अयोध्येचा राम कोण ? l ram mandir ayodhya marathi

WhatsApp Group Join Now

*राम राम मंडळी*  

श्रीराम हे हिंदू धर्मातील एक प्रमुख दैवत आणि अवतार मानले जाते. रामायण हा एक महत्वाचा हिंदू ऐतिहासिक ग्रंथ आहे ज्यात श्री रामाची कथा आहे.  रामायण हे भक्तिसाधना आणि नैतिकतेचं प्रमाणपत्र म्हणून महत्त्वाचं मानलं जातं. 

अयोध्या नगरी मध्ये २२ जानेवारी २०२4 रोजी पुन्हा प्रभू श्री रामाची प्रतिष्ठापना होणार आहे.या घटनेला ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक राजकीय आणि अध्यात्मिक सर्व कंगोरे आहेत.  प्रत्येकाच्या मनात या घटनेसाठी वेगवेगळे संकल्प विकल्प आहेत . “राम मानव की ईश्वर ” या वर देखील मत मतांतरे आहेत.  परंतु हिंदू हृदयात प्रभू श्री रामाप्रती नितांत श्रद्धा, प्रेम ,निष्ठा आणि भक्तीच आहे यावर दुमत नसावे. या अनुषंगाने हा दिवस आनंदाचा , उत्साहाचा आणि भक्तिमय भाव मनात दृढ करण्याचा आहे असे निश्चितपणे म्हणता येईल .  

आजच्या लेखात “राम” आणि प्राचीन राम कथा ‘रामायण’ या दोन्हींचे भौतिक आणि अध्यात्मिक पातळीवर वेगवेगळ्या संतांनी, अभ्यासकांनी सांगितलेले  वेगवेगळे अर्थ आणि व्याप्ती यांचा गोष वारा आपणास वाचायला मिळेल. 

– वाल्मिकी रामायण हा राम कथेवरील सर्वात प्राचीन ग्रंथ समजला जातो. त्या आधी श्री. नारद ऋषींनी ही कथा वाल्मिकी यांना कथन केली अशी देखील एक समजूत आहे. 

-स्वामी रामदासांनी रामाचे वर्णन सगुण आणि निर्गुण दोन्ही प्रकारे केले आहे. त्यांच्या मनाचे श्लोक आणी दासबोध या दोन्ही जगप्रसिद्ध साहित्यातून त्यांनी राम म्हणजेच आत्माराम आणि ते म्हणजेच तुम्ही आणि या रामाचे दर्शन कसे घ्यावे याची स्पष्ट दिशा दाखवली आहे.. 

– संत एकनाथ, संत तुकाराम, आणि संत नामदेव ह्या महाराष्ट्रीय संतांनीही आपल्या अभंग रचनेतून श्रीरामाचे भक्तिपूर्ण वर्णन केले आहे. 

– स्वामी विवेकानंद परदेशातील आपल्या वास्तव्यात हिंदू धर्माचा प्रसार करताना रामायण कथेबद्दल सांगत, रामायण ही गोष्ट फक्त राजाची नाही , त्याला सामाजिक, तात्विक तसेच अध्यात्मिक बैठक आहे आणि हे एक महान सत्य आहे. हे रामायण आपल्या देहात देखील घडते आहे . 

– कबिरांचा राम हा निर्गुणी राम आहे. 

 “राम निरंजन न्यारा रे, अंजन जगत पसारा रे ” या त्यांच्या रचनेतून , जे जे इंद्रिय गोचर आहे ती माया आहे  , त्या पलीकडे जो निऱ – अंजन आहे तो खरा राम असे संत कबीर समाजाला परखड पणाने सांगतात. 

– *अक्षर बीजाक्षरआणि परिणाम*  

संस्कृत भाषेप्रमाणे ‘ र ‘ हे अक्षर अग्नितत्वाचे म्हणजेच तेजाचे/ प्रकाशाचे असून,  ‘म ‘ हे स्व त्वाचे प्रतीक आहे. या अनुषंगाने राम म्हणजे माझ्यातील स्वयं प्रकाश हा अर्थ होतो . आत्मज्ञान जाणणे  असाही अर्थ इथे अपेक्षित आहे. 

