नेताजी भारतीय इतिहासाचे महान स्वातंत्र्यसेनानी
भारतीय इतिहासाचे महानायक , महान स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिकारी नेते, सच्चे देशभक्त सुभाषचंद्र बोस यांची 127 वी जयंती संपूर्ण देश साजरी करत आहे. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या योगदानाची तुलना कधीच कोणाशी होऊ शकत नाही. ते एक धाडसी आणि स्वातंत्र्यासाठी अतिशय उत्साही , निर्भिड नेते होते. सुभाषचंद्र बोस यांना श्रीमद भागवतगीतेतून खूप प्रेरणा मिळाली होती, म्हणूनच त्यांच्या जीवनात स्वातंत्र्य, समता आणि अखंड ओतप्रोत भरलेलली देशभक्तीची तळमळ दिसून येते, जी भारतवासीय कधीच विसरू शकणार नाहीत.
नेताजींसाठी राष्ट्र सर्वोपरि होते. इंग्रजांच्या तावडीतून मातृभूमीची सुटका करण्यासाठी त्यांनी स्वतःचे सैन्य “आझाद हिंद फौज” तयार करण्याचा मार्ग निवडला. देशभक्ती आणि स्वातंत्र्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी बर्लिनमध्ये फ्री इंडिया सेंटरची स्थापना करून आझाद हिंद रेडिओ सुरू करून स्वातंत्र्य चळवळ पुढे नेली. यामध्ये इंग्रजी, गुजराती, मराठी, बंगाली, पश्तो, तमिळ, फारसी आणि तेलगू भाषेत स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित बातम्यांचे बुलेटिन आणि कार्यक्रम प्रसारित करण्यात आले. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य मिळवण्याच्या मोहिमेला गती देण्यासाठी युरोपमध्ये भारतीय लष्कराची स्थापना करण्यात आली. ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक नावाची राजकीय संस्थाही त्यांनी स्थापन केली.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी “तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दुंगा” ही घोषणा दिली होती, जी आजही देशातील प्रत्येक नागरिक आणि तरुणांच्या हृदयावर कोरलेली आहे. ही घोषणा राष्ट्राप्रती बांधिलकी, कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव करून देते. त्यामुळे कित्येक बलिदान आणि परिश्रम घेऊन आज मिळालेले हे स्वातंत्र्य आपण बळकट करण्यासाठी प्रयत्नशिल, सज्ज राहिले पाहिजे.नेताजी, ज्यांची जयंती आपण दरवर्षी “पराक्रम दिवस” म्हणून साजरी करतो, ते म्हणाले होते “राष्ट्रवाद हा मानवजातीच्या सर्वोच्च आदर्श, सत्यम, शिवम आणि सुंदरम् यांनी प्रेरित आहे. भारतातील राष्ट्रवादाने आपल्या लोकांमध्ये शतकानुशतके सुप्त पडलेल्या सर्जनशील शक्ती जागृत केल्या आहेत.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे बालपण (Netaji Subhash Chandra Bose)
1) नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिशातील कटक शहरातील हिंदू कायस्थ कुटुंबात झाला होता .
2) त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती होते. जानकीनाथ बोस हे कटक शहरातील प्रसिद्ध वकील होते . त्यांनी कटक महानगरपालिकेत दीर्घकाळ काम केले होते आणि बंगाल विधानसभेचे सदस्यही होते . ब्रिटिश सरकारने त्यांना रायबहादूर ही पदवी दिली होती.
3) प्रभावतीदेवींच्या वडिलांचे नाव गंगानारायण दत्त होते. दत्त कुटुंब हे कोलकात्यातील उच्चभ्रू कुटुंब मानले जात असे . प्रभावती आणि जानकीनाथ बोस यांना एकूण 14 मुले होती, ज्यात 6 मुली आणि 8 मुलगे होते. सुभाषचंद्र जी हे त्यांचे नववे अपत्य आणि पाचवा मुलगा होता. त्यांच्या सर्व भावांपैकी सुभाषला शरदचंद्रांचे सर्वात जास्त प्रेम होते.
