नागपंचमी 2024: पूजा, विधी, कथा आणि महत्त्व
हिंदू धर्मात निसर्गाला खास महत्त्व आहे. येथे देवीदेवतांबरोबरच सूर्य, चंद्र, नद्या, पर्वत, झाडे, वनस्पती, गायी, आणि नाग यांचीही पूजा केली जाते. श्रावण महिन्याला विशेष महत्त्व असून तो वर्षातील सर्वात पवित्र महिना मानला जातो. श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते आणि अनेक सण साजरे केले जातात. त्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. श्रावण महिना हा पावसाळ्याचा ऋतू असल्याने नाग किंवा साप बिळातून बाहेर येतात. त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी नागपंचमीची पूजा केली जाते. चला तर मित्रांनो, नागपंचमी विषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
भारतात नागपंचमीचे महत्त्व
हिंदू धर्मात देवीदेवतांची पूजा करण्यासाठी अनेक सण साजरे केले जातात. देवीदेवतांच्या पूजा करण्यासोबतच, या दिवशी व्रत ही केले जातात. नागपंचमी हा सण देखील अशाच सणांपैकी एक आहे. भगवान शंकरांच्या गळ्यात नाग हारासारखा आहे, तर भगवान विष्णूच्या शय्येवर नाग विराजमान आहे. भारतीय लोकजीवनातही नागांचे विशेष स्थान आहे. याच कारणांमुळे नागांची देवता म्हणून पूजा केली जाते.
भारतात अजूनही बरेच लोक शेतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे शेतीची साधने आणि पशु-पक्षी यांची पूजा करण्याची प्रथा आहे. नागाला शेतकऱ्यांचा मित्र मानले जाते कारण ते उंदीर आणि इतर कीटक खाऊन पिकांचे रक्षण करतात.
नागपंचमी हा सण साजरा करण्यामागे धार्मिक आणि सामाजिक कारणे ही आहेत. शिवाय, ज्योतिषशास्त्रानुसार काही लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष असतो. हा दोष दूर करण्यासाठीही नाग देवतांची पूजा केली जाते आणि पूजे साठी नागपंचमीचा दिवस शुभ मानला जातो.
नागपंचमीचे प्राचीन परंपरा
नाग देवताची पूजा ही भारतात हजारो वर्षांपासून चालत आलेली एक खास परंपरा आहे.
वैदिक काळात: अगदी जुने असलेले धर्मग्रंथ म्हणजेच वेदांमध्येही नागपूजेचा उल्लेख आढळतो. विशेषत: अथर्ववेदात अशी सर्पदंशापासून रक्षण आणि नागांचा सन्मान याविषयी स्तोत्र आणि प्रार्थना आहेत.
मधल्यायुगीन काळात: या काळात नागपूजा अधिक रुढी आणि थोडीशी जटिल झाली. त्या काळात, नाग देवता यांना समर्पित मंदिरे बांधली गेली आणि पूजा विधी अधिक सविस्तर झाले. हस्तलिखित ग्रंथांमधून आणि मंदिरांमधील शिलालेखांमधून आपल्याला या काळात नागपंचमी कशी साजरी केली जायची याची माहिती मिळते. यावरून हे स्पष्ट होते की, नागपंचमी भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांमधील लोकांच्या संस्कृतीमध्ये किती महत्वाची आहे.
नागपंचमी हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला साजरा केला जातो. या दिवशी, भक्तगण, नागदेवता आणि भगवान शिव यांची पूजा करतात आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळवण्याची प्रार्थना करतात. या दिवशी प्रामुख्याने आठ सर्प देवतांची वासुकी, ऐरावत, मणिभद्र, कालिया, धनंजय, तक्षक, कर्कोटकस्य आणि धृतराष्ट्र याची पूजा केली जाते.
तारीख आणि शुभ मुहूर्त
या वर्षी (2024) नागपंचमी हा सण 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. पंचमी तिथी 9 ऑगस्ट रोजी सकाळी 8:15 वाजता सुरू होईल आणि 10 ऑगस्ट रोजी सकाळी 6:09 वाजता संपेल.
पूजा विधीसाठी शुभ मुहूर्त:
पूजेची शुभ वेळ दुपारी 12:13 ते 1:00 राहील आणि सर्वोत्तम वेळ संध्याकाळी 6:33 ते 8:20 असे राहील. या दिवशी तुम्ही घरीच पूजा करू शकता किंवा मंदिरात जाऊन सर्पांचं दर्शन घेऊ शकता.