– शरीर रचनेतील अभ्यासक अध्यात्माचा किंवा गूढ आणि सूक्ष्म गोष्टींचा अभ्यास करताना शरीरातील सात चक्रांचा विचार करताना आढळतात. यामधील मणिपूर चक्र हे नाभी केंद्राजवळ आहे आणि त्याचा बीज मंत्र ‘ रं ‘ आहे असे मानतात. या बिजमंत्रांची स्पंदने आपल्या व्यक्तिमत्वावर, आत्म विश्वास आणि निर्भयता या गुणांवर सकारात्मक कार्य करतात असे त्यांचे म्हणणे आहे. सामान्य माणसाला हा बीज मंत्र खूप उष्णता निर्माण करणारा आहे म्हणून  सोपा करून  राम म्हणा असे सांगितले जाते अशी ही एक विचारधारा प्रचलित आहे. 

*राम , आत्मा राम आणि परब्रम्ह राम*

सर्व ग्रंथ रचनांवरून आणि काव्यातून देखील हा इशारा समजतो की हिंदू धर्मात  स्वतःला जाणणे  म्हणजेच राम ते आत्माराम आणि आत्माराम ते परब्रह्म असा प्रवास आहे.  आणि हीच मुक्ती आहे. 

 देव पाहण्याची दृष्टी प्रत्येकाची वेगळी ! जीवनात ” राम ” हवा ही इच्छा मात्र संगळ्यांच्या मनात अनादी काला पासून सारखीच आहे. 

कुणाचा कर्म हाच देव आहे तर कुणाचा योग हाच देव, कुणी भक्तिरसात देव पाहील तर कुणी निर्गुणाचा पुजारी असेल. कुणाच्या बुद्धीत तो त्याला गवसेल तर कुणाला हृदयात दिसेल तर कुणाला निसर्गात दिसेल.  

 सर्वांचा “राम” वेगवेगळा आहे आणि तरीही प्रत्येकाच्या हृदयात  तो एकच आहे असे सर्व संत म्हणतात, तो कालातीत आहे असेही ते म्हणतात. 

 *राम तर रामाच्या ही आधीचा !*  

पुराण कथा सांगते की वाल्या चा वाल्मिकी झाला तेव्हा , वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिले. राम कथेचा जन्म आधी झाला आणि  त्या नंतर श्री विष्णूंनी राम अवतार घेतला .  

या कथेत राम जन्म,अयोध्या, राजा दशरथ, श्रावण बाळ आणि त्याच्या आई वडिलांचा दशरथराजा ला मिळालेला शाप, दशरथ राजाच्या तीन राण्या , श्री रामाचे बंधू  लक्ष्मण, भरत ,शत्रुघ्न , त्या नंतर कथेत आलेला राजा जनक, पृथ्वी कन्या जानकी, सोन्याचा मृग झालेला मारीच, रावण , श्री हनुमान आणि इतर अशा असंख्य व्यक्तिमत्वाचे दर्शन होत होत राम राज्य स्थापित होते.  

रामायणाची ही कथा ऐकत  राम नवमी, हनुमान जयंती, सीता जयंती सारखे उत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात  साजरे होतात.दर वर्षी मंदिरा मंदिरात अखंड जप, भजन,कीर्तन ,प्रसाद यांचा आस्वाद घेतला जातो. सर्व वयोगटातील स्त्री पुरुष भविकतेने आपापल्या भागातील मंदिरात जाऊन दर्शनाचा लाभ घेतात. असा हा पारंपरिक, सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळा पिढ्या न पिढ्या साजरा केला जातो. 

याच मुहूर्तावर  रामरक्षा  मंत्र सिद्ध करण्याचा संकल्प देखील घेतला जातो.  

 श्री राम अशा प्रकारे  कर्मा कर्मात आणि जप, पूजा- अर्चा, होम -हवन ,स्तोत्र पठण अशा धार्मिक कार्यातून आणि राम नवमी नवरात्र, दसरा नवरात्र, दिवाळी,  अशा सांस्कृतिक सण वारातून फार पूर्वीपासून व्यापलेला आहे. 

*हा राम मंदिरात मूर्ती रूपाने आणि मनात भाव रूपाने आजही वसलेला आहे.* 

          *राम आत्ताचा*  ram mandir ayodhya marathi

जशी जशी मानवाची प्रगती होत गेली, उत्क्रांती होत गेली, शैक्षणिक आणि पर्यायाने बौद्धिक वाढ होत गेली, तस तसे मानव विचारांनी अधिक समृद्ध होत गेला. आपल्याच कृतींना तो डोळस पणाने पाहू लागला . त्या वर चिंतन करू लागला. अंधानुकरण न करता आपण काय आणि का करत आहोत हा प्रश्न स्वतःला आणि वडीलधाऱ्या माणसांना विचारू लागला. मानवाचे मन अखंडपणे अधिकाधिक संपन्न होऊ पाहते आहे. 