4) शरदबाबू हे प्रभावती आणि जानकीनाथ यांचे दुसरे पुत्र होते. सुभाष त्याला मेजदा म्हणत. शरदबाबूंच्या पत्नीचे नाव विभावती होते.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वैवाहिक आयुष्य
1) 1934 मध्ये, जेव्हा सुभाष उपचारासाठी ऑस्ट्रियामध्ये राहत होते, तेव्हा त्यांना पुस्तक लिहिण्यासाठी इंग्रजी जाणणाऱ्या टायपिस्टची आवश्यकता होती. त्याच्या एका मित्राने त्याची एमिली शेंकल नावाच्या ऑस्ट्रियन महिलेशी ओळख करून दिली . एमिलीचे वडील प्रसिद्ध पशुवैद्य होते . सुभाष जी एमिलीकडे आकर्षित झाले.
2) पुढे त्यांनी 1942 मध्ये बॅड गॅस्टीन नावाच्या ठिकाणी हिंदू परंपरेनुसार लग्न केले . एमिलीने व्हिएन्ना येथे एका मुलीला जन्म दिला . ती जेमतेम चार आठवड्यांची असताना सुभाषजींनी तिला पहिल्यांदा पाहिलं. त्यांनी तिचे नाव अनिता बोस असे ठेवले.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची चळवळ
1) 1920 मध्ये ICC सिव्हिल सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. पण लगेच 1921 मध्ये त्यांनी राजीनामा दिला.
2) भारतामध्ये सर्वप्रथम मुंबईला जाऊन महात्मा गांधींना भेटले. मुंबईत गांधींजी मणिभवन वास्तु मध्ये वास्तव्य करत होते. तिथे 20,जुलै 1921 रोजी महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस पहिल्यांदा एकमेकांना भेटले.
3) गांधींजीनी इंग्रज सरकारच्या विरोधात ‘असहकार आंदोलन’ चालवले होते. दासबाबू बंगालमध्ये ह्या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यांच्याबरोबर सुभाषचंद्र जी ह्या आंदोलनात सहभागी झाले.
4)1922 साली दासबाबूंनी काँग्रेस अंतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली. इंग्रज सरकारचा विरोध करण्यासाठी त्यांनी स्वराज पक्षाच्या अंतर्गत कोलकाता महापालिकेची निवडणूक लढवून जिंकली. स्वतः दासबाबू कोलकात्त्याचे महापौर झाले. त् महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी नेताजींची नियुक्ती केली.
5) 1923 मध्ये आखिल भारतीय युवा काँग्रेस चे अध्यक्ष आणि बंगाल राज्यातील काँग्रेस पक्षाचे सचिव झाले.
6) तसेच नेताजी दोनदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेत. (1938 – हरिपूर अधिवेशन आणि 1939 – त्रिपुरा अधिवेशन)
7)३ मे १९३९ रोजी सुभाषचंद्र बोस त्रिपुरा अधिवेशनात यांनी राजीनामा दिला पुढे काँग्रेसऐवजी त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाने स्वतःचा पक्ष स्थापन केला . दुसरे महा*यु*द्ध सुरू होण्यापूर्वीच फॉरवर्ड ब्लॉकने स्वातंत्र्य लढा अधिक तीव्र करण्यासाठी जनजागृती सुरू केली.
8) 21 ऑक्टोबर 1943 रोजी नेताजींनी सिंगापूरमध्ये अरजी-हुकुमते-आझाद-हिंद (स्वतंत्र भारताचे अंतरिम सरकार) स्थापन केले. नेताजी आझाद हिंद फौजेचे सरसेनापतीही झाले .
लोकसंख्या नियंत्रणाचे आणि स्त्री- समानतेविषयी विचार
1) राष्ट्रीय संसाधनांच्या अनुरूपच राष्ट्राची लोकसंख्या असली पाहिजे.
