नैसर्गिक ऊर्जेचे स्त्रोत आणि त्यांचे महत्त्व l Natural energy resources in Marathi

WhatsApp Group Join Now

या लेखामध्ये नैसर्गिक ऊर्जा स्त्रोत म्हणजे काय व त्यांची उदाहरणे तसेच त्यांचे उपयोग काय आहेत ते बघणार आहोत.

  अनादी कालापासून मनुष्याने निसर्गात असलेल्या ऊर्जेचा उपयोग स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याकरता केला आहे. ऊर्जेची गरज ही सर्वच मनुष्य व प्राणिमात्रांना आपल्या जीवनात भासत असते. सुरुवातीला त्याला काहीच ऊर्जांचीच माहिती होती. जसे की सुर्य,दोन दगड घासले की अग्नी निर्माण होतो इत्यादी. जसजशी त्याला ऊर्जेची गरज भासत गेली, तसे नवीन नवीन ऊर्जेचे पर्याय त्याने शोधले.मुबलक प्रमाणात नदी, नाले तलाव व पावसाचे पाणी उपलब्ध असल्यामुळे हळूहळू पाण्यापासून सुद्धा ऊर्जा निर्मिती करण्यास सुरुवात केली. Natural energy resources in Marathi.

गरज ही शोधाची जननी असते. त्यामुळे मनुष्याने गरज पडली तेव्हा, नवनवीन शोध लावून निसर्गातील ऊर्जेचा उपयोग स्वतःचे आयुष्यमान वाढवण्याकरता, तसेच स्वतःचे आयुष्य सुखी करण्याकरता केला आहे.

नैसर्गिक ऊर्जेचे स्त्रोत खालील प्रमाणे आहेत-(natural resources of energy)

१) पारंपारिक ऊर्जा स्त्रोत-(conventional energy sources)–ही ऊर्जा सजीवांचे अवशेष जमिनीत गाडले जाऊन त्यावर नैसर्गिक प्रक्रिया होते. त्याला जीवाश्म असे म्हणतात, त्यापासून तयार होते.

पारंपारिक ऊर्जा स्त्रोत खालील प्रमाणे आहेत–

अ) दगडी कोळसा-कोळसा हा खाणीमध्ये सापडतो पूर्वीपासून या ऊर्जेचा उपयोग सगळीकडे होताना दिसतो. पाणी गरम करणे, स्वयंपाक करणे तसेच चुलीमध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो. फार प्रचलित असा ऊर्जेचा हा स्त्रोत आहे. यापासून नंतर वीज निर्मिती करण्यास मनुष्याने सुरू केले आहे. आपल्याकडे कोळशापासून वीज निर्मिती करणारे अनेक वीजघर आहेत.

ब) खनिज तेल–खनिज तेल हे खडकात आढळते. नैसर्गिक खनिज तेलाला कच्चे तेल असेही म्हणतात.(crude oil).त्यामध्ये मृतिका ,खनिज आणि काही धातूही असतात. या खनिज तेलावर प्रक्रिया करून, शुद्धीकरण करून त्याला पेट्रोल केरोसीन जळणारा, वायू इत्यादी इंधनामध्ये परिवर्तित केले जाते.

पेट्रोलियम पासून डिझेल, वंगण,डांबर तयार करण्यात येते. तसेच रंग, जंतुनाशके, सुगंधी द्रव्य, कृत्रिम धागे तयार करण्यासाठी सुद्धा करण्यात येतो.

क) लाकूड —फार पूर्वीपासून लाकडी सरपणाचा उपयोग ऊर्जा तयार करण्यासाठी केला जातो. जेव्हापासून मनुष्याला ऊर्जेची गरज भासली, तेव्हापासून त्यानी लाकूड जाळून त्या उर्जेवर अन्न शिजवणे किंवा पाणी गरम करणे या क्रिया करायला सुरुवात केली. Natural energy resources 

२) अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत-(non conventional energy sources)–हा ऊर्जा स्त्रोत निसर्गात मुबलक प्रमाणात सापडतो. कारण तो पुन्हा पुन्हा तयार होत असतो. अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत अजिबात प्रदूषण करत नाही. पारंपारिक ऊर्जा स्त्रोतामुळे प्रदूषण होऊ शकते. पारंपारिक ऊर्जा स्त्रोताचा भरपूर वापर केला गेल्यामुळे आता पृथ्वीवरून तो स्त्रोत संपण्याच्या मार्गावर आहे. म्हणूनच या अपारंपारिक ऊर्जा स्त्रोताकडे मनुष्याने संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.

अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत खालील प्रमाणे आहेत.

   अ) सौर ऊर्जा—सूर्यापासून मिळणाऱ्या या ऊर्जेला सौर ऊर्जा असे म्हणतात. सूर्य हा मुबलक प्रमाणात ऊर्जा देत असतो. भारतासारख्या देशात तर बाराही महिने सूर्य तळपत असतो. या ऊर्जेचा वापर आपण वेगवेगळ्या कामांकरता करू शकतो. सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती केली जाते. त्यातून मनुष्याची बऱ्यापैकी वीजेची गरज भागू शकते. रस्त्यावरील विजेचे खांब, तसेच गरम पाणी करणे, सोलर कुकर (solar cooker) अशा प्रकारच्या अनेक गोष्टींसाठी वीज निर्मिती केली जाते. आश्चर्याची गोष्ट आहे की ४५ मिनिटांच्या सूर्यप्रकाशात एक वर्षाची वीजनिर्मिती केली जाऊ शकते. पण फक्त गरज असते की हा सूर्यप्रकाश आपल्याला पूर्णपणे मिळवता आला पाहिजे. पण आता मनुष्याने वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या साह्याने हा सूर्यप्रकाश मिळवून त्याचा १००%उपयोग करणे सुरू केले आहे.

सौर ऊर्जेचे उपयोग–

१) घराच्या छतावर सोलर पॅनल (solar panel) मध्ये सौर ऊर्जा एकत्र करून तिचा उपयोग घरामध्ये पाणी गरम करणे याकरता केला जातो.

२) फोटो व्होलटाइक सेल द्वारा सौरऊर्जेचे रूपांतर वीजेमध्ये केले जाते. या वीजेचा उपयोग,खेडेगावी किंवा काही शहरात रस्त्यांवरील दिवे लावण्याकरता केला जातो.

३) सौर ऊर्जा शेतातील पाण्याचे पंप चालवण्याकरता वापरली जाते.

४) सोलार कुकर मध्ये अन्न शिजवले जाते.Natural energy resources.

   ब) पवन ऊर्जा—

वाहणाऱ्या वाऱ्यापासून जेव्हा ऊर्जा निर्मिती केली जाते तेव्हा त्याला पवन ऊर्जा असे म्हटले जाते. ही ऊर्जा निर्मिती करताना अजिबात प्रदूषण होत नाही वातावरण अतिशय शुद्ध असते. तसेच वारा हा एक न संपणारा ऊर्जेचा स्त्रोत आहे. ज्या प्रदेशांमध्ये वारा खूप वाहतो, तेथील वाऱ्यापासून वीज निर्मिती केली जाते. या ऊर्जेपासून वीज निर्मिती करण्यासाठी पवन चक्क्यांची उभारणी केली जाते. ज्या दिशेला वारा वाहतो आहे त्या दिशेला या चक्क्यांचे पाते फिरतात व त्यातून वीज निर्मिती होते. जिथे पवनचक्क्यांची निर्मिती करायचे असते. त्या ठिकाणी वाऱ्याची गती कमीत कमी ६.५m/s असायला हवी.

पवन ऊर्जेतून वीज निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान अनेक विकसित देशात फार मोठ्या प्रमाणात वापरले जाते. अजून भारतामध्ये त्यातील बदल घडलेला नाही. पण पुढील काळात नक्कीच पवन ऊर्जा ही  ऊर्जेचा मुख्य स्त्रोत म्हणून वापरली जाऊ शकते. त्याचा भविष्यकाळ उज्वल आहे. भारतामध्ये २०१७-२०१८ या काळामध्ये५२.६६ बिलियन युनिट्स एवढी वीज पवन ऊर्जेपासून निर्माण केली.

पवन ऊर्जेचे उपयोग–

१)पवन ऊर्जेचा उपयोग मुख्यतः घर आणि व्यवसाय यांसाठी वीजनिर्मिती करणे हा आहे .

२) जोरदार वाऱ्यामुळे जमिनीची धूप होत असते. अशावेळी पवनचक्क्यांमुळे भूकंपाचा धोका टाळता येतो.

३) पाण्याचा उपसा करायला पवन ऊर्जेचा उपयोग केला जातो. भारत सरकारने असे अनेक पंप ज्यांची क्षमता 20 ते 400 लिटर पाण्याचा उपसा करणे एवढी आहे, अशा अनेक पंप ची व्यवस्था केलेली आहे.