म्हणूनच मन, मनाचे व्यापार त्याची कारणमीमांसा यावर संशोधन होत राहिले. या साठी परंपरेने चालत आलेल्या गोष्टी आणि त्या मागील कार्यकारण भाव यावर पुष्कळ संशोधन होत राहिले .  

चित्ताची शुध्दता ही सर्वात प्रमुख पात्रता  आहे. त्या साठी  यज्ञ, याग,जप , मंत्र सांगितले आहेत जेणेकरून मन इतरत्र भरकटणे काही काळ का होईना थांबेल आणि हळू हळू सन्मार्गाला लागून चित्त शुद्धी होईल अशी बैठक या मागे आहे हे संतांनी पण वारंवार सांगितले आहे आणि संशोधकांनी देखील आता हे मान्य केले आहे.  

स्व अनुभवासोबत , रंजकता यावी म्हणून कधी काव्य स्वरूपात कधी रूपकात्मक स्वरूपात अध्यात्माचे सार सांगितले गेले आहे. आधीच्या काळात माणसे त्या मनाने साधी होती, भाविक होती . त्यांना साध्या साध्या कर्मकांडातून च खरी भक्ती, डोळस भक्ती म्हणजे काय हे समजावणे इष्ट होते . आजच्या पिढीला वर्तमानातील दाखले द्यावे लागतात. 

यू ट्यूब वर सध्या एका डॉक्टर सर्जन चे एक छोटे व्याख्यान देखील व्हायरल होत आहे. त्यांनी नाम जपाचे महत्व आणि त्यांचे अनुभव सांगितले आहेत. सर्जरी करताना यश देणारा हात हा नेहमी अदृश्य राहतो, निमित्त आपल्या कर्म करणाऱ्या हाताचे होते असे त्यांचे स्पष्ट मत आहे.  

        *राम उद्याचा*  

आजची उगवती पिढी AI म्हणजेच  कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारी बुद्धिमान पिढी आहे. उत्क्रांतीच्या टप्प्यावर वेगाने पुढे जाणारी आहे .  

तिला कदाचित राम कळणार नाही, स्तोत्राचे महत्व, मंत्रांचे परिणाम कळणार नाहीत , पण जे कळण्यासाठी ती धडपड करते आहे आणि जिथे ही धडपड थांबणार आहे तिथेच आपला राम उभा आहे हे आधुनिक अध्यात्म म्हणजेच मन आणि मनोव्यापार या वरील संशोधन सांगते. मुक्ती साठी सारे जीव धडपडत आहेत आणि मुक्ती दाता राम आहे. 

*हा राम असा बुद्धीत, समाधानाच्या, संतुष्टीच्या तहाने मध्ये वसलेला आहे.* 

       *मन आणि आत्मा हेच सीता आणि राम

अध्यात्मामध्ये मन, चित्त, अहंकार यांना पार करून कुंडलिनी शक्ती ला ऊर्ध्वगामी करण्यासाठी श्वासच सहाय्यभूत होतो असे पातंजल योग सूत्रात स्पष्ट म्हंटले आहे .कुणी याला मन आणि आत्मा म्हणेल कुणी सीता आणि राम !  

    स्व अनुभव घेऊन त्यात आधुनिक विज्ञानाच्या ज्ञानाची भर घालून मनाला श्र्वासाच्या साहाय्याने योग्य दिशा देण्यावर भर वर्तमानातील अध्यात्म चिंतकांनी दिला आहे. समाजाला जे समजते त्या भाषेत त्याला त्याची उन्नती साधून देण्याचे कार्य निसर्गात अखंड चालू आहे . 

*विज्ञान, अध्यात्म आणि रामायण* 

आजच्या जमान्यात भोळे भाबडे भाविक जसे दिसतात त्याच बरोबरीने किंबहुना जास्त प्रमाणात डोळस, व्यावहारिक, लॉजिकल विचार करून मगच विश्वास ठेवणारे बौध्दीक भाविक  दिसतात. 

आस्तिक आणि नास्तिक दोघंही भाविक च. एकाचा अनंतावर विश्वास तर एकाचा स्वतः वर विश्वास आहे. दोघांमध्ये तत्वतः फरक करायचे काही कारण नाही . तत्वम् असी म्हणा किंवा अह्म ब्रम्हास्मी म्हणा दोन्ही रस्ते वेगळे मुक्काम मात्र एक असे वेद पुराण सांगते.  

श्री श्री रविशंकर  रामायणाचा अर्थ उकलून सांगताना म्हणतात,  

– आपले शरीर म्हणजेच अयोध्या आहे.  

