचार मुक्त करतो व मनाला पून्हा सकारात्मकतेकडे नेतो.

कुंडलिनी योग:-

हा योग करताना मंत्राचा उच्चार करताना शारिरीक हालचाली केल्या जातात म्हणून या योगासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. ह्या योगासाठी उत्तम प्रशिक्षकाचे सहकार्य घेऊ शकता. 

माईंडफूलनेस मेडिटेशन :-

हे ध्यान तुम्ही कोठेही, केव्हाही करु शकता. या ध्यानाच्या सरावाने तुम्ही सजग आणि सतर्क राहता. ह्या ध्यानात तुम्ही आजूबाजूला होणाऱ्या सर्व हालचाली, आवाज आणि वास यांवर लक्ष केंद्रित करतात. 

अध्यात्मिक मेडिटेशन:-

नावातच सगळे आले.  या ध्यानामूळे आपले देवाशी सखोल नाते तयार होण्यास मदत होते. या ध्यानात शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करायचे आहे.

 जेन मेडिटेशन:-

जेन ध्यानाचा सराव प्रशिक्षित योगा शिक्षकाच्या मार्गदर्शनाने करायचा आहे. या योगामुळे मेंदूला चालना मिळते व तणाव कमी होतो. 

ध्यानाचे फायदे (Benefits of Mediation) :-

ध्यान किंवा मेडिटेशन ही एक अशी अवस्था आहे यात मेंदू व मन एकाग्र करता येतात. ध्यानासाठी सरावाची आवश्यकता असते. सातत्याने ध्यान केल्याने विपरित व कठिण परिस्थितीतही मानसिक संतूलन चांगले राहते. ध्यान करण्याने आपल्या शरीरातील आंतरिक उर्जा निर्माण होते.  तसेच आपल्या मनात प्रेम करुणा, सद्‌भावना, धैर्य, उदारता, क्षमा हे गूण विकसित होतात. 

खालील फायदे आपण पाहूया.

१) ताण तणाव कमी होण्यास मदत होते.

२)  मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. 

३) मुलांना अभ्यासात, खेळात एकाग्रता वाढवण्यास मदत होते.

४) ध्यान करण्याने वयस्क व्यक्तींना स्मरण शक्ती वाढवण्यास मदत मिळते.

५) अनिद्रा नाहीशी होते.

६) वाईट सवयींपासून व्यक्ती मुक्त होतो.

७) ब्लडप्रेशरच्या त्रासापासून सूटका मिळते.

८) आपले व्यक्तिमत्व स्थिर होण्यासाठी पंचमहाभूते मदत करतात.

९) आजारपण कमी येते व आल्यास लवकर बरे होण्यास मदत होते.

१०) औषधोपचार देखील लवकर लागू पडतात.

एकत्रित ध्यान करण्याचे फायदे:-

अस म्हणतात की, जेव्हा शंभर लोक एकत्र येऊन ध्यान साधना करतात तेव्हा त्याच्या लहरी ह्या जवळ जवळ पाच किलोमीटर अंतरावर पसरतात.  हजारो वर्षांपूर्वी आपले पूर्वज, ऋषीमूनी तप, ध्यान करत असत तेव्हा त्या लहरी सकारात्मकता पसरवत होत्या. पण काळानुसार हे नष्ट होत गेले. पण आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील सिद्ध झाले की, सलग ९० दिवस मेडीटेशन केल्याने आपल्या घरातील इतर व्यक्तींवर सकारात्मक प्रभाव पड़तो.

ध्यान कसे करावे ( How to Meditate?)

वेळ:-  ध्यान करण्यासाठी जी वेळ तुम्ही निवडता तुम्हाला त्याचे तसे फायदे मिळतात. 

• ब्रम्हमुहूर्तच्या वेळी केलेले ध्यान हे सर्वोत्तम मानले जाते. आपल्या भौतिक स्वरुपाच्या पलिकडे जाऊन अध्यात्मिक पातळी गाठता येते.

• सूर्योदयाच्या वेळी केलेल्या ध्यान योगामुळे शारीरीक आरोग्य सुधारते.

• दूपारी, संध्याकाळी, रात्री केव्हाही ध्यान धारणा करता येते पण त्यासाठी जास्त गरज शांतता व एकाग्रता याची हवी. फक्त त्याचे मिळणारे फायदे कमी होत जातात.

