रेमल चक्रीवादळ : चक्रीवादळांची नावे कशी ठरवतात आणि का?

WhatsApp Group Join Now

चक्रीवादळ ‘रेमल’ पश्चिम बंगालमधील सागर बेट आणि बांगलादेशातील खेपुपारा 26 मे 2024 रात्री चा  दरम्यान धडकला आहे. बंगालच्या उपसागरातून आलेल्या ‘रेमल’ चक्रीवादळाचा फटका बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला बसला असून त्याचे परिणाम राज्याच्या विविध भागातही दिसून येत आहेत. 26 मेच्या चा रात्री रेमल चक्रीवादळ धडकले तेव्हा त्याचा वेग ताशी १३५ किमी होता.  हवामान खात्याने या वादळाबाबत अलर्ट जारी केला असून, त्यामुळे या वादळाला हाताळण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करणात आली आहे.

चक्रीवादळ ‘रेमल’ बंगालच्या उपसागरातील हे वर्षातील पहिले मान्सूनपूर्व उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आहे. सहसा, हिंदी महासागर, अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरावर अनेक उष्णकटिबंधीय चक्रीवादळे तयार होतात. चक्रीवादळे Tauktae, Michaung, Mocha, Biparjoy आणि Tej  ही काही उदाहरणे आहेत. या वाक्या वाचनानंतर तुमच्या मनात नक्कीच एक प्रश्न आला असेल – ‘रेमाल’ (Remal) चक्रीवादळाला हे नाव कसं दिले? आणि चक्रीवादळाला नाव देण्याची गरज का आहे? आपण ही चक्रीवादळाचे नाव सुचवू शकतो का? चला तर मग जाणून घेऊया चक्रीवादळांची नावे कशी आणि का बर दिले जातात.

“रेमल” चक्रीवादळला नाव कसे दिले गेले?

अरबी भाषेत ‘रेमाल’ शब्दाचा  अर्थ  ‘वाळू’ असा होतो.  हे नाव ओमान ने बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना नावे देण्याच्या प्रथेनुसार आहे. यापूर्वी बंगालच्या उपसागरात ‘मिचांग’ चक्रीवादळाचा प्रभाव पडला होता. 2023 मध्ये, चक्रीवादळ मिचांग हे बंगालच्या उपसागरातील चौथे आणि उत्तर हिंदी महासागरातील सहावे चक्रीवादळ होते. त्यावेळी म्यानमारने हे नाव दिले  होते.

पॅनल ऑन ट्रॉपिकल सायक्लोन्स (पी. टी. सी.) हा एक प्रादेशिक गट आहे ज्यामध्ये भारत आणि सागरी स्रोतांच्या सीमेवर असलेल्या इतर देशांचा  ही समावेश आहे. हा गट चक्रीवादळांना नावे देण्यासाठी सहकार्य करतो. पी. टी. सी. चे सदस्य असल्यामुळे ओमान ने चक्रीवादळांना ‘रेमाल’ हे नाव दिले आहे.

क्रीवादळांना नावे देण्याचे महत्त्व

चक्रीवादळांना नावं देणं खूप कारणांमुळे महत्वाचं आहे. वेगळं नाव असल्याने लोकांना चक्रीवादळाची माहिती लक्षात ठेवणं आणि पाठलाग करणं सोपं जातं. यामुळे सरकारी यंत्रणा आणि लोकांमध्ये चांगली संवाद साधता येते. लोकांना जागृता करून योग्य ती खबरदारी घेण्यास मदत होते. जर चक्रीवादळांना नावं नसलं तर त्यांच्याबद्दल चर्चा करणं आणि माहिती समजून घेणं कठीण होईल. विशेषत: तातडीच्या परिस्थितीमध्ये लोकांची सुरक्षा राखण्यासाठी नेमकी माहिती देणं गरजेच असतं. त्यामुळे चक्रीवादळांना नावं दिल्याने गोंधळ टाळण्यास मदत होते.