पूजा कशी करावी:
– नागपंचमीच्या दिवशी सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला.
– त्यानंतर घराच्या प्रवेशद्वारासह मंदिरच्या बाहेरील दरवाजा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि त्यावर रांगोळीने नागाचं चित्र काढा.
– नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह भगवान शंकराची पूजा केली जाते म्हणून शिवलिंगावर जल अर्पण करून भगवान शंकराची पूजा करावी.
– तुम्ही पूजेसाठी नागदेवतेची मूर्ती आनु शकता किंवा नागाची मातीची प्रतिमा करून अथवा रक्तचंदनाने वा हळदीने पाटावर नवनागांच्या आकृती काढून त्यांची पूजा करूशकता.
– पूजा सुरू करून नाग देवतेला फळे, फुले, धूप, दीप, कच्चं दूध आणि नैवेद्य अर्पण करा.
– शेवटी नागदेवतेचे ध्यान करून पूजा आणि आरती करा. आरती झाल्यावर नागपंचमीची कथा वाचा.
– शक्य असल्यास पूजेनंतर शेतात किंवा नागाचं बिळ असेल त्या ठिकाणी दुधाची वाटी ठेवा.
नागपंचमीच्या दिवशी उपवास करणे आणि सर्पांना दूध पाजणे हा एक धार्मिक विधी मानला जातो. नाग हे पवित्र प्राणी मानले जातात जे समृद्धी आणि सुख-शांतीचे प्रतीक आहेत.
नागपंचमी शी संबंधित कथा
नागपंचमी शी संबंधित अनेक सुप्रसिद्ध जुन्या कथा प्रचलित आहेत. त्यापैकी काही कथा खालीलप्रमाणे आहेत. या कथांचे स्वअध्ययन किंवा श्रवण करणे शुभ मानले जाते.
शेतकरी आणि नागाची कथा
एका राज्यात एक शेतकरी त्याच्या दोन मुलां आणि एका मुलीसह राहत होता. एके दिवशी शेतात नांगरताना, नाग आणि नागाचे नागकुळ नांगराखाली येऊन मरण पावली. नागिणीने दु:ख व्यक्त करून बदला घेण्याचा निर्णय घेतला आणि रात्री शेतकरी, त्याची पत्नी आणि दोन मुलांना दंश मारले. दुसऱ्या दिवशी सकाळी, ती शेतकऱ्याच्या मुलीला दंश करण्यासाठी आली. मुलीने नागिणीसमोर दूध ठेवून माफी मागितली. मुलीच्या या कृतीने नागिणी खुश झाली आणि शेतकरी, त्याची पत्नी आणि दोन मुलांना पुन्हा जीवदान दिले.
हा दिवस श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी होती. त्या दिवसापासून नाग पंचमी साजरी केली जाते, आणि सापांच्या रागापासून सुरक्षित राहण्यासाठी प्रथना केली जाते.
श्रीकृष्ण आणि कालिया नागशी सामना
वृंदावन गावात कालिया या विषारी नागाने यमुना नदी प्रदूषित केल्याने ग्रामस्थ आणि गुरांचा जीव धोक्यात आला होता. श्रीकृष्णाने कालियाचा सामना करण्याचा निर्णय घेतला, बहुमुखी नागाशी लढण्यासाठी नदीत डुबकी मारली. आपल्या अलौकिक शक्तीचा वापर करून, श्रीकृष्णाने कालियाच्या डोक्यावर नृत्य केले, त्याला “कालिया मर्दन” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजयात पराभूत केले. श्रीकृष्णाच्या अलौकिक स्वरूपाची जाणीव करून, कालियाने शरणागती पत्करली आणि श्रीकृष्णाच्या आदेशनुसार, नदीची शुद्धता पुनर्संचयित करून सोडली.
श्रीकृष्णाने कालिया नागाला पराभूत करून गोकुळातील लोकांचे रक्षण केलेला दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी, नागपंचमी. त्या दिवसापासून लोक नागाची पूजा करून त्याला लाह्या आणि दूध अर्पण करतात. नागदेवतेने प्रसन्न होऊन आपल्याला त्रास देऊ नये हीच त्यामागची भावना असते.
