मानवी भावनांचा ओलावा :ओले आले
गेल्या अनेक वर्षापासून मराठी चित्रपटाने अनेक नव नवीन विषय प्रदर्शित करून रसिकांच्या मनावर आणि बॉक्स ऑफिस वर आपला ठसा उमटवला आहे.मराठी सिनेमा म्हणजे वेगळा विषय असाच समीकरण सध्या झालेलं दिसून येत आहे. नवीन वर्षात देखील हि परंपरा कोकनट मोशन पिक्चर्स‘ ने जपलेली दिसून येत आहे. विपुल मेहता दिग्दर्शित ओले आले’ हा मराठी चित्रपट याचं एक आणखीन उदाहरण ठरलेलं आहे. ५ जानेवारीला प्रदर्शित झालेला हा सिनेमा थेट प्रेक्षकांच्या भावना जागृत करून डोळ्यात ओलावा निर्माण करण्यात यशस्वी झालेला दिसून येत आहे.
दिग्दर्शक विपुल मेहेता आणि संगीतकार जोडी सचिन-जिगर यांचा मराठीतील हा पहिलाच सिनेमा.दिग्दर्शक विपुल मेहेता गुजराथी सिनेमात एक नावाजलेलं नाव. त्यांच्याच ‘चाल जीवी लाइए’ या गुजराथी सेनेमाचा अधिकृत रिमेक म्हणजे ओले आले. विपुल मेहेता यांनी हिंदी मध्ये कंजूस माखीचुस या नावचा हिंदी सिनेमा केला होता तर अनेक गुजराथी नाटकं व सिनेमे त्यांनी केले आहेत. क्यू कि सांस भी कभी बहु थी..या मालिकेचे लिखाण देखील विपुल मेहेता यांनी केलं आहे. मुळात या सिनेमाची कास्टिंग हेच या चित्रपटाची भक्कम बाजू आहे.मराठी आणि हिंदी चित्रपटात दमदार अभिनयाची छाप उमटवणारे जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर, निरागस व्यक्तिमत्व आणि प्रभावी अभिनय करणारा सिद्धार्थ चांदेकर आणि रूपवान सायली संजीव यांना सोबत घेऊन बाप-लेकाच्या अनोख्या नात्यावर प्रकाश टाकणारा चित्रपट या गुणी लेखक आणि दिग्दर्शकाने नव्या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित केला आहे.

काय आहे याच कथानक ?
मुळात चित्रपटच नावचं फार आकर्षक आहे.आणि याच शीर्षकच या चित्रपटच कथानक आहे.हटके नाव असलेला हा चित्रपट कथानक काय असेल हाच विचार करायला भाग पडतो हेच याच पाहिलं यश म्हणायला हवं. एका मोशन पिक्चर मध्ये एका नाना पाटेकर,सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव रिव्हर राफ्टींग चा आनंद घेत प्रवास करताना दिसत आहेत. या मोशन पिक्चर सोबत एक घोष वाक्य दिसून येत “एक आशा प्रवासाची गोष्ट,ज्याने शिकवले जीवन जगण्याचे सूत्र” हि ओळच प्रेक्षकांना कुतूहल निमार्ण करयला लावणारी ठरली आहे.जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा पासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाची उस्तुकता लागून राहिली होतो. अखेरीस ५ जानेवारी २०२५ रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. कथानक सुरु होता होताच या चित्रपटच शीर्षक प्रेक्षकांना कळायला लागत. साधारणता वडील आपलं संपूर्ण तारुण्य आपल्या मुलांसाठी खर्ची घालवतात आणि उतार वयात मात्र आपल्या तरुण मुला कडून वेळेची अपेक्षा ठेवत राहतात. आता हा तरुण मुलगा आपलं करियर घडवण्यासाठी वेळ काळ,तहान भूक हरवून केवळ करीरच्या मागे धावत असतो. याच जीवनाच्या सत्यावर हा चित्रपट आधारलेला आहे. ओंकार लेले अर्थात नाना पाटेकर सध्या निवृत्ती जीवन जगत आहेत, आपण किती जगलो या पेक्षा कसे जगलो याचा विचार आता त्यांना पडतो.आपल्या प्रमाणे आपल्या मुलाने जीवन नुसतच जगू नये तर त्या जीवनाचा आनंद घ्यावा म्हणून ते त्याला समजवत राहतात पण ध्येय वेड्या आदिला म्हणजेच आदित्य लेलेला जीवनाचे हे मर्म लक्षात येत नसते. अश्यातच एक विचित्र गोष्ट ओंकार लेले यांच्या सोबत घडते त्या घटने नंतर आदित्य पुरता हादरून जातो.आता आपल्या वडलांची इच्छा पूर्ण करायची म्हणून तो एका प्रवासाला निघतो. अर्थात हा प्रवासच खरा जीवन प्रवास आहे हे त्याच्या नंतर लक्षात येत.
कथा जरी साधी सरळ वाटत असली तरी ती प्रत्येक वेळी वेग वेगळे वळण घेत राहते आणि प्रेक्षकांना शेवट पर्यंत खुर्चीत जखडून ठेवते. प्रेक्षक हसता हसता कधी डोळे पुसू लागतात ते देखील कळत नाही.