चक्रीवादळाचे नाव देण्यामागचा इतिहास

जागतिक हवामान संघटना World Meteorological Organization – WMO ही संयुक्त राष्ट्रसंघाची United Nations एक संस्था आहे. ही संस्था हवामान आणि आपत्ती यांच्यावर काम करते. आर्थिक आणि सामाजिक आयोग – आशिया आणि पॅसिफिक Economic and Social Commission for Asia and the Pacific – ESCAP हा देखील आशियातील अर्थव्यवस्थांच्या विकासावर लक्ष केंद्रित करणारा संयुक्त राष्ट्रसंघाचा गट आहे.

१९७२ मध्ये, WMO ने लक्षात घेतले की उत्तरेकडील हिंदी महासागराच्या ज्यामध्ये अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर समाविष्ट आहेत, या परिसरातील देशांनापण  चक्रीवादळांचा सामना करताना मदतीची गरज लागेल , म्हणून त्यांनी पॅनेल ऑन ट्रॉपिकल सायक्लोन्स Panel on Tropical Cyclones(PTC) नावाचा एक गट तयार केला. या गटात आठ वेगवेगळ्या देशांनी भाग घेतला. त्यात बांगलादेश, भारत, मालदीव, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, ओमान आणि थायलंड यांचा समावेश होता.

पूर्वी चक्रीवादळांची ओळख अक्षांश Latitude आणि रेखांश Longitude या गुंतागुंतीच्या आकडेवारीच्या आधारे केली जायची. मात्र, सर्वसामान्य जनतेसाठी या आकडेवारी समजून घेणे कठीण होत . म्हणून  हवामान तज्ज्ञांनी लोकांशी चांगले संवाद साधण्यासाठी चक्रीवादळांना नावं देण्यास सुरुवात केली. २००० मध्ये, चक्रीवादळांवर नजर ठेवणे सोपे व्हावे म्हणून त्यांना नावं देण्याचा निर्णय PTC ने घेतला. प्रत्येक देशाने नावे सुचवली आणि PTC ने त्यातील सर्वोत्तम नावे निवडली. २००४ पासून त्यांनी चक्रीवादळांना नावं देण्यास सुरुवात केली. २०१८ मध्ये इराण, कतार, सौदी अरेबिया, युनायटेड अरब एमिरेटस आणि येमेन ही आणखी काही देशे PTC मध्ये सामील झाली.

चक्रीवादळांची नावे कशी दिली जातात

लोकांना चक्रीवादळाच्या इशाऱ्यांवर लक्ष घालता यावं आणि योग्य ती पावले उचलता यावीत यासाठी चक्रीवादळांबद्दल अधिक प्रभावीपणे संवाद साधण्याची गरज होती. त्यामुळेच चक्रीवादळांना नावं देण्याची ही पद्धत रुजु झाली. चक्रीवादळांना नावं देण्याची पद्धत ही हवामान शास्त्रातील एक मनोरंजक गोष्ट होती. विशेषत: एकाच वेळी अनेक चक्रीवादळं येत असताना हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांना  आणि सर्वसामान्य लोकांमध्ये चांगला संवाद साधण्यासाठी याचा उपयोग केला जातो. चक्रीवादळांची नावं कशी ठरवली जातात याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया.

·      चक्रीवादळांना नावे देण्याचे निकष

सागरी चक्रीवादळांना नावं देण्याची जबाबदारी वेगवेगळ्या प्रदेशातील हवामान खात्याची असते. प्रत्येक प्रदेशाकडे आधीच ठरवून ठेवलेल्या नावांची यादी असते. एखादं नवं चक्रीवादळ तयार झालं की, त्या यादीतील पुढचं नाव त्या चक्रीवादळाला दिलं जातं. गोंधळ टाळण्यासाठी आणि सगळीकडे सारखीच नावं वापरावीत म्हणून ही यादी आंतरराष्ट्रीय समिती बनवतात आणि जपून ठेवतात. अशा पद्धतीने चक्रीवादळाची ओळख व्यवस्थित रीत्या होते आणि त्यामुळे कोणत्या चक्रीवादळाबद्दल बोलत आहोत हे सहज कळतं. चक्रीवादळांची यादी तयार करण्यासाठी नावं सुचविणाऱ्या देशांना काही नियमांचं पालन करावं लागतं.