 – दश इंद्रिये धारण करणारा जीवात्मा  म्हणजे राजा दशरथ होय.  

– राम हा सर्वत्र प्रिय, करुणामय , त्यागी , कर्तव्य प्रिय, एक पत्नी, एक बाणी पण कुठेही न अडकलेला म्हणूनच अलिप्त असलेले आकाश तत्व आहे. आपल्या शरीरातील द्रष्टा हाच तो आत्मा राम !  

– पृथ्वी कन्या सीता ही दैव वशात मारीच रुपी सोनेरी भासणाऱ्या संसार मृगाच्या मोह मायेत अडकून पडलेली महा शक्ती होय. सीता म्हणजे आपले चंचल मन होय. 

– लक्ष्मण म्हणजे काय योग्य काय अयोग्य आहे हे मनाला सतत सांगणारी , मन रुपी सीतेला मोहात अडकु नको हे परोपरीने सांगणारी आपली सद्विवेक बुध्दी होय. 

 -सुविद्य दश ग्रंथी ब्राह्मण आणि आपल्या तपश्र्चर्येने देवांनाही सेवक बनवू शकणारा रावण म्हणजे काम, क्रोध, लोभ , मोह, मद, मत्सर यात अडकलेला आणि या वरच पोसला जाणाराआपला अहंकार होय ! 

या अहंकार रुपी रावणाने मन रुपी सीतेला पळवून लावले. या मनाची, श्वास रुपी मारुती राया च्या मदतीने अहंकारातून सुटका करून तिलाआत्म रुपाशी एकरूप करून घेणे ही मुक्ती होय. 

 महाराष्ट्राचे  आधुनिक वाल्मिकी म्हंटले जाते त्या ग .दी. माडगुळकर यांची गीत रामायणातील गीते अजरामर झाली आहेत.  “आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे ” यातूनही आत्मा आणि मनाच्या या मिलनाचे सार दिसून येते. 

दैव वशात, गुरुकृपेने संसाराचे बरे वाईट अनुभव घेऊन आलेली विरक्ती जेव्हा परमेश्वर भेटी साठी किंवा न समजणाऱ्या कुठल्यातरी अनाम शांततेसाठी, अनाम आनंदासाठी व्याकूळ होते तो भाग्याचा क्षण. 

सर्व संतांनी या व्याकूळ भावाच्या विरहिणी रचल्या आहेत . तळमळ जागी होणे हीच गुरू कृपा हे सगुण भक्तीचे पाठ देणारे संत ज्ञानेश्वर माऊलीं पासून निर्गुण भक्तीचे उपासक संत कबिरांपर्यंत  सर्वांनी एकमुखाने सांगितले आहे. त्यातूनच भक्ती उदयास पावते.  

“सत्य कोणते जाणावे, आता शरण कुणा जावे असे म्हणताना शेवटी ” भक्ती वीण सर्व शीण ” असे रामदास स्वामी त्यांच्या अभंगात म्हणतात. या भक्तीतून च मग हा आत्मा म्हणजेच तेज तत्वी श्री राम होय याची जाणीव होते . आणि हीच विचारधारा योग मार्गी अभ्यासकांची देखील आहे हे देखील दिसून येते. 

२२ जानेवारी २०२4 रोजी संपन्न होणाऱ्या राम लाला मूर्तीच्या स्थापने निमित्त देश भरात ठीक ठिकाणी रामरक्षाची अवर्तने करण्यात आली आहेत.  हिंदू धर्मात रामरक्षा ही संरक्षक कवच मानली जाते. आज ही घराघरात याचे पठण नित्य किंवा संकट काळी भक्तिभावाने केले जाते. 

 दोन वर्षाच्या कठिण काळात अनेक जणांनी अनुभवले आहे. प्रचिती हाच पुरावा !  

या मागे कुठले विज्ञान आहे या वर जाणकार म्हणतात आपले मन आणि मनाची अपार शक्ती ! आपली श्रद्धाच काम करते. 

रामनवमी नवरात्रात रोज १३ वेळा रामरक्षा म्हणून  अनुष्ठान करण्याने ती सिद्ध होते अशी मान्यता आहे. 

यजुर्वेदातील  शांतीमंत्रातून हाच संदेश मिळतो आहे… एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ ! यातूनच उद्याचे राम राज्य स्थापित होणार आहे. 