पद्धत:-

ध्यानासाठी सुरुवात करताना आपल्याला रोज वेळ काढता येईल असा ठराविक वेळ ठरवावा. सुरुवात १० मिनिटांपासून करावी. योग्य, हवेशीर जागा निवडा.  साधी बैठक घालावी. किंवा ज्यांना खाली मांडी घालून बसणे जमत नसेल त्यांनी खूर्ची घ्यावी. आपले हात मांडीवर सहज ठेवावे.  डोळे बंद करावे. श्वासावर लक्ष द्यावे. सुरवातीला आपले लक्ष विचलित होईल कारण आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमूळे थोडे कठिण होईल पण मोठे श्वास घेऊन पून्हा लक्ष केंद्रित करावे. हळूहळू हे जमू लागले की ॐ या मंत्राचा उच्चार करुन ध्यान धारणा करावी. हळूहळू वेळ वाढवत न्यावी.

योगा एक नविन ओळख:-

योगाच्या अनेक प्रकारातून आपण हा ध्यान योग पाहीला. आपल्या भारतातील फार जूनी परंपरा कालातंराने नष्ट होत आली होती. पण माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग पद्धतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर एका उंचीवर नेले. आणि एक जनजागृती निर्माण झाली.  असे म्हणायला काही हरकत नाही की, आज या मितीस देशात व परदेशात योगा ला मान्यता मिळाली आहे.

ध्यान( मेडीटेशन) करण्यामूळे मानसिक व शारिरीक थकवा दूर करता येतो. जगातील बरीच नामवंत लोक मेडीटेशन मूळे अगदी फीट ॲण्ड फाईन आहेत. व ते स्वतः आपल्याला त्याचे फायदे सांगतात. आहार, विहार व योगा यामूळे आपण निरोगी आयूष्य जगतो. 

ध्यानामूळे (मेडिटेशन) तर आपल्याला जे हवे आहे त्यासाठी मन एकाग्र करता येते. ध्यानामुळे आपण पंचतत्वांशी एकरूप होतो.  सध्याच्या धावपळीच्या युगात आपल्याला  स्वतःशी संवाद साधता येत नाही. आपली निर्णयक्षमता देखील कमकुवत होऊ शकते. ज्यांच्या शारिरीक हालचालींवर मर्यादा आहेत. ते ध्यान चांगले करु शकतात.

ध्यान (मेडीटेशन) आणि इच्छापूर्ती यांचा संबध:-

जेव्हा मनात कोणती इच्छा ठेऊन आपण ध्यान साधना करतो तेव्हा ती साधना यशस्वी होत नाही, कारण मन:शांतीसाठी मनात कोणतेच विचार न आणता एकाग्रता साधायची असते. आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण मनात इच्छा न ठेवता ध्यान करतो. आपले तरंग हे विश्वात सोडतो.  म्हणून जो पर्यंत विश्वाशी आपले तरंग जूळत नाही तोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही. म्हणून ध्यान करणे ही मोठी साधना आहे. सातत्याने, सराव करून ती साध्य करता येते.

आंतरराष्ट्रिय स्तरावर घेतलेली दखल:-

दरवर्षी १७ फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्ल्ड ह्यूमन स्पिरीट डे म्हणून साजरा करतात. यात मन, शरीर, मेंदू यांची सांगड घालून पून्हा आपल्यातच आपले अंतरमन शोधायचे आहे. हा दिवस साजरा करण्याचा हेतू हा आहे की,  मानवाने नेहमी आशावादी, रचनात्मक व आनंदाने जगावे. आपले कुटूंब, शेजारी, सहकारी, नातेवाईक यांच्याशी पून्हा चांगले नाते निर्माण व्हावे आणि यासाठी मेडीटेशन शिवाय कोणता चांगला पर्याय असेल बरे?

मानव जिवनाला पून्हा पूनर्जिवित करायचे असेल तर आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी ठेवलेली सुंदर भेट आणि काय असू शकते ?ध्यान ( मेडीटेशन) करून आपण आपल्या पूढच्या पिढीला छान वारसा देऊ शकतो. आयूष्य सकारात्मकतेने जगण्याची नविन दिशा देऊ शकतो.

तुम्हाला ही ध्यान (Meditation Benefits in Marathi) एक मुलभूत गरज माहिती कशी वाटली, ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरीवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्या पर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी  आमच्या ‘ लेखक मित्र’ या वेबसाईटला भेट दया. तसेच आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top