मोबाईलचे व्यसन म्हणजे काय, ते कसे सोडवावे? कारणे उपाय

WhatsApp Group Join Now

आजच्या डिजिटल युगात मोबाइल फोन हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. काम, शिक्षण, मनोरंजन आणि संवादासाठी मोबाइल अनिवार्य झाला आहे. मात्र, मोबाईल चा अतिरेक वापर झाला की तो व्यसनात बदलतो. मोबाइलचे व्यसन म्हणजे सतत त्याचा वापर करण्याची अनिवार इच्छा होणे, ज्यामुळे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो.

सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया…

मोबाइलच्या व्यसनाची कारणे:

मोबाइलच्या व्यसनामागे अनेक कारणे आहेत. त्यातील काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  1. सोशल मीडियाचा अति वापर – फेसबुक, इंस्टाग्राम, व एक्स यांसारख्या सोशल मीडिया अँप्समुळे लोक मोबाईल कडे जास्त आकर्षित होत आहेत.
  1. Online गेमिंग आणि Streming – 

Pubg, free-fire, candy crush यांसारख्या ऑनलाईन गेम्स खेळण्यामध्ये प्रामुख्याने तरुण पिढी आणि लहान मुले ही मोबाईल मध्ये गुंतत चालली आहेत.

  1. वेळेच्या व्यवस्थापनाचा अभाव – अनेक कॉलेजचे विद्यार्थी, गृहिणी, ऑफिस वर्कर्स यांना आपल्या रिकामी काय करावे हे सुचत नाही त्यामुळे ते विरंगुळा म्हणून मोबाईलचा वापर जास्त प्रमाणात करतात.
  1. काम आणि शिक्षण – कोविड मुळे अनेक लोकांचे काम हे work from home असल्यामुळे तसेच विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेस हे मोबाईल वर ऑनलाईन असल्याने मोबाईलचा वापर हा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे या वापरामुळे लोकांना मोबाईल सतत वापरण्याची सवय लागली आहे.
  1. मनोरंजनाचे साधन – यूट्यूब, Netflix, amazon prime यांसारख्या विविध OTT अँप्समुळे लोक हे सिनेमा, वेब सिरीज बघण्यात तासनतास वेळ हा मोबाईल वर घालवत आहेत.

मोबाइलच्या व्यसनाचे दुष्परिणाम:

मोबाईलच्या अति वापरामुळे माणसाच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होतात. 

  • शारीरिक परिणाम :
  1. डोळ्यांचे आजार – मोबाईलच्या अति वापरामुळे मुख्यता दृष्टी कमी होणे, डोळ्यांमध्ये जळजळ होणे तसेच रातांधळेपणा यांसारखे आजार होतात.
  2. मानदुखी तसेच पाठदुखी – मोबाईल जेव्हा आपण वापरत असतो तेव्हा आपली बसण्याची शैली ही व्यवस्थित  नसते यामुळे याचा परिणाम आपल्या मानेवर तसेच पाठीवर होत असतो.
  3. झोपेची समस्या – झोपण्याच्या अगोदर काही लोकांना मोबाईल बघत बसण्याची खूप सवय असते यामुळे आपले मन हे विचलित होत असते यामुळे त्याचा परिणाम आपल्या झोपेवर होतो.

मानसिक परिणाम :

  1.  नैराश्य व एकटेपणा – सोशल मीडियावर दाखवले जाणारे “आदर्श” जीवन पाहुन स्वतःची तुलना त्यांच्याशी करून घेणे, कमी लाईक्स कमी फॉलोवर्स यामुळे कमीपणाची भावना येऊन एकटं वाटणे, शिवाय व्हर्च्युअल संवादामुळे वास्तविक नातेसंबंधाकडे दुर्लक्ष होते , ज्यामुळे व्यक्तीला एकाकी वाटू लागते.
  2. लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होणे – मोबाइलच्या सतत वापरामुळे आपले लक्ष विचलित होत असते. एखाद्या कामात एकाग्रता ठेवणे कठीण होते, कारण आपल्याला अधूनमधून मोबाइलकडे पाहण्याची सवय लागते. विशेषतः विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यासाठी हा मोठा अडथळा ठरतो. अभ्यास करताना किंवा ऑफिसच्या कामात लक्ष केंद्रीत करताना मध्येच सोशल मीडिया चेक करण्याची सवय आपल्या कार्यक्षमतेवर परिणाम करते.

उपाय :

2.

  • निष्कर्ष 

मोबाइल हे एक अत्यंत उपयुक्त असे साधन आहे, पण त्याचा अतिवापर हानिकारक ठरतो. त्यामुळे जबाबदारीने आणि मर्यादित प्रमाणातच मोबाइलचा वापर करावा. तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग केल्यास ते जीवन समृद्ध करू शकते, पण त्याच्या अतिवापर केल्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, मोबाइलचे व्यसन ओळखून त्यावर वेळीच नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा व आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top