४) वीज निर्मिती करताना प्रदूषण होत नाही व हवा स्वच्छ ठेवल्या जाते. पवनचक्की पासून वीज निर्मिती करताना कुठलेही इंधन लागत नाही. Natural energy resources.

   क) बायोमास (जैव वस्तूमान)–ज्या जैविक पदार्थांचे रूपांतर ऊर्जेत करता येते अशा पदार्थाला जैव वस्तुमान किंवा बायोमास असे म्हणतात. जैव वस्तुमान हे वनस्पतीज असू शकते. यात खराब झालेले धान्य, फळ, फुलं ,झाडांची पाने, घरगुती कचरा, झाडांचे खोड तसेच जनावरांची विष्ठा, असे प्राणीज पदार्थ आढळतात. जैव वस्तुमानावर जैव रासायनिक प्रक्रिया केल्यास मिथेन वायू (Methane gas) आणि इंधन तेल तयार होते. भविष्यात अतिशय चांगला ऊर्जा स्त्रोत म्हणून जैव वस्तुमानाकडे बघितले जाते. कारण जैव वस्तुमान हे भरपूर प्रमाणात निसर्गात उपलब्ध असते. जगभरात जवळपास रोज १४६ टन जैव वस्तुमानाची निर्मिती होत असते. भारतात एकूण ऊर्जेच्या 32 टक्के ऊर्जा ही जैव वस्तुमानापासून निर्माण केली जाते. या ऊर्जेपासून अधिकाधिक वीज निर्मिती करण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. ज्या ठिकाणी हे जैव वस्तुमान एकत्र केले जाते त्यांना बायोगॅस प्लांट असे म्हणतात.पुढील काही वर्षात भारत सरकारने पाच हजार

Compressed biogas plants तयार करण्याचे ठरवले आहे.

जैव वस्तुमान पासून तयार होणाऱ्या ऊर्जेचे उपयोग—

भारतासारख्या विकसनशील देशात जैव वस्तुमान हे एक उत्तम ऊर्जा तयार करण्याचे साधन आहे, त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास होतो आहे.

१) या ऊर्जेचा उपयोग स्वयंपाक करणे, पाणी गरम करणे आणि वीज निर्मिती करणे यासाठी होतो.

२) जैव वस्तुमानापासून  उत्तम खत तयार होतं. ते शेतीसाठी वापरले जातं.

३) स्वच्छतेच्या दृष्टीने जैव वस्तुमानापासून निर्माण होणारी ऊर्जा फार उपयोगी आहे. कारण स्वच्छतागृहांपासून बायोगॅस प्लांट्स जोडले गेलेले असतात. Natural energy resources,in Marathi 

   ड) समुद्राच्या लाटेची ऊर्जा किंवा भरतीची ऊर्जा—

पाण्याच्या लाटेबरोबर ची पाण्याची गती बदलते. त्यापासून ऊर्जा निर्मिती केली जाते. जलविद्युत ऊर्जेचा हा प्रकार आहे. दर दिवशी ठराविक वेळी समुद्राचे पाणी पुढे येते आणि मागे जाते त्याला भरती ओहोटी असे म्हणतात. समुद्रकिनाऱ्याजवळ जिथे भरतीचा जोर जास्ती असतो, अशा ठिकाणी जनित्रे फिरवून त्या पाण्यापासून  वीज निर्मिती केली जाते. भरती पासून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात त्यासाठी लाटांची उंची आठ मीटर असावी लागते. समुद्रकिनाऱ्यालगत कठीण खडक असावे लागतात. त्यामुळे ऊर्जा निर्मितीच्या केंद्रांना धक्का पोहोचत नाही. समुद्र किनाऱ्यावरील तापमान वर्षभर उष्ण असावे लागते.

भरती ऊर्जेचे उपयोग—

१) वीज निर्मिती करण्यासाठी मुख्यतः भरती उर्जेचा उपयोग केला जातो.

२) धान्यांची भरड करण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग केला जातो.

३) जल शुद्धीकरण करण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग केला जातो. 

