Political content writer: राजकीय घडामोडींची उत्तम जाण असल्यास तुम्ही बनू शकता राजकीय कंटेण्ट रायटर

WhatsApp Group Join Now

Political content writer: राजकीय घडामोडींची उत्तम जाण असल्यास तुम्ही बनू शकता राजकीय कंटेण्ट रायटर

राजकारण हे एकमेव क्षेत्र असे आहे ज्याच्यासोबत आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जोडले गेलेलो असतो. सतत काहीतरी नवनवीन उलाढाली या क्षेत्रात होत असतात. मतदार या नात्याने नागरिकांना असलेल्या मतदानाच्या अधिकारामुळे देशातील सगळेच नागरिक राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी असतात. मतदानाचा हा अधिकार बजावल्यानंतर निवडून दिलेले आपले प्रतिनीधी त्यांचा पक्ष या सगळ्याच गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनावर प्रभाव पाडत असतात. त्यामुळे नागरिकांना राजकीय वर्तुळात घडत असलेल्या घाडमोडींबद्दल कुतुहल असते. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील माहिती, बातम्या समाजापर्यंत पोहोचवण्याची कला तुमच्यात असेल तर तुम्ही उत्तम राजकीय कंटेण्ट रायटर म्हणून काम करु शकता. इतकेच नाही तर एखाद्या राजकीय पक्षासाठी देखील कंटेण्ट रायटर म्हणून काम करु शकता. चला तर मग आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण पाहूया की राजकीय कंटेण्ट रायटिंग क्षेत्रात कोणकोणत्या नवनवीन संधी उपलब्ध आहेत. political content writer jobs in Marathi

राजकीय घडामोडींवर प्रकाश टाकणारे लेख

तुम्हाला राजकारणाची उत्तम जाण असेल आणि तुम्ही केंद्र, राज्य आणि जिल्हा पातळीवरील राजकारण समजू शकत असाल तर तुम्ही या सर्व घाडमोडींबाबत लिहून उत्तम पैसे कमाऊ शकता. नागरिकांना नेहमीच जाणून घ्यायचे असते की, त्यांनी मत देऊन निवडून दिलेले राजकीय नेते नेमकी कोणकोणती समाजोपयोगी कामे करीत आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांनी घेतलेले निर्णय आणि त्या निर्णयांचा समाजिक पातळीवर झालेला  चांगला वाईट परिणाम या सर्व गोष्टी नागरिकांना समजून घ्यायच्या असतात आणि तो त्यांचा अधिकारही आहे. त्यामुळे तुम्ही पक्षीय राजकारण आणि त्याचे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणारे बरे वाईट परीणाम याबद्दल सत्य परिस्थीती मांडू शकत असाल तर तुमच्या लेखाला अनेक वाचक मिळू शकतात. वर्तमान पत्रं आणि राजकीय बातम्या देणाऱ्या वेबसाईट्सला असे लेख लिहणाऱ्या लेखकांची अत्यंत गरज असते. Political content writer

·      राजकीय लेख लिहणाऱ्यांनी कोणत्या गोष्ट लक्षात ठेवाव्यात

1.   तुम्ही जेव्हा एखाद्या वेबसाईटसाठी किंवा वर्तमानपत्रासाठी लेख लिहित असाल तेव्हा लेख लिहिताना एखाद्या पक्षाच्या हितासाठी आणि एखाद्या पक्षाची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने लेख लिहिला जाऊ नये. नागरिकांचे त्यातील हित आणि अहित लक्षात घेऊन लेख मांडला गेला पाहिजे.

2.  तुम्ही जर का एखाद्या पक्षासाठी लेख लिहिण्याचे काम करीत असाल तर  पक्षाने किंवा पक्षातील नेत्यांनी केलेली परिणामकारक कामे नागरिकांपर्यंत पोहोचावीत या उद्देशाने लेखन करणे अपक्षीत असते.  

शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचे लेखन

शासन हे नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी काम करीत असते. त्यामुळे शासन विविध समाजोपयोजी योजना राबवित असते. या योजनां नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम तुम्ही तुमच्या लेखन शैलीच्या माध्यमातून करु शकता. ग्रामिण भागात आजही अनेकांना शासन निर्णय म्हणजे काय हे माहिती नसते. मग केंद्र शासन किंवा राज्य शासनाने घेतलेले शासकीय निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी राबवण्यात आलेल्या योजना तुम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवू शकता. शासनाच्या विविध विभागांमार्फत दर दिवशी अनेक GR म्हणजेच शासन निर्णय सादर होत असतात त्यांतील माहिती सोप्या शब्दांत मांडणी करुन नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम तुम्ही करु शकता. त्यासाठी एखादी वेबसाईट तयार करुन तुम्ही शासकीय योजना तुमच्या शब्दात नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करु शकता. Political content writer

शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत विविध योजना आखल्या जातात. या योजना बरेचदा ग्रामपंचायतीमार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत मग तुम्ही शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आलेल्या योजना शब्दबद्ध करुन त्यांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू शकता. सध्या सगळ्याच शेतकऱ्यांकडे फोनमध्ये व्हॉट्सऍप असते. त्याद्वारे तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत तुमच्या वेबसाईटच्या लेखाची लिंक पाठवू शकता. त्यांना माहिती तर मिळेलच परंतु जितके जास्तीत जास्त वाचक तुम्ही वेबसाईटवर आणू शकाल त्याबदल्यात गुगल ऍड सेन्सच्या google AdSense माध्यमातून तुम्ही पैसे देखील कमाऊ शकता.

स्क्रिप्ट रायटरचे काम

सध्या Audio visual म्हणजे AV या माध्यमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राजकीय क्षेत्रातील घडत असेलल्या दैनंदिन घडामोडी नागरिकांसमोर मांडणारे अनेक यूट्यूब चॅनल्स सध्या अस्तित्वात आहेत. digital media किंवा Electronic media देखील हे काम करीतच आहे परंतु सध्या यूट्यूब सारख्या माध्यमाची त्यात भर पडली आहे. येथे उत्तम स्क्रिप्ट रायटरची नेहमची वानवा जाणवते. कारण राजकीय क्षेत्राशी संबंधीत एखादा प्रश्न घेऊन त्यावर नेमकेपणाने माडंणी करीत चलचित्रे म्हणजेच visual च्या माध्यमातून व्हिडिओ बनवले जातात. या व्हिडिओला जितके लाईक्स किंवा व्ह्यूव्ज येतील त्याप्रमाणे त्यांची गुगल रँकिंग होते आणि यूट्यूबवर ऍड्स सुरु झाल्यास त्याचे गुगल मानधन देखील सुरु होते. अशा युट्यूब चॅनल्ससाठी स्क्रिप्ट रायटर Marathi Political script writer म्हणून तुम्ही काम करु शकता. किंवा स्वतःचा युट्यूब चॅनल देखील सुरु करु शकता.

बरेचदा राजकीय पुढाऱ्यांना देखील त्यांच्या भाषणांतील मुद्दे लिहून देणारे स्क्रिप्ट रायटर हवे असतात. पक्षिय राजकारणाचे आणि केंद्रिय आणि राज्य पातळीवर उमटणारे पडसाद याचा योग्य अभ्यास असल्यास तुम्ही एखाद्या मंत्री किंवा आमदार यांच्याकडे भाषण लिखाणाचे काम करु शकता. कारण त्यांना विविध कार्यक्रमांसाठी भाषणे सादर करायची असतात, त्यांच्याकडे विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी वेळ कमी असतो ते काम तुम्ही करुन देऊन त्यांच्यासाठी उत्तम भाषण स्क्रिप्ट तयार करु शकता. त्याचे 30 ते 50 हजारापासून पुढे मानधन मिळते. इतकेच काय तर त्या राजकीय नेत्यांच्या इमेज बिल्डिंगसाठी लागणारा कंटेण्ट देखील तुम्ही तयार करुन पैसे कमाऊ शकता. योग्य शब्दांकन आणि राजकाणाची जाण असल्यास या गोष्टी कठीण नाहीत.    