आस्तिक आणि राजा जनमेजय यांची कथा
महाभारतात, राजा जनमेजया याने, त्याचे वडील राजा परीक्षित यांच्या सर्पदंशाने झालेल्या मृत्यूमुळे शोकाकुल होऊन, सर्व सापांचा नायनाट करण्यासाठी सर्पासत्र या मोठ्या सर्पदवीचे आयोजन केले. बळीच्या आगीत असंख्य साप नष्ट झाल्यामुळे सर्प समुदायाने मानवी वडील आणि नागा आईपासून जन्मलेल्या प्रसिद्ध ऋषी अस्तिका यांच्याकडे मदत मागितली. आस्तिकाने जनमेजयाशी संपर्क साधला आणि करुणा आणि जीवनाचे मूल्य याबद्दल स्पष्टपणे बोलली. आस्तिकाच्या शहाणपणामुळे जन्मेजय प्रभावित झाले , म्हणून त्याने इतर सापांना वाचवत यज्ञ थांबवला.
ही कथा क्षमा, करुणा आणि जीवनाचे पावित्र्य या संकल्पनांवर केंद्रित आहे.
भावाचा उपवास आणि नाग पंचमी
पाच शतकांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. नाग पंचमीच्या एक दिवस आधी सत्येश्वर यांचे मृत्यू झाला. भावाच्या विरहा मुळे सत्येश्वरी दुखी झाली आणि तिने अन्न त्याग केल्यावर सत्येश्वर तिला नागाचा रूपात दिसला. त्या नंतर नागाला तिने आपला भाऊ माणला. सत्येश्वरीचा आपल्या भावावरचा प्रेम बगुण नाग देवता प्रसन्न झाले आणि तिला वचन दिले की जी बहीण माझे भाऊ म्हणून पूजा करेल तिचे रक्षण मी करेन. म्हणून नाग चतुर्थीला जे नाग पंचमीच एक दिवस आधी असतो त्या दिवासी हा उपवास करतात आणि नाग पंचमीचा दिवासी उपवास सोड्तात. लहान मुली पासून ते विवाहित स्त्रिया आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी उपवास करतात. या उपवास केल्याने त्यांचा भाऊ सुखी, निरोगी आणि सर्व दुःखांपासून मुक्त होईल, असा विश्वास आहे.
नागपंचमीचे धार्मिक महत्त्व
भारताला कृषीप्रधान देश म्हणून ओळखे जाते. शतकानुशतके सापांना आपल्या शेतांचे रक्षणकर्ते म्हणून पूजनीय मानले जाते. पावसाळ्यात साप जास्त सक्रिय असतात, नागपंचमीचा या दिवशी शेत नांगरणे आणि जमीन खणणे अशुभ मानले जाते आणि ते करणे टाळलतात. नागपंचमीच्या वेळी लोक विशिष्ट प्रथा आणि विधी पाळतात जैसे की नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, तसेच चुलीवर तवा ठेवू नये असे अनेक संकेत पाळले जातात. त्याऐवजी वाफवून बनवलेले पदार्थ जसे की पुरणाचे दिंड, गव्हाची खीर, पातोळे बनवून नैवेद्य अर्पण करतात. कणकेचे दिवे बनवून नाग देवतेयांची पूजा करतात आणि नागदेवता आपले रक्षण करावे अशी प्रार्थना केली जाते.
निष्कर्ष
नागपंचमी हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण सण आहे. हा सण केवळ एक धार्मिक उत्सव नसून, तर पर्यावरण आणि मानवी जीवन यांच्यातील नातेसंबंधांचे प्रतीक आहे. साप हे निसर्गातील एक महत्त्वपूर्ण घटक असून, ते पर्यावरणातील संतुलन राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. पावसाळ्यात सापांची वर्दळ वाढते, त्यामुळे त्यांच्यापासून रक्षण मिळावे म्हणून ही पूजा केली जाते. नागपंचमीच्या निमित्ताने पर्यावरणाचे आणि सापांच्या संवर्धनाचे महत्त्वही अधोरेखित होते. चला तर मित्रांनो , आपल्या श्रद्धा, आस्था आणि परंपरांना जपत नागपंचमी साजरी करूया आणि निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ करूया.
तुम्हाला “नागपंचमी 2024: पूजा, विधी, कथा आणि महत्त्व” या बद्दलची माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र‘ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
लेखिका – अश्विनी ढंगे, इचलकरंजी