  इ) जलविद्युत ऊर्जा—-वाहत्या पाण्यापासून त्याची गतीय ऊर्जा वापरून  वीज निर्मिती केली जाते. धरणांमध्ये साठलेल्या पाण्याला टरबाइन मध्ये फिरवले जाते व त्यामधून वीज निर्मिती केली जाते. जलविद्युत वापरणारा भारत हा सर्वात मोठा देश आहे .आपल्या देशामध्ये जवळपास 85GW एवढी वीज निर्मिती केली जाईल एवढी पाण्याची क्षमता आहे. आता 50GW एवढी जलविद्युत ऊर्जा तयार केली जाते.

जलविद्युत ऊर्जेचे उपयोग—-

१) वीज निर्मिती करण्यासाठी

२) सिंचना करता

३) पूर आणि दुष्काळ यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी

४) मनोरंजना करता या ठिकाणी काही वॉटर पार्क केलेले असतात. Natural resources of energy.

  ई) भूऔष्णिक ऊर्जा–भूपृष्ठाच्या खूप आतमध्ये  प्रचंड प्रमाणावर ऊर्जा साठवलेली असते, जी ऊर्जा आपण वापरत नाही. या ऊर्जेचा पुनर्वापर केला जाऊ शकतो. भूपृष्ठाच्या आत मध्ये शिलारस वितळलेल्या अवस्थेत असतो. यामुळे भूपृष्ठाखालील सछिद्र खडक तापतात. या स्तराला भूऔष्णिक ऊर्जा स्त्रोत म्हणतात. या स्त्रोतातील प्रवाही जल वाफेच्या रूपात असते. त्याचे तापमान आणि दाब खूप उच्च असतो. हे भूऔष्णिक पाणी किंवा प्रवाह विहिरीद्वारे जमिनीवर आणतात. या विहिरीमध्ये पोलादी नळ्या असतात. त्याद्वारे हा पदार्थ वीज निर्मिती केंद्र  पर्यंत आणला जातो. तिथे जनित्रा द्वारे वीजनिर्मिती केली जाते. काही ठिकाणी नैसर्गिक उष्ण पाण्याचे झरे असतात त्याद्वारे सुद्धा वीज निर्मिती केली जाते. भारतामध्ये वज्रेश्वरी, मनिकरण, सूर्यकुंड, सोहना या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आहेत. Natural energy resources,In Marathi 

भूऔष्णिक ऊर्जेचे उपयोग–

१) या ऊर्जेचा उपयोग घरे आणि हरितगृह उबदार ठेवण्यासाठी करतात.

२) औद्योगिक क्षेत्रात या ऊर्जेचा वापर केला जातो.

३) पिकांना सुकवण्याकरता या ऊर्जेचा वापर होतो.

  उ) हायड्रोजन पासून मिळणारी ऊर्जा—या ऊर्जेपासून अजिबात प्रदूषण होत नाही वातावरण शुद्ध राहते. कुठल्याही प्रकारचा कार्बन हवेत मिसळत नाही.

. पाण्यामध्ये  हायड्रोजन उपलब्ध असतो. पाण्याचे विघटन करून हायड्रोजन मुक्त केला जातो आणि त्याद्वारे ऊर्जा निर्मिती केली जाते. जीवाश्म इंधनामध्ये हायड्रोजन असतो. त्यापासून ऊर्जा निर्मिती केली जाते. असे अनेक पावर प्लांट्स आता भारत सरकार उभारत आहे. ज्याद्वारे हायड्रोजन द्वारा वीजनिर्मिती केली जाते.

हायड्रोजन पासून मिळणाऱ्या ऊर्जेचे उपयोग—

१) वीज निर्मिती

२) वाहनांमध्ये ही ऊर्जा वापरतात

३) घरगुती उपकरणांमध्ये ऊर्जेचा वापर केला जातो. Natural resources of energy.

भारतामध्ये अपारंपारिक ऊर्जेचे खूप स्त्रोत आहेत. तरीही अजूनही पारंपारिक ऊर्जेचा वापर केला जातो. तेव्हा अपारंपारिक ऊर्जेबाबत समाज जागृती आवश्यक आहे. अपारंपारिक ऊर्जेचा वापर करून आपला देश समृद्ध बनवता येतो. याकरता देशाच्या नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. 

तुम्हाला हा लेख कसा वाटला natural energy resources in Marathi ते नक्की कमेंट मध्ये कळवा. तसेच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी लेखक मित्र या वेबसाईटला जरूर भेट द्या. आपल्या मित्र परिवारामध्ये जरूर शेअर करा आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

धन्यवाद!

8 thoughts on “नैसर्गिक ऊर्जेचे स्त्रोत आणि त्यांचे महत्त्व l Natural energy resources in Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top