चित्रपटाची जमेची बाजू
साधारण कथा असाधारण पद्धतीने दाखवण्यात दिग्दर्शकाने यश मिळवलं आहे. सोप साध वाटणारं कथानक अचानक वेगवान होऊन जात आणि हसता हसता आपल्याला विचार करायला लावत ते कळत देखील नाही. आपलाच भारत देश इतका सुंदर दिसतो हे DOP ने आपल्या कलेतून दाखवून दिले आहे. खास करून दक्षिण भारतातील मंदिर,पर्यटन स्थळे मोठया पडद्यावर जेव्हा दिसतात तेव्हा तिथल्या सौंदर्याच्या प्रेमात प्रेक्षक हरवून जातो.अभिनयाचं विद्यापीठ असलेल्या नाना पाटेकर यांनी लोकांना पोट धरून हसवलं आहे तर क्षणात रडवल देखील आहे.एक अभिनेता आपला अभिनय प्रेक्षकांच्या मनात कसा उतरवतो आणि आपल्या पात्रात त्या प्रेक्षकांना कसा रमवतो हे पुन्हा एकदा नाना पाटेकर यांनी दाखवून दिल आहे. मकरंद अनारस्पुरे यांचा पडद्यावरील वावर म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानीच असते. या चित्रपटात जरी मकरंद यांची भूमिका छोटी असली तरी आपल्या विनोदाच्या अचूक टाईमींग ने मकरंद यांना प्रेक्षक चांगलाच लक्षात ठेवतो. प्रवासावर आधारित कथानक आणि सिद्धार्थ चांदेकर हा एक वेगळाच योगा योग म्हणावा लागेल. या अभिनेत्याला आज पर्यंत बरेच चित्रपट हे प्रवासावर आधारित मिळाले आहेत.परंतु प्रत्येक सिनेमात त्याने आपली वेगळी जादू कायम ठेवली आहे.या सिनेमा मध्ये देखील त्याने करिअर साठी ध्येय वेडा तरुण आणि वडिलांसाठी भाऊक होणारा मुलगा अप्रतिम सादर केला आहे.
मराठी सिनेमाच्या प्रेक्षकांची आवड अचूक ओळखून रश्मीन मजिठीया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटातील संवाद देखील अप्रतिम लिहिले आहेत. तुझ्याकडे भाकरवडी आहे,पुण्याची आहेस? हा संवाद म्हणजे अभ्यासातून निमार्ण केलेला विनोद ! असे अनेक संवाद हे नुसते हसवातच नाहीत तर अनेक संवाद हे थेट काळजात घुसून मनाला विचार देखील करयला भाग पडतात. चित्रपटाची लांबी २ तास २२ मिनटे जरी असली तरी हा चित्रपट संपूच नये,हा प्रवास असाच अखंड रहावा अस प्रेक्षकांना वाटत राहत.
चित्रपटाची कुमकुवत बाजू
चित्रपटला सचिन –जिगर याचं संगीत लाभलं आहे. मराठीत प्रथमच पदार्पण करणाऱ्या या संगीतकार जोडीने या चित्रपटात काही श्रवणीय गीत सादर केले आहे परंतु काही गाण्यांच्या संगीतावर जर अजून श्रम घेतले असते तर या चित्रपटातील सर्व गीते अजून बहारदार झाली असती. विनोदाचा बादशाह मकरंद अनारसपुरे यांचा वावर अजून थोडा वाढवला असता तर विनोदाचा ओलावा अजून वाढला असता.एका हुकमी एक्क्याला कोठे आणि कसा वापर करावा हे जर दिग्दर्शकाने आणखीन अभ्यास पूर्ण जाणून घेतलं असत तर अजून मनोरंजनात भर पडली असती.
एकीकडे हिंदी,तमिळ,तेलगु,कन्नड सारखे तगडे चित्रपट देखील याच आठवड्यात रिलीज झाले असले तरी या सिनेमाला एक स्वतःचा वेगळा प्रेक्षक वर्ग आहे.मराठी सिनेमाला नवीन वर्षात नवीन विषय,अभिनयाच्या नव्या जोड्या आणि परिपूर्ण मनोरंजन करणारा असा हा चित्रपट. ज्यांना करिअर आणि नाते संबंध कसे हाताळावे हे जाणून घ्यायचे आहे,वडील आणि मुलगा हे वयाने मोठे होत असताना विचाराने दूर का होत असतात हे जाणून घ्यायचे असेल त्यांनी हा विनोदाच्या साह्याने बाप लेकांच्या नात्यावर भावनात्मक मत प्रदर्शित करणारा हा चित्रपट सहकुटुंब सहपरिवार पाहण्या योग्यच आहे.
तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला , जरूर कॉमेंट करून सांगा . आणि अश्याच माहितीपर लेखांसाठी आमच्या ग्रुप ला सुद्धा जॉईन व्हा.
लेखक – Amit More
चित्रपटाचे सूत्र खूप छान उलगडून दाखवले आहे👌👌
रिव्ह्यू वाचून आता चित्रपट बघितलाच पाहीजे 👍
हो नक्कीच आवडेल तुम्हाला
रिव्ह्यू वाचून आता चित्रपट बघितलाच पाहीजे 👍
छानच ! लेख वाचताना बर्याच गोष्टी छान वाटल्या. चित्रपटा च्या review सोबत इतर अनेक गोष्टी चा उल्लेख केला आहे. मांडणी छान वाटली. खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद
चित्रपट पाहिला असल्याने ह्या लेखात उत्तमरित्या चित्रपटाचे पुनरावलोकन केले हे ठाम पणे सागु शकते. छान मांडणी. ज्यांनी पाहिला नसेल ते हा लेख वाचून पाहायला नक्कीच जातील.