    ( माझ्या लेखकमित्र कुटुंबातील सर्व वाचक सदस्यांना सविनय नमस्कार !. वाचकहो हा लेख ram mandir ayodhya marathi कसा वाटला ते जरूर कमेंट करून सांगा. आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय. सोबतच आपल्या सूचना,आणि सल्ल्यांचही स्वागत आहे.अश्याच रंजक कथा आणि माहितीपर लेख वाचण्यासाठी आमच्या वेब साईटला जरूर भेट द्या.धन्यवाद !.) 

26 thoughts on “अयोध्येचा राम कोण ? l ram mandir ayodhya marathi”

  1. मोहनीराज तुळशीबागवाले

    खूप छान लेख वाचून आनंद झालाय जय श्रीराम

  2. Arundhati Vishwasrao

    ज्योती, या लेखाची मांडणी मला भावली. सगुणा पासून निर्गुण ते आत्माराम असा आपलाच राममय प्रवास कसा घडतो हे छान व्यक्त केले आहेस!! तसेच मनाच्या निरनिराळ्या अवस्थांमधून आपल्याला उमगत गेलेला राम व वालमिकींपासून अधुनिक काळा पर्यंत दर्श केलेला राम हा समाजाचा आदर्श म्हणून स्विकारलेला राम का झाला हे फार योग्य पध्दतीने मांडले आहेस! 👏🏼👏🏼👏🏼👏🏼 खूप कौतुक

  3. Sulekha Deuskar

    An article that captures the essence of religion , spirituality and culture . A wonderful reading ! Congrats to Ms Jyoti Ekbote , for this enlightening article on the significance of Shree Ram 🙏🏻

  4. Vaidehi Goķhale

    Sundar apratim lekh. Jay Shriram , Jay Sjriram lekha madhe one printing mistake zali ahe . 22 jan 2023 write kele ahe instead of 22 Jan 2024.

    1. मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏🏼
      आता एडिट नाही करता येत..

  5. खुप छान चिंतन आहे ज्योती.
    राम,आत्माराम ते परब्रह्म हा प्रवास साधणे खरंच अवघड गोष्ट आहे पण प्रयत्नपुर्वक आणि अनन्य भक्तीने सोपे होते हेच आपले संत सांगतात. ओंम तत् सत् त्वम असी!
    Keep it up!

  6. अतिशय सुंदर लेख. खूप छान लिहिला आहे. हे वाचनीय कीर्तनच जणू, सर्वांनी नक्की वाचावे असे. लिहित रहा. धन्यवाद. जय श्री राम!!

    1. मनःपूर्वक धन्यवाद !खूप छान प्रतिक्रया आहे ही . प्रेरणादायी 🙏🏼

  7. हा लेख वाचून रामाच्या बाबतीत संपूर्ण जीवनाचे दर्शन घडले आहे. रामाने कोणते प्रकारचे कसे काम केले आणि त्यांची नीतिमत्ता काय होती याबाबत सविस्तर माहिती झाली. आपण लिहीलेल्या लेख अतिशय सुंदर आहे. धन्यवाद. 👏👏

    1. धन्यवाद प्रवीण . तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांकडून देखील खूप शिकता येते. आम्ही शब्दात मांडतो जे तुम्ही कृतीतून करत राहता.
      आपल्या कार्यासाठी लिहायची संधी लवकर मिळो .😊

  8. हा लेख वाचून रामाच्या बाबतीत संपूर्ण जीवनाचे दर्शन घडले आहे. रामाने कोणते प्रकारचे कसे काम केले आणि त्यांची नीतिमत्ता काय होती याबाबत सविस्तर माहिती झाली. आपण लिहीलेल्या लेख अतिशय सुंदर आहे. धन्यवाद. 👏👏

  9. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ ! यातूनच उद्याचे राम राज्य स्थापित होणार आहे. अप्रतिम लिहिले आहे मॅडम.

    1. तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांकडून देखील खूप शिकता येते. आम्ही शब्दात मांडतो जे तुम्ही कृतीतून करत राहता. 😊

  10. Milind Kulkarni

    फारच सुंदर लेख आहे. एवढ्या मोठ्या विषयाचा इतक्या कमी शब्दांमध्ये मागोवा घेणे हे अत्यंत कठीण काम तुम्ही खूप सहजपणे पार पाडलेलं आहे. भगवान श्रीरामांचं स्वरूप सर्वच पातळ्यांवरून इतक्या सहजगत्या उलगडून दाखवल्याबद्दल आपलं अभिनंदन.

  11. 🙏🏼 खूप मनापासून धन्यवाद मिलिंदजी. आपल्यासारख्या जाणकारांकडून अशी दाद मिळाली की प्रेरणा मिळते आणि उत्साह वाटतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top