–          नावं राजकीय, धार्मिक किंवा आक्षेपार्ह असू नयेत.

–          ती नावं छोटी, उच्चारायला सोपी आणि आठ अक्षरांपेक्षा कमी असावीत.

–          प्रत्येक देश काही नावं सुचवितो आणि PTC त्या सर्वोत्तम निवडते.

–        नवीन चक्रीवादळ निर्माण झालं की, यादीतील पुढील नाव त्याला मिळतं. कोणत्या देशाने ते नाव सुचवलं याचा विचार केला जात नाही.

–          उदाहरणार्थ, पहिल्या चक्रीवादळाला निसर्ग बांग्लादेशाचे सुझावलेले होते  आणि पुढील चक्रीवादळाला गति भारताचा सुझावलेले होते.  

·       क्षेत्रानुसार नावे देण्याची पद्धती

जागतिक स्तरावर, वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या नावे देण्याची पद्धती आहेत. पॅसिफिकमध्ये, सदस्य राष्ट्रांनी सुचविलेल्या नावांच्या यादीमधून वादळांची नावं निवडली जातात. हिंदी महासागरातील चक्रीवादळांची नावं ही थायलंड, श्रीलंका आणि भारतसारख्या देशांनी सुचविलेल्या यादीमधून निवडली जातात. प्रत्येक प्रदेश त्यांच्या स्वत:च्या परंपरांचं पालन करतो जेणेकरून नावं योग्य आणि संबंधित असतील. या पद्धतींमुळे स्थानिक भाषा आणि सांस्कृतिक आवडी प्रतिबिंबित होऊन प्रभावित झालेल्या लोकांना ही नावं अधिक सोयीस्कर होतात.

वर्षानुवर्षे लक्षणीय बदल

चक्रीवादळांना नावं देण्याच्या पद्धतीमध्ये अनेक महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. या प्रमुख बदलांमध्ये पुरुषी नावं समाविष्ट करणे, क्षेत्रीय संघटनांचा सहभाग आणि जुन्या नावांचा निवृत्तीचा समावेश आहे. या बदलांमुळे चक्रीवादळांना नावं देण्याची पद्धत अधिक स्वीकारार्ह आणि प्रभावी बनली आहे.

आपण ही चक्रीवादळाचे नाव सुचवू शकतो का?

       होय आता आपण ही चक्रीवादळाचे नाव सुचवू शकतो. भारतीय हवामान खात्याने ही सुविधा    उपलब्ध करून दिली आहे.

तुमचे सुचवलेले नाव डायरेक्टर जनरल ऑफ मेटेरोलॉजी, इंडिया मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट, मौसम विभाग, लोधी रोड, नवी दिल्ली – ११०००३ या

 पत्त्यावर पाठवा. तुमच्यासोबत तुमचा संपर्क क्रमांक आणि पत्ता नक्की द्या.  परंतु लक्षात ठेवा की सुचवलेले नाव वर दिलेल्या चक्रीवादळाच्या

 नावे देण्याचे  निकषात असावे.

       अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिल्यला वेबसाइटला भेट दियू सकता.

https://mausam.imd.gov.in

निष्कर्ष

चक्रीवादळांना व्यवस्थित रीत्या नाव देणे ही आपत्ती व्यवस्थापनात  खूप महत्वाची भूमिका बजावते. स्पष्ट संवाद सुलभ करून, लोकांमध्ये जागृकता निर्माण करून आणि तयारीला प्रोत्साहन देऊन ही नावं समुदायांना या शक्तिशाली चक्रीवादळांच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम बनवतात. जीव वाचवण्यासाठी आणि नुकसान कमी करणे यासाठी येणाऱ्या संभाव्य चक्रीवादळांबद्दल माहिती असणे आणि आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक असते.

तुम्हाला “रेमल चक्रीवादळ : चक्रीवादळांची नावे कशी ठरवतात आणि का?” या बद्दलची माहिती कशी वाटलीते आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या लेखक मित्र‘ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.

धन्यवाद !                 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top