2)आझाद हिंद फौजेतील महिलांसाठी झाशी ची राणी रेजिमेंटची तयार करण्यात आली होती . ज्यामध्ये जवळपास 1000 स्त्रिया सैनिक होत्या .
3) तसेच ‘महिला राष्ट्रीय संघाच्या’ स्थापनेसाठी पुढाकार घेतला.मित्रांनो ,आपण आजकाल पाहतच आहोत की स्वातंत्र्यानंतर तब्बल 75 वर्षानंतर (21 सप्टे 2023) महिलांसाठी लोकसभेत आणि राज्यांच्या विधानसभेत 33 % आरक्षण मिळाले आहे. महासत्ता होऊ पाहणाऱ्या देशात अजूनही स्त्री – पूरूष समानतेवर साशंक असणाऱ्या कित्येकांना नेताजीसारखे आधुनिक दूरदृष्टी विचारवंत नेते आपल्या भारतभूमीत होऊन गेले ही निश्चितच प्रत्येक भारतवासीसाठी अभिमानाची बाब आहे .
समाज आणि संस्कृती बद्दल विचार
1) जातीप्रथेसारख्या वाईट रुढींचा विरोध करत ते म्हणाले ‘संपूर्ण स्वातंत्र्यता ‘ .सर्वांसाठी च समान असली पाहिजे.
2) आझाद हिंद सेने मध्ये सैन्यांची भरती जाती भेद-भावापासून दूर कर्तुत्वावर केली जात होती.
नेताजींचा मृ*त्यू आणि त्यासंबंधी चौकशी करता नियुक्त केलेले आयोग
जपानच्या दोम्मई वृत्त संस्थेने 23 ऑगस्ट 1945 रोजी संपूर्ण जगाला कळवले , की नेताजी 18 ऑगस्टला तैवान मध्ये विमान अपघातात जखमी झाले होते शरीर बऱ्याच प्रमाणात भाजल्यामुळे त्यांचा जपानी दवाखान्यात मत्यू झाला. स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने ह्या घटनेची चौकशी करण्यासाठी, १९५६ आणि १९७७ मध्ये दोन वेळा एकेका आयोगाची नियुक्ती केली. दोन्ही वेळा हाच निष्कर्ष निघाला की नेताजींचा त्या विमान अपघातातच मृ झाला होता.
१९९९ साली मनोज कुमार मुखर्जी ह्यांच्या नेतृत्वाखाली तिसरा आयोग नेमला गेला. २००५ साली तैवान सरकारने 2005 साली मुखर्जी आयोगाला असे कळवले की १९४५ साली तैवानच्या भूमीवर कोणतेही विमान अपघातग्रस्त झालेच नव्हते. मुखर्जी आयोगाने आपल्या अहवालात नेताजींचा मृ त्या विमान अपघातात घडल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही असे सांगितले. परंतु भारत सरकारने मुखर्जी आयोगाचा हा अहवाल नामंजूर केला होता.
भारत सरकारकडे नेताजींच्या मृशी निगडित जेवढ्या फायली होत्या त्या २०१५ साली त्यांतल्या बऱ्याच फायली सरकारने लोकांना बघण्यासाठी खुल्या केल्या आहेत पण जपानने मात्र 5 फायली पैकी दोनच खुल्या केल्या आहेत त्यापैकी तीन अजूनही बंद स्वरूपात आहेत.
सरतेशेवटी नेताजींचा मृ कसा झाला आहे? की ते त्या अपघातातून वाचले होते, हे अद्याप न उलगलेलं कोडेच आहे. पण इतिहास मात्र या महानाय काला चिरंतर अमर म्हणूनच आठवेल यात यात किंचीतही शंका नाही…
तर मित्रांनो, आपण नेताजींच्या (Netaji Subhash Chandra Bose information in Marathi) विषयी जी माहिती पाहिली ती तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंट करून नक्की तुमचा प्रतिसाद कळवा. आणि आमच्या watsapp ग्रुपला ही जॉईन व्हा.
लेखिका -अमृता नामदेव कारंडे,कोल्हापूर