सोशल मिडिया अकाऊंट्स  

सध्या सोशल मडिया हे एक असे माध्यम बनले आहे ज्याच्या माध्यमातून टार्गेट ऑडियन्स पर्यंत सहज पोहोचता येते. आपले काम एकावेळेच अनेकापर्यंत पोहोचवता येते. त्यामुळे हल्ली सगळ्याच राजकीय नेत्यांचे, त्यांच्या पक्षाचे सोशल मिडिया अकाऊंट्स Politiacl social accounts असतात. फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यूट्यूब सारख्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर प्रत्येक राजकीय नेत्याला स्वतःचे राजकीय काम नागरिकांपर्यंत पोहोचवायचे असते. त्यासाठी आता सोशल मिडिया अकाऊंट्स हँडल करणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर काम करु लागल्या आहेत.  या कंपन्या राजकीय नेत्यांचे सोशल मिडिया अकाऊंट्स हँडल करतात. Political person social media accounts handle  या कंपन्यांसाठी कंटेण्ट रायटर म्हणून तुम्ही का करु शकता. त्यामध्ये कॅप्शन रायटर, कॉपी रायटर, स्क्रिप्ट रायटर आणि स्लोगन रायटर अशी विविध कामे उपलब्ध असतात. राजकीय घडामोडींचा अभ्यास करण्याची तुम्हाला आवड असल्यास तुम्ही या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवू  शकता. इतकेच काय तर या सोशल मिडिया कंटेण्ट रायटरला या कंपन्यांध्ये  60 हजारापासून ते 1 लाखापर्यंत मानधन असते. राजकारणाचा योग्य अभ्यास आणि ते मांडण्याची कला यामध्ये अवगत असणे आवश्यक असते.

राजकीय कंटेण्ट रायटर बनण्यासाठी कोणत्या कौशल्यांची आवश्यकता असते?

राजकारण हे असे क्षेत्र आहे जे कधीच संपणार नाही. उलट या क्षेत्रात दररोज काहीना काही नवनवीन घडामोडी होत असतात आणि त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम देखील होत असतो. त्यामुळे या क्षेत्राशी संबंधीत माहिती नागरिकांना हवी असते. राजकारणी देखील त्यांचे काम नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमे शोधत असतात. हे माध्यम मिळवून देऊन तुम्ही उत्तम पैसे कमाऊ शकता. त्यासाठी राजकीय कंटेण्ट रायटरकडे कोणती कौशल्ये असणे आवश्यक असते  ते आपण पुढे पाहू.

·      राजकाणाची उत्तम माहिती सोप्या भाषेत मांडण्याचे कौशल्य

·      भारतातील पक्षीय राजकारण आणि राज्यातील पक्षीय राजकारणाचा अभ्यास असणे आवश्यक असते

·      ग्रामपंचायत ते मंत्री पदापर्यंतच्या सर्व राजकीय प्रतिनीधींशी संबंधीत कायदे व नियमावली माहिती असणे आवश्यक असते.

·      घोषवाक्ये तयार करण्याची कला, लेख लेखन, स्क्रिप्ट लेखन या कला अवगत असणे आवश्यक असतात.

·      फोटो पाहून त्यावर किमान 50 शब्दांत मराठीमध्ये कॅप्शन लिहिता येण्याची कला आवश्यक असते.

·      केंद्रातील आणि राज्यातील सरकारचे धोरण आणि कायदे याबाबत माहिती असणे आवश्यक असते.

·      शासकीय स्तरावरील विविध योजना आणि शासन निर्णय समजून घेऊन त्यांची सोप्या शब्दात मांडणी करण्याची कला अवगत असायला हवी.

वरील माहितीत मांडलेल्या कौशल्यांवर तुम्ही काम करु शकलात तर नक्कीच तुम्ही एक उत्तम राजकीय कंटेण्ट रायटर म्हणून काम करु शकता आणि चांगले पैसे देखील कामाऊ शकता. Political content writer

लेखन क्षेत्रातील विविधं संधीबद्दल माहिती देणाऱ्या लेखांसाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला भेट देत रहा. माझा हा लेख कसा वाटला ते कमेंट करुन नक्की कळवा. तुम्हाला या लेखाबद्दल काही सुचना करायच्या असतील तरी तुमच्या सुचनांचे स्वागतच असेल. वाचत रहा प्रगती करीत रहा!

8 thoughts on “Political content writer: राजकीय घडामोडींची उत्तम जाण असल्यास तुम्ही बनू शकता राजकीय कंटेण्ट रायटर”

  1. प्रतिक्षा रणदिवे

    उत्तम, अगदी सोप्प्या भाषेत लेख लिहिला आहे.

  2. शीतल मॅम, खूप मुद्देसूद आणि ठळक लिहिता तुम्ही. तुमचे ब्लॉग वाचणं आणि त्यातून ब्लॉग राइटिंग चे धडे घेणं मला आवडतं आणि सोपं वाटतं. शुभेच्छा.
    – स्मृती

    1. शंकर बळी

      संपूर्ण माहिती देणारा लेख. लिंक पाठवल्याबद्दल धन्यवाद.

  3. कविता पांडे

    खूपच महत्त्व पूर्ण माहिती दिली आहे.पण कुठे आणि कसं मिळेल